|
Milya
| |
| Wednesday, June 14, 2006 - 2:44 pm: |
| 
|
कुणी उगाच कसलाही अर्थ काढू नये म्हणून आधीच जाहीर करतो की व.वि.सां.का म्हणजे वर्षा विहार सांस्कृतिक कार्यक्रम.. सर्वाना माहीत आहेच की व. वि. ची तारीख जाहीर झालेली आहे. 'वर्षा'... - हे कुठल्याही मुलीचे नाव नाही. शुद्ध मराठीत ह्याला बारीश म्हणतात. तर असो... वर्षा पेक्षा वर्षाविहाराची मायबोलीकर जास्त अतुरतेने वाट पहात असतात. मग प्रत्येकाचे कारण वेगळे का असेना? कुणीतरी कुणाच्या सहवासात चार क्षण घालवता येतील म्हणून येतात तर कुणी चला त्यानिमित्ताने तरी 'कुणाच्या' जाचातुन चार क्षण सुटका होतेय म्हणून येतात. कुणी काही 'प्रेक्षणीय' स्थळे बघायला म्हणून येतात तर कुणी नुसतेच गप्पा मारायला... आणि मग ह्या मेळाव्यात मायबोलीकरांनीच आयोजित केलेले काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर मग काय दुग्धशर्करा योगच जणू. तर सालाबादाप्रमाणे ह्याही वेळी व. वि. ला भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी आहे इतकेच नव्हे तर कार्यक्रम नीट आयोजित करता यावेत म्हणून ह्यावेळी एक वेगळी समिती देखील आहे तेव्हा व. वि च्या सांस्कृतिक समितीचा सदस्य ह्या नात्याने व. वि. च्या दिवशी काय काय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत (जुन्या आणि जाणत्यानी काय काय धिंगाणा घातला जाईल असे वाचावे) ह्याची ही एक छोटीसी झलक (संयोजोकरांनी सांस्कृतिक समितीच्या मागे 'झलक दिखला जा' 'झलक दिखला जा' असा सारखा लकडा लावला होता म्हणुन हा प्रपंचखटाटोप ... (प्रपंच नको.. उगाच लिहिताना हात थरथरायला लागतात) किंवा त्यापेक्षा रुपरेखा म्हणुया .... सकाळी ९ ते १० - नाष्टा व ओळखपरेड.... (परेड शब्द खोडलाय कारण, परेड म्हणले की उगाचच लोटापरेडची आठवण येते. तेव्हा नाष्ट्यापाठोपाठ परेड नको) मागच्या व. वि. ला बऱ्याच जणांनी एका ID साठी एक असा बऱ्याच प्लेट नाष्टा हाणला होता त्यामुळे बिचाऱ्या संयोजकांना नाष्टा मिळालाच नाही त्यामुळे ह्यावेळी Dr. मोदी लिमिटेड नाष्टा देणार आहेत... पण त्याची कसर भरुन काढण्यासाठी संयोजकांनी खास NJ वरुन श्रीमती 'अनामिका' ह्यांच्याकडुन खास त्यांच्या हातचे लाडू मागवले आहेत (पुण्याहुन व. वि साठी येणाऱ्यासाठी खास सुचना : लाडू खाण्यासाठी लागणाऱ्या वस्तु जसे की हातोडा, करवत, स्कू ड्रायव्हर ह्या प्रत्येकाने आपापल्या आणायच्या आहेत. संयोजक त्या पुरवणार नाहीत.. तसेच त्यापेकी काही हरवल्यास त्याची जबाबदारी संयोजकांवर नाही) उपसुचना : माणशी एकच लाडू मिळेल. लाडू खाल्ला नाही किंवा अर्धाच खाल्ला तरी वर्गणीतुन त्याचे पैसे परत मिळणार नाहीत... उप-उपसुचना : लाडु पूर्ण खाल्ला नाही तर घरी घेउन जाण्यासाठी प्लास्टिकची पिशवी संयोजक देणार नाहीत... ती ज्याची त्यानी आणावी... उप-उप-उपसुचना : व. वि. ला बाहेरुन पदार्थ आणण्यास सक्त मनाई आहे.. ज्यांना कर्जतचे वडे खायचे असतिल त्यांनी कर्जतलाच थांबावे... विषेश टीप : ऐनवेळी 'NJ' लाडू न पोचल्यास पर्यायी व्यवस्था म्हणुन कु. बाधा (ह्यांना सतत कुठलीतरी बाधा होत असते.. आधी भूतबाधा आणि आता प्रेमबाधा...) ह्यांच्या सुरळीच्या वड्या देण्यात येतील... वरील सर्व सुचना- उपसुचना सुरळीच्या वड्यांनाही लागू आहेत. अरे ह्या नादात ओळख राहुनच गेली की.. नाष्टा करता करता सर्वजण आपली ओळख करुन देतील. ओळख करुन देताना उगिच कुणी 'नमनाला घडाभर तेल' असा प्रकार करु नये किंवा उगाच मूग गिळुन गप्प बसु नये.. त्यासाठी सांस्कृतिक समितीचे स्वेछाध्यक्ष (स्वेछेने ह्या शब्दावर अध्यक्ष महाशयांचा कापीराईट असल्याने तो इथे टाळला आहे) गंगुअण्णा फाटकं स्वत: सर्वांना ओळख कशी करुन द्यायची ह्याचे प्रात्यक्षिक दाखवितील. १० ते ११ : कचऱ्यातून कला पूर्वाध : माजी संयोजक आणि मायबोलीवरचे नव्या धडाडीचे कवी श्रीयुत करुण (मागच्या व.वि ला ते स्वत: संयोजक असल्याने त्याना आपल 'घसा' साफ़ करायचा मोका मिळाला नव्हता म्हणुन ह्यावेळी त्यांचा हात सारखा शिवशिवत आहे (कविता लिहिण्यासाठी हो...) ) ह्यांच्या कविता 'अस्मादिक' आपल्या सुरेल आवाजात गाउन दाखवतील. विषेश टीप : कापसाचे बोळे ज्याचे त्याने घरुन आणायचे आहेत... उत्तरार्ध :आज घडीचे सुपरमॉडेल श्रियुत शिरुमामा हे चित्रविचित्र जाहिरातींवर मॉडेलिंग करतील. घाबरु नका हा मायबोलीचा व. वि आहे तेव्हा इथे वस्त्रगळती सारखे प्रकार होणार नाहीत...(तरी सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणुन कुणालाही ह्यावेळेला आपले क्यामेरे किंवा हॅंडीकॅम वापरता येणार नाहीत...( व. वि चे अधिकृत फोटोग्राफर श्रीयुत कोटीस्तंभ ह्यांना मात्र चित्रित करायची मुभा राहिल. कारण तसेही ते केलेले चित्रिकरण परत कुणालाच दाखवत नाहीत... ) ११ ते १२ : लाटणे फ़ेका स्पर्धा खास महिलाग्रहास्तव काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवात खूप गाजलेली ही स्पर्धा व. वि. निमित्त परत एकदा आयोजित केली जात आहे ( हेराफेरी सारख्या movie चा दुसरा भाग येऊ शकतो तर लाटणे फ़ेका स्पर्धेचा का नाही?) ह्यात मायबोलीकर महिला आपापल्या नवर्यांना लाटणे फ़ेकुन मारतील आणि नवरे ते चुकवायचा प्रयत्न करतील. जी महिला जास्तीत जास्त लाटणी मारुन दाखवेल तिला मायबोलीवरच्या आद्य लाटणेफ़ेकपटु श्रीमती अमृता भावजोशी ह्यांच्या हस्ते एक लाटणे बक्षीस देण्यात येईल विषेश टीप : प्रथमोपचाराची सोय संयोजकांतर्फ़े केली जाईल.. १२ ते २ : भोजन आणि वर्षाविहार वर्षाविहाराला जाताना आपल्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी आम्ही खास व्यवस्था केली आहे.. आपले मायबोलीकर; कुमार विकल्प आणि कुमारी बाधा तसेच कुमार प्रदास आणि कुमारी शिक्षा ह्यांनी ही जबाबदारी उचलल्याबद्दल 'मंडळ' त्यांचे आभारी आहे... त्यांना कुमार सुशिल सुधाकर, कुमार तन्मय आणि कुमार राजपुत्र मदत करतीलच... ह्यामुळे दुहेरी हेतु साध्य होइल, तुम्हाला जरा मोकळीक (फ़िरण्यासाठी) मिळेल पण त्याहीपेक्षा व. वि. म्हणजे वधु वर सुचक मेळावा असा वाकडा अर्थ पण कुणी काढु शकणार नाहीत. नाष्त्याच्या वेळचे सर्व नियम भोजनासही लागू रहातील.. विषेश टीप : कृपया जेवताना 'घटोत्कच', कुंभकर्ण' अश्या अमानवीय प्राण्यांना पाचारण करु नये. अन्यथा भोजनासाठी दुप्पट आकार पडेल... २ ते ३ : मला ऐकु आलेल्या चुकीच्या कविता श्रीमंत स्वत: जातीने हजर राहु न शकल्याने त्यांनी फोनवर ऐकवलेल्या त्यांच्या काही कविता श्रीमती फ़ाडुका त्यातले बरेच शब्द गाळुन (जे चारचौघात वाचण्यासारखे नसतील) सादर करतील... ह्यावेळी त्या स्वत:च्या काही कविताही त्यात घुसडतील... (ह्यावेळेत मायबोलीकरांनी आपली वामकुक्षी उरकुन घ्यावी) ३ ते ३:३० : वहिनीचा सल्ला अर्थात 'विचारा तर खरं' (हे खोटं कसं काय विचारतात बुवा?) ह्यात श्रीमती पीएसक्यू, (का)कु. बाधा आणि श्रीमती रोमा ह्या श्रोत्यांना मौलिक सल्ला देतील विषेश आतिथि म्हणुन श्रीमती शालिनी अबुधाबीकर आपले विचार मांडतील.. तसेच उसगावहून श्रीमती TJ खास फोनवरुन मायबोलीकरांशी संवाद साधतील... ह्यात प्रामुख्याने नवयाला नजरेच्या धाकात कसे ठेवाल? टी व्ही मालिका - एक चिरफ़ाड, मी चाखलेले पंजाबी पदार्थ, माझी आवडती माकडे.. आपले मॉडेल अश्या नानाविध विषयांवर सल्ला देण्यात येईल. ३:३० ते ४ : 'हे कधी बदलणार?' ह्या विषयावर एक परिसंवाद(हा 'परी'संवाद असला तरी भाग घेणाऱ्या पऱ्या पेक्षा पसरलेल्या जास्त असतिल) ह्या सत्रात विविध बदल कधी होणार ह्यावर चर्चा होईल जसे की 'भाभी भी कभी बहन थी' मध्ये तुलसी नवरा कधी बदलणार?, सी हा माणूस प्रश्ण विचारायचे कधी थांबणार?, सल्मान खान कपडे कधी घालायला लागणार? लता मंगेश्कर गायची कधी थांबणार? देवानंद पिक्चर बनवायचे कधी थांबणार असे विविध ज्वलंत बदल चर्चिले जातील... ४ ते ५ : विविध गुणदर्शन ह्यात वेगवेगळे कलाकार आपले गुण उधळतील जसे की कुमार राजपुत्र, कुमार तन्मय आणि शिरुमामा ह्यांच्या साथीत 'शादी का लड्डू' ही एकांकिका सादर करतील. लेखक श्रीयुत विकल्प, नाट्यरुपांतर श्रीयुत विजय घरकर आणि दिग्दर्शक सुशील सुधाकर द्राविडी प्राणायाम एक आधुनिक योगप्रकार - सादर करतील कु. बाधा आतल्यागाठीची बाई - ही नाट्यछटा सादर करतील श्रीमती फ़ाडुका सरतेशेवटी संगीत मानापमानाचा प्रयोग होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. ह्यात आजी माजी संयोजक आणि सांस्कॄतिक समितीचे सर्व सदस्य भाग घेतील तळटीप : ही रुपरेखा बुधवारी लिहिण्यात आली आहे ह्याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी.. बाकीच्यांनी दिवे घ्यावेत... ह्या लिखाणातील व्यक्ती काल्पनिक नसुन त्यांचा मायबोलीकरांशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजु नये. 
|
Mrinmayee
| |
| Wednesday, June 14, 2006 - 2:52 pm: |
| 
|
मिल्या खूप्पच धमाल. एक प्रश्ण: ह्यातल्या IDs मायबोलिकरांच्या खर्या (?) IDs शी जुळवण्याचा छंद लागल्यास काय करावे?
|
Shyamli
| |
| Wednesday, June 14, 2006 - 2:59 pm: |
| 
|
अग माझे झाले सुद्धा जुळऊन.. मिल्या... हि हि हि.... 
|
Shyamli
| |
| Wednesday, June 14, 2006 - 3:02 pm: |
| 
|
मिल्या हा धोक्याचा इशारा... लाल शाईमधे वरती दे की अजुन मजा जरा 
|
Milya
| |
| Wednesday, June 14, 2006 - 3:07 pm: |
| 
|
केला बघ बदल ...
|
Maitreyee
| |
| Wednesday, June 14, 2006 - 3:11 pm: |
| 
|
आतल्या गाठीची बाई सही लिहिलय मिल्या
|
Shyamli
| |
| Wednesday, June 14, 2006 - 3:12 pm: |
| 
|
ह्म्म ...धमाल रे...बुधवार इफेक्ट जाणवतोय अगदी...
|
Mrinmayee
| |
| Wednesday, June 14, 2006 - 3:18 pm: |
| 
|
मिल्या, आणखी एक आठवून द्यावं म्हणते. मायबोलीकरांच्या एका हौशी नाटककारांची चमु 'तुझे ठेव तुजपाशी' हे कार्यक्रमानंतरचे मानापमान टोमणे इत्यादी आपले आपल्याजवळ कसे ठेवावेत यावर आधारित एक नाटक बसवताहेत असं ऐकलं. त्यातील जवळ जवळ सगळेच 'परदेशाई' असल्यामुळे त्यांच्या तिकिटखर्चाची सोय संयोजक कशी करणार आहेत ते कळेल का? (की बाकीच्यांना तो खर्च झेलावा लागेल?)
|
Charu_ag
| |
| Wednesday, June 14, 2006 - 3:45 pm: |
| 
|
मिल्या, ह. ह. पु. वा. .
|
Prajaktad
| |
| Wednesday, June 14, 2006 - 4:11 pm: |
| 
|
'वर्षा'... - हे कुठल्याही मुलीचे नाव नाही. शुद्ध मराठीत ह्याला बारीश म्हणतात.>>>> सी हा माणूस प्रश्ण विचारायचे कधी थांबणार?,>> आतल्यागाठीची बाई>>>  मिल्या ! धम्माल जमलय सगळ.
|
Storvi
| |
| Wednesday, June 14, 2006 - 4:25 pm: |
| 
|
>>श्रीमती फ़ाडुका >> मिल्या अब तुम्हारी खैरियत नही 
|
मिल्या... लै भारी...   
|
Ninavi
| |
| Wednesday, June 14, 2006 - 4:33 pm: |
| 
|
मिल्या >>> लाडू खाण्यासाठी लागणाऱ्या वस्तु जसे की हातोडा, करवत, स्कू ड्रायव्हर ह्या प्रत्येकाने आपापल्या आणायच्या आहेत. आणि ईनो आणिक पुदीनहरा कोण आणणार आहे म्हणे? मृण्मयी, >>> कार्यक्रमानंतरचे मानापमान टोमणे इत्यादी आपले आपल्याजवळ कसे ठेवावेत कशाला आपल्याजवळ ठेवायचे? सव्याज परत करायचे. इतके दिवस बीबीवर येऊन काहीच शिकली नाहीस का? 
|
Mrinmayee
| |
| Wednesday, June 14, 2006 - 4:43 pm: |
| 
|
अगदी पटलं गं निनावी. तेव्हा नवीन नाटकाची घोषणा: 'नवीन सदरा' येथील हौशी नाट्यमंडळ सादर करीत आहे एक धमाल विनोदी (?) नाटक, 'माझेही ठेव तुजपाशी' बरोबर?
|
Zakki
| |
| Wednesday, June 14, 2006 - 4:52 pm: |
| 
|
प्रत्यक्ष व. वि. पेक्षा इथे त्याबद्दल वाचण्यातच जास्त मजा येते आहे! मिल्या डटे रहो!
|
टोमण्यांचा कार्यक्रम...!!! ... एकुण सगळच धमाल...
|
मिल्याऽऽऽ ! झकाऽऽऽऽऽऽऽस !!! ' गंगु ' अण्णा फाटक खरोखरच ROFL !!! p.s. by the way, ही प्रतिक्रिया मी स्वेच्छेने दिली आहे, पुरे होश और हवास ( हे हवास एक काय असत कै माहित बाबा ) में !
|
मिल्या,जबर्या रे भो.. पण संयोजकांनी व विचे डीटेल्स टाकण्याधी सा. स चे डिटेल्स टाकायची परवानगी तुला कोणी दिली?पाहुन घेईन
|
>>>>> ह्यामुळे दुहेरी हेतु साध्य होइल, तुम्हाला जरा मोकळीक (फ़िरण्यासाठी) मिळेल पण त्याहीपेक्षा व. वि. म्हणजे वधु वर सुचक मेळावा असा वाकडा अर्थ पण कुणी काढु शकणार नाहीत. छे छे मिल्या, अजिबात शन्काच नको वाकड्या अर्थाची! उलट वविच्या पाळणाघराच्या अभिनव, पुरोगामी "खास व्यवस्थेच्या" उपक्रमाचे सर्वजण मनःपुर्वक स्वागतच करतील! DDD आणि त्यातुनही काही अतृप्त आत्मे कुत्सित शन्का काढतीलच की पाळणाघराला जरा जास्त अनुभवी माणसे नकोत का? तर त्यान्च्या कडे दुर्लक्ष करावे! DDD बायदीवे, या खास व्यवस्थेला काही वेगळे चार्जेस असणार हेत का? कृपया खुलासा व्हावा! ...... मिल्या, झकास लिहिल हेस!
|
Rajkumar
| |
| Thursday, June 15, 2006 - 12:24 am: |
| 
|
मिल्या... जबर्या.. .. .. ..
|
|
|