Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 14, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » कथा कादंबरी » गुन्हा » Archive through February 14, 2006 « Previous Next »

Daizy
Tuesday, January 10, 2006 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज ऑफीस मधुन निघायला वेळ्च झाला होता त्यामुळे गडबडीतच नीघाली आणि धावपळतच स्टेशन गाठले.

ईतकी धावपळ करुनही तीची train गेली होती.. आता काय पटकण down करून fast पकडायला हवी.. नाहितर घरी यश च्या प्रश्नांन उत्तर्र द्यावी लागणार.. fast train निघलीच होती.. तिने ती सराईत पणे पकडली.. 4th seat मिळाली.. सुटकेचा निश्वास टाकुन ती जर सावरुन बसली. आज जरा जास्तच काम होते ऑफिसात पण यशला ते कुठे कळणार त्याला फक्त घड्याळाचे काटे दिसतात.. train ने आता वेग घेतला तसे नेहा विचारात हरवली हिच तर एक वेळ होती स्वत:सठी
... आईने अनेक साड्या आणल्या होत्या देवाण - घेवानीसठी " आमच्यात न ह प्रकार कघी बन्द होईल माहीत नाही, अग! ह्या साड्या एका घुण्यानतर कोणी घालणार देखील नाही,पण दील्या नाहीतर सगळीकडे नाव निघेल ..." नेहाची आई नेहाच्या मैत्रीनींना सांगत होती.तसेच नेहा साठी आणलेल्या साड्या, शालु,चपला,पोत, दागीणे वगैरे दाखवत होती नेहा मात्र तिथे असुनही नसल्यासारखीच.. तीने ह्या लग्नाला होकार दिला तो फक्त आई-वडिलांसाठी....
तीचे प्रेम होते पराग वर. लहाणपणापासुन तीच्या सोबत सावलीसारखा असायचा. त्याला त्रास झाला की ईच्या डोळ्यात आसवे, नी हीने नुसता विचार केला की हा क्रुती करणार. असे बघीतले तर पराग मोठा होता एक वर्षाने, पण तीच्यापेक्षा तो खुपच समजदार होता. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्याचा positive attitude तीला आवडत असे.एखाद्या फुलासारखे जपत असे. तिच्या शक्य तितक्या मागण्या तो पुर्ण करत. तीचे प्रत्येक मुड तो सांभळत. पण जर कुठे चुकली तर हक्काने कान उघाडणी ही करत.समोरच्या बगल्यात तो रहायला आला तेव्हा दोघेही ७-८ वर्षाचेच असतील


Kiroo
Thursday, January 12, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Daizy Tak ik puZcaa Baaga lavakr.

Daizy
Monday, January 16, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks kiru मराठी लिहायला वेळ लागतो.. मी लिहतेय लवकरच

Daizy
Tuesday, January 17, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तीने त्याला प्रथम बघीतले ते त्यांच्या घरची वास्तुशांतीच्या दिवशी गोरा, थोडसा बारिकच, तांबुस डोळे पण त्यावर चष्मा होता पण वागण्यात वेगळीच चपळता होती. ती त्याला बघत होती अजुन बरिच लहान मुल खेळत होती. त्यच्या मागे पराग दादा, पराग दादा म्हणत मागे पळत होती. नेहा ला उगीचच त्याचा राग येत होता. समोरच्या बगल्यातली वर्दळ दोन तीन दिवस होती. अधुनमघुन तीचे लक्ष बगल्याकडे जात होते. सगळे कसे खेळीमेळीचे वातावरण होते. नेहाला ते खुप आवडले. नेहाच्या घरात कमालीचे शिस्तीचे वातावरण असे. वडिल खुप कडक स्वभावाचे,कोणