|
Arun
| |
| Monday, June 12, 2006 - 10:30 am: |
| 
|
शिकविलेत तुम्ही आम्हा जीवनाचे सार तुमच्याच निखळ विनोदाने आज स्मृतीदिनी तुमच्या हाती केवळ तुमचे लिखाण व्यक्तीचित्र असो वा असो प्रवासवर्णन नाटक असो वा भाषांतरे चार रावसाहेब, अन्तू बर्वा अथवा धोंडोपंत या व्यक्तीरेखांत मज दिसे मी पण लंडन जपान असो वा अमेरिका जणू आम्हीच केले दौरे तुमच्यासह प्रवासवर्णनापरी प्रवासातील मी हाच होता सारा लेखनप्रपंच काकाजी असो वा असो ती फुलराणी माय मराठी जणू भासे तुमच्या चरणांची दासी आता केवळ तुमचे शब्द जपून ठेवणे पु. ल. असते तर .... याच विषयावर बोलणे
|
अरुण, छान लिहिलय. पु. ल. फॅन असूनही हा दिवस कसा विसरले
|
Dhani
| |
| Monday, June 12, 2006 - 1:31 pm: |
| 
|
फ़ारच छान लिहिले आहे अरुण...
|
Abhi_
| |
| Monday, June 12, 2006 - 11:39 pm: |
| 
|
अरुण मस्तच रे!! ..
|
छान रे अरुण... खरोखर पु. ल. आज असते तर.....
|
Smi_dod
| |
| Monday, June 12, 2006 - 11:47 pm: |
| 
|
अरुण छान...पु.ल. म्हणजे आपली शाळा होती.. त्यांचा हात धरुनच मी या साहित्याच्या जगात फ़िरलेय.. त्यांनी आमचे वाचन,भाषाविश्व,अनुभवविश्व समृध्द केले.. निखळ विनोदाने खळखळुन हसायला शिकवले... घडवले नवनवीन प्रदेशांची, साहित्यिकांची ओळ्ख करुन दिली... परदेश फ़िरवुन आणले तसेच शान्तिनिकेतन ही फ़िरवुन आणले... चाळीत न रहाता चाळीचे जीवन ही अनुभवले..व्यक्ती मधल्या वल्लीचें दर्शन खुमासदार पणे घडवले.. खरच जे अनुभव त्यांच्या पुस्तकातुन मिळाले ते मिळणे नाही... तासनतास ऐकट्याने हसत रहाणे.. समोरच्या माणासांमधे कोणी अन्तुबर्वा,सखाराम,बबडु, आहे का? हे शोधणे हा तर माझा आवडता छंद होता. फ़क़्त एवढ्या बाबतीतच आमची पिढी मला नशिबवान वाटते कि आमच्या साठी पु.ल. होते.. आता आमच्या मुलांसाठी ती उणिव आहे.. पण त्यांचे चिरतरुण साहित्य बरोबर आहे हीच मोठी दौलत आहे...
|
Meenu
| |
| Tuesday, June 13, 2006 - 12:55 am: |
| 
|
खरच पु. लं ना जितकं miss करतो आपण सगळे तेवढ जगात दुसया कुणा लेखकाला miss केलं नसेल
|
Itsme
| |
| Tuesday, June 13, 2006 - 12:55 am: |
| 
|
Arun, mastach ....
|
Giriraj
| |
| Tuesday, June 13, 2006 - 1:07 am: |
| 
|
आहा! मस्तच रे अरुण! -- -- --
|
Jo_s
| |
| Tuesday, June 13, 2006 - 1:17 am: |
| 
|
अरूण छानच लिहीलय पु.ल. प्रेमींनो मी काल कविता पानावर पुलं ची आठवण काढली होती. आता वेगळ पान केल आहेच तर पुल तुम्ही जाताना साठवण इथेच ठेवून गेला आणि तुमच्या आठवणीने प्रत्येक डोळा पाणावला पुल तुम्ही जाताना थोडं तरी थांबायचं होतं सार्या व्यक्ति वल्लींना तुम्हाला एकदा भेटायच होतं "बटाट्याची चाळ" आता पोरकी झाली "त्या फुलराणी"ला ही तुम्हीच बोलकी केली "तुझं होतं तुझं पाशीच" हे आता जाणवतं जेव्हा तस नावींन्य क्वचीतच सापडतं "पुर्वरंग"ची "अपूर्वाई" नेहमीच राहील मनात देशोदेशी फिरताना स्वदेश नाही विसरलात "वार्यावरची वरात" पोहोचली घरा घरात लहान थोर वेडे होती हसण्याच्या भरात तुम्ही फार बिन्धास्त होता जेव्हा हादरवली दिल्ली "पुल तुम्ही स्वत्:ला काय समजता" जेव्हा उडवता "खिल्ली" नाटक, संगीत, सिनेमा, लेखन काही शिल्लक नाही ठेवलं जे जे मिळवलं ते ते तुम्ही नेहमीच वाटून टाकलं राहवलं नाही म्हणून प्रयत्ने काहीतरी लिहीलं जेव्हा पत्राचा मजकूर लिहीणार्याने पत्यातल्या नावाच्या धन्याला बोलावून नेलं सुधीर
|
Smi_dod
| |
| Tuesday, June 13, 2006 - 1:23 am: |
| 
|
वा सुधीर.. मस्त.. डोळे पाणावले.. छान लिहिलय..
|
Puru
| |
| Tuesday, June 13, 2006 - 1:36 am: |
| 
|
शब्दांना वाकवीत पण सवंगतेकडे जराही न झुकलेला विनोद करावा तो पुलंनीच! गुदगुल्या होतील पण बोचकारे निघणार नाहीत असं लिहावं पुलंनीच! समाजातील दंभांचं शाब्दिक व्यंगचित्र काढावं पुलंनीच! तानसेन नाही तर निदान कानसेन होऊन रसिकतेने कसं जगावं हे शिकवावं पुलंनीच! या हातानी दिलेलं दान त्या हातालाही समजु नये असं दातृत्व शिकावं पुलं कडूनच!!
|
अरूण, सुधीर, अतिशय सुंदर लिहिले आहे... त्यांच्या बद्दल लिहावे तेवढे थोडेच... अशी चतुरस्त्र व्यक्ती (की वल्ली??) पुन्हा होणे नाही...
|
अरूण.. खरंच धन्यवाद रे.. तु उल्लेखलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखा आणि प्रत्येक जागा परत एकदा उभ्या राहिल्या.. अंतु बर्वा, नारायण, पेस्तनजी, बबडू, चितळे मास्तर, सखाराम गटणे, भैय्या नागपूरकर, काकाजी एक ना अनेक.. पूर्वरंग, अपूर्वाई मध्ये केलेली प्रवासवर्णन म्हणण्यापेक्षा प्रवासाचे रसाळ कथन.. त्यांची शास्त्रीय संगीतावरची हुकुमत.. त्यांचे रविवारची गोष्ट मधलं पेटीवादन क्या बात है.. त्यांचा गुळाचा गणपती मधला अभिनय.. तो भोळा भाबडा चेहरा.. अप्रतिम...
|
Rajkumar
| |
| Tuesday, June 13, 2006 - 2:43 am: |
| 
|
अरुण,जो मस्तच! .. .. ..
|
Gs1
| |
| Tuesday, June 13, 2006 - 9:00 am: |
| 
|
वा अरूण, अगदी समयोचित
|
पु. ल. एक आठवण.. जसं तुमचं, तसं माझं ही ते दैवत.. ते असताना कधी दर्शन होण्याचा योग आला नाही, पण परवा पुस्तक प्रकाशित करताना त्यांच्या घरी जाऊन आलो.. 'आता डोळ्यानी पाच टक्के ही दिसत नाही, नाहीतर वाचलं असतं तुमचं पुस्तक,' सुनिताबाई म्हणाल्या. 'आता आलेली पुस्तकं, कुठल्या कुठल्या वाचनालयाला देते मी'.... 'पुस्तक देवळात पोहोचलं, आता तुम्ही काहीही करा', मी त्यांना म्हणालो.. पुढे त्यांच्याशी गप्पा मारायला काही वेळ म्हणाला.. 'भाईचं पहिलं पुस्तक.. तेव्हा संगणक नव्हते... पुस्तक हाताने कंपोज करत. मग प्रकाशक ते घेऊन येई,' त्या सांगत होत्या. 'आपण चुका शोधून काढायच्या, मग परत पाठवायचं, असं चार पाच वेळा करावं लागायचं '. 'त्यांना सोपं जावं म्हणून मी कंपोझरच्या खुणा शिकले, आणि तश्या दुरुस्त्या करू लागले.' 'शेवटची चार पाच पानं राहिली, आणि मला जायचं होतं गावाला. मी भाईला पध्दत समजावून सांगितली आणि शेवटची चार पानं आली की तपास सांगून निघाले.' 'परत आले, तेव्हा भाईला विचारलं. तो म्हणाला प्रुफं तपासली आणि काम पूर्ण झालंय. मला जरा आश्चर्य वाटलं' 'पुस्तक आलं तर त्यात भरपूर चुका.. मी प्रकाशकाला बोलावून भांडले, तर तो म्हणाला 'बाई, तुमची सही आणि परवानगी असल्याशिवाय मी पुस्तक छपत नाही.. म्हणून मग प्रुफं बाहेर काढली.' 'त्या चार कागदांवर वाघ नावाच्या कंपोझरचं नांव होतं.. आणि पहिल्याच वाक्यात चार पाच चुका बघून भाईने, वाघ वर काट मारून तिथे डुक्कर असं लिहून पुस्तक परत पाठवलं होतं... 
|
Shreeya
| |
| Tuesday, June 13, 2006 - 1:27 pm: |
| 
|
आपल्या लाडक्या पु.लंचा स्मृतिदिन अन लक्षातच नाही. पण म.टा.तील श्रद्धान्जली कायम आठवते, "पु.ल., यापुढे महाराष्ट्र कधीच आपल्या आठवणींनी रडणार नाही. आपले लिखाण वाचुन हसेल,हसता हसता डोळ्यात पाणि येईल इतकेच!" आजही ते आपल्यात आहेत हेच खरे!
|
Badbadi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 11:12 pm: |
| 
|
अरूण, सुधीर, विनय... सुंदर... अगदी कुठल्याही पिढीला हसवण्याची ताकद होती पु. लं. मध्ये..
|
Smi_dod
| |
| Tuesday, June 13, 2006 - 11:22 pm: |
| 
|
विनय छान..पु.ल. च्या घरी जाउन आलात... मला वाटत हा किस्सा सुनिता बाईंच्या कुठल्या तरी पुस्त्कात पण त्यांनी सांगीतलाय... खरच पु.ल. ग्रेट होते 
|
|
|