|
Yog
| |
| Thursday, May 25, 2006 - 1:14 pm: |
| 
|
1. भेट प्रत्त्येक क्श्णाला भरभर वेग घेणार्या गाडीतून बाहेरील मागे पळणार्या चराचर गोष्टिन्गत आज शलाका चे मनही तसेच मागे मागे जात राहिले... खर तर आजच्या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहिली होती तीने, नव्हे त्यासाठी गेले दोन वर्ष जीवापाड प्रयत्न केले होते. आयुष्याचा इतका महत्वाचा निर्णय घेताना किती गोष्टीन्ना तोन्ड दिले होते. घरात शिरीष पासून आप्त, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, कचेरीतील इतर समवयस्क या सर्वान्च्या प्रश्णाना कधी उत्तरे देत, कधी टाळत, तर कधी एकान्तात स्वताचाच निर्धार पक्का करत इथवर येवून पोचली होती. आयुष्यात इतर काही गोष्टी मना सारख्या नसतीलही घडल्या पण ही एक गोष्ट मात्र घडवून आणायचीच या एकाच निर्धारावर गेली सहा वर्षे तीने अनेक गोष्टी पेलल्या, अन आज त्याच्या पूर्ततेची वेळ जवळ आली होती. कधी कधी काही गोष्टिन्मागे सयुक्तीक कारण किव्वा मनाला पटणारं किव्वा प्रत्यक्ष दिसणार चित्र नसत तरी त्या घडतात. इतरान्साठी शलाकाच्या या निर्णायामागे किव्वा कृतीमागे कदाचीत हाच अतर्कवाद असावा पण शलाका साठी मात्र तो निर्णय हा तीच्या हरवल्या अस्तित्वाचा पुनर्जन्मच होता जणू. साता समुद्रापार परदेशातून आपल्याच मायभूत येवून हा पुनर्जन्म घेण्यासाठी आतुरलेले तीचे शरीर पण मन मात्र सरल्या प्रत्त्येक क्शणान्चे उलट पाढे करत आयुष्याची बेरीज वजाबाकी मान्डत बसलेले.. गाडी अचानक एखाद्या वेळी आडवळणावर धक्का घेई किव्वा ड्रायव्हर ने जोरात ब्रेक लावला त्या वेळी एखाद्या स्वप्नातून जागे झाल्यागत तिची चलबिचल अन मग पुन्हा एकदा पुढील प्रवासाची उत्सुकता अन घालमेल.. दहा वर्षाच्या मुलीला दत्तक घ्यायचा निर्णय पक्का केला त्यादिवशी अशीच उत्सुकता अन घालमेल तीने अनुभवली होती. तस तर दत्तक देणे घेणे हा व्यवहार ज्या संस्थेकडे केला होता त्यान्च्याकडून त्या मुलीविषयी तीला आवश्यक माहिती मिळालीच होती. पण तरिही संस्थेच्या नियमानुसार मुलीचे खरे आई वडील, नाव, गाव, जात, हे मात्र तीला अजूनही ठावुक नव्हत. देशात मुम्बईपासून दूर एका छोट्या गावातील मानसी आश्रमात तिची ही मानसकन्याच तीला भेटणार होती जणू. आज त्या मुलीला प्रत्त्यक्षात भेटून शलाकाला आयुष्यातील पुढील अनेक गोष्टीन्चा मार्ग आखायचा होता,एकटीसाठी नव्हे तर दोघीन्साठी. तस तर मातृत्व हे काही नविन नव्हते शलाकासाठी. स्वताच्या पोटच्या मुलाला शिरीष कडे ठेवून येताना केव्हडा ताण आला होता तीला. मनु आज चार वर्षाचा होता, शिरीष त्याची खूप काळजी घेत असे, अन ही ट्रिप तर एकच आठवड्याची होती, तेव्हा फ़ार काळजी करण्याचे कारण नव्हते पण तरिही मनुला अस एकट सोडून इतक्या लाम्ब अन तेही एक आठवडा ती पहिल्यान्दाच जात होती. अमेरीकेत शिरीष तीला सोडायला विमानतळावर आला तेव्हाही don't worry, everything will be fine या त्याच्या आश्वासक शब्दाने तीला धिर दिला होता पण आज प्रत्त्यक्षात इतका धाडसी निर्णय जिवन्तपणे समोर उभा राहील तेव्हा काय होईल या कल्पनेने तीच मन अस्वसथ झालेल. ती मुलगी मला आवडेल? तीला मी आवडेन? ती माझ्या बरोबर इतक्या लाम्ब येईल? मनु कसा react करेल? शिरीष ची सम्मती असली तरी एका घरात आपण चौघे एक कुटुम्ब म्हणून जगू शकू? अनेक प्रश्ण. अन स्वताच मूल असूनही एका मोठ्या मुलीला अस दत्तक घेण्याचा तिचा निर्णय किती यशस्वी ठरेल, किती योग्य आहे, हे फ़क्त येणारा काळच ठरवणार होता. she was missing shirish today... or may be she was missing that soothing touch , एक आश्वासक स्पर्श! शलाकासाठी हक्काचा असलेला आश्वासक स्पर्श मात्र दहा वर्षापूर्वीच काळाच्या ओघात विरून गेलेला, हातातून वाळू भुर्रकन निसटून जावी तसा. त्या वाळू बरोबर तीचा एक हक्काचा किनाराही सुटून गेला जणू. शिरीष च्या सहवासाची सवय तीने लावून घेतली तरी मनाच्या कप्प्यात खोल कुठेतरी दडवून ठेवलेल्या त्या स्पर्शाची, ओलाव्याची उणिव मात्र आज पुन्हा पुन्हा इतक्या तीव्रतेने भासली तेव्हा गाडीबाहेरील त्या पळत्या झाडान्बरोबर मनही मागे गेल तर नवल नव्हत. शलाका एका विचीत्र दोलायमान अवस्थेत अडकलेली, भविष्यातील गोष्टीन्ची भिती अन उस्तुकता तर सरल्या काळाची हुरहुर.. ताई आश्रम आला! ड्रायवर च्या आवाजाने ती भानावर आली. मानसी आश्रमाच्या प्रवेशद्वारापाशी गाडी उभी राहिली अन त्याच्या पलिकडील एक नविन विश्व शलाकाच्या येण्याची जणू आतूरतेने वाट पहात उभ होतं.. (क्रमशः)
|
Ninavi
| |
| Thursday, May 25, 2006 - 1:23 pm: |
| 
|
वा! छानच सुरुवात आहे. योग, नेहेमीप्रमाणेच उत्तम शैली आणि content .
|
Dha
| |
| Thursday, May 25, 2006 - 3:47 pm: |
| 
|
छान! विषयही वेगळा आणि छान आहे.
|
Yog
| |
| Thursday, May 25, 2006 - 4:48 pm: |
| 
|
आश्रमाचा परिसर अतीशय मोहक होता. खरच मुम्बईपासून तस म्हटल तर जवळ असून सुध्धा चित्रातील एखाद्या टुमदार घरकुलागत तो परिसर पाहून विश्वास बसत नव्हता. गेटवरील झुकलेल्या फ़ुलान्चे वेल, स्वच्छता अन शिस्तबध्द्पणाच्या सूचना देणार्या पाट्या, आदबीने स्वागत करणारे लोक, दूरवर पसरलेली वनराई, पायवाटेच्या दुतर्फ़ा लावलेल्या गुलाबाच्या बागा, पान्ढर्या शुभ्र रन्गाची बैठी घरे, त्यावर अचूकपणे हिरव्या रन्गात रन्गवलेली खिडक्या दारे, दूरवरून ऐकू येणार्या वाहत्या नदीचा खळखळाट, नवागतास एखाद्या संरक्षक कवेत घेवू पाहणारे उत्तरेकडील डोन्गर अन या सर्वान्मधे वसलेल हे विश्व. याला काय म्हणाव, अनाथ आश्रम, का चित्तप्रवृत्ती मन, अन शरीर शान्त करणारा सन्यासी आश्रम, का weekend ला विरन्गुळा म्हणून येण्याच ठिकाण, का समाजाने ज्यान्च अस्तित्व, अस्मिता, ओळख नाकारली त्या मुलीन्च घर? त्या वास्तूत पाऊल ठेवताच दत्तक अन कायदा या शब्दान्चा शलाकाला विसर पडला अन जणू आपल ideal home असच असत, असच होणार होत या भावनेने ती गहिवरली. तस तर आश्रमाचा परिसर खूप मोठा होता अन इतकी शिस्त, टापटीप, अन मेहेनत घेवून जपलेला सात्विक निसर्ग त्या आश्रमाच्या चालकाबद्दल बरच काही सान्गू पहात होता. आजच्या युगातही अशी माणसे आहेत अन असे आश्रम आहेत याचच आश्चर्य होत. अस म्हणतात घराच्या भिन्ती बोलतात अन त्यात राहणार्या माणसान्बद्दल बरच काही सान्गतात सुद्धा, आपल्या मनाचे कोपरे मात्र त्यासाठी मोकळे हवेत. त्या वास्तूतील मुलीही कदाचित तितक्याच सुसंस्कृत अन शिस्तबध्ध असाव्याअत असे तीला वाटून गेले. कुठेही अनाथ आश्रम किव्वा आश्रयदाते, असा आव नाही, कसलाही देणगिदार बडेजाव नाही, अशा वातावरणात एव्हाना तिची घालमेल सम्पून गेली अन उलट एका कौतुक अन आदरयुक्त भावनेने तीचे मन भरून आले. आश्रमाच्या मुख्य कार्यालयात तीने नावनोन्दणी केली. " दादान्ची खोली त्या समोरच्या इमारतीत आहे. ते तिथेच भेटतील अन त्यान्ची भेट झाली की तुम्हाला मुलीलाही भेटता येईल." कर्मचार्याने दादआन्च्या निवासाचा रस्ता तिला दाखवला. शलाका "मानसीनिवास" च्या त्या मुख्य इमारतीकडे चालू लागली. गुलाबाच्या दुतर्फ़ा बागेबाहेर घातलेल्या छोट्याश्या कुम्पणावर अनेक छोटे मोठे सुविचार लिहीले होते. काही मराठी तर काही इन्ग्रजी. अन अशाच एका पाटीपुढे शलाका थबकून उभी राहिली... "stories are made, they don’t happen!" ती पाटी वाचताना तीच्या काळजाचे ठोके चुकले अन क्षणभर आपण कुठे उभे आहोत हेच विसरून गेली... पाटी पुन्हा पुन्हा वाचताना सरली दहा वर्ष सहज डोळ्यात तरळू लागली अन मनात खोलवर कुठेतरी कोन्डून ठेवलेल्या घटनान्चा प्रवाह ओघळू लागला.... stories are made they don’t happen! शलाका च्या या बोलण्याची तीच्या मैत्रिणी खर तर टिन्गल उडवायच्या. अग ते पुस्तकात अन लिहा वाचायला ठिक आहे पण आयुष्यात तस होत नसत. स्वताच्या आयुष्याची स्टोरी लिहीण्या घडवण्याइतकी तू मोठी नाहीस बबडे, या आईच्या वाक्यान्वर खर तर तीला राग येत असे. शलाकाची ती हट्टी अन झुन्ज देण्याच्या व्रुत्तीची आईला फ़ार काळजी असे. एकीकडे परिकथान्वर विश्वास ठेवणारी तर दुसरीकडे अशा परिकथा प्रत्त्यक्षात घडतात किव्वा घडवायला हव्यात असा सुधा मूर्तीन्चा आदर्श डोळ्यापुढे ठेवणारी शलाका. परदेशात आई वडिलान्पासून दूर शिक्षण घेताना आपण स्वताची परिकथा स्वतः घडवणार आहोत यावर तिचा ठाम विश्वास होता. तिला तरी कुठे ठावुक होत की तिच्या परीकथेतील राजकुमार असाच सहज तीला भेटणार होता. (क्रमशः)
|
Champak
| |
| Friday, May 26, 2006 - 10:27 am: |
| 
|
योग, रोज किमान दोन भाग वाचायला मिळतील अशी अपेक्षा!
|
chaan lihitoyas.. mastach,...!!!.. .. .. .. ..
|
Yog
| |
| Monday, May 29, 2006 - 1:36 pm: |
| 
|
mods, कृपया, ही कथा व सर्व posts ज्येष्ठ मधे हलवाल का..?
|
Kanak27
| |
| Tuesday, May 30, 2006 - 6:56 am: |
| 
|
Yog , Its interesting , Plz send post early !
|
Jo_s
| |
| Wednesday, May 31, 2006 - 5:35 am: |
| 
|
योग, खासच मला वाटत मी पुर्ण झाल्यावरच वाचायला हव होतं. अस वाट पहात बसायच म्हणजे . . . .
|
Yog
| |
| Wednesday, May 31, 2006 - 1:33 pm: |
| 
|
मन्डळी, माफ़ करा कामात अडकलो (होतो).. पुढचे भाग टाकतो लवकरच!
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 31, 2006 - 2:00 pm: |
| 
|
योग, तुझ्या कथा, एकत्रच वाचाव्या लागतात. शक्यतो पुर्ण लिहिल्यानंतरच टाकत जा रे. म्हणजे पुरता आनंद मिळेल
|
Yog
| |
| Wednesday, May 31, 2006 - 3:54 pm: |
| 
|
2. स्टोरी so abhi, whats the story...? अरे कसली स्टोरी? परवा तर ती भेटलीये, seems like nice girl thats all.. अभीने निलेश ला उडवून लावले. तरिही अभी च्या बोलण्यातील एक अवघडलेला सूर निलेश ला जाणवला. दोनच दिवसापूर्वी b 19day party मधे झालेली शलाकाची ओळख. इतर मुलिन्पेक्षा वेगळी, साधी शलाका त्या इतर देखाव्यात अन गर्दीत अभीषेकला आवडली. अर्थात पहिलीच भेट, ओळख अन इकडची तिकडची बोलणी यापेक्षा जास्त काही घडल नव्हत पण जल्लोशात गुन्ग त्या समुदायात शलाकाच व्यक्तीमत्व आकर्षक छाप पाडणार होत, का कुणास ठावूक? it was different... something different... अभी ला शब्दात मान्डता येत नव्हत पण शान्तपणे एका कोपर्यात बसलेल्या शलाकाच्या टपोर्या डोळ्यान्ची भाषा कुठेतरी मनाला भिडली होती. तसा अभी चार चौघान्सारखा मध्यम वर्गीय घरात वाढलेला शिकलेला, काहितरी करून दाखवायची जिद्द अन स्वप्ने उराशी घेवून आलेला अन उच्च शिक्षणातील इतर हजार चिन्ता अन व्यापात कुठेतरी एखाद्या मुलीबरोबर सम्बन्ध जुळावेत किव्वा मुद्दामून जुळवावेत असा मुद्दामून विचार तर त्यावेळी त्याने केलाही नव्हता. कदाचित भविष्याची शाश्वती नसताना असले विचार करणे निदान त्याला तरी परवडणार नव्हत. पण काहितरी घडल निश्चीत, कारण त्या दिवसापासून शलाकाच्या घरी त्याच्या चकरा वाढू लागल्या. मग रोजचे एकत्र येणे जाणे, वेळ मिळेल तेव्हा बाहेर जाणे, एकत्र इतर मित्र मैत्रीणीन मधे देखील त्या दोघान्च्यात एक जवळीक वाढत होती. नेहेमी आपल्या तन्द्रीत असणारा अभी कामे सम्भाळत तीच्या साठी वेळ काढू लागला अन ते सर्व निलेश च्या नजरेतून सुटण कस शक्य होत? दिवसभर दोघे बाहेर असले तरी रात्री घरी आल्यावर सुख दुख्खाच्या गप्पा करायला एकमेकान्शिवाय त्यान्ना दुसर कोण होत? जी नाती अन सम्बन्ध देशात जुळत नाहीत ती अशी परिस्थितीने अपोआप जुळवली होती. आई, वडिल, मित्र, अन इतर नात्यान्च्या गोन्धळात शलाका बद्दल नेमक आपल्याला काय वाटत हे अभी ला कळत नव्हत. एकीकडे मनात असा सम्भ्रम तर दुसरीकडे शलाकाच्या सहवासात एक समाधान अन वर्षानुवर्षे ओळख असल्यागत आपुलकी. किती नाजुक असतात अशी नाती, म्हणावी तर आपली नाहितर त्याला नावही देता येत नाही. वाटत हे माणुस आपल हक्काच, अन दुसर्या क्षणि जाणवत की त्या व्यक्तीबद्दल आपल्याला अजून काहीच माहित नाही. तरिही माहित नसण्याची एक विचित्र धुन्दी अन अधिक जाणू घेण्याच कुतुहल. काय करतेस एकटी इथे...? त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर, शलाका एकटीच निवान्त बसली होती तीच्या बालकनी मधे. बाहेर वाहणार्या जराश्या बोचर्या वार्याला तीने अन्गावरील पान्ढर्या शालित बान्धल होत. बाजुला कुन्डीत लावलेल्या फ़ुलान्चा मन्द सुवास पसरला होता. निरभ्र आभाळातील विभोर चान्दणे अन बाजूच्या व्यक्तीचा चेहेरा स्पष्ट दिसावा असा स्वच्छ चन्द्रप्रकाश.. आतमधे शलाकाची फ़ेवरेट गझल्स ची cd ऐकू येत होती. "झिन्दगी जब्भी तेरी बज्ममे लाती है हमे.. ये जमी चान्द से बेहेतर नजर आती है हमे..." अभी च्या प्रश्णाने ती भानावर आली, तीच्या डोळ्यान्च्या कडा त्या चन्द्रप्रकाशात चमकल्या अन हळुच नकळत काही टपोरी नक्षत्र ओघळली. काही नाही रे.... निवान्त बसलीये. काय झालं? घरी काही problem आहे का...? अभीच्या आवाजात काळजीचा सूर होता. खर तर आताशा दोघाना एकमेकान्ची सवय झाली होती. साधारण मनात काय चालले आहे याचा अन्दाज येत असे. तिच्या मनातील एखादा प्रश्ण, चिन्ता अभी अचूक हेरत असे तेव्हा तिलाही आश्चर्य वाटे. आज मात्र अभीच्या त्या भाबड्या प्रश्णाने ती अधिकच गहिवरली.. काही नाही अभी, just feeling lonely... ,त्रास होतोय थोडा... कसला, काही बोलशील? जाऊदे रे उगाच तुझ्या डोक्याला त्रास अन तू ऐकून काय करणार आहेस? (खरच काय करणार होता तो? पण तीला कसला त्रास होतो आहे ते जाणून घ्यावस तरी का वाटत होत?) may be you will feel better....tell me.... अभी हळुच तिच्या जवळ बसला. खर तर गेली दोन वर्षे येणार्या नविन मुला मुलीन्च्या चिन्ता, त्याना वाटणारी भिती, घरची आठवण, मानसिक ताण, सर्व जवळून अनुभवल होत त्याने. अशा वेळी दुसर्याला मदत करण शक्य नसल तरी कुणितरी विचारणार जवळ आहे ही भावनाच खुप सुरक्षित वाटत असे. अभी तसा इतरान्च्या दुख्खाबद्दल अडी अडचणिबद्दल अधिक जागरूक असलेला. अन शलाका शी तर एक अनामिक नात निर्माण झालेल, निदान त्याच्या दृष्टीकोनातून तरी, ती इतर चार चौघीन्सारखी फ़क्त मैत्रीण नव्हती. शलाका ला त्याच्या बद्दल काही वाटत का हे तर त्यालाही जाणून घ्यायच होत. काय सान्गू अभिषेक, I am going thorugh a break up and its hurting........ शलाका ने मान वळवली अन एकटीच हुन्दके देत बसली... अभि ला हे अगदी अनपेक्षित होत. शलाका ला आपण बर्यापैकी ओळखतो असा त्याचा समज त्यातही तिच्या वैयक्तीक आयुष्यात फ़ार काही गुन्ता गुन्तीच्या घटना वगैरे असतील अस तिच्या व्यक्तीमत्वावरून त्याला कधिच वाटल नव्हत. इतक्या निरागस अन साधेपणामागे इतक काही दुख्खद असू शकेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. तिच्या शब्दाने खर तर तो हबकलाच. क्षणभर काय बोलावे हेच कळेना त्याला. त्या शब्दातून ती आपल्यापसून फ़ार कुठेतरी दूरवर निघून गेल्यागत वाटल. त्याने तीचा हात घट्ट धरला अन फ़क्त शान्तपणे बाजुला बसून राहिला. त्या थन्ड हवेतही, आत साचलेले अन घुसमटलेले तीचे अश्रू बराच वेळ तिच्या हातात झिरपत असावेत.प्रथमच एखाद्या तीर्हाईताच दुख्ख अभीला इतक जवळून स्पर्शून गेल. एखाद्या शान्त रात्री चन्द्रप्रकाशात एखादी नौका डुलत असते, प्रत्त्येक सरत्या लाटेवरील शुभ्र झिरमिरी वाट तिला चन्द्राजवळ नेत असते. कुठल्याही क्षणी तो चन्द्र अलवार तिच्या शिडावर उतरेल असे वाटत असतानाच अचानक एक लाट उसळते अन सर्व वाटा बुडून जातात. चन्द्रवाटान्चा तो लपन्डाव चालूच रहातो अन नौकेची सफ़रही. इतके दिवस शलाकाच्या जवळ आलेल्या अभीला शलाकाशी आपल काय नात आहे याच उत्तर हव होत. त्या रात्री अचानक एक लाट उसळली अन हातात मात्र उरला फ़क्त चन्द्राचा ओलावा. तो सुन्दर होताच पण तरिही त्याचा नव्हता... (क्रमशः)
|
Yog
| |
| Wednesday, May 31, 2006 - 4:11 pm: |
| 
|
software engineer होवून शलाकाला बन्गलोर मधे नामान्कित कम्पनीत नोकरी मिळाली अन इतर दोन मैत्रीणीन्बरोबर तिथे जीवनाचा सर्वात सोनेरी काळ व्यतीत करताना, त्यान्च्याच ग्रुप मधिल रजत शी तिचे नाजुक सम्बन्ध जुळले. ऐन तारूण्यात अन उमेदीच्या दिवसात, असे मोकळे अन स्वतन्त्र आयुष्य जगताना त्यान्चे असे सूर जुळणे ही काही नविन बाब नव्हती. पण, पहिल प्रेम, पहिला स्पर्श, सर्व पहिलच पण त्याच अपरूप, नाविन्य, उत्सुकता, excitement सर्व मात्र अगदी विलक्षण, almost like a dream...!! अन भाबडी शलाका तिला खात्री होती की This is forever... पण ते नाते सम्बन्ध परीपक्व होण्या आधिच दोघान्च्याही घरच्या विरोधापुढे त्यान्ना उभ रहाव लागल होत. अनेक प्रयत्न, मिनतवार्या अन बोलणी करून देखिल कुठेतरी काहितरी चुकत होत. घरच्यान्च्या दृष्टीने एक अपरिपक्व प्रेम आणि त्यातून पुन्हा वर्ण अन जातीभेद. या सर्वात शलाका, खर तर नक्की कुणाला खुष कराव या गुन्त्यात स्वताच सुख हरवून बसली अन गोन्धळली. विचाराने पुढारलेले आपले आई वडील वेळ आली की कृतीत मात्र अजूनही मागासलेले अन आप्त स्वयिकान्चे मिन्धेच आहेत याची जाणीव तिला झाली. एकीकडे चीड आणि सन्ताप तर दुसरीकडे आपल्याच आईवडिलाना दुखवण्याच, अन त्यातून सम्बन्धित सर्वानाच दुखवण्याच ओझ. कदाचित शलाका अजून इतक्या विरोधाला तोन्ड देण्याइतकी परिपक्व झाली नव्हती किव्वा सुधा मूर्तीन्चा आदर्श पुस्तकात खूप appealing वाटला असताना त्याच्या पूर्ततेसाठी किती त्याग अन कष्ट सोसावे लागतील याची बहुदा कल्पना अन तयारी तीने केली नसावी. यातच भर म्हणून रजत च्या घरातील चाली रिती, संस्कार यात आपण कुठेही बसत नाही ही दिसती गोष्ट तिला नाकारता येत नव्हती. परिपक्वता समाजाच्या दृष्टीने अनेक प्रकारची असू शकते. पण आपण दोघ राजा राणि अन बाकी दुनिया गेली उडत अशा तत्वान्वर नविन आयुष्य उभ करण तिला मन्जूर नव्हत, अर्थात ही लढाइ कुठवर अन किती वेळ याचा विचार अन उत्तर तिच्याकडे नव्हत. प्रेमात पडताना खरच इतका विचार तिने करायला हवा होता का? रजत ला सोडून इतर कुठेही मन गुन्तवण ही कल्पनाही अशक्य होती. आज ना उद्या ही गोष्ट निकालात काढावी लागेल हे कळत होत. विचीत्र योगायोग म्हणावा की नियतीचे फ़ासे, पण उच्चशिक्षणासाठी परदेशात तिचा अर्ज शीष्यवृत्ती सकट मन्जुर झाला अन अचानक त्या निमित्ताने तिच्या आयुष्यात एक नविन पर्वच सुरू झाल जणू. अशी सन्धी पुन्हा येणार नाहि हे तिलाही ठावुक होत अन यातूनच रजतच्या नाते सम्बन्धान्चा गुन्ता कदाचित कायमचा सुटेल (तुटेल?) किव्वा निदान काही काळ तरी त्या क्लेशदायक गोष्टीना तोन्ड द्यावे लागणार नाही या कल्पनेने तिच्या परदेशवारीला कदाचित सर्वान्चीच सम्मती मिळाली असावी. आई वडिलान्बद्दल खर तर तिला प्रचन्ड आदर अन प्रेम होत पण कधी कधी अशा प्रसन्गातून आपल्या आप्त स्वकीयान्चे वेगळे चेहेरे समोर येतात तेव्हा त्यातून येणारी चीड, उबग, अन एक हताशपणा यातून बाहेर पडताना तीने शोधलेली ती पळवाट होती का...? आपलेच वाटणारे सगे सोयरे तिला तेव्हा परके वाटले होते अन कालपर्यन्त रजत कडे जाणारी प्रत्त्येक वाट आज उसळत्या विरुध्ध प्रवाहाबरोबर बुडत होती.... रजत, I hate myself to do this to you, but I think we should stop here... इतक्या लोकाना दुखवून आयुष्यात मिळणार सुख मला नको आहे. please forgive me if possible .. रजत आणि शलाकाची ती शेवटची भेट, एखाद्या तुफ़ानाने कौले उडवून न्यावीत तसे इतके दिवसान्चे गोडीगुलाबीचे दिवस क्षणार्धात उडून गेले. तिचे शब्द ऐकल्यावर रजत च्या डोळ्यात दाटलेले भाव तिला कायमचे अस्वस्थ करून गेले. विमानाने उड्डाण केल, देश सुटला, अन शलाकाची सफ़र पुन्हा एकदा सुरू झाली.. मनात अनेक प्रश्ण, उत्तरे, बोच, दुख्ख, गमावलेले अन गवसलेले बरेच काही, रजत वर केलेल्या अन्न्यायाची बोच, अन कुठेतरी स्वताला सिध्ध करून दाखवण्याची, पुन्हा नव्याने सारं रचण्याची ओढ, धड्पड. चन्द्रवाटान्शी तिचाही लपन्डाव तेव्हाच सुरू झाला होता.. Was it a beginning of the new story or an end to the old one? (क्रमशः)
|
Dha
| |
| Wednesday, May 31, 2006 - 4:19 pm: |
| 
|
कथा छान आहे. waiting for next...
|
योग, भावनांचे अगदी सुंदर आणि तरल वर्णन
|
Lampan
| |
| Friday, June 02, 2006 - 6:37 am: |
| 
|
सत्यकथेवर आधारीत ?? म्हणजे वाटतीये ..
|
खुप ओघवती आणि छान झालिये... मलाही लंपन सारखेच वाटतेय...!!!
|
Maudee
| |
| Monday, June 05, 2006 - 3:28 am: |
| 
|
लेख़कमहाशय कुठे आहात??? टाका लवकर पुढचा भाग
|
Lampan
| |
| Monday, June 05, 2006 - 8:23 am: |
| 
|
एवढी वाट बघायला लावणे बरे नाही .. जर मला राग आला तर मीच लिहिन काहीतरी ... :p
|
Dha
| |
| Tuesday, June 06, 2006 - 9:42 am: |
| 
|
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहातेय.
|
|
|