|
Jo_s
| |
| Wednesday, June 14, 2006 - 4:11 am: |
| 
|
मंडळी धन्यवाद खरतर काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्याबद्दल कोणीही लिहीलं तरी ते चांगलच वाटत. त्यात लिहीणार्या पेक्षा त्या व्यक्तीचच श्रेय असतं. पु.ल. ही तसेच एक सुधीर
|
Paragkan
| |
| Wednesday, June 14, 2006 - 11:39 pm: |
| 
|
VInay ... too much re ... 
|
Raina
| |
| Friday, June 16, 2006 - 4:03 am: |
| 
|
विनय तुम्ही साक्षात सुनिताबाईंना भेटलात?? फोटो आहे का हो ? पहायला फार आवडेल. smd-dod- हा किस्सा आहे मनोहर तरि मध्ये आहे. पण पु.लंच्याच भाषेत सांगायचं तर देसाईंना डायरेक्ट कृष्णाच्या तोंडुन गीता ऐकण्यासारखं वाटलं असणार !
|
रैना, हो मी भेटलो... देवळात जायचं तसं गेलो, आणि माथा टेकून आलो... त्यांच्याबद्दल खूप खूप चांगलं आणि वाईट मी ऐकलेलं आहे.. तेव्हा एक किस्सा सांगावा वाटतो... पु. ल. देशपांडे Trust आता त्यांना झेपत नाही म्हणून पार्ल्याच्या कुठल्यातरी Trust मध्ये विलीन करण्यात आलेला आहे.. ( Trust बंद करता येत नाही असा नियम आहे म्हणे, आणि तो त्यांना माहीत नव्हता). जेव्हा जमेनासं झालं तेव्हा त्यांनी Trust कमिशनर कडे अर्ज केला, तेव्हा त्याने बाईना भेटायला बोलावलं.. ठरल्याप्रमाणे बाई पोहोचल्या.. कमिशनरः या Book Keeping मध्ये मला काही शंका आहेत.. Abnormality वाटते... हे कोण लिहितं.. बाईः मी स्वतः लिहिते. एका CA कडून शिकून घेतलं ते काम मी.. कमीः मग मला सांगा की सगळी बाजू जमेची... Trust च्या कामासाठी जो खर्च असतो तो कुठे आहे? बाईः अहो खर्च कसला. Trust माझ्या घरातून चालतो.. मी सगळे हिशेब लिहिते. बाकी त्यावर नोकर, CA , कारकून सगळं काही मीच... CA कडून Accounts शिकतात Trust साठी, खिळे जुळणी शिकते पुस्तकांसाठी, Driving करतात उगाच पैसे कशाला वाया घालवा म्हणून... जीवन वाहून घेतलं त्यांनी त्यांच्या प्रेमासाठी.. आजही सकाळी लवकर तयारी करून फोनच्या शेजारी बसून असतात त्या.. आणि खरं Direct कृष्णाच्याच तोंडून गीता..
|
Bee
| |
| Saturday, June 17, 2006 - 1:17 am: |
| 
|
विनय धन्यवाद इथे तुम्ही सुनिताबाईंबद्दल लिहिले त्याबद्दल. त्यांच्या पुस्तकातून मला खूप काही नवे संदर्भ कळलेत. कधी कधी त्याचे परिच्छेद खूप जड वाटतात समजायला. पण तेच पुस्तक परत वाचले की कळते बाई काय म्हणताहेत. मी तुमचे विनोदी प्रवास वर्णन वाचले आहेत पण तुम्ही असेही काही वेगळे इतक्या छान शैलीत लिहू शकता हे माहिती नव्हते. keep it up!
|
Milya
| |
| Saturday, June 17, 2006 - 4:28 am: |
| 
|
अरुण, सुधीर, विनय छान लिहिले आहेत. पु. लं च्या स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद
|
Arun
| |
| Saturday, June 17, 2006 - 10:47 am: |
| 
|
धन्यवाद मंडळी .......... तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद .............
|
अरुण, विनय सुधीर, फारच छान. मी शाळेत असताना पु लन्ची विनोदी पुस्तके वाचली. पण नन्तर त्यान्चे वैचारिक लेखन वाचून भारवून गेलो. (तुझे आहे तुजपाशी नाटक तर अप्रतीम) वक्ता दशसहस्त्रेशु, दाता भवति वा न वा असे एक सुभाशीत आहे. परन्तु आपल्या कलेने सम्पूर्ण मराठी माणसान्वर राज्य करुन जमवलेली सम्पत्ती डोलसपणे दान करणारा हा वक्ता आणी दाता या सम हा.
|
Raina
| |
| Sunday, June 18, 2006 - 12:12 am: |
| 
|
विनय धन्यवाद हा किस्सा वाचला नव्हता आधी कुठे. !त्यामुळे मला पण आता डायरेक्ट कृष्णाच्या तोंडुन नाही तरि "संजय उवाच " ऐकते आहे असे वाटले. ! सुनिताबाई खरोखरच धन्य आहेत. पु.लं चा व्याप सांभाळायला त्या काय काय म्हणुन शिकल्या. बाकी तुम्ही म्हणता ते खरंच. सुनीताबाईंविषयी ईतके प्रवाद आहेत. पण एक क्षण त्यांच्यावरचे (अति व्यवहारीपणाचे, विक्षिप्तपणाचे) आणि फटकळपणाचे आरोप खरे आहेत, असे जरि मानले, तरी त्या एक विलक्षण प्रामाणिक आणि उत्कट, आणि ताठ कण्याने जिवन जगल्या /जगत आहेत- हे मान्य करावेच लागेल. माझ्या तरी डोळ्यासमोर "खमकी बाई " आणि बुद्धिमान, स्वाभिमानी स्त्री "ह्या शब्दांबरोबर सुनिता बाईच सामुर्त उभ्या राहतात. बाकी देसाई साहेब- आपण माझ्या फोटो आहे का हो ?ह्या प्रश्नाला काय शिताफीने बगल दिलीत. !वा! अरुण, सुधीर हे पु.ल नामस्मरण सुरु केल्याबद्दल खरोखरीच धन्यवाद !
|
Seema_
| |
| Sunday, June 18, 2006 - 2:05 am: |
| 
|
अरुण हे काय अचानक तुम्ही गुलमोहरवर वगैरे ~D पण मस्तच लिहिलय अगदी. महाबळेश्वरचे फ़ोटो पण छानच होते . विनय मस्त. गीता आवडली एकदम . 
|
Jo_s
| |
| Tuesday, June 20, 2006 - 1:15 am: |
| 
|
मिल्या, विजय, रैना प्रतिसादाबद्दल धन्यवाद
|
रैना, यावरून फोटो नाही हे तुझ्या लक्षात आलं असेलच... त्या खमक्या होत्या म्हणून... हे पुलंनी पण मान्य केलेलं आहे.. एक दोन किस्से एक दोन दिवसात...
|
|
|