Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 27, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » काव्यधारा » झुळुक » Archive through June 27, 2006 « Previous Next »

Asmaani
Monday, June 26, 2006 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रुदा आणि निरु_कुल, एक छोटासा प्रयत्न. प्लीज सम्भाळून घ्या.

राखेतून घ्यावी गगनभरारी त्यांनी,
जळण्यासही नुरले काही ज्यांच्यापाशी
विझणे अन ज्यांना होई अशक्य त्यांनी,
तेजाने तळपून नासाव्या तमराशी.


Arch
Monday, June 26, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आषाढा निमित्त....
कौलारू घरातून पडणार्‍या पागोळ्या
हातातून निसटत असत सगळ्या
आठवणींच्या रेशीमलडीत लपेटलेल्या
उलगडताहेत मनाला देत गुदगुल्या


Ninavi
Monday, June 26, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, महिना बदलला?
अस्मानी छान लिहीलंयस.

जळताना होईन विजयध्वज तेजाचा
तळपेन भेदुनी अंधाराची छाती
मी अजिंक्य आणिक अवध्य माझी आशा
पुरलेत तरीही रुजून येईल वरती..


Ameyadeshpande
Monday, June 26, 2006 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>तळपेन भेदुनी अंधाराची छाती
>>>पुरलेत तरीही रुजून येईल वरती

व्वा! क्या बात है! आषाढाची सुरूवात जोरदार अगदीच!!!


Lopamudraa
Monday, June 26, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कौलारू घरातून पडणार्‍या पागोळ्या
हातातून निसटत असत सगळ्या
आठवणींच्या रेशीमलडीत लपेटलेल्या ..........मस्त arc ,निनावि,असामि सुद्धा.. जोरदार सुरवात...!!!!

Asmaani
Monday, June 26, 2006 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, सही लिहिलेस. अर्च, सुंदर.

Jo_s
Tuesday, June 27, 2006 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर, काय चालल्ये
समदी जाळपोळ इकडं
कवि हायसा की
जळणाची लाकडं

जरा लिवा कायतरी
मंद झुळूकं वाणी
आकाश छान पाझरतय
जरा तिकडं बघा कोणी

समदीकडे बघा कशी
हिरवी पोरं आल्येत
आमची धरती मायं
आता लेकुरवाळी झाल्ये

जरा इचार करा यावर
आणि लिवा चला
छानस झरझर


Meenu
Tuesday, June 27, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लय ब्येस सुदिर ..
थंड गार हवेत
जळण दिसलय
जे न देखे रवी
म्हुनच म्हनलय


Jo_s
Tuesday, June 27, 2006 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, धन्यवाद मिनू
..
सुधीर

R_joshi
Tuesday, June 27, 2006 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंद वा-याची झुळुक
अवचित मला भेटली
शब्दांच्या पलिकडे अर्थ
मला ती समजावुन गेली

प्रिति


Meenu
Tuesday, June 27, 2006 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुळझुळणारं पाणी
पानांची हिरवी गाणी
आली वर्षाराणी
गार गार वारा
अंगावर ओला शहारा
तृप्त तृप्त धरा


Ninavi
Tuesday, June 27, 2006 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर, मीनू,

जळणे हा धर्म कवीचा, जसा रवीचा
बेचिराख होवूनही विश्व उजळावे
आसवांत भिजता कैसे रुजते गाणे
ते गुपीत हसणार्‍यांना कसे कळावे?


दिवे घ्यालच.

Tusharvjoshi
Tuesday, June 27, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


ढगांचे भरधाव घोडे
पाण्याचे बाण घेऊन आले
मी पुन्हा त्याला शरण आलो
आसमंत पुन्हा विजयी झाले

तुषार जोशी, नागपूर


Tusharvjoshi
Tuesday, June 27, 2006 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मी कितीदा भरभरून आलो
आलीच नाहीस तू भिजायला
मलाही जिवावर येतं गं
तुझ्या शिवाय, बरसायला

तुषार जोशी, नागपूर


Asmaani
Tuesday, June 27, 2006 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुंद शांत एकांती
वाजे कान्ह्याचे पाऊल
आषाढात राधेला
लागे श्रावणाची चाहूल


Ninavi
Tuesday, June 27, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्रदयाच्या खोल तळाशी पुरलेल्या त्या
मृद्गंध होउनी आठवणी दरवळती
आषाढघनांना लाजविती पागोळ्या
ज्या पापण्यांतुनी गालांवर ओघळती


Tusharvjoshi
Tuesday, June 27, 2006 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पहिल्या पावसात तू भिजशीलच
आठवून माझा भिजायचा सोहळा
असे तुझे आणि माझे नाते
अलगद जोडतो पावसाळा

तुषार जोशी, नागपूर



Tusharvjoshi
Tuesday, June 27, 2006 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, पागोळ्या खासच,

तुषार


Swara
Tuesday, June 27, 2006 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाऊस आता फक्त
मी खिडकितूनच पाहाते
वेदना आतली
कुर्वाळत राहाते

मला meenu चा ललित मधला सवय लेख खुप आवडला. पण मागच्या महिन्यात आता post टाकता येत नहिये कुणी सांगाल का काय करावे लागेल?


Chinnu
Tuesday, June 27, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार खुप खुप छान!
निनावी, पहीली चारोळी खुप छान. अवध्य माझी आशा, वा वा!
तुझे designer दिवे पण सहियेत!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators