Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
रहम

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » कथा कादंबरी » रहम « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 20, 200625 03-20-06  1:10 pm

Sampada_oke
Tuesday, March 21, 2006 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारु, ही नुसती कथा नाहीये तर वास्तव आहे हे कळल्यावर अंगावर शहारा येतो.
तू सांगितल्याप्रमाणे दुपारीच वाचली, कारण मन सुन्न झाले वाचून.
लोकं अशी का वागतात हा खराच गूढ प्रश्न आहे.



Milindaa
Tuesday, March 21, 2006 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुर्दैवाने या कथेतील संदर्भ खोटे, काल्पनिक नाहीत. <<

चारु, वरील वाक्याचा अर्थ लावायला मदत करणार का ? ही एक कथाच आहे, असे अनेक प्रसंग घडले आहेत, घडलेही असतील पण तुला एखादी अशी सत्यघटना माहिती आहे का ? जनरल रेफरन्स ठीक आहे पण जेव्हा आपण सत्यकथा म्हणतो तेव्हा त्याचे उदाहरण असले पाहिजे.

त्या अनुषंगाने ही सत्याच्या जवळपास नेणारी कथा आहे असे मी म्हणेन, फारतर " सत्यघटनेवर आधारीत " असे म्हणता येईल, पण वास्तव किंवा सत्यगटना नाही.

हे माझे मत झाले. इतर मते ऐकायला आवडतील, वैयक्तिक टीका टाळून.


Salil_mirashi
Tuesday, March 21, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून किती वर्षं हे चालणार आहे कोण जाणे? माणसं असं करून कुठल्या अल्लाहला आणि कुठल्या रामाला खुश करु इछितात कोण जाणे? शेवटी आपण सगळे राक्षस आहोत हेच खरं.धर्माच्या बुरख्याखाली साल्या आपल्या वासना आणि आपला क्रोध शमवत असतो आणि राहणार. १९४७ असो,१९९२ असो,२००३ असो.

उत्तम कथा. लोकांची झोप पुन्हा एकवार चळावणारी कथा.


Charu_ag
Wednesday, March 22, 2006 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलींदा, दिसले रे तुझे प्रश्न.

या कथेची मांडनी काल्पनीक असली तरी कथा सुत्र आणि शेवटचा प्रसंग मात्र काल्पनीक नाही. तेंव्हा 'सत्यघटनेवर आधारीत' अस ही म्हणता येईल.

मला अशी एखादी घटना माहित आहे का?...... हो, आणि अश्याच आणखी काही.


हे वास्तव आहे का? हो, जे तिथुन (पुर्वी पाकिस्तान, अफगानीस्तानातुन आणि आता बांग्लादेशातुन) येताहेत, त्यांच्या मते अजुनही असचं होतय.

माणसं अशी का वागतात?



Limbutimbu
Wednesday, March 22, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारूग, तुझ थोड चुकलच! अन आमचही चुकत हे!
पुर्वी काय की आत्ता काय, वर्तमानपत्रात कस जाती धर्माच नाव न घेता लिखाण करायचा पायन्डा पडला हे जस की मशिद किन्वा चर्च असेल तर प्रार्थनास्थळ अस म्हणायच अन मन्दिर किन्वा तत्सम असेल तर पुजास्थळ असे शब्द वापरायचे म्हन्जे जातीधर्माचा उल्लेख केल्याचा अपराधही होत नाही अन ज्यान्ना जे समजुन घ्यायचे ते समजुन घेतातच! हो की नाही?
तुझी कथा कथा म्हणुन चान्गली हे, पण मग असल्या कथा लिहाव्यातच का? उगिच कुणाच्या भावना दुखवायच्या अन कुणाच्या भडकायच्या! नाही का? अन वृत्तपत्रिय लेखनात प्रार्थनास्थळ अन पुजास्थळ असले भेद कसोशीने पाळित सर्वधर्मसमभाव किन्वा निधर्मीपणाचा बुरखा निगरगट्टपणे वापरणारे तमाम वृत्तपत्रकार ब्राह्मण्य किन्वा ब्राह्मणीवाद( ? ) हे शब्द मात्र कसे सहज जाता येता वापरीत असतात!
माझ्या मते सगळे राजकारण सन्ख्येचे असते, सन्ख्या धर्म, जात, गाववाला, एकप्रकारचे शिक्षण अशा अनेकानेक समुहान्ची होते! ज्या ज्या वेळेस जो जो समुह बलिष्ठ तो तो काहीना काही उचापत्या करतोच करतो! हेच ते द्वैत मी माझ्या आधिच्या पोस्ट मधे मान्डले होते जे सर्वधर्मसमभाव किन्वा निधर्मीवाद यात अन्तर्भुत नाही! आणि हे द्वैत केवळ धर्म किन्वा जात यान्ना बान्धिल नाही हे तर स्त्रीपुरुष, वयाने वा आकाराने लहान थोर, शिक्षणातील कमीजास्त, सासुसुने सारखी सर्व नाती अशा त्रिविध स्तरावर अस्तित्वात असते! आणि तेच आम्हि अमान्य करतो आहोत असे निदान मला तरी वाटते! आणि सर्वधर्म समभाव किन्वा निधर्मीपणात वापरायचे अद्वैत एकतर्फी वापरले जाऊन चालत नाही हे जेव्हा तुझ्या कथेसारख्या कथातुन कळते तेव्हा मात्र लगेच याला असले रन्ग देवु नका अन तसले रन्ग देवु नका असे सुचविले जाते!
हा विषय तसा फार गहन नाही पण सगळच स्पष्ट करुन सान्गता येत नाही शिवाय हे लिखाण या बीबीचा विषय देल्हिल नाही, पण एकन्दरीत सर्व प्रतिक्रिया वाचल्यावर हे लिहावेसे वाटले, याचा सारान्श लिहिणे सोप्पे असले तरी जाहीर लिहिणे शक्य नाही


Ekanath
Wednesday, March 22, 2006 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तस्लिमा नसरीन यांचे "लज्जा" हे पुस्तक वाचल्यास अशा घटना (बांगलादेशात) घडतात, याला पुष्टी मिळते.

माझ्यामते हेच तस्लिमा नसरीन यांनी खुलेआप लिहिले. ते तिथल्या मूलतत्त्ववाद्यांना झेपले नाही, म्हणून तस्लिमा यांना जीवे मारण्याचा हुकुम काढला गेला. खरेखोते आता आठवत नाहीये.


Ekanath
Wednesday, March 22, 2006 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी आपण सगळे राक्षस आहोत हेच खरं.धर्माच्या बुरख्याखाली साल्या आपल्या वासना आणि आपला क्रोध शमवत असतो आणि राहणार.

खरे आहे तुमचे.

गांधीजी मेल्यावर ब्राह्मणांची कत्तल करणे, गांधी बाई मेल्यावर शिखांची कत्तल करणे, आणि इतर घटना! माणूस आपल्यातला रानटीपणा बाहेर काढण्यासाठी सदैव आतुरलेला असतो, हेच सत्य असावे.


Limbutimbu
Wednesday, March 22, 2006 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> माणूस आपल्यातला रानटीपणा बाहेर काढण्यासाठी सदैव आतुरलेला असतो, हेच सत्य असावे.
हे सत्य आहेच, पण त्याच्या विरुद्ध बाजुनी जिव्हाळा, प्रेम, त्याग या गोष्टीही मनुष्यात अस्तित्वात असतातच!
पण जन्मजात वृत्तीनुसार कोणता माणुस त्याच्यातल क्रौर्य, हिन्स्रता, विध्वन्सकता कुठ बाहेर काढण्यास काय गोष्टीच निमित्त करेल याला कधिच धरबन्ध नसतो! तस नसत तर जमिनीचे वाद किन्वा भाऊबन्दक्या किन्वा सुनेचे होणारे छळ किन्वा वृद्धाश्रमात धाडलेल्या वृद्ध व्यक्ती या बाबी समाजात दिसल्या नसत्या!
आणि अर्थातच, अजुनतरी कोणत्या समाजात कोणत्या प्रकारच्या हिन्स्र घटना किती प्रमाणात घडल्या जातात यावर त्या समाजात "माणुसकी" शिल्लक हे की अजुन रुजायचीच हे हे कळते आणि त्या त्या प्रमाणात तो तो समाज, समुह अन्य समुह समाजापासुन वेगळा पडु लागतो किन्वा तो त्याचे तसे वेगळे पण मुद्दामहूनही जपत असु शकतो! अजुन काय लिहू?



