आठवण आठवणींच्या सुवर्ण क्षणांना गुंता म्हणु नकोस त्या जर का नसतील तर अर्थ नाही जीवनाला दु:खातले चार सुखद क्षण जखमेवरची खपली विरहातील सांत्वन एकांतातील सखासुद्धा त्याच असतात त्यांचे मह्त्व विचारुन बघ तु मुलांपेक्षा दुर रहाणार्या आईला विरहातील एका प्रेयसीला पालकांपासुन दुर परदेशातल्या मुलांना सासरी जाणार्या मुलीला आईसाठी तो असतो अश्रुंचा काळ प्रेयसीसाठी परिक्षेची वेळ परदेशातील मुलांचा स्वप्नाळु छंद मुलींना मिळतो मात्र त्याने त्रिकाळ आनंद... त्याच जर का नसत्या तर कसे राहिले असते हे सगळे??? रुप...
|
योगी सही चाललय रे... चालु दे
|
म्हटले भेटितच तक्रारींचा सुर लावीन तुझ्याकडुन सॉरीची अपेक्षा ठेवीन पण भेटितच तुझे निरागस हास्य पाहिले नि मनातले कटु विचार हवेत विरले.. भ्रमा, लोपा... कसातरी पहुंचा रे..
|
योगि तु लिहितोस.. माहित नव्हते,... >> लोपा, निळ्या शाईत पहिल्यांदाच लिहितोय.. रुप.. टिमलकलक ते टिमलकलक कविता छान..
|
>>रुप.. टिमलकलक ते टिमलकलक <<<< योगी काही कळले नाही...
|
R_joshi
| |
| Saturday, July 01, 2006 - 6:02 am: |
| 
|
योगी सुरुवात छान झाली आहे. नवी सुरुवात शब्दांची संगे तुझ्या झाली नवी दिशा अर्थाची आज मला सापडली प्रिति
|
thnks प्रि.. सगळी बॉसची कृपा.. रुप.. background music दिलिय 
|
लय आज मला सापडली जगण्याची अशीच राहु दे संगत तुमची या काटेरी वाटेवरती.. आयुष्यात कठिण वळणे आहेत फार, पण तुमच्या संगे करीन ती पार..
|
तुझे राग़ावलेलं मन मला अगोदरच भेटते मग त्याला खुलवायला मला गोड हसावेच लागते... रुप... हाय प्रिती...
|
Mruda
| |
| Saturday, July 01, 2006 - 7:19 am: |
| 
|
तुझ्याशिवाय जगणं नाही हे विसरायचं ठरवलंय.... मन मेलं तरीही जगायचं ठरवलंय.... मृ
|
तुझ हसण पहाण्यासठी मला रुसाव लागत तु रुसल्यावर मात्र मलाच हसु फुटत
|
Smi_dod
| |
| Monday, July 03, 2006 - 1:22 am: |
| 
|
मेलेल्या मनाने जगणे सोपे आहे हे मला आत्ता उमगले जेव्हा जगणे तुझ्याशिवाय जगले संथ स्तब्ध... अर्थहिन!!!!
|
मेल्या मनाने जगायला मन स्वताच असाव लागतं दुसर्याच्या मनात सतत हसुन जगाव लागतं रुप...
|
Jo_s
| |
| Monday, July 03, 2006 - 7:30 am: |
| 
|
मृदा, हर्शु, स्मि., रुपाली छान चाललय
|
Vnidhi
| |
| Monday, July 03, 2006 - 11:09 am: |
| 
|
दुसरया साठी जगता जगता स्वत: जगायचे विसरून गेले, आता जगणे असह्य झालेय, पण म्हणलं ना.. दुसरया साठी जगावे लागते....
|
Vnidhi
| |
| Monday, July 03, 2006 - 11:16 am: |
| 
|
तुझी आठवण.. मोरपिसा सारखी जपुन ठेवली आहे, कारण... मनाचा मोर आता कधिच नाचणार नाहीये..
|
Paragkan
| |
| Monday, July 03, 2006 - 5:51 pm: |
| 
|
श्वास अडतो तेव्हा तेव्हा जगण्यावरचे प्रेमच नडते जगणे अडते तेव्हा फक्त श्वासांचे या देणे उरते ...
|
कोणासाठी तरी म्हणुन श्वास अडतो.. जगण्यासाठी नाही.. पण कोणी असले तरच श्वासही उरतो.. नाहीतर नुसते जगण्यासाठी तोही कमी पडतो......!!!
|
अरे व्वा!! मस्तच चाललय सुधीर धन्यवाद
|
तुझ्या गालावरच्या ख़ळ्यांच्या प्रेमात मी पडलोयं पण तुला कस सांगावं याच्या विचारात मी गढलोय रुप...
|