|
Charu_ag
| |
| Tuesday, March 14, 2006 - 7:59 am: |
| 
|
'रहम' दारावरचे धक्के ऐकुन गोविंदजी खडबडुन उठले. कमलादेवी पण जाग्याच होत्या. दोघानी वाड्याच्या दाराचा कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. दारावर एकामागुन एक धक्के बसत होते. दोघांच्याही काळजात चर्र झाल. बल्लु आणि बिन्नी पण आवाजाने जागे झाले. काय होतय ते त्या कोवळ्या जिवाना कळतही नव्हते. बल्लु ने शांत झोपलेल्या विरु ला पण जागे केले. विरु उठुन आईच्या, कमला देवींच्या कुशीत जावुन बसला. बिन्नी आणि बल्लुने वडिलाना मिठी मारली. आता काय करायच? एवढ्या रात्री कुठे जायच? दारावर तर साक्षात मृत्यु धडका घालत होता. कमलादेवीनी आपल्या पतीकडे एकवार पाहिल. मांडीवर निजलेल्या विरुला घट्ट पोटाशी धरल आणि त्या उठल्या. गोविंदजीना सुद्धा काळ दिसत होता. तेही बल्लु बिन्नी ला घेवुन उठले. वाड्याला एकच प्रवेशदार. जाणार तरी कुठे? दार वाजवणारे ते खविस आत्ता समोर येतील. कमलादेवीना नजेरेनेच खुण करुन पाठोपाठ यायला सांगितल. पाचही जण भितीने थरथरत जिना उतरुन जिन्याखालच्या खोलीकडे जावु लागले. आता शक्य तितका वेळ लपुन बसणे एवढच त्यांच्या हाती होत. जिन्याखालची खोली वरुन सहसा कुणाला दिसत नाही. जीव वाचवण्याचा सध्या तरी एकच मार्ग गोविंदजीना दिसत होता. थरथरत्या हाताने खोलीच अरुंद दार उघडल. कमलादेवीना आणि बिन्नीला आत ढकलल. ढकलाढकलीत विरुला दाराच्या कोपर्याचा धक्का लागला. त्याने रडण्या आधीच कमलादेवीनी त्याचे तोंड घट्ट दाबले. बिचारा नुसताच मुसमुसु लागला. बल्लु ला आत पाठवुन गोविंदजी दार घट्ट लावत आत येवुन बसले. इवलीशी ती खोली, पण आता तिच मोठा आधार होती. प्रवेश दारावर चे धक्के आता वाढु लागले होते. एखाद्या ओंडक्याने धक्के घालत असावेत. दहा बरा जणांचा तरी जमाव असावा. गोविंदजी आणि कमलादेवी कानोसा घेत होते. कमलादेवीनी मनातल्या मनात देवाचा धावा सुरु केला. मांडीवर मुसमुसणरा विरु आता बराच शांत झाला होता. बिन्नी ने आईला घट्ट पकडले होते. तिच्या ह्र्दयाची लकलक कमलादेवीना स्पष्ट जाणवत होती. बारा तेरा वर्शाची कोवळी पोर. शेजारीच श्वास रोखुन बसलेला बल्लु. कधी आईकडे तर कधी बाबाबंकडे बघत होता. त्याला कुठ कळत होत काय होतय ते. गोविंदजींच एकटच 'वेगळ' घर त्या गावात शिल्लक होत. बाकी सगळे घरदार सोडुन कधीच सीमापार गेले होते. गोविंदजीना पण अनेकानी आग्रह केला, चला इथुन. ते खविस जीव घेतील तुमचा आणि पोराबाळांचा. चला इथुन. पण गोविंदजिना ते पटल नाही. वाडवडिलांच्या जमिनी, त्यांच घर, आसपासची मित्रमंडळी सोडुन अस निघुन जायच? अश्या सोन्यासारख्या मातीला टाकुन जायच? आपला मुल्क सोडुन परक्या मुलुखात जायच? हट्टाने ते तिथेच राहिले होते. गावातुन जाणारा एखादा नातेवाईक येऊन बरोबर चलण्याचा आग्रह करत असे. त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग सांगुन मन वळवण्याचा प्रयत्न करित असे. पण व्यर्थ. आपली माणस सोडुन अस परक्यांच्या गावी जायच हेच त्यान पटत नव्हत. गेल्या कित्येक पिढ्यापासुन त्यांच कुटुम्ब त्याच गावात राहत होत. घरतल्या प्रत्येकाच्या अस्थी इथल्या नदीतच विसर्जीत करायची आपली परंपरा. ही भुमी, ही नदी सगळ सोडुन परक्या जागी आश्रितासारख जाणे त्यान पटत नव्हते. आपली भुमी का सोडायची? कोण मारायला येतय, सगळी आपलीच तर माणस आहेत! एवढा जिगरी दोस्त रेहमान आहे. मग कशाची काळजी! असा विचार करुनच गोविंदजी बोलनार्याना गप्प करित. सगळे सगेसोयरे सोडुन गेले पण गोविंदजींचा निर्धार ठाम होता. कमलादेवीना कळत होत काय होतय आसपास ते. रोज नव्या बातम्या आणि रोज नव्या काळज्या. पोरांसाठी जीव तळमळत होता आणि नवर्यासाठीही. पन्ना जीज्जी सांगत होती तिच्या बहिनीच काय झाल ते. पुरुषाना जिवंत जाळल, पोराना पाय धरुन गरगर उचलुन भिंतीवर आपटल, बायकांच वय पण पाहिल नाही. सहा वर्षाची असो नाहीतर ७० वर्षाची. सगळ्या खविसानी मिळुन.... पन्ना जिज्जीच्या बहिनीने तर तिच्या पोटच्या पोरीचा गळा आपल्या हाताने घोटला. त्या अश्राप जिवाला कळतही नव्हते कि आपली जन्मदाती आई का अस करतेय. पण त्या खविसानी कुस्करल असत तरी कुठे कळल असत आपल काय होतय ते. त्या विचारानेच कमलादेवींच्या अंगावर काटा आला. बिन्नीकडे एकवार पाहिल आणि डोळे मिटुन पुन्हा देवाचा धावा सुरु केला. आत दरवाजा उकललला होता. दहा बारा जणांचा जमाव घोषणा देत वाड्यात शिरला होता. त्यांच्या हातातल्या मशालींचा उजेड दाराच्या फटीतुन स्पष्ट दिसत होता सगळेच्या सगळे जिण्यावरुन धडधडत वर गेले. सगळ्या खोल्या शोधल्या. पण कुणीच घरात सापडल नाही. चिडलेल्या जमावाने मोठमोठ्याने घोषण देत घर विस्कटुन टाकल. एक दोन जण जिन्यापाशी येवुन गेले. साक्षात काळ येऊन गेला होता. शेजारच्या देवाघरातील कपाट खाली पाडली. स्वयंपाक घर उधळल. रक्त प्यायला टपलेला लांडगा श्वापद मिळाल नाही तर जसा उसळतो तसा जमाव आता उसळला होता. काहीच... कुणीच हाती लागत नव्हत. पुन्हा एकवार घोषणा देत जमाव तिथुन निघुन गेला. सगळ पुन्हा शांत झाल. आजची रात्र टळावी, उद्या कसही करुन इथुन पळुन जायच गोविंदजीनी पक्क केल. सुर्योदयाला अजुन वेळ होता. आता कुठे रात्र चढली होती आणि जमावा मध्ये पिशाच्च सुद्धा. . सगळ शांत झाल तरी मनात अजुन खळबळ होतीच. काल गावातल देऊळ पाडल तेंव्हाच मनात पाल चुकचुकली होती. आपण आपल्याच गावात परक होत चाललोय याची शंका यायला लागली होती. आसपासच्या लोकांचे तुच्छ कटाक्ष टोचत होते. त्याना सगळा मुल्क फक्त त्यांच्या बिरादरीचा करायचा होता. त्याना त्यांच्या पाक भुमीवर एकही काफिर नको होता. दोन देशातल्या सीमा आता माणसांच्या मनामध्ये सुद्धा पडल्या होत्या. इथुन जायच तरी कुठ? तिथे कोण ओळखणार आपल्याला. आपल्या मातीत जिथ आपण परक झालो तिथे परक्या प्रांतांत कोण भीक घालणार? काळजीने जीव उकलत होता. कमलादेवीनी आणि गोविंद्जीनी निश्वास सोडला पण काही क्षणापुरताच. पुन्हा जिन्यावर चाहुल लागली. कुणीतरी खाली उतरत होत. हातात पेटता पलिता होता. त्या संथ पावलांच्या जवळ येत जाणार्या आवाजागणिक भीती वाढत होती. जिन्याच्या पायथ्याशी ती व्यक्ती येऊन उभी राहिली. आणि जिन्याच्या खालच्या बाजुला येवु लागली. ही जागा माहित असणारा त्यांच्या कुटुंबाबाहेरचा एकच माणुस होता, रेहमान. बरोबर... त्याच त्याच्या बिरादरी तल्या एकाशी जमिनीवरुन भांडन झाल होत तेन्व्हा जीव वाचवण्यासाठी तो आपल्याकडेच आला होता. त्याला आपण याच खोलीत लपवल होत. बरोबर.. त्याला माहित असणर आपण कुठे आहोत. आता तोच वाचवेल आपल्याला. आशेचा एक अंधुक किरण दिसला. गोविंदजीनी निश्वास सोडत समाधानाने कमलादेवींकडे पाहिल. दारावर एक जोराचा धक्का बसला. आनि दार उचकटल. समोर दुसरच कुणीतरी होत. पलित्याच्या उजेडात त्याचे लाल डोळे अधिकच भयान वाटत होते. गोविंदजीनी क्षणभर ओळखलच नाही. पलित्याचा उजेड आता त्याच्या चेहर्यावर पडल होता........ रेहमानच होता तो, पण मृत्युला सोबत घेऊन आला होता. त्याने खसकन गोविंदजीना बाहेर ओढल. एकच आधार आता कर्दनकळ ठरला होता. त्या झटापटीतही खोलीच्या दाराला बंद करण्याचा गोविंदजी प्रयत्न करित होते. कमलादेवीना बाहेर काय घडतय याची कल्पना आली. विरुच्या आणि बल्लुच्या डोक्यावरुन हात फिरवला. आत फक्त काही क्षण.... पुढ काय घडणार याची चाहुल लागली होती. 'रेहमान, अपने दोस्ती के खतिर तो छोड दे हमे, कल सुबह हम ये घर, गांव, ये मुल्क छोडके चले जायेन्गे, आज की, केवल आज की रात हमे बक्ष दे | ' गोविंदजी कळकळवत होते. 'रेहमान. छोड दे हमे | हमने क्या बिगाडा है तुम्हारा | बक्ष दे हमारी जान, रेहमान, इतना तो रहम कर | ' अगतिक गोविंदजी त्याच्या हातापाया पडत गयावया करत होते. रेहमानच्य अंगात शिरलेला सैतान बहिरा झाला होता. त्याला दिसत होता तो फक्त स्वताच्या हातातला कोयता आणि गोविंदजींची मान. हातपाया पडानार्या गोविंदजीना लाथाडुन तो छद्मी हसला. 'ठिक है, तु भी जाते जाते क्या याद रखेगा! तेरी दोस्ती के खातिर, तुझे तेरे घरवालोंके बाद मारुंगा | ' गोविंदजी खाली कोसळले. ......... आणि कमलादेवींचा हात बिन्नीच्या गळ्याकडे गेला. समाप्त (?) ************************************************************************** दुर्दैवाने या कथेतील संदर्भ खोटे, काल्पनिक नाहीत. अफगानीस्तान, पश्चिम पाकिस्तान मधील हा भुतकाळ असला तरी पुर्व पाकिस्तान मधले वर्तमान आहे. अशाच एखाद्या काळरात्री नशिबाने वाचलेला एखादा बल्लु, विरु हे अमित, शांतनु किंवा रणजीत च्या रुपाने भेटतात आणि मन ढवळुन काढतात. गोविंदजी, कमलादेवी कधीतरी भेटतात, ....... पण बिन्नी, ती कधीच भेटली नाही.
|
Moodi
| |
| Tuesday, March 14, 2006 - 8:03 am: |
| 
|
चारु असे वाचुन सुन्न व्हायला होत. निशब्द!!! 
|
Nalini
| |
| Tuesday, March 14, 2006 - 8:12 am: |
| 
|
मुडीला अनुमोदन. सगळी कथा अगदी श्वास रोखुनच वाचुन काढली. कथा ईथेच संपवुन चालणार नाही हे. ही नव्या अध्यायची सुरुवात असायला हवी.
|
चारू काय भयानक आहे ग हे. का ही माणसं थांबतात तिथं? आपला वाटत नसेल त्यांना पलिकडचा देश पण तिथं निदान सुरक्षितता आहे एवढं पण नाही का कळत?
|
Amrutabh
| |
| Tuesday, March 14, 2006 - 10:13 am: |
| 
|
चारु, मन अगदी कोमेजुन गेल्यासारख वाटल वाचून 
|
Champak
| |
| Tuesday, March 14, 2006 - 12:59 pm: |
| 
|
कथेचे नाव अन पहिल्या परिछेदात च पुढची कथा समजली. मागील वर्षी rediff वर १९८९ च्या त्या भयानक दिवसातील घटनांवर आधारीत लेख १९ जानेवारी १९९० ची live commentary http://www.rediff.com/news/2005/jan/19kanch.htm शंतनु सिद्धार्थ हे indonesia तील मुसलमाना चे नाव असु शकते हे कधी खरे वाटेल का? पण ते सत्य आहे!!
|
Ashwini
| |
| Tuesday, March 14, 2006 - 12:59 pm: |
| 
|
शेवटपर्यंत वाटत होतं की तो रेहमान काहीतरी रहम करेल किंवा दुसरा काहीतरी चमत्कार होईल. पण असे चमत्कार फक्त सिनेमामध्येच घडतात, नाही का? चारू, तुझ्याकडून अपेक्षा वाढायला लागल्यात आता. जिन्याखालच्या खोलीतला प्रसंग तर सहीनसही उभा केलास.
|
Champak
| |
| Tuesday, March 14, 2006 - 1:05 pm: |
| 
|
का ही माणसं थांबतात तिथं?>>>>> मोठा मोलाचा सवाल हे. नवी दिल्ली अथवा जम्मु तील निर्वासीत छावण्यांमधुण जगणार्या काश्मीरी पंडितांच्या व्यथा बद्दल जमल्यास जरुर वाचा मला आठवतोय तो दिवस...... अडवाणी ग्रुह मंत्री असताना नंदीग्राम ला हिंदुंचे हत्याकांड झाले होते. अन अडवाणी सांत्वन करायला गेले होते. धाय मोकलुण रडणारे ते आप्त अन तोंड लपवणारे अडवाणी. सत्तेवर कुणीही असले तरी comman man is always at the receiving end
|
This is so sad अशा गोष्टी मी वाचायच्या टाळते. सहन होत नाही किंवा द्रुष्टी आड स्रुष्टी म्हणतात तसे .... आणि संघमित्रा का ही माणस थांबतात तिथे ला अर्थच नाही. हिंदु आणि मुस्लिम मधलाच हा प्रश्ण आहे का? जगभर हेच चालते. सत्तेवर जो येतो तो आंधळा बनतो. इतके लाख वर्ष झाली पण हे साधी धर्म, जात सारखी जीर्ण बंधन कोणी आजपर्यंत तोडू शकले नाही. वर्ण वगैरे तर मग देवाची देण आहे... असो, चारु सही लिहितेस.
|
सुन्न करणारी कथा एका मुस्लिमाला वाचवले त्याच्या बदल्यात हे मिळाले
|
Mbhure
| |
| Tuesday, March 14, 2006 - 5:40 pm: |
| 
|
एक छान कथा वाचल्याचे समाधान मिळाले. वर म्हटले आहे तसे त्या अंधार्या खोलीतील विचारांचे शब्दरुप छानच आहे. मनुस्विनी, एकच विनंती आहे. उगाच ह्या उत्तम कथेचा " हिंदु - मुस्लीम " V&C करु नका. कथा प्रवृतीची आहे. धर्माची नव्हे. हे कुठेही असु शकते. राधाबाई चाळी नंतर झालेल्या दंगलीत, एका मुसलमान जवानाला जमावाने जाळुन मारले होते, ते आठवले. त्या जवानाने आपल्या बायकोला असेच सांगितले की, ' मी भारतीय आहे. देशासाठी लढलोय. हे इथे सर्वांना माहित आहे. त्यामुळे आपल्याला कोण त्रास देणार?' " माणस का थांबतात? " ; कारण त्यांचा माणुसकीवर जरा जास्तच विश्वास असतो.
|
Gandhar
| |
| Tuesday, March 14, 2006 - 10:46 pm: |
| 
|
.. .. .. ..
|
Bee
| |
| Wednesday, March 15, 2006 - 12:47 am: |
| 
|
चारू हे सगळ आपण फ़क्त वाचल आहे, चित्रपटांमध्ये बघितलेल आहे मात्र अनुभवलेल नाही. तरीपण तुझ्या लेखणीतून तूला जाणवलेली यातना पुर्णपणे चित्रीत झाली आहे. शेवटही छानच केला.
|
Gs1
| |
| Wednesday, March 15, 2006 - 3:56 am: |
| 
|
चारू, वास्तवाच्या अत्यंत जवळच अस प्रत्ययकारी लेखन.
|
चारु, हे मी अनुभवले आहे मी college असतांना माझ्या वडीलांकडे काश्मिर हुन एक व्यक्ती आली, तो काश्मिर मध्ये एका college professor. होता,त्याचा चेहरा गुलाबी अगदी काश्मिरी तेज जे ऐकुन होतो ते दाखवत होत, ...., ते पिढीजात तीथे रहात आले त्यामुळे इतक्या अतीरेकी हल्ल्या नंतर सुध्दा त्यांच्या मनाला काश्मीर सोडायचा विचार शिवला नाही, पण एके दिवशी त्यांचा एक विद्यार्थी रात्री त्यांच्याकडे आला आणि सांगु लागला, sir उद्या पहाटे तुमचे घर तुमच्यासहीत पेटवण्याचा आमच्या संघटनेचा आदेश आहे, तुम्ही आत्ताच्या आता हे घर सोडुन निघुन जा...... .... आनि १०-१५ वर्शाची service पिढीजात मालमत्ता सगळ सोडुन, घरातली सुइ सुध्दा न घेता ते family घेउन पुढच्या मिनिटाला घराबाहेर पडले, ?????????????? मजल दर मजल करीत ते महाराश्ट्रात येउन पोहचले होते,.... , इतर ठिकान्च्या नातेवाइकांची मदत घेत तो नोकरी शोधत होता आमच्या college मध्ये जागा नव्हती म्हणुन पपांनी त्यांना दुअसर्या college चा पत्ता दीला, आनि तीथे फ़ोन करुन सगळी परीस्थीती सांगीतली तो माणुस PHD. zoology त होता, आज तो आमच्या जवळच्या तालुक्याला च आहे lecturar ... पण त्याचा विद्यार्थी विद्येला जागला म्हनुन तो जगला पन बाकीच्याबद्दल त्याने ज्या काहाण्या सांगीतल्या ते ऐकुन जीवाचा थार्काप झाला.. आम्ही ते ऐकुन कितीतरी रात्री झोपलो नव्हतो त्याने तर अनुभवले होते...............
|
एमभुरे, बरोबर हे तुमच, कुणाला काय आठवेल तर कुणाला काय! एकदा द्वैत तरी मानल पाहीजे नाहीतर अद्वैत! पण एकतर्फी अद्वैत मानुन चालत नाही! मला मात्र १९४८ चे महाराष्ट्रातील भीषणकाण्ड आठवले! चारू, छान लिहिल हेस! प्रत्ययकारी!
|
Ninavi
| |
| Wednesday, March 15, 2006 - 9:24 am: |
| 
|
चारू... ... ... शब्दच नाहीत.
|
Megha16
| |
| Wednesday, March 15, 2006 - 11:59 am: |
| 
|
चारु खरच कथे विषयी काही सांगायला शब्द नाही. कथा वाचताना अंगावर एकदम काटा आला किती भयानक प्रंसग असेल तो. ज्याला मदत केली त्याने च मेघा
|
Milindaa
| |
| Wednesday, March 15, 2006 - 12:27 pm: |
| 
|
उगाच ह्या उत्तम कथेचा " हिंदु - मुस्लीम " V&C करु नका. << भूषण, पूर्णपणे अनुमोदन !! या कथेकडे केवळ कथा म्हणूनच पाहावे असे वाटते.
|
Manuswini
| |
| Wednesday, March 15, 2006 - 3:02 pm: |
| 
|
भुरे मी कुठे हिंदु मुस्लिम v&c करतेय? मी just लिहिले की माणसाची प्रवृती त्याला वाचवून काही फायदा झाला नाही कारण शेवटी हेच दडले आहे की त्याचा धर्म आडवा आला. मी स्वःता मुंबईत हिंदुनी मुस्लिमाना आनी vice versa केलेले हाल बघितले आहेत जावु द्या आणखी न लिहिलेले बरे माझी पण हिच विंनती की कोणाची प्रतिक्रिया वाचुन उगाच मतितार्थ काढुन conclusion ही करु नका की त्या प्रतिक्रियेत हेतु हा असाच होता म्हणून ती एक सहज प्रतिक्रिया होती ह्याच दृष्टीने पहावे आणी सोडावे
|
Maanus
| |
| Wednesday, March 15, 2006 - 4:00 pm: |
| 
|
Mr. & Mrs. Iyre एक मस्त चित्रपट नाज़, ईद मुबारक
|
Mbhure
| |
| Wednesday, March 15, 2006 - 5:30 pm: |
| 
|
मनुस्विनी तुम्हला दुखावण्याचा मुळीच हेतू नव्हता आणि नाही. तसे झाले असेल तर I am sorry . मतितार्थ एव्हढ्याच करीता काढला गेला, कारण तुमच्या दुसर्या वाक्यातील " मुसलमान " हा शब्द खटकला. मला वाटत कथेतही तो टाळला आहे. धर्मापेक्षाही ही जास्त MOB Reaction असते. असो. परत एकदा क्षमस्व. थोड्याफार " घर न सोडण्याच्या " विषयावर ' राहिले दूर घर माझे' नावाचे नाटकही येऊन गेले आहे. त्याबद्दल दिनेशनी मागे गुलमोहरमधेच लिहीले होते.
|
अगदी मनाला सुन्न आणि विषण्ण करणारी कथा.
|
Charu_ag
| |
| Monday, March 20, 2006 - 10:32 am: |
| 
|
कथा गंभीर असुनही त्याला तुम्ही एवढी भरभरुन दाद दिलीत. सगळ्यांचे मनापासुन आभार. कथा प्रवृतीची आहे .............. भूषण, एका वाक्यात सगळं सांगितलत आपण. धन्यवाद.
|
Dineshvs
| |
| Monday, March 20, 2006 - 1:10 pm: |
| 
|
चारु, नलिनीने आवर्जुन वाचायला सांगितली होती कथा. एरवीहि वाचलीच असती म्हणा. हे वास्तव नसते, हि कथा काल्पनिक असती, तर फार छान झाले असते. पण ....
|
|
|