Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 07, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » कथा कादंबरी » २६ ऑक्टोबर, २००५ » Archive through March 07, 2006 « Previous Next »

Shraddhak
Monday, March 06, 2006 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकाळचे ९.३०

अजून फक्त साडे नऊ! केव्हा येणार मॉम आणि डॅड.. डॅडची फ़्लाईट लॅंड झाली की नाही ते पण कळत नाही. मॉम बिचारी तिकडं टेन्शनमध्ये असेल. महिन्याभरापूर्वी डॅड परत येत असल्याचं समजल्यापासून ती आजच्या दिवसाची वाट बघतेय सारखी....
मला दोन वर्षांपूर्वीचं सगळं आठवलं. डॅडना त्यांच्या कंपनीने long term पाठवायचं ठरवलं तेव्हा मॉमने खूप वाद घातला होता त्यांच्याशी. कारण माझी स्कूल वगैरे चालू असताना तिकडे जाणं परवडणार नव्हतं. डॅडना आम्ही नीट सेटल होण्याच्या दृष्टीने जाणं आवश्यक वाटत होतं. अखेर मॉमवर एकटीवर माझी जबाबदारी टाकून ते गेलेदेखील... त्यांनी प्रॉमिस दिलेलं मॉमला वेळ मिळेल तसा चक्कर मारीन म्हणून... पण काय आले नाहीत ते! आता येताहेत अडीच वर्षांनी... काम संपलं म्हणून! नाहीतर आलेच नसते ते... कधीच आले नसते.
मॉमचं काय झालं असतं मग? आपल्यासारख्या वाया गेलेल्या मुलाला सांभाळताना मॉम वेडीच झाली असती.. आणि मग आपलं कोण राहिलं असतं?
ते विचार झेपेनासे झाले शेवटी म्हणून मी आंघोळीला जायला उठलो. तेवढ्यात फोन वाजला.
" हॅलो बेटा... मी पोचलेय एअरपोर्टवर सुखरुप. डॅडच्या फ़्लाईटबद्दल अजून काही announcement नाही. मघाशी त्याने दुसर्‍याच कुठल्यातरी फ़्लाईटबद्दल सांगितलं मला वाटतं.... आणि आत्ताच डॅडचा फोन आला होता. सुनीत अजून मुंबई एअरपोर्टवरच आहे. "
चला... कुठे का होईना डॅड सेफ आहेत तर... मॉमचं टेन्शन कमी होईल जरा.
" मॉम, तू काहीतरी खाऊन घे आधी. आता वेट तर करायचाच आहे तुला. पण आधी खाऊन घे. It's my order." मी तिला म्हटलं.
" अच्छा, आज वरुण महाशय बरेच गंभीर दिसतायत. मॉमला ऑर्डर वगैरे देणं चालू आहे आज.. " मॉम पहिल्यांदाच छानसं हसून म्हणाली. " ओके बेटा.. मी खाऊन घेते काहीतरी. नंतर तुला कॉल करते. "

सकाळचे ११.००

गरम पाण्याच्या मनसोक्त शॉवरमध्ये मी आंघोळ केली आणि माझ्या रुममध्ये येऊन स्केचबुक बाहेर काढली. लहानपणापासून मी खूप छान स्केचेस काढतो, असं सगळेच म्हणतात. मी शेवटच्या स्केचची तारीख चेक केली. २५ डिसेंबर, २००४. बापरे! म्हणजे गेल्या वर्षभरात मी हात लावला नाही माझ्या स्केचबुकला? किंवा मला काही काढायची, करायची इच्छाच राहिली नव्हती का? मी खिडकीतून बाहेर बघितलं. समोर प्रचंड झाडी आणि मागचा अपार्टमेंट कॉंप्लेक्स दिसत होता. मी त्या खिडकीच्या चौकटीत दिसणारा सीन कागदावर काढायला सुरुवात केली.
.... डोकं जरा शांत झाल्यासारखं झालं.

दुपारचे १२.१५
वॉव! स्केच बर्‍यापैकी जमलं की! मी पेन्सिल खाली ठेवतं स्वतःला कॉम्प्लिमेंट दिलं. थोडं refine करावं लागेल, पण आत्ता नको. आत्ता भूक लागलीये. पोटोबाची सोय बघायला हवी.
पिझ्झा! माझ्या डोक्यात एकदम ट्यूब पेटली. मॉम कधीमधी खूश असली की मला पिझ्झा ऑर्डर करायला सांगते. खरं तर तिलापण खूप आवडतो पिझ्झा... तिला बरंच काय काय आवडतं, पण जेव्हापासून डॅड तिला असे तिच्या एकटीच्या भरोशावर सोडून गेलेत, तेव्हापासून ती पहिली दिलखुलास, निर्धास्त मॉम राहिलीच नाहीय. कायम प्रॉब्लेम्स, चिंता... तिचा चेहरातरी कसा उदास उदास दिसतो आता...
ते काय नाही. आज डॅड आले की पुन्हा संध्याकाळी पण पिझ्झा मागवायचा! आता डॅड आलेयत तर मॉमला काय टेन्शन राहणार नाही.
.... मी फोन उचलून पिझ्झा कॉर्नरला माझी ऑर्डर देतो. आज पाऊस भलताच भयंकर आहे... त्याला नक्कीच खूप वेळ लागेल. मी फोन ठेवून बाल्कनीमधून दिसणारा भयानक पाऊस आणि काळं काळं झालेलं आभाळ बघत राहतो.

दुपारचे १.३०

बापरे! दुपारी सव्वा बाराला ऑर्डर केलेला पिझ्झा आत्ता आला. त्यासोबत ऑफर म्हणून फ्री कोक आहे आणि मी मागवलेत म्हणून गार्लिक ब्रेड. पिझ्झा नुसता पाहूनच भूक दुप्पट झाल्यासारखी झाली.
तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. मॉम!!!
" वरुण, डॅडची फ़्लाईट निघालीय मुंबईहून बहुधा. सगळं ठीक होईल ना रे? लॅंडिंगचा काही प्रॉब्लेम आला तर? ओह गॉड, आयम सो वरीड. नाही नाही ते विचार येतायत डोक्यात. "
मॉमला इतका रडवेला, केविलवाणा आवाज मी पूर्वी कधीही ऐकला नव्हता.
"Mom... Mom... be calm. Everything's gonna be alright. You take care. Please Mom... be patient. The flight will land safely......" माझे शब्द तिला किती पोकळ वाटत असतील, हे मला कळत होतं. बाहेरचं भयानक दिसणारं आकाश, मध्ये मध्ये होणारा विजांचा कडकडाट तिच्या भीतीमध्ये भर घालतच असणार. त्यातून एअरपोर्टच्या खिडकीपाशी उभं राहून रनवेकडच्या भागात नजर टाकली तर सगळं याहून scary दिसत असणार.
" मॉम आधी त्या खिडकीमधून बाहेर पाहाणं सोड... मी म्हणतोय म्हणून सोड. " मॉमला एक क्षणभर आश्चर्य वाटलं असणार. मला स्वतःला वाटलं. मॉम आत्ता नेमकी कुठे उभी राहून बोलत असेल, याचा अचूक अंदाज मला बांधता आला म्हणून!
"But Varun...."
" तू माझं ऐकणारेस की नाही? " माझ्या नकळत मी मॉमवर ओरडलो. "He is gonna be alright. But I want you to be alright right now. Be brave. Mom... Nothing will happen.
" ओके बेटा.... मी जरा आतल्या बाजूला जाऊन बसते. "
...मॉमने फोन ठेवला. माझं लक्ष समोर टीपॉयवर पडलेल्या पिझ्झा बॉक्सकडे गेलं. एव्हाना माझी पिझ्झा खायची इच्छा पार मरून गेली होती.


Shraddhak
Monday, March 06, 2006 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुपारचे ३.३०
" ........ "
" हं बोल मॉम... "
" .......... "
" थॅंक गॉड! झाली नं त्यांची फ़्लाईट सेफ़ली लॅंड? "
" ........... "
" ओके मॉम... कळतं गं मला. पण आता रडू नकोस हं. या तुम्ही दोघं घरी. मी वाट बघतोय तुमची. "

मला एकदम खूपच मोकळं, मोकळं शांत वाटलं. गेली अडीच वर्षं जणू मी आणि मॉम घुसमटल्यासारखे जगत होतो, ती सगळी घुसमट नाहीशी झाल्यासारखी वाटली.

डॅड परत आलेयत आता. आता पुन्हा आमचं घर पूर्वीसारखं होईल.
मी पिझ्झा गरम करायला ठेवला.

दुपारचे ४.५०

अजून डॅड आणि मॉम ट्रॅफिकमध्ये अडकलेयत. डॅड इथल्या ट्रॅफिकला सारखे नावं ठेवतायत ते पाहून मॉमला सारखं हसू येतंय. डॅडनी कॉल केला मघाशी...
"Can't wait to see you, my son! खूप उंच झालायस म्हणे! आणि बराच हॅंडसम दिसतोस असं मॉम म्हणत होती... पण फोटोजवरून तर तसं काही वाटत नाहीये बुवा... "
" डॅडऽऽ... बरं ते जाऊ द्या. मी पण केव्हाची तुमची वाट बघतोय डॅड... लौकर या. "
" अरे काय हा इथला ट्रॅफिक... तिकडे US मध्ये म्हणजे..... " पुढचं वाक्य मला ऐकूच आलं नाही. मॉम जोरात हसायला लागली त्यात डॅडचं वाक्यच हरवल्यासारखं झालं.

संध्याकाळचे ५.४५

शेवटी कसे बसे ट्रॅफिकमधून वाट काढत मॉम डॅड, येऊन पोचले घरी. मॉम किती relax दिसतेय. खूप दिवसांनी बिन्धास्त, दिलखुलास हसू आहे तिच्या चेहर्‍यावर....
डॅड खूप बारीक झालेत दोन वर्षांत. चेहरा पण खूप थकल्यासारखा... May be he was missing us all the while there....
मी एकदम धावत जाऊन डॅडना लहान मुलासारखी मिठी मारली. डॅड ' अरे.. अरे ' करत होते, पण त्यांनी मला जवळ घेतलं.
" मग काय, बंगलोरची काय हालहवाल, मिस्टर वरुण? "
मी काहीच बोलत नाही. या क्षणाला जाणवतंय की, मॉम जितकी वाट बघत होती डॅडची तेवढीच मीदेखील बघत होतो. Our family is incomplete without him.
" डॅड, मॉम तुम्ही चहा घेणार? "
" अरे वा... चिरंजीव बरेच जबाबदार झालेले दिसताहेत. " मॉमकडे बघत ते म्हणाले.
" पण मला तिकडे राहून कॉफीचीच सवय लागलीय बुवा. येते का तुला कॉफी? "
" हो येते. पण... मॉमला नाही आवडत कॉफी. " मी मॉमकडे बघितलं. तिने हसून मान डोलावली. मी उड्या मारत किचनमध्ये गेलो कॉफी करायला.

संध्याकाळचे ७.००
मॉम आणि डॅडच्या बेडरुममध्ये जाऊन मी डॅडना अगदी चिकटून बसलोय. ते मधून मधून माझ्या केसांमध्ये हात फिरवत मॉमशी गप्पा मारतायत. गेल्या दोन वर्षांतले सगळे डिटेल्स....
" मग काय वरुण, नवीन काही स्केचेस काढलीस की नाही? " डॅडना सगळं बारीकसारीक लक्षात आहे अजून. मी मात्र उगीचच... जाऊ दे.
" आहेत ना... एकतर आत्ता दुपारी काढलंय. आत्ता आणतो. " मी जवळजवळ उड्या मारत माझ्या रूमकडे गेलो. स्केचबुक घेऊन येत असताना मॉमचं माझ्याबद्दलचं बोलणं ऐकू आलं म्हणून मी दाराबाहेर थांबलो.
" सुनीत, तू नव्हतास ना इथे, तेव्हा मला वरुणचा किती आधार होता म्हणून सांगू? तो माझी इतकी काळजी घेत होता ना... कधी कधी प्रश्नच पडायचा बघ... मोठं कोण? तो का मी? "
मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं. मी आत गेलो तेव्हा डॅडनी मला जवळ घेऊन पाठीवर थोपटलं.

रात्रीचे ८.००
" डॅड, पिझ्झा मागवूयात? "
त्यांच्याआधी मॉमच म्हटली एखाद्या लहान मुलीसारखी....
" चालेल. वरुण, लाव रे फोन... " डॅडनी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला म्हणून तीच चटकन म्हणाली, " हो मला माहीताय तुला तिकडचं अन्न खाऊन कंटाळा आलाय म्हणून! तुझ्यासाठी मी सगळा तुझा आवडता स्वयंपाक करणारेय. पण मला आणि वरुणला मात्र पिझ्झाच... तू इथे नसताना आम्ही पिझ्झाच मागवायचो मूड असला की... हो की नाही रे, वरुण? "
मी लगेच फोनकडे धावलो आणि चांगली भलीमोठी ऑर्डर दिली. पिझ्झा, गार्लिक ब्रेड, पास्ता... मला आणि मॉमला आवडतं ते सगळं काही!

रात्रीचे ९.३०
" डॅड, पाऊस कसला scary वाटतोय नं इथला? "
" हूं... आहे खरा. येतानादेखील आम्ही किती ठिकाणी अडकलो होतो. म्हटलं जॅम क्लीअर होतोय की नाही? "
" ........ "
" सुनीत, तुला अजून देऊ शाही पनीर? "
" नको, मला थोडी दाल दे. मस्तच झालेय. "
" डॅड, मॉमनी त्यात भरपूर बटर टाकलंय हां. मघाशी मी पाहिलं ना किचनमध्ये. तुम्हीच सारखे कॅलरीजचा जप करत असता ना? "
" गप रे तू... तुझ्यापुढे त्या पिझ्झ्यावर किती कॅलरीज आहेत ते बघ. "
" पण मी तरुण आहे ना... मला चालेल. "
" मग तुझा डॅड काय म्हातारा झालाय का? मलाही चालेल. "
" बरं सुनीत, त्याला विचार ही पायल कोणे? "
" मॉमऽऽऽ.... कोणी नाही हो डॅड. ही मॉम उगीच काहीही सांगते. ती पायल सारखी घरी फोन करते आपल्या म्हणून! "
" पण तू कशाला एवढा लाल गुलाबी होतोयस? " डॅड आणि मॉमच्या हसण्याचा आवाज खोलीभर घुमला.
... मी खाली मान घालून पिझ्झा खात राहिलो. माझं मन खूप खूप आनंदाने भरून गेलं होतं.
स्केचबुक पुन्हा कपाटात ठेवू लागलो तसं जाणवलं, मी आजच्या स्केचवर तारीख घातली नाहीये. मी माझं favorite ink pen काढून वळणदार अक्षरात लिहिलं,......... वरुण... आणि खालती आत्तापर्यंतची सर्वांत मेमोरेबल डेट. २६ ऑक्टोबर, २००५.


Shraddhak
Monday, March 06, 2006 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.................

२६ ऑक्टोबर, २००५. सुरळीत चाललेलं बंगलोरचं जीवन कोलमडून टाकणार्‍या, हजारो कुटुंबं उघड्यावर आणणार्‍या मुसळधार पावसाचा दिवस - पुढचे काही दिवस हेडलाईन ठरलेला; तरीही एका दृष्टीने इतर ३६४ दिवसांसारखाच! एकीकडे काही हात अस्मानी संकटातून आपला आसरा सावरण्यात गुंतले होते; आणि दुसरीकडे काही हात वळचणीला वरून पडणार्‍या पागोळ्या झेलण्यात मग्न. बहुतांश मनांवर घरं - दारं, सगे - सोयरे, गाडगी - मडकी गमावल्याच्या कटू आठवणींनी कोरलेला दिवस, पण काही मनांमध्ये काहीतरी गवसल्याच्या आठवणींनी चिरस्मरणीय ठरलेला. एकच घटना, पण प्रत्येकाच्या दुनियेत वेगवेगळ्या कारणांनी नोंदलेला - म्हणूनच इतर ३६४ दिवसांसारखा!

समाप्त


Pama
Monday, March 06, 2006 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा.. too good !! तो दिवस अगदी जीवंत केलास बघ. सगळे प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले.

Abhijat
Monday, March 06, 2006 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतीम! शब्दात वर्णन करता येणार नाही इतके सुन्दर!

Maitreyee
Monday, March 06, 2006 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, सुन्दर गं! उच्च लिहिलयस, कल्पना पण सुरेख ..

Vaishali_hinge
Monday, March 06, 2006 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shradhaa chaan lihiley, manapasun aavadale, bhaavana chaan tipalyayat!!!

Megha16
Monday, March 06, 2006 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा
छान लिहल आहेस.
कथा वाचताना सगळ डोळ्यासमोर येत होत. अगदी हुबेहुब वर्णन केल आहेस बघ.
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहते.


Tulip
Monday, March 06, 2006 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवडली ग खूप! संवाद छानच लिहितेस तु. सहज आणि अनौपचारीक वाटतात.

Prajaktad
Monday, March 06, 2006 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा!अशक्य छान लिहलयस ग! शब्द नाहित वर्णन करायला...
असच उत्तम यापुढेहि लिही.


Nalini
Monday, March 06, 2006 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छान! अप्रतिम! .. ..

Ninavi
Monday, March 06, 2006 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, अप्रतीम. सुंदर. सुंदर!!

Kiroo
Monday, March 06, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरेखच..शब्दांची मांडणी अप्रतीम.खूप आवडली कथा.

Manish2703
Monday, March 06, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र .. लै भारी .. मस्तच

Arch
Monday, March 06, 2006 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रध्दा, फ़ारच सुंदर. तू विषय फ़ार छान निवडतेस आणि रंगवतेस. आणि मुख्य म्हणजे नेहेमी +ve note वर संपवतेस.

अज्जुकाला म्हणाव ह्या कथेवर एखादा कार्यक्रम सादर करता येईल.


Kandapohe
Monday, March 06, 2006 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, मस्त लिहीले आहेस. गतवर्षीच्या पावसाची आठवण पण सुंदर रंगवली आहेस. आधी वाटले की त्यानंतर लगेच लिहीले असतेस तर पंच बसला असता. पण सांगता सही केली आहेस.

नुकतेच दिलीप प्रभावळकर यांचे श्रीयुत गंगाधर टिपरे वाचत आहे. त्यात वेगवेगळ्या वयाच्या ५ व्यक्तींची दैनंदीनी लिहीली आहे. तुला सुद्धा ३ वेगवेगळ्या वयोगटतील व्यक्तींचे मन सहजतेने रंगवता आले आहे. Keep it up


Devdattag
Monday, March 06, 2006 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केवळ अप्रतिम.. पूर्वी एक रेशिमगाठी म्हणून मालिका यायची कुठल्याश्या वाहिनीवर त्यात देण्यायोग्य.


Psg
Monday, March 06, 2006 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र. छान! याची एक कादंबरी होऊ शकेल इतक material आहे आणि तुझ्यात ते potential ही.. :-) ही गोष्ट इतक्य लवकर संपावी अस वाटत नव्हत! खूप खूप लिहत रहा तू

Lampan
Tuesday, March 07, 2006 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्जब्बर्रद्दस्स्त्त !!!
म्हणजे काय चलेंज वगैरे काही नाहीच


Kandapohe
Tuesday, March 07, 2006 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांची सिगरेट तुमच्या खिशात सापडली तर तुम्ही वाया कसे जाता म्हणे? >>

माझ्या एका मित्राचे वडील चेनस्मोकर होते. मी त्याच्या घरी रोज जात असे. एकदा घरी गेलो आणि बहीणी जाम ताप देत होत्या, खरे सांग सिगरेट ओढलीस ना, असे म्हणुन. शेवटी मी त्या मित्राकडे घेवुन गेलो आणि दाखवले शर्टला का वास येवु शकतो ते. :-)

Neelu_n
Tuesday, March 07, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा सुंदर... मस्तच.. लिहित रहा असच छान :-)

Rupali_rahul
Tuesday, March 07, 2006 - 2:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्ध नेहमिप्रमाणेच सुंदर कथा.

Madhurag
Tuesday, March 07, 2006 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, एकदम सही लिहिलयस. too good. असच छान छान लिहित रहा :-)

Amrutabh
Tuesday, March 07, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा,खूप सुरेख लिहिलय... keep it up...:-)

Giriraj
Tuesday, March 07, 2006 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hmmmm.... छानच रंगवतेस श्रद्धे तू! कादंबरीच्या दृष्टीने एखादा विषय घोळतोय की नाही मनात?






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators