|
" बाई तुमची आता सुन आली थोडी विश्रांती घ्या. " सुलोचनाने सुचवल्यावर बाई गप्प बसल्या. ग़ेल्या ५० वर्षांचा संसार ती विशीतली कोवळी पोर काय सांभाळणार. आणि आपल सोवळ ओवळ कशी काय पाळणार. गावातल्या शंभु महादेवाची पुजा आपल्या घराण्यात असते. ह्या वेळी महाशिवरात्रीला नविन सुन आणि आनंदाला करुद्या पुजा अस नानांनी सुचवल्यावर कावेरी बाई मनातून चमकल्या होत्या. हातातून काहीतरी निसटून चालल्याची भावना आणि त्या परक्या लहानशा मुलीवरचा अविश्वास. मानेनेच त्या हो म्हणाल्या होत्या. नानांना विरोध करण्याचा स्वभाव त्यांचा नव्हताच. आनंदा परदेशातून आल्यावरच कावेरीबाईनी त्याच्या मागे लग्नाचा धोषा लावला होता. परदेशातून आलेल्या मुलाला साजेशी बायको शोधताना त्या नकळत साजेशी सुन देखिल बघत होत्या. सुचेताला आनंदाने पसंत केल्यावर त्या थोड्याश्या नाखूषच होत्या. बघायला गेल्यावर साधा तिने वाकून नमस्कार देखिल केला नाही. लग्न ठरल्यावरती तरी तिने वाकून नमस्कार करायचा नव्हता का ही खंत नानांपाशी त्यांनी त्यानंतर अनेकदा बोलून दाखवली होती. नाना थोडे सुचेताच्याच बाजूने बोलल्यावर कावेरीबाईंना रागच आला तिचा. दिसायला देखिल आनंदाला शोभेशी नवह्ती ती. आनंदा किती गोरा आणि ती सावळीशीच. केस पण खंद्यापेक्षा वर. कसा लांबसडक शेपटा हवा खर तर. आणि वर ते डोळ्यावर येणार बचकभरून केस. पण हसली की मोत्यासारखे दात चमचम करतात. हसली की लोभसवाणी दिसते हे कावेरीबाईंनी मनात कबूल केल. " बाई तुमचा आनंदा किती गोरा लक्ख. अशी का हो सुन निवडली तुम्ही " सुलोचनाचे खोचक उद्गार कावेरी बाईनीनी ऐकु आले नाहीत असे दाखवले तरी सुचेताचा सावळा वर्ण, तिचे ते बोॅब केलेले भुरुभुरु उडणारे केस, कपाळाला साधी काळी टिकली पण नाही. गळ्यात चेन नाही हातही ओके बोके. परत एकदा त्यांना खुपले. निदान लग्नात तरी घालून घेणार का ही पोरगी दागीने. उसासत कावेरी बाईनी हातातल्या पाटल्या बांगड्या चाचपल्या. आनंदाशी बोलायचे ह्या विचारात त्या अनेकदा त्याच्या खोलीजवळ जाऊन परतल्या होत्या. शेवटी धीर करून त्या आनंदाच्या खोलीत आल्या. " आई तुला काही सांगायचे आहे का मला? " नकळत कावेरीबाईंनी खंत आनंदा कडे व्यक्त केली. खळखळून हसत आनंदा म्हणाला " अग तुला सुनच हवी होती तर तुच शोधायचीस की. मला कशाला मुलगी बघायला लावलीस? आता मला तीच आवडली करू काय " " अरे पण जोडा शोभायला नको का? " आनंदानी ह्या प्रश्णाकडे पुर्ण दुर्लक्ष केल. कावेरीबाईंच्या गळ्यात हात टाकून त्याने विचारले " आई मला सुचेताच आवडली आहे. माझ्या निवडीवर विश्वास नाही का तुझा? " अस आनंदाने गळ्यात बिळ्यात हात टाकले की कावेरीबाई विरघूनच जायच्या. पण आज मात्र आपले बोलणे नेटाने पुढे नेत त्या आनंदाला म्हणाल्याच " पण आपल्याकडे अनेक रिती, कुळाचार आहेत. तिला जमणार आहेत का रे? आपण पहायला गेलो होतो तेंव्हा साधा नमस्कार सुद्ध केला नाही तिने आणि हात ओके बोके कपाळाला टीकलीसुद्धा नवह्ती. " एखादी लहानशी जखम ठुसठुसावी तशी ती गोष्ट कावेरी बाईंच्या मनाला लागली होती. " अग आई सांगीतल मी तिला की पुढच्या वेळी तुझ्या पाया पड म्हणून. आणि आई असा आदर दाखवलाच पाहिजे अस थोडी आहे. आणि सुचेता तशी समजुतदार आहे. बाकी राहिल कपाळावर टीकली. मला काही फ़रक पडत नाही. " काल भेटलेल्या मुलीची बाजू घेऊन आनंदा आपले म्हणणे डावलू लागला बघून कावेरीबाईंना अत्यंत असुरक्षीत भासू लागल. अजून ती पोरगी घरी सुद्धा आली नाही तर ही कथा. तुमची एक खाष्ट सासू बनु लागली आहे ही नानांची चेष्टा अत्यंत अपमानास्पद वाटु लागली होती. काय चुक आहे हो माझे, गेले ५० वर्ष तुमचा संसार सांभाळते आहे. सासुबाईंची हु की चु न करता सेवा केली. त्यांचे घालून पाडून बोलणे तसेच अश्रुंबरोबर गिळले तेंव्हा कुठे गेला होतात तुम्ही. आअता मारे सुनेचा पुळका येतो आहे तुम्हाला. तरी पण सासुबाईंच्या आजारपणात सगळ केल. लहान मुलं पदरात घेऊन. साध कौतुकाचे बोल ऐकले नाहीत कधी. चांगल खडसावून विचारवस वाटल नानांना. पण कावेरीबाईंनी नेहमीप्रमाणे मनातच सगळ ठेऊन देवघरातल्या पितळी समया काढून खसाखसा चिंचेने घासायला सुरुवात केली. " लग्न तस अगदी साधच करून दिल नाही " " अहो आणि आहेर अगदी मोजक्याच लोकांना केला. कावेरीबाई तुमच्याकडून चांगल्या २ साड्या घेणार मी. " " कावेरीबाईंनी नेत्राच्या लग्नात काय बहार उडवली होती, त्यामानाने त्यांच इथे काहीच कौतूक झाल नाही " " काय हो कावेरीबाई एकुलता एक मुलगा आहे. कस काय चालऊन घेतल तुम्ही? " कावेरीबाई हसून दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत होता. पण बरीच हौस मौज राहिलीच ह्याची बोच जास्त होती. सगळे कढ आत जिरवून त्यांनी नविन सुनेचे स्वागत केले. तिच्या गळ्यातले लहानशीच सोन्याची माळ आणि हाततल्या अगदीच पातळ बांगड्या त्यांच्या नजरेला बोचल्याच. पण आनंदाची नाराजी पत्करून चालणार नव्हते. पुढे होऊन त्यांनी हाततल्या पाटल्या तिच्या हातात चढवल्या. आणि गळ्यातली मोहनमाळ तिच्या गळ्यात घातली. सुनेने कसे लक्ष्मीसारखे दिसले पाहिजे. अंगभर दागीनेच दागीने हवेत. कुलकर्ण्यांच्या घरात सुन आली म्हणजे काही थोडके काम नव्हते. गावातले प्रतिष्ठीत घर आहे आपले. कावेरीबाईंनी सुनेला आणि मुलाला ओवाळले. पहीले काही दिवस पुजा अर्चा, रीसेप्शन वगैरे मधेच गेले. सुचेता हळू हळू रुळायचा प्रयत्न करत होती. कावेरीबाईंना मान वर काढायची फ़ुरसत मिळाली नव्हती. " मी करू का आई " सुचेताने आत येत विचारले कावेरीबाईंनी थोड नाराजीनेच तिच्याकडे बघीतले. " राहूदेत ग तु बैस. अजून नवी नवरी आहेस तु " सुचेता काहीच बोलली नाही. दोन मिनिटानंतर " बाबांना चहा हवा आहे आणि आनंदला पण " घुटमळत तिचे शब्द बाहेर आले. कावेरीबाइंना आनंदाचा एकेरी उच्चार खुपलाच. तिकडे काणाडोळा करत त्या आधणाचे पाणी टाकायला उठल्या. " आई आनंद म्हणाला की माझ्या हातचाच चहा हवाय. बाबा पण तेच म्हणाले " चाचरत सुचेताने सांगीतले. कावेरीबाईंना आधणाचे पाणी दाणकन आपटून सगळ लोटून बाहेर जाऊन बसायची तीव्र इच्चा झाली. पण वरकरणी अतिशय शांतपणे त्यांनी चहाचे सामान तिच्या हाती दिले. " चहाच कर फ़क्त. तो पण २ च कप. आणि आता नर्मदा येईल तीच आवरेल सगळ. तु काही करू नकोस. स्वयपाक तयार आहे माझा. आणि जेवायलाच बसायच आहे म्हणाव आता. पुरे झाला चहा. " सुचेताने चहाचे आधण टाकले आणि निमुटपणे ती तिथे उभी राहिली. कावेरीबाई कोथींबीर निवडायच्या निमित्ताने डोळ्याच्या कोपर्यातून तिलाच निरखीत होत्या. थरथरत्या हाताने तिने तो चहा ओतला तेंवा थोडा बाहेरच सांडला. कावेरीबाईंना तिचा खूप राग आला. निमुटपणे सगळ पुसुन मान खाली घालून सुचेता गेली तेंव्हा त्यांना मात्र थोडे वाईट वाटले. अवघडली असेल पोर म्हणत त्या मागच आवरू लागल्या. जेवणानंतर मागच आटपून त्या बाहेर आल्या.. " बाबा तुम्ही पण ना " सुचेता लाडीक हट्ट करत होती. त्यांचे पाय खोलीच्या दाराशीच थबकले. नानांचे खळखळून हसणे कावेरीबाईंना झोंबले. " सुचे तु जरा शांत बैस इथे. बाबा माझे आधी मग तुझे. तक्रारी कसल्या करतेस माझ्या " " बघा ना बाबा लग्गेच join होतो म्हणतोय " " अरे आनंदा घेऊन जा तिला कुठेतरी ४ दिवस आणी मग हो join .. काम काय पाचवीलाच पुजलेली असतात " नानांचा आवाज ऐकून कावेरीबाईंच्या मस्ताकात तिडीक गेली. आपल्याला बाहेर न्यायच कधी ह्यांच्या लक्षात आल नाही. आनंदाला कसला उपदेश करतायत. संतापाने डोळ्यातले पाणी आवरत त्या खाली निघून गेल्या.. " आई तुझ्याशी बोलायचे आहे " कावेरी बाई साड्यांच्या घड्या घालून कपाट निट बसवीत होत्या " अरे बोल ना " " नाही सुचेता बद्दल बोलायचे होते " कावेरीबाईंच्या कपाळावर नकळत आठी उमटली. " आई ती घरात आपल्या नविन आहे. आई बाबा बहीण वगैरे सगळ सोडून घरात रमण्याचा प्रयत्न करते आहे. तीच थोडफ़ार चुकणारच. पण तु थोड समजून घेत जा तिला. बिचारी काल रडली माझ्याजवळ " काय बोलतोय हा आनंदा कसला सासुरवास केला मी तुझ्या बायकोला? ती जस adjust होण्याचा प्रयत्न करते आहे तसा मी देखिल करतेच आहे ना. प्रत्यक्षात कनवटीला किल्ल्या खोचत त्या म्हणाल्या " होईल ती ह्या घरात adjust सगळ्याच मुलींना ह्यातून जाव लागत. आणि रडायला काय झाल भरल्या घरात. मी सुद्धा नविन मुलगीच होते ह्या घरात आले तेंव्हा. तिच्याहून ५ वर्षांनी लहान होते शिवाय. झालेच मी adjust .. झाले ना? " आनंदा गप्प बसला. आपण त्याला गप्प केले ह्याचे कसलेसे समधान कावेरीबाईंना मिळाले. हे जे आपण करतोय त्यात काहीतरी चुकतय अशी हलकीशी जाणीव त्यांना व्हायची कधीतरी पण सुचेता समोर आली की त्यांना कसलीशी भिती देखिल वाटायची. परत ती भावना असुरक्षीततेची. " आई मदत करू मी काही? " सुचेताने दरवाज्यातूनच विचारले. कावेरीबाई सोवळ्यात स्वयपाक करत होत्या. तिथूनच त्यांनी तिला हाताने बाहेर जा खुणावले " नको आज सोवळ्यात स्वयपाक असतो आपल्याकडे. तु तुझ आवरून घे " सुचेता थोडावेळ तिथेच घुटमळली आणि धावत खोलीत शिरली. कावेरीबाई जरा वरमल्या. स्वयपाक आवरून पुजा आटपून त्या आनंदाच्या खोलीजवळ आल्या. अर्धवट लावलेल दार त्यांनी हलकेच लोटला. सुचेता पलंगावर निजली होती. एका हातात त्यांचा लग्नाचा आल्बम घेऊन. थोडावेळ त्या पोरीविषयी कावेरीबाईंच्या मनात माया दाटून आली. तिला पोटाशी धरून समजाऊन सांगाव अस वाटल. त्यांच्या चाहुलीने सुचेताला जाग आली. पटकन सावरून ती बसली " sorry चुकून झोपले. तुम्हाला मदत पण नाही विचारली मी नंतर. " ती काहीसी वरमून म्हणाली. त्यावर त्या काही हसून बोलणार इतक्यात मागून आनंदा आत शिरला. " अग sorry कसल म्हणतेस. तिला हौसच आहे सगळी काम स्वत : करायची. कित्ती सांगीतल तरी ऐकत नाही. " सुचेता हसली. कावेरीबाइंना उगीचच राग आला. फ़णकार्याने त्या तिथून निघून गेल्या.. आता कावेरीबाईंच्या स्वभावाशी सुचेताने थोडे जुळवून घेतले होते. ती त्यांच्या पद्धती समजून घेण्याचा आटोकाट प्र्यत्न करत होती. देवाच्या पुजेची तयारी असो की अंगणातला सडा असो, कावेरीबाई आठ्या चढवून तिच्या प्रत्येक कामाकडे बघत. त्याचीही तिला सवय झाली होती. आनंदा join झाल्यापासून नानांशी सोडल तर कोणाशीच सुचेता बोलायची नाही. कावेरीबाईंना तीच ते घुम्यासारख बसणही आवडायच नाही. तिने पुढे पुढे कराव किंव हे कस हो करायच विचाराव अस त्यांना सतत वाटत राही. सासर्याशी कसल्या गप्पा गोष्टी करते ही.. त्यांना नानांचा खूप राग यायचा.. " अग ऐकलस का मी शेखरला भेटून येतो. तार आली आहे त्याची. तातडीच काम आहे. " नाना गळ्याला मफ़लर गुंडाळत म्हणाले. सुचेता तिथेच पेपर वाचत बसली होती. " जरा दोन कपडे पिशवीत दे. आज तिथेच मुक्काम करेन " कावेरीबाई बोलल्या नाहीत. लगबगीने त्यांनी आत जाऊन पिशवी भरून आणली. " काळजीच कारण नाही. थोड जमीनीच कोर्टात काम आहे म्हणतोय. " " काही लागल तर कळवाल ना? " कावेरीबाईंनी हातात लहानसा डबा देताना विचारले. " हे बेसनाचे लाडू आहेत. शेखरला आवडतात " चप्पल घालताना नानांनी सुचेताचा निरोप घेतला. " येतो सुचेता. आनंदाला सांग. उद्या ये म्हणाव मला न्यायला " सुचेताने मान डोलावली. पण नाना गेल्यावर तिला एकदम घरात परक्यासारखे वाटू लागले. उगीचच ते ४ च खोल्यांचे घर तिला खायला उठले. कावेरीबाई परत कामाला जुंपल्या. मन रमवायला सुचेताने मग घरून आणलेली पुस्तक काढली. संध्याकाळचा चहा कावेरीबाईंनीच केला. " कधी येणार म्हणाला आनंदा? " काहीतरी बोलायचे म्हणून त्यांनी विचारले " ६ वाजतील म्हणाला होता " " येईलच एव्हड्यात. पोहे करते जरा खमंग. आवडतात त्याला खूप. आणि दाणे पण हे एवढाले टाक म्हणतो. वरून बरीक चिरलेली कोथींबीर. " " आई " सुचेताने मधेच बोलणे थांबवायचा प्रयत्न केला. कावेरीबाईंच्या कपाळावर आठ्या पडल्या. " आई आनंद म्हणत होता की संध्याकाळच खायला काही करत जाऊ नकोस. लवकरच जेवत जाईन आता. " कावेरीबाई काही बोलल्याच नाहीत मग. देवघरात जपमाळ ओढत त्या बसून राहिल्या. सुचेतानेच मग घरातले दिवे लावले. बाहेर व्हरांड्यातला दिवा देखिल लावला. कुकरही तिनेच लावला वाटत. कावेरीबाईंचा जप अजूनही चालूच होता. ८ वाजले तरी आनंदाचा पत्त नाही बघून कावेरीबाई थोड्या अस्वस्थ झाल्या. " सुचेता फ़ोन लावलास का आनंदाला? " न रहावून त्यांनी विचारले. सुचेताने मानेनेच होकार दिला. " office मधून कधीच निघाला म्हणे तो. ६ लाच. पण अजून कसा काय आला नाही माहित नाही " कावेरीबाई काळजीनेच आत गेल्या. नुसतेच काय बसायचे म्हणून कपाटातले काहीबाही आवरायला लागल्या. नेहमी सुचेता त्यांच्या खोलीत यायची नाही. पण आज ती त्यांच्या शेजारी येऊन बसली. घड्याळात नवाचे टोले वाजल्यावर तिने भरलेल्या डोळ्यांनी कावेरीबाईख़डे बघीतले " आई ठीक असेल ना हो तो? " तिचे काठोकाठ भरलेले डोळे बघून कावेरीबाई हसल्या. त्यांना तिच्यात आपल्च रुप दिसल. 30-40 वर्षांपुर्वीच.. " अग येईल की. होतो कधी कधी त्याला उशीर. कोणीतरी भेटल असेल रस्त्यात. काळजी करू नकोस " तिने मान डोलावली. ९ चे साडे ११ झाले तसा कावेरीबाईंचाही धीर सुटत चालला. एव्हाना सुचेताने त्याच्या office मधल्या माहिती असलेल्या मित्रांना फ़ोन केले होते. कुठेच आनंदाचा पत्ता नाही म्हणल्यावर ती खुपच घाबरली होती. " आई अजून कसा आला नाही हो तो " सुचेता आता रडतच होती. कावेरीबाई उठल्या. " चल माझ्याबरोबर. " म्हणत तिला त्या देवघरात घेऊन आल्या. आतमधली लहानशी गणपतीची चांदीची मुर्ती त्यांनी बाहेर काढली. आणि पितळ्याच्या भांड्यात पाणी घेऊन ती बुडऊन ठेवली. " साकड घालायच गणरायाला. सुखरूप आण रे माझ्या आनंदाला. बरका सुचेता हा गणपती पिढ्यानुपिढ्या ह्या घराण्यात आहे. संकटाच्या वेळी हाच धाऊन आला आहे वेळोवेळी. " सुचेताने डोळे मिटून नमस्कार केला. " ये जेऊन घे काहीतरी " सुचेताने मानेनेच नाही म्हंटले. " मला भुक नाही आई तुम्ही घ्या जेऊन. मी त्याची वाट बघते " कावेरीबाईंना पहिल्यांदाच तिच्यात आपल्या मुलाची काळजी करणारी बायको दिसली. त्यांनी तिच्या डोक्यावर थोपटले. ती तशीच सोफ़्यावर डोक टेकवून पडली. कावेरीबाई तिच्या केसातून हात फ़िरवत राहिल्या. कधी झोप लागली कळलच नाही. पाऊण वाजता बाहेर आनंदच्या गाडीचा आवाज झाला तशी सुचेता झटकन जागी झाली. घराच दार उघडून ती थंडीची पर्वा न कराता तशीच अनवाणी बाहेर पळत गेली. बाहेर आनंदाला सुखरूप बघून तिने दोन्ही हातांनी स्वत : चा चेहरा झाकला आणि मुसमुसून ती रडू लागली. आनंदाने गाडी लाऊन सुचेताला जवळ घेतले. उंबर्यावर थबकलेल्या कावेरीबाई समाधानाने हसल्या आणि घरात शिरल्या. समई लाऊन त्यांनी गणरायाचे अभार मानले. देवघराशी सुचेताच्या पायांचा आवाज वाजल्या. त्यांनी तिला हसून सांगीतले " मला भुक नाही सुचेता तु आणि आनंदा जेऊन घ्या. गणरायाला परत देवघरात बसवते. आणि प्रार्थना करते. नंतर थोडस दुध घेईन मी. जा तु बघ तुझ्या नवर्याला काय हवय आणि काय नकोय " सुचेता त्यांच्याकडे बघून हसली. तिने आत येऊन गणपतीला हात जोडले. आणि आपला हात कावेरीबाईंच्या हातावर ठेऊन " thanks आई " इतकेच म्हणले आणि तिथून ती निघून गेली. समयीच्या मंद प्रकाशात कावेरीबाईंच्या बरोबर गणरायाचा चेहरा पण आज समाधानी उजळून गेला होता.
|
Arch
| |
| Wednesday, March 01, 2006 - 3:34 pm: |
| 
|
रचना, सगळेच characters फ़ारच छान उभे केले आहेस. तुझ लिखाण मनाला नेहेमीच भावत कारण ते वास्तववादी असत. तुझी लेखनशैली खरच सुरेख आहे.
|
Pama
| |
| Wednesday, March 01, 2006 - 4:05 pm: |
| 
|
रचना, फारच सुरेख लिहिल आहेस!!
|
Moodi
| |
| Wednesday, March 01, 2006 - 4:25 pm: |
| 
|
रचना अतिशय छान लिहिलयस. मला अगदी भारतातल्या त्या माहेर अन मेनका मासिकातील कथांची आठवण झाली. अगदी सहज अन ओघवत लिहीलस बघ त्या कथांसारखे. अजुनही मी घरी गेले की ती मासिके आणुन वाचते. लिहीत जा ग जमेल तेव्हा. 
|
Maitreyee
| |
| Wednesday, March 01, 2006 - 4:29 pm: |
| 
|
मस्त लिहिलयस गं रचना! btw हा आनंदा गेला कुठे होता पण इतका वेळ
|
Ninavi
| |
| Wednesday, March 01, 2006 - 5:05 pm: |
| 
|
रचना, छान लिहीलंयस. ( पण मैत्रेयीचा प्रश्न मलाही पडलाच! की ' क्रमशः' आहे?) 
|
Sashal
| |
| Wednesday, March 01, 2006 - 6:46 pm: |
| 
|
हो ना .. तोच प्रश्न .. खरंतर क्षुल्लक आहे पण असा कसा उशीरा आला काही न कळवता phone होता की घरात .. पण गोष्ट छान रंगवली आहेस रचना ..
|
सगळ्यांना thanks गोष्ट लग्गेच वाचून प्रतीक्रिया दिल्याबद्दल. मैत्रेयी, निनावी, सशल - its not the point गं
|
Manuswini
| |
| Wednesday, March 01, 2006 - 8:14 pm: |
| 
|
छान वाटले वाचताना पण एक प्रश्ण वहिवाट ह्या नावाचा अर्थ नाहे कळला कथेसाठी?
|
Mita
| |
| Wednesday, March 01, 2006 - 8:33 pm: |
| 
|
रचना, छान... खुपखुप ओळखीची वाटली गं कथा..
|
Kandapohe
| |
| Wednesday, March 01, 2006 - 9:37 pm: |
| 
|
सुंदर. एकदम छान मोजक्या शब्दात मांडले आहेस. 
|
Paragkan
| |
| Wednesday, March 01, 2006 - 10:58 pm: |
| 
|
Good one RB!
|
Rajasee
| |
| Thursday, March 02, 2006 - 4:57 am: |
| 
|
रचना,छानच लिहिले आहेस, शेवटचे परिच्छेद वाचताना भरून आलं सहीच !!!!
|
Bee
| |
| Thursday, March 02, 2006 - 6:51 am: |
| 
|
रचना, नविन कथेची मागणी त्वरीत पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद! कथा लिहिण्यात तुझी प्रगती होते आहे.
|
darjedaar Katha....,aani chhan Characterisation
|
Champak
| |
| Thursday, March 02, 2006 - 10:45 am: |
| 
|
Nice Rachana! मनःस्विनी, वहिवाट म्हंजे वर्षानुवर्षे चालत आलेली एखादी परंपरा ह्या अर्थाने! आई चे मुलावरील, बायकोचे नवर्यावरील प्रेमापोटी काळजी करण्या ची ही परंपरा कथे त्शेवट जसा केला तसी च चालु राहिली! बरोबर हे का??
|
Ninavi
| |
| Thursday, March 02, 2006 - 11:07 am: |
| 
|
>>> that's not the point गं! बरोबर आहे. नवीन लग्न झालेलं दाखवलंय ना, म्हणून. थोड्या दिवसांनी तोच main point होईल बघ! असो. विनोद पुरे. पण in any case असे loose ends सोडू नयेत गोष्टीत असं माझं ( विनम्र) मत आहे. चंपक, गोष्टीत आलेल्या एका महत्त्वाच्या परंपरेचा उल्लेख करायला विसरलास असं नाही वाटत? 
|
good one Rachana निनावी .. अगदी अगदी 
|
Champak
| |
| Thursday, March 02, 2006 - 11:58 am: |
| 
|
kay g bai? .. ..
|
Pama
| |
| Thursday, March 02, 2006 - 12:16 pm: |
| 
|
निनावे.. खरचं! तीच तर वहिवाट आहे. रचना, मला ही तो प्रश्न पडला अणि मलाही वाटल तू म्हणतेस तसा that wasnt the point . पण, वाटयय कि तेव्हढाच एक loose end न सोडता अगदी काहीही explanation देऊन तो भाग close केला असतास तर कथेचा circle complete झाला असता. असो.
|
Storvi
| |
| Thursday, March 02, 2006 - 1:42 pm: |
| 
|
निनावी अगदी अगदी... रचना good one
|
Ashwini
| |
| Thursday, March 02, 2006 - 2:06 pm: |
| 
|
रचना, मस्त लिहीलं आहेस, नेहमीप्रमाणेच..
|
Manuswini
| |
| Thursday, March 02, 2006 - 4:06 pm: |
| 
|
thanks champak वहिवाट म्हणजे वाट लागणे अस मला वाटयचे seriously जरासे कच्चे आहे मराठी
|
Chinnu
| |
| Thursday, March 02, 2006 - 4:45 pm: |
| 
|
मला कावेरीबाई आणि त्यांच घर वगेरे पण दिसल अगदी. फ़ार छान लिहिलस रच!
|
Megha16
| |
| Thursday, March 02, 2006 - 5:53 pm: |
| 
|
रचना मस्त कथा आहे. बरयाच जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. मेघा
|
|
|