Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 01, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » काव्यधारा » झुळुक » Archive through July 01, 2006 « Previous Next »

Jayavi
Thursday, June 29, 2006 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेडेपणाला नको घाबरुस
नको कमी लेखूस स्वत:ला
शहाण्यांच्या ह्या जगात कधी तरी
येते किंमत या वेडेपणाला




R_joshi
Thursday, June 29, 2006 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह वाह!!!!!
आज झुळुक अधिकच रंगात आली आहे. सर्वानीच फार छान लिहिले आहे.


R_joshi
Thursday, June 29, 2006 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शहाण्याच्या जगात मी
नेहमीच वेडी ठरते
म्हणुन कल्पनेच्या जगात
मी जास्त वावरते


Rupali_rahul
Thursday, June 29, 2006 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेडी ठरण्याचे दु:ख़ कधिच नव्हते मला
फ़क्त शहाण्यांच्या बाजारात नेहमीच कमी पडते, का कळत नाही मला???

रोजच्या जीवनात शहाण्यांसारख वागताच येत नाही
कित्तिही समजावले तरी मनाला थोपवता येत नाही

जगाच्या फ़ाफ़टपसार्‍यात आहे पैश्याला महत्व
नको तिथे देत असते मी भावनांना महत्व

दुसर्‍याकडे बघायला इथे आहे कोणाला वेळ
विकत घेतात पैशाने, आनंद असो वा भेळ

दु:ख़ दारिद्र्य, गोठल्या सगळ्यांच्या संवेदना
पैशाने विकत घेतल्या सगळ्यांनी वेदना

आजच्या या जगात "सबसे बडा रुपय्या"
मी सगळे निमुट बघते करुन मनाच हिय्या

मनात मात्र सतत चालु महायुद्ध असत
पण त्यात नेहमी जिंकत प्रेमच असतं
पण त्यात नेहमी जिंकत प्रेमच असतं...


रुप...


Rdb
Thursday, June 29, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणूनच रुचते मला
असे एकटे रहाणे
"वेडा, वेडा" ऐकून
चुप बसणारेच शहाणे..

राहून बघावे स्थितप्रज्ञ
न करता कुठलेही गार्‍हाणे
करू द्यावे उपद्व्याप त्यांना
आपण शांतपणे पहाणे!

आशीष



Lopamudraa
Thursday, June 29, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनात मात्र सतत चालु महायुद्ध असत
पण त्यात नेहमी जिंकत प्रेमच असतं >>>>>
kharay g... rupalii..!!!

Rdb
Thursday, June 29, 2006 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या वरील कवितेचा antithesis ..

ह्या वयात "वेड" नाही
तर कधी ते तुला झपाटेल?
जीवनाची नौका तुझी
किनार्‍याआधीच आपटेल!


शहाणपण वगैरे ठीक आहे
खूप थकल्यावर बघता येईल
पण हे वेड, ही जिद्द?
केव्हा तरी ती जाईल!
सद्ध्या "ते" विरुद्ध "आपण"
असे नुसते भाण्डत आहोत, पण
असा काळ दूर नाही जेव्हा
जगण्यासाठी माणुसच माणसाला खाईल!

आशीष


R_joshi
Friday, June 30, 2006 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज देवाचे देवपण मी पाहिले
दगडाच्या मुर्तित नव्हे माणसाच्या मनात

कोसळणा-या वादळात...
बरसणा-या पावसात
सर्वस्व वाहुन गेले ज्यांचे
त्यांना मदत करणा-या हातात

आज देवाचे देवपण मी पाहिले...





R_joshi
Friday, June 30, 2006 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्यातला वेडेपणा
मनाला भावला
माझ्यातल्या शहाणपणापेश्रा
तो अधिक समजुतदार वाटला

प्रिति


Aavli
Friday, June 30, 2006 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेड्याच्या नको लागू नादास,
वेडे नेहमी असते आवेषात....
म्हणून अटकेपार दौडले,
वेडात मराठे सात..........


Swara
Friday, June 30, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेड पांघरणाराच खरा
असतो शहाणा
खर रुप लपवीण्याचा
वेड हा बहाणा


Dhruv1
Friday, June 30, 2006 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आता थांबावं इथंच
तर आकाश पुकारतं
आता ऊडावं इथुन
पंखांच ओझं बळावतं


Dhruv1
Friday, June 30, 2006 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


नीज यावी डोळ्यांत
तर चांदण्या डोकावतात
जिवावर सोसलेल्या
तुझ्या वेळा बोलावतात


Dhruv1
Friday, June 30, 2006 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कोसळणार्‍या
तार्‍यामधुनी
वेळ थांबते
अटीतटीची

आणिक मजला
देऊन जाते
तव स्मरणांची
आण्वीक होळी


Dhruv1
Friday, June 30, 2006 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


ऊन लाजरे
संध्यासमयी
कोमलस्पर्शी
जरतारीचे

वार्‍यावरती
दरवळणारे
धुंद जरासे
मनोमनीचे


Dhruv1
Friday, June 30, 2006 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


समुद्राचे डोळे
भरुन वाहातात
तेव्हाच तर
लाटांच्या झालरीत
ऊभे राहातात
पावसाळे


Paragkan
Friday, June 30, 2006 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wah re dhruv .. lkhaasach re!

Giriraj
Friday, June 30, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा! मस्तच रे धृवा!

Lopamudraa
Friday, June 30, 2006 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धृव सुंदर... कल्पना...,छान आहेत झुळुका...!!!.. .. .. .. .. .. .. . ..

R_joshi
Saturday, July 01, 2006 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवलि स्वरा छानच.
ध्रुव झुळकेतल्या कल्पना अप्रतिम आहेत





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators