Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 07, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » ललित » चिमटा » Archive through July 07, 2006 « Previous Next »

Yog
Thursday, July 06, 2006 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिमटा

पोटाला चिमटा बसतो तेव्हा त्या गोष्टीची किम्मत कळते. अगदी खरे आहे. हा चिमटा स्वतः स्वताला काढून घेणारे मात्र फ़ारच दुर्मिळ. तसे लहानपणापासून पुढे अनेक वर्षे आमच्या ओळखीत होता तो फ़क्त मामीचा चिमटा,तिने रागाने तिच्या मुलान्च्या पोटाला काढलेला चिमटा. बिचारी मामीची मुले त्या चिमट्याला घाबरून सकाळी दात घासण्यापासून ते रात्री देवाचे नाव घेवून झोपेपर्यन्त सर्व कामे कशी शिस्तीत पार पाडत असत. कुठे कमी जास्त वा चूक गडबड झाली की मामीने त्यान्च्या पोटाला काढलेल्या चिमट्याचे वळ दोन दिवस टिकून रहात. आता या चिमट्याचे रहस्य म्हणजे मामी पुण्याची,त्यातून सरकारी शाळेत शिक्षक, त्यातून शिस्तप्रीय, त्यातून घरची परिस्थिती बेताची, असे म्हणता येईल.
मामीचा चिमटा इतका प्रसिध्ध होता की "मामीने चिमटा घेतला तर प्रेतही कळवळून उठून बसेल" असे आम्ही गमतीने तिला चिडवत असू. प्रेत नाही पण तिच्या मुलाना ती जवळून गेली तरी दचकताना मि पाहीले आहे. अर्थात आज त्या मुलान्च्या अन पर्यायाने मामीच्या आयुष्याचे सोने झाले यामागे ती शिस्त, संस्कार अन बर्‍याच अर्थाने तो चिमटा कारणीभूत आहेच. कित्त्येक वेळा स्वतःच्या पोटाला चिमटा घेवून तिने सर्व कुटुम्बाला वर आणले, ते वळ कुणाला दिसले नसले तरी त्याची जाण आहे, हेही खरं. या जगात जिथे स्वताला कमी करून दुसर्‍याला पुरवणारे आहेत तिथेच स्वताच्या घरची साखरेची पोती लपवून दुसर्‍याच्या हातावर फ़क्त चिमटीभर साखर ठेवणारे वाणीही आहेत. कीडा मुन्गीलाही "विठ्ठल" समजून साखरेची अन गुळाची पोती मुन्ग्या अन मुन्गळ्यान्साठी उघडे करणारा सन्त तुकाराम वाणी एखादाच, आमचा अनीही तसाच.
अनी,
अनीचे सम्पूर्ण नाव काय हा प्रश्ण तितकासा मह्त्वाचा नाही कारण सर्वाना तो अनी म्हणूनच अधिक ठावूक होता. अनी म्हटल की हसरा चेहेरा, बान्धेसूध शरीर, अन एक वेगळीच आकर्षित करणारी आपुलकी.

तशी अनी ची अन माझी ओळख परदेशातली. पण पहिलीच ओळख झाली तेव्हा मात्र अगदी गेली अनेक वर्षे एकमेकाना ओळखत असल्यागत आम्ही गप्पा मारल्या होत्या, पन्चम आणि किशोरदा हे दोघान्च्याही जिव्हाळ्याचे विषय असल्याने थन्डीतील बर्फ़, शाळेचे तास, रुममेट्स पासून चालू झालेली चर्चा पन्चम अन किशोर चे एकत्रीत शेवटचे गाणे कुठले यावर सम्पली तेव्हा तब्बल अर्धा दिवस उलटून गेला होता. त्या दिवसापासून ते आजवर कितीतरी छोट्या मोठ्या गोष्टीतून अनी सतत आठवतो. तसा तो काही बडे बाप का बडा बेटा नव्हता. असाच इतर चार चौघान्सारखा मध्यम वर्गीय घरातून धडपड करून मेहेनत करून वर आलेला. स्वताबद्दल नाही इतकी काळजी दुसर्‍याची करत असे. त्याच्या या स्वभावाचा गैरफ़ायदा लोक घेत हे त्याला माहित होते पण परोपकारातून त्याला काय अन कुठला परमोच्च वगैरे आनन्द मिळत असे देव जाणे. आम्ही मित्र त्याला गमतीते "सन्त अनी" म्हणत असू. सन्त गाडगेबाबा, गोरा कुम्भार, सन्त तुकाराम वगैरे आम्ही पुस्तकातून वाचलेत पण इतरान्च्या घरी झाडू घेवून साफ़ सफ़ाईत मदत करणारा, कधीही वेळी अवेळी, रात्री अपरात्री मदतीला जाणारा, स्वताला कमी करून दुसर्‍याला देणारा अनी आम्ही प्रत्त्यक्ष पाहिलाय, आमच नशीब तोही आमच्यातलाच एक हाडामासाचा मनुष्य होता नाहितर सन्त अन देव पुस्तकात अन तसबिरीत नाहितर दगडात शोधायची आपली बालपणापासूनची शिकवण. अन्याने त्याचा हा सन्तपणा एकदा माझ्याही बाबतीत दाखवला होता.

अनी खूप emergency आहे रे दोन हजार डॉलर्स हवे आहेत असे म्हटल्यावर या माणसाने तासाभरात पैसे हातावर ठेवले अन म्हणला सवडीने परत कर. कशाला हवे आहेत, काय emergency आहे, कधी परत देशील, किती परत देशील, एक नाही की दोन नाही. पुन्हा एव्हडी रक्कम हातावर ठेवून जणू काही गणपतीच्या आरतीचा प्रसाद वाटल्यागत हात झटकून मोकळा. त्याच्या त्या उदारपणावर फ़िदा व्हाव का त्याचा हेवा करावा हेच कळत नसे. त्यानन्तर काही दिवसानी आम्ही असेच एका मॉल मधे गेलो होतो खरेदीला. तेव्हा सध्ध्या जरा तन्गी आहे म्हणून अनीने काहिही खरेदी केले नाही तेव्हा मागावून कळले की मला पैसे दिले तेव्हा बेट्याला स्वताच्या assistantship बद्दल चिन्ता होती. ते कळले तेव्हा इतके भयन्कर अपराधी वाटले की केवळ दोस्तीचा हक्क म्हणून आपण अन्याला गृहीत धरले पण ते पैसे देताना त्याला अडचण होती हे आपल्या लक्षातही आले नाही याची बोच लागली. खर तर स्वताचे पैसे न जाता देखिल एका वेगळ्याच अर्थाने त्या दिवशी चिमटा बसला होता अन मनात वळ उठले होते. पुढे वेळेत त्याचे पैसे परत केले, व्याज देवून शिवाय वर अधिक रक्कम देवून तरिही कितिही दिले असते तरी ती रक्कम, स्वताला कमी करून अन्याने माझ्या भागवलेल्या गरजेपूढे नगण्य होती. जेव्हा मि तसे अधिक पैसे परत केले तेव्हा अन्या म्हणला "अरे मित्रात कसले आलेय व्याज आणि favor ? अन्या हा असा होता सुखद धक्के देणारा. घरापासून दूर इतक्या लाम्ब अनीच्या रुपाने एक जीवलग भेटला म्हटले तरी चालेल. दोघान्ची एकच परिस्थिती, चिन्ता, व्यथा अन मिळत्या जुळत्या आवडी निवडी या रसायनातून आमची chemistry अशी काही फ़ीट जमली की त्या भावबन्धाना मित्र, भाऊ, सखा, सोबती, अशा कुठल्याही नात्याचे नाव देणे म्हणजे आजीवन उर्जेचे स्त्रोत असणार्‍या अणू रेणूना एखाद्या तीन चार वर्तुळी nucleus मधे बन्दिस्त करण्यासारखे आहे.

अनी जितका मनमिळावू तितकाच लाजरा. इथे युनिवर्सिटीत एका मुलीवर जीव होता त्याचा म्हणजे तेही एकतर्फ़ीच. अर्थात प्रेम, आकर्षण, अफ़ेयर इत्यादी मायाबाजारात "ईतर" बाह्य गुणाना जास्त भाव असतो हे त्याला माहीत नसावे. तशी ती बया काही अप्सरा नव्हती पण इतर चार चौघानी डोक्यावर बसवलेली असल्याने तेव्हड्या उन्चीवरून तिला बहुदा जमिनीवर चालणारा अनी दिसला नसावा किव्वा तिने पुराण कथान्मधील खोटे ध्यान लावून बसलेल्या देव वा ऋषीन्सारखे त्याला neglect केले असावे असे माझे मत. सौ बात की एक बात, अनीने तिच्यासाठी बरेच जीवाचे रान केले असले तरी शेवटी तो एक वनवासच होता. हा अधुनिक युगातील राम अन्गावरील वलकले शोधत होता (म्हणजे तिच्यासाठी भेट म्हणून छानसा पोशाख खरेदी करत होता) तेव्हा त्याची जान(की) मात्र कान्चनमृगान्मागे धावत होती.
"जाऊदे न यार, चलता है पण ती सहीच आहे रे, i like her " असे म्हणून अनीने माझे तोन्डच बन्द केले. म्हणजे दशा याची अन चरफ़ड मला. असो. अनी सारखी माणस पैदा होतात की परिस्थितीने बनतात हा एक गूढ प्रश्ण आहे.

अनी बरोबर तब्बल सात ते आठ वर्षे एकत्र काढली असतील. त्याच्या बारीक सारीक सवयी, बोलताना मधेच जरा हात मोकळे केल्यागत डोक्याच्या मागे हाताची घडी घालण्याची ति लकब, गुलजार, पन्चम अन किशोरदा या सर्व दैवतान्च दिवाणाखान्यातील कपाटात त्याने सजवलेल देवघर, पोथ्या नाहीत पण audio cassette अन cd च ते अफ़ाट कलेक्शन, सन्ध्याकाळी पर्वचा म्हटल्यागत रोज एक तरी पन्चमगीत गुणगुणायची सवय, कधिही कुठल्याही गोष्टीवरून आतातायीपणा न करण्याचा अजब सय्यम, अन अजून बरेच काही. नविन semester चालू व्हायच तेव्हा तर त्याच्या सन्तपणाला ऊत येत असे. कुणाला एयरपोर्ट वर पिकप कर, कुणाला शाळेत सोडून ये, कधी कुणाच ग्रोसरी सामान आण, कुणाला assistantship मिळवून द्यायला मदत कर, कुणाला भारतात फोन लावून द्यायला फोन कार्ड दे (आई वडिलान्पासून इतक्या दूर परक्या देशात आलेल्याना तो एक फोनच तेव्हा किती जवळचा वाटे), कुणाला campus फ़िरवून आण, कुणाला अभ्यासात मदत कर, एक ना हजार गोष्टी. याला याच्या कामातून इतका वेळ मिळतो कसा, अन एकाही दमडीची अपेक्षा न करता किव्वा कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता हा प्राणी इतक्या लोकाना इतक्या वेळी पुरे पडतो कसा हे न उलगडलेल कोड आहे. इतक करूनही पुन्हा कुठेही चल म्हटले की गडी सापडेल तो शर्ट चढवून तयार.
अनीच व्यक्तिमत्व शब्दात पकडण कठीणच आहे. कितीही लिहील तरी ती गाथा सम्पणार नाही पण एक दिवस असा अचानक अनी ही गाथा सम्पवून गेला. एका दुर्दैवी अपघातात त्याच निधन झाल. ढसा ढसा रडण या शब्दान्चा अर्थ त्या दिवशी पहिल्यान्दा मला कळला. त्याच अन्त्यदर्शन घेतल तेव्हाही "जाऊ दे रे, हे चालायचच" असे काहितरी म्हणून तो परत उठून बसेल असे वाटले होते पण तसे घडले नाही.
आयुष्याकडून अनीच्या फ़ार काही महाकाय अपेक्षा नव्हत्याच. इतर चार चौघान्सारखेच शिकून मोठे व्हायचे, काहितरी करून दाखवायचे, शक्य झाल्यास स्वरचित गझल्स चा सन्ग्रह काढायचा (गुलजार अन पन्चम त्याच्या रक्तात भिनले होते, बहुदा अनीने रचलेल्या अनेक गीत गझलान्मागे त्याच्या त्या दैवतान्ची प्रेरणा होती), एखाद्या मस्त छान कोकणस्थ गोर्‍या सुन्दर मुलीशी संसार करायचा, आपल्या पैशातून आई वडिलाना जग दाखवायच अन आयुष्याच्या सन्ध्याकाळी मस्तपैकी चहाचे घुटके घेत पन्चम, गुलजार अन किशोरदा मनात भरायचे. देशाच्या आर्थिक समस्या, दन्गे धोपे, उत्पात, राजकीय घडामोडी, जात पात अन असे अनेक वितन्डवाद यापेक्षा त्याला त्याच्या भोवतीच्या मित्र मैत्रीणीन्च्या सुख दुख्खाची चिन्ता अधिक होती, स्वतापेक्षाही कणभर जास्तच.

अजूनही युनिवर्सीटीच्या आवारात कधि गेलो की अन्या भेटतो. आम्ही रहात असू त्या अपार्ट्मेन्ट च्या परिसरात गेलो की सहस्त्र वर्षान्च वादळ दाटून याव तशा अनेक आठवणी नव्याने जन्म घेतात, सर्व गात्र जड होतात,मन सुन्न होते. टेनिस खेळायला अनी जुनेच नायकीचे बूट अन आवडती racket घेवून तयार असेल असे वाटत रहाते. बेट्याने सर्व काही दिलखुलासपणे उधळले, एक tennis racket सोडून, तेव्हडी एकच गोष्ट काय त्याने मलाही दिली नाही.

अनी गेला हे अजूनही मि स्वताला समजावत असतो, तो या जगात नाही हे पटवून घ्यायला स्वताला चिमटा काढून घ्यावा लागतो. अवती भोवती अजून असेच कितीतरी अनी असतीलही, पण हा अन्या नसेल. माणुसकी दुर्मिळ झालेल्या या जगात असे अनी का आणि कुठून येतात याचे उत्तर तोच देवू शकेल. बरे आहे, एकटाच गेला, बायको मुले असती तर त्याना त्याच्या पश्चात व्याप झाला असता असे म्हणावे का अरेरे अनीच आयुष्य का सम्पल अस म्हणाव तेच कळत नाही. जन्म मृत्त्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का आपल्याच मनाचे खेळ हे उमगत नाही. पण अनी "आहे" म्हणून जग सुसह्य्य आहे.

कधि मूड येईल तेव्हा अनीबरोबर उजळणी केलेले गुलजार, पन्चम अन किशोरदा चे कलेक्शन ऐकत बसतो अन दर वेळी गुलजार ने पन्चम बद्दल (पन्चम गेल्यानन्तर) केलेल निवेदन ऐकले की काळ थाम्बतो, उरतात फ़क्त काही ओल्या आठवणी...
("जिन्दगी का ये खेल अकेले नही खेला जाता पन्चम, हमारी तो टीम है, आ जावो या बुलालो...")

अनी, तेरे बिना जिन्दगी से शिकवा तो नही, तेरे बिना जिन्दगी भी लेकीन जिन्दगी तो नही...


(चिमटा : अनी(माझ्यातला) : काल्पनिक?)


Ninavi
Thursday, July 06, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर. xxxx xxxx xxxx

Chinnu
Thursday, July 06, 2006 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आ जावो या बुलालो की भुलालो?
...मी वाचता वाचता दमले रे! :-)


Yog
Thursday, July 06, 2006 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chinnu,
धन्यवाद! typo दुरुस्ती केली आहे

Aashu29
Thursday, July 06, 2006 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे अनि खरच असतात का रे? मला नाहि कधि असे मित्र मिळाले, तसे करतात खूप मदत , पण अशी? समरसून!!!
अश्रु आले बघ डोळ्यात!!
सुंदर लिहले आहेस!

Dineshvs
Friday, July 07, 2006 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, या बाबतीत मी खुप भाग्यवान आहे. अगदी तुझ्या अनी सारखे नसले तरी माझ्यासाठी जीवाचे रान करणारे खुप मित्र भेटले.
आणि त्यांचे ऋण फ़ेडायचा फ़क्त एकच मार्ग असतो,
आपणहि त्यांच्यासारखे बनायचे.


Limbutimbu
Friday, July 07, 2006 - 12:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, चिमटा व अनि शब्दानन्तर काल्पनिक पुढे प्रश्ण चिन्ह का दिलेस?
असे अनि आजुबाजुला असतात, बघण्याची नजर असेल तर दिसतात, ते तसे असतात त्यातुन जगातील चान्गुलपणा शिल्लक रहातो
चिमटे पण असतात... नाना प्रकारचे!
एकुणात तू छान लिहिल हेस! :-)