Milya
Thursday, March 23, 2006 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारु : अंगावर काटा आणनारी कथा आहे गं

खरेच माणसे अशी का वागतातं?


Abhijat
Thursday, March 23, 2006 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या अश्या प्रकारे वागून आपण ख-या माणुसकीच्या धर्मामध्ये या मानवनिर्मित धर्मान्चे किती प्रदूषण निर्माण करतो आहोत याचा खरोखरी आपण कधीच विचार करणार नाही का?

Chinnu
Thursday, March 23, 2006 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटच्या ओळी फ़ार मार्मिक आहेत. गुड वन, चारु.

Dineshvs
Friday, March 24, 2006 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारु, हे अगदी एखाद्या धर्मालाच लागु पडते असे नाही. कुठल्याहि कारणाने माणसांचे दोन समुह, समोरासमोर ऊभे ठाकले कि असे होतेच. प्रत्येकवेळी ईतका टोकाचा हिंसाचार होतोच असे नाही.
खुपदा आपल्यासाठी या ऐकीव गोष्टी असतात. पण कधी कधी आपल्या वर असा प्रसंग आला तर.
आपल्यापैकी कुणी नायजेरियात जाऊन आला असेल तर त्याना तिथले कम्युनिटी प्रॉब्लेम्स माहित असावेत.
एका दिवशी काहि कल्पना अन्सताना, एखादा समुह ऑफ़िसमधे शिरतो. सगळे ऑफ़िस ताब्यात घेतो. सगळ्या गोर्‍याना, ( त्यात मी आलो ) बाहेर काढले जाते. अंगावर शस्त्रे घेऊन धावुन येतात ते लोक. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या कि निघुन जातात. हे प्रसंग आफ़्रिकेतल्या बहुतेक देशात अनुभवायला येतातच. ईजिप्त लिबिया सारखा एखादा अपवाद असला तर.
हे समुहात माणसांचे हिंस्त्र होणे, तेंडुलकरांच्या अनेक नाटकात आपण बघितले आहे. आणि प्रसंगानुरुप कधी कधी आपणहि तसेच वागतो. क्वचित मग हळहळतो.


Chafa
Friday, March 24, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरं आहे दिनेश तुमचं. मी परवाच Dr Wayne Dyer (हे एक motivational speaker आहेत) यांचा कार्यक्रम पाहीला. त्यात १९९४ मधे रवांडा इथे झालेल्या genocide मधे एका 4X3 आकाराच्या बाथरूम मधे ९१ दिवस इतर ३ बायकांबरोबर लपून राहून, आपल्या श्वासाचाही आवाज होणार नाही अशा अवस्थेत बचावलेल्या एका Tutsi बाईला स्टेज वर बोलावले होते. (नाव आता आठवत नाही, net वर नक्की सापडेल) या काळात अनेकदा वेडापिसा झालेला इतर धर्माचा जमाव तिला मारायला म्हणून लांडग्यांसारखा पूर्ण घरभर फिरत होता. बाथरुमच्या भिंतीमधून तिला त्यांचे आवाजही ऐकू येत होते. तिला शाळेत Maths शिकवणारे तिचे शिक्षकही यात सामिल होते! त्या ९१ दिवसांनंतर जवळजवळ ६ फूट उंच असलेली ही बाई ६० पाऊंड वजनाची राहीली होती. बाहेर आल्यावर तिचे आई, वडील, बहीण, भाऊ सगळे मारले गेल्याचे तिला कळले.

चारु, तुझी गोष्ट वाचताना हे सगळे आठवत राहीले आणि ही गोष्ट सत्याच्या किती जवळची आहे ते जाणवले. कोणतीही माणसं असोत, किंवा कोणताही देश, हे असं होतंच असतं.

पण सर्वात संवेदनाशील होतं ते तिने त्या स्टेजवर केलेलं भाषण. Audience मधला प्रत्येक जण आपापले डोळे पुसत होता. तिच्या त्या African accent मधल्या English मधे किती छान बोलली ती! इतके सगळे होऊनही जगातल्या चांगुलपणावर तिचा पूर्ण विश्वास आहे, अशा अर्थाचे!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators