Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 13, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » काव्यधारा » झुळुक » Archive through March 13, 2006 « Previous Next »

Devdattag
Wednesday, March 08, 2006 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या लतेचा ह्या तरूशी
शतजन्माचा अनुबंध
हेच सांगतो आज लाडके
जाईजूईचा हा गंध


Vaishali_hinge
Wednesday, March 08, 2006 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या गंधाचा स्पर्श,
चार चोघात जाणवतो
आणि बावरुन मी
इकडे तिकडे बघतो
कुणाला काही कळले
तर नाही ना...
म्हणुन दचकतो!!!


Meenu
Wednesday, March 08, 2006 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझं नातं आहे तुझ्या अलवारपणाशी
माझं नातं आहे तुझ्यातल्या मायाळुपणाशी
माझं नातं आहे तुझ्या सभ्यतेशी
'विरुद्ध' असेल कदाचित पण माझं नातं आहे.....तुझ्याशी


Mavla
Wednesday, March 08, 2006 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय, माझ नातं आहेच तुझ्यशी....
जणु वार्‍याचं वेगाशी, तहानेच पाण्याशी..
तुझ्याच सोबत जगण्यासठी
आजन्म घेतलेल्या त्या वचनाशी....

मावळा.


Shyamli
Wednesday, March 08, 2006 - 11:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नात तुझ माझ
जन्माजन्मांच
तु केलेल्या खोड्यांबरोबरच
माझ्यातल्या रुसव्यांच!

श्यामली!!!


Sarivina
Thursday, March 09, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Namaskaar mitraho...
\dev vaaparun message pathawata yet naheeye. It s giving error ur message is too short...Can anybody pls guide me???




Jaaaswand
Thursday, March 09, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message




कधी डोळ्यात अन स्वप्नांत का राहतो मी
तिच्या हास्यांत अन आसवांत का वाहतो मी
मीच आहे द्विधेत का मला कधी कळतो मी
पानांवरचे दवबिंदू आता अलगद झेलतो मी

जास्वन्द...


Milindaa
Thursday, March 09, 2006 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही तर enter मार धडाधड <<<
jaaaswand, नवीन युजर ला सल्ले देताना शक्यतो योग्य मार्गाचे द्यावेत, पळवाटांचे नव्हे.

sarivina , dev वापरण्याऐवजी dev2 वापरुन बघा. दुसरं म्हणजे मेसेज टाकण्यासाठी किमान ४ शब्द लिहीणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी पाळूनही अडचण आली तर खालील ठिकाणी विचारा


I need help <== ही लिंक आहे

Heartwork
Thursday, March 09, 2006 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझी वाट पहाताना
सारखे तेच जाणवत होते
माझ्यासाठी असेच कुणी
चाफ्याखाली झुरत होते.


Milindaa
Thursday, March 09, 2006 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jaaaswand, मी योग्य तोच शब्द वापरला आहे. पळवाट च आहे ती. ते बंधन काही कारणाने घातले आहे तेव्हा त्या बंधनात रहायचे सांगणे दूर, तुम्ही त्याचा work around सांगताय, एका अर्थी ही पळवाटच आहे. यात मी फक्त नियम पाळायला सांगतोय.

मॉडरेटर, आक्षेपार्ह वाटलं तर ही पोस्ट्स उडवायला हरकत नाही.


Jaaaswand
Thursday, March 09, 2006 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा..मी माझ्या दोन्ही पोस्ट उडवल्या आहेत...


तिच्या माझ्या सगळ्या भेटींतली
मी प्रत्येक आठवण जपली आहे
हसूंचे गुच्छ तिला देऊन मी
आसवांची माळ शिंपली आहे

जास्वन्द...


Sarivina
Friday, March 10, 2006 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीवन आणि सहजीवन यात सांगु काय नातं आहे?
जीवन जणु वर्षा ऋतू अन सहजीवन श्रावण आहे


Sarivina
Friday, March 10, 2006 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जमलं मित्रहो. धन्यवाद सगळ्यांना

Sarivina
Friday, March 10, 2006 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या आठवणी जणु
श्रावणाच्या सरी
चिम्ब होई तन-मन
भर मध्यान्ह प्रहरी


Maple
Friday, March 10, 2006 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

namaskaar mandali, mee tumachi navin marathi sathi.

Vaishali_hinge
Friday, March 10, 2006 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रावणसरी मस्त!

झुळुक आज शांत का?


Sarivina
Friday, March 10, 2006 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जन्मजन्मांतरीचं नातं नको होतं मला
अपेक्षा होती फ़क्त सथिदाराची
वाटेत थकले,पडले तर एका हाताची


Sarivina
Friday, March 10, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खांदाही नको होता मला आधाराला
हवी होती फ़क्त आश्वासक नजर
मी पैलतीर गाठताना


Jayavi
Sunday, March 12, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घाई का तुज पैलतीरी
पोचण्याची कामिनी
चालूया निवांत आता
हात हाती घेऊनी


Shyamli
Sunday, March 12, 2006 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks जया....

घाई नाही ग
वाटतय जरास भय
एकटेपणाचिही आता
आता करुन घेते सवय

श्यामली!!!


Jayavi
Sunday, March 12, 2006 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घाबरतेस काय ह्या एकटेपणाला
भितेस काय ह्या एकांताला ?
घे लेखणी हातात
एकांतच वाटेल हवाहवासा सोबतीला:-)

application/msword
swayam.doc (20.5 k)


Nilyakulkarni
Sunday, March 12, 2006 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घाबरतच नाही सखे
मी कधी या एकांताला
तुझ्याच वेड्या आठवणी
आता असतात सोबतीला


Nilyakulkarni
Sunday, March 12, 2006 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या वळणावर आजही
नकळत पाउल अडखळतं
तुझी वाट पाहत क्षणभर.
वेड मन तेथेच रेंगाळत......


Shyamli
Monday, March 13, 2006 - 1:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेंगाळणार वेड मन
आणि अडखळणार पाऊल
तु नसतानासुधा तुझी
ऊगीचच घेतय चाहुल

श्यामली!!!


Chingutai
Monday, March 13, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजही त्या वळणावर
तुज़्या भेटीचा सन्केत नाही
तरी वेडी ही पाउलवाट
माज्या मनाच ऐकत नाही





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators