|
Deemdu
| |
| Wednesday, March 22, 2006 - 3:50 am: |
| 
|
खरच एक वर्ष झालं का हो? मला तर अजुनही विश्वासच बसत नाहीये. आयुष्य कधी तुमच्या शिवाय काढु शकेन अस वाटलच नव्हतं. तुम्हाला आठवत मी ३ / ४ वर्षांची असेन आणि तुम्ही माझ्यासाठी कानातले घेउन आला होतात, ते कानातले मी घातले आणि तुमच्या मांडीवर येउन बसले आणि तुम्हाला कानातले दाखवुन विचारल होत " बाबा आता मला नथनी कधी आणणार? " " तो जोडा घे इकडे, मग तुला नथनी आणु. " अस म्हणुन तुम्ही मला कवटाळल होतत. मी आजतगायत तो स्पर्ष विसरु शकत नाहीये. तेंव्हा वाटल होत माझ्या इतक माझ्या बाबांना कोणीच आवडत नाही. आणि ते खरही होत म्हणा. आठवत एकदा दिवाळीत माझा हात भाजला होता फटाक्यामुळे, माझ्या हातावर मध चोपडुन रात्रभर माझ्याशेजारी बसला होतात, आणि सकाळी तसेच कामाला गेलात. " माझी माई म्हणजे माझा मोठा मुलगा आहे " म्हणायचात. सगळ्या भावंडांन मध्ये माझी एकुलती एक मुलगी आहे अस म्हणताना तुमच्या डोळ्यातली चमक मला त्या वयातही जाणवायची. प्रत्येक वेळी एकच धडपड जे आपल्याला मिळाल नाही ते निदान मुलांना तरी मिळु दे. बाबा आठवत का हो? माझा एक्सीडेंट झालेला, मी घरी कशी आले ते देखील आठवत नव्हत मला. आई तशी पहील्या पासुनच तडकु, म्हणाली एक कानाखाली द्या सगळ आठवेल, पण तुम्ही मला जवळ घेउन बसलात नंतर आईनी आणि तुम्ही मला औषध वगैरे लावुन झोपवल होतत, तुम्हाला माहिती नसेल पण मी जागीच होते, आई तुमच्या कडे रडलेलीही मला माहीत आहे, तुम्ही तीला समजावलत आणि मी झोपले होते तिथे आलात, तुम्हाला वाटत होत मी झोपली आहे, तुम्ही हळुच वाकलात आणि माझ्या गालावर पापी घेउन माझ्या आंगावरुन हात फिरवुन मला पांघरुण घातलत. आणि गेलात. पण मला त्यावेळी तुमच्या डोळ्यातल पाणी दिसल होत बाबा.... आपण भांडण पण किती केली ना हो बाबा, अगदी TV वर कार्यक्रम कुठला बघायचा इथपासुन ते मी तुम्हाला कोणाला आवडतच नाही, किंवा तुम्ही मला अस काच बोललात, एकदातर मी serial च्या भांडणावरुन रिमोट देखील फोडला होता. एकदा तुम्ही आम्ही घरात नसताना गावाला जाणार होतात तेंव्हा तुम्ही आमच्या साठी लिहुन ठेवलेली चिठ्ठी आजही मी जपुन ठेवली आहे, काय त्या instructions म्हणे आईला त्रास देऊ नका, निट जेवण करा, दुपारच्या वेळी कोणाला दरवाजा उघडू नका. त्या चिठ्ठीच महत्त्व मला आज कळतय हो. मला दाखवायला म्हणुन आपण गेलो होतो तिथपासुन ते माझ लग्न होईपर्यंत तुमच्या जीवाची झालेली घालमेल मला जाणवत होती. त्यावर हसुन म्हणाला होतात माझ्या लेकीनी मला अजीबात जोडे झिजवायला लावले नाहीत, आत्ता कुठे स्थळ बघायला सुरुवात केली तर लगेच लग्न ठरल पण. सिमांतपुजनाच्या दिवशी आई अर्धातास बाबा कुठे आहेत म्हणुन शोधत होती आणि तुम्ही वर गच्चीत उभ राहुन लहान मुलासारख ढसाढसा रडत होतात. आमच्या किती मोठ्या मोठ्या चुकासुध्धा तुम्ही अगदी हसत हसत माफ केल्यात. मी swimming pool वर ५००० रु. हरवुन आले, घाबरत घाबरतच घरी आले की आता काय आइकायला मिळणार म्हणुन पण तुम्हाला सांगीतल तर तुम्ही मला अजीबात न ओरडता म्हणालात पैसेच गेले ना नशीब तर नाही नेल कोणी, अग आपले नव्हतेच ते अस समजायच. पण त्या ५००० ची त्यावेळी अपल्याला किती किंमत होती ह्याची जाणीव मला होती, आणि आजही आहे. बाबा खरच सांगते अगदी मनापासुन जेंव्हा लग्नाच्या मंगलाष्टका सुरु झाल्या ना तेंव्हा वाटल होत द्याव तो सगळा हार बिर फेकुन आणि आई, योगी आणि तुम्हाला घेउन सरळ घरी निघुन जाव. लग्न झाल्यानंतरही जेंव्हा घरात भांडण व्हायची तेंव्हा मला समजावणारे माझे बाबा होते की माझा एखादा मित्र खरच कळत नव्हत. बाबा म्हणुन दाटलेल प्रेम तर त्यात दिसायचच पण मित्रासारख सगळ रोखठोक चुका पण दाखवुन दिल्यात. पार्थ च्या जन्माच्या दिवशी पहाटेपासुन आई माझ्या बरोबर आत लेबर रुम मध्ये तर बाहेर तुम्ही आणि राजेश. जसजसा वेळ जाईल तसतशी तुमची घालमेल वाढत होती शेवटी तुम्ही Doctor ला जाऊन सांगीतलत c section करुन टाका तीला खुप त्रास होतोय. इतका माझा त्रास तुम्ही बाहेर उभे राहुन अनुभवु शकत होतात. आणि पार्थ झाल्याच कळल्याबरोबर राजेश ला मिठी मारुन तुम्ही रस्त्यात रडला होतात. त्यादिवशी माझ्या लक्शात होत की तुमचा ५० वा वाढदिवस आहे, पण आत्ता फोन करु नंतर करु च्या नादात दुपार झाली, आणि तुमचाच फोन आला " काय हे? येव्हढी हाफ सेंचुरी पार केली आम्ही तर तुमचा साधा फोनही नाही. " मग आपण रात्री जेवायला जायच ठरवल होत. आई मुंबईला मावशी कडे गेली होती. रात्री माझ्याकडे आलात आणि म्हणालात " योगीला यायला अजुन वेळ आहे, मी पुढे होतो, तुम्ही मागुन या " . पण तुम्ही पुढे का गेलात बाबा....... मी खरच तुमची गुन्हेगार आहे बाबा मी त्या वेळी तुम्हाला थांबवायला हव होत, सगळे एकत्रच जाऊ म्हणून. का माझ्या बुद्धीला ब्रम पडला कळल नाही. तुम्ही गेलात आणि आमच्या मनामध्ये एक पोकळी निर्माण झाली, आयुष्यभर कितीही काहीही केल तरी ही पोकळी भरुन निघणार नाही. प्रत्येक गोष्टीचा आनंद हा अपुर्णच वाटतो, प्रत्येक वेळी वाटत आज बाबा असते तर!!!!! बाबा आलेला प्रत्येक माणुस जाणरच आहे हो, तुम्ही गेलात, पुढे कधी आम्हीही जाऊ, पण आयुष्यभर इतके कष्ट करुन इतक्या खस्ता खाऊन आत्ता कुठे जरा चांगले दिवस आले होते. आत्ता स्वतःसाठी जगायचे दिवस आले होते तर तेही त्या परमेश्वराला बघवल नाही? जेंव्हा केंव्हा तुम्ही स्वप्नात येता कळत असुनही ते स्वप्न संपुच नये अस वाटत. बाबा एकदाच माझी चुक माफ करुन परत या हो, तुमच्या कडे सगळ्या चुकांच्या क्षमा मागायच्यात, तुमच्या कडे हट्ट करायचेत, तुम्ही बाहेर जाताना हट्टानी तुमचा भांग पाडुन द्यायचाय, एक पैशाला एक केस असे तुमच्या डोक्यावरचे पांढरे केस काढुन पैसे कमवायचेत, तुमच्या कुषीत झोपायचय. बाबा या हो एकदाच तुमच्या लेकराला एकदाच जवळ घ्या....................... उद्या माझ्या बाबांच पहील वर्षश्राद्ध आहे
|
ओऽऽह, नो वर्डस मोअर! इश्वर त्यांना सद्गती देवो!
|
Moodi
| |
| Wednesday, March 22, 2006 - 4:05 am: |
| 
|
आमच्या संवेदना तुझ्याबरोबर आहेत यापेक्षा अधिक काय ग सांगणार!!
|
Jaaaswand
| |
| Wednesday, March 22, 2006 - 4:06 am: |
| 
|
दीमडू.. अतिशय touching.. right from the bottom of the heart शब्द नाहीत... बोलायला अंगावर शहारा आला... एवढीच प्रतिक्रिया देऊ शकतो
|
Charu_ag
| |
| Wednesday, March 22, 2006 - 4:11 am: |
| 
|
दीमडु, ... ..... ..... ..... ...
|
Nika
| |
| Wednesday, March 22, 2006 - 5:35 am: |
| 
|
डोळ्यातुन पाणि काढलस दिमडु, मला हि बाबा म्हणजे माझं जग आहे त्यांच्यावीना जगने अशक्यच आहे
|
touching!!!.. .. .. .. ..
|
Gandhar
| |
| Wednesday, March 22, 2006 - 7:37 am: |
| 
|
दीम्स .. .. ..
|
Savani
| |
| Wednesday, March 22, 2006 - 9:34 am: |
| 
|
दीमडू, अगदी डोळे भरून आले ग वाचताना... तुझ्या बाबाना सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
|
Shyamli
| |
| Wednesday, March 22, 2006 - 9:40 am: |
| 
|
दिमडु वाचवत नाहिये ग..... डोळे भ्रले पाण्यानी माझि आई पण नुकतिच गेलिये ग!
|
Arch
| |
| Wednesday, March 22, 2006 - 10:18 am: |
| 
|
दिपाली, अगदी touching . छानच मांडल आहेस. त्यांच्या स्मुतिस माझाही नमस्कार.
|
Champak
| |
| Wednesday, March 22, 2006 - 10:59 am: |
| 
|
.. .. .. ..
|
Nalini
| |
| Wednesday, March 22, 2006 - 11:11 am: |
| 
|
दिमडु
|
Chinnu
| |
| Wednesday, March 22, 2006 - 3:09 pm: |
| 
|
I dont have words deemdu!
|
Divya
| |
| Wednesday, March 22, 2006 - 5:05 pm: |
| 
|
खरच शब्दच नाहीत.... मनापासुन श्रद्धान्जली.
|
Swasti
| |
| Wednesday, March 22, 2006 - 10:38 pm: |
| 
|
दी म डु . . . . . . . . . . . .
|
Athak
| |
| Wednesday, March 22, 2006 - 11:32 pm: |
| 
|
दीम्डुबेन , very touching लिहुन मन मोकळ केलस
|
Milya
| |
| Thursday, March 23, 2006 - 12:50 am: |
| 
|
दिम्डु छान श्रद्धांजली वाहिलीस...
|
दीमडु डोळे भरुन आले ग...
|
Dineshvs
| |
| Thursday, March 23, 2006 - 6:34 am: |
| 
|
दीमडु, हे बाबाने नक्कीच वाचलं असणार. असं माणुस जाऊन जाऊन कुठे जाणार ? आपल्याभोवतीच राहणार नेहमी.
|
Megha16
| |
| Thursday, March 23, 2006 - 11:45 am: |
| 
|
दिम्डु, तुझ्या बांना माझी पण आदरपुर्वक श्रद्धाजंली.
|
Hems
| |
| Thursday, March 23, 2006 - 12:39 pm: |
| 
|
दीमडू, लेकीची ही माया खरच पोचणार बाबांपर्यंत !! ...
|
Deemdu
| |
| Thursday, March 23, 2006 - 11:29 pm: |
| 
|
सगळ्यांच्या सदिच्छांबद्दल आभार मानुन मला तुमचा अपमान नक्कीच करायचा नाहीये. खरतर बाबां विषयी लिहीण्यासारख खुप काही आहे पण त्या वेळेला जे जे जस जस सुचत गेल तसतस लिहीत गेले इतकच.
|
Bee
| |
| Friday, March 24, 2006 - 12:53 am: |
| 
|
दीमडु, वाचून हृदय हळव झाल. पण अपघाताच कळल नाही. तुझे c section झाले त्या दिवशी त्यांचा वाढदिवस. तू कशी काय उठू फ़िरू शकलीस बाहेर जायला?
|
Psg
| |
| Friday, March 24, 2006 - 2:11 am: |
| 
|
बी, अरे तो separate para आहे रे बाबा! त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी वाढदिवस होता त्या दिवशी!!! ज्या दिवशी बाळ झाला तोच दिवस नाही! कळलं नाही तर धाडकन प्रश्ण विचारण्यापेक्षा दोनदा वाचाव रे, म्हणजे आपोआप समजत!
|
|
|