Yog
Friday, July 07, 2006 - 12:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dinesh,
अगदी...
limbu,
बहुदा मला ती पन्चलाईन (त्यात दडलेल रुपक) नीट व्यक्त करता आली नाही बहुतेक. थोड बदलल आहे बघ काही सन्दर्भ लागतोय का..?
(अनी हे माझेच दुसरे अस्तित्व. कुठेतरी काळाच्या ओघात माझ्यातील अन तुमच्या आमच्या आतील हा अनी मेला म्हणजे हरवला. त्याची आठवण येत रहाते. अनी "आहे" म्हणून या शेवटच्या वाक्यातून ते व्यक्त करायचे होते अन त्याच बरोबर प्रत्त्यक्षात असा अनी खरच भेटला असे एक जिवन्त चित्रण उभे करायचे होते.
या लेखातील प्रत्त्येक details ला तन्तोतन्त जगलेला अनी नाही भेटला पण दिनेश म्हणतो तसे थोड्या फ़ार फ़रकाने असे अनी अवती भोवती असतात. म्हणूनच याला काल्पनिक तरी म्हणावे का हा मलाच पडलेला एक प्रश्ण, म्हणून ते प्रश्णचिन्ह.)


Limbutimbu
Friday, July 07, 2006 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह, आता कळले तुला काय म्हणायचे ते! :-)
आपल्यातल्या अनिच असण हा "निरागसतेचाच" एक वेगळ्या प्रकारचा अविष्कार असु शकतो. काळाच्या ओघात पुरेसे "बनचुके" झाल्यावर निरागसते सोबत आपल्यात दडलेल्या अनिचाही मृत्यु होतो! उरतात आठवणी!
मात्र कित्येक जणान्च्या बाबतीत तर त्याही पुढे पाऊल पडते ते म्हणजे दुसर्‍या कुणात असा अनि प्रत्यक्ष दिसला तर तो करीत असलेल्या कामाची "लष्कराच्या भाकर्‍या" अशी कुचेष्टेने सम्भावनाही करणारे कमी नाहीत, जावुदे, तो विषयच वेगळा हे!
पण अस वाटत की निरागसतेच्या अस्तित्वाशिवाय परोपकार असु शकेल की नाही याची शन्का हे! मी निरागसतेचा अर्थ व्याप्ती शोधू पहातोय म्हणुन हे लिहिले


Rahulphatak
Friday, July 07, 2006 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, खरोखरचं अशी व्यक्तिमत्व शब्दात पकडणं फार कठीण.
देशाच्या आर्थिक समस्या, दन्गे धोपे, उत्पात, राजकीय घडामोडी, जात पात अन असे अनेक वितन्डवाद यापेक्षा त्याला त्याच्या भोवतीच्या मित्र मैत्रीणीन्च्या सुख दुख्खाची चिन्ता अधिक होती, स्वतापेक्षाही कणभर जास्तच. >>>> हे फार महत्वाचे आहे रे !

त्याचा स्वभाव, व पंचमच्या उल्लेखामुळे नकळत बंध तयार झाले अनि बद्दल वाचताना.. त्याच्या निधनाचे वाचून ....... !


Raina
Friday, July 07, 2006 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग,

चिमट्याची कळ यथोचीत जाणवली. आपलं लेखन मनापासून आवडलं


Gs1
Friday, July 07, 2006 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा छान लिहिले आहे. कॉलेजमध्ये असा एक मित्र मलाही लाभला आहे.


Rajkumar
Friday, July 07, 2006 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर.. असा मित्र लाभायलाही भाग्य लागते खरे..

Mi_anu
Friday, July 07, 2006 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगले लिहीले आहे. अनिच्या आत्म्याला जिथे असेल तिथे शांती मिळो.

Jo_s
Friday, July 07, 2006 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग,
......
......
......
चिमटा
......
......
......
जाणवला.

सुधीर



Badbadi
Friday, July 07, 2006 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. .. .. सहज म्हणून वाचायला सुरूवात केली.. आणि आता ऑफ़िस मध्ये डोळ्यातलं पाणी लपवायचा प्रयत्न चालू अहे...

Rupali_rahul
Friday, July 07, 2006 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच एकदम सुंदर कथा योग. डोळ्यातुन पाणी कधी आले तेच कळले नाही...

Paragkan
Friday, July 07, 2006 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Good one!

Shreeya
Friday, July 07, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम लेख!!
खूप आवडला. पण शेवटी हे प्रश्नचिन्ह का?
काल्पनिक तर नाही वाटत(?)


Chandya
Friday, July 07, 2006 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भावस्पर्शी!!. छान लिहिले आहेस रे योग. काहिसे आत्मचिंतनात्मक वाटले.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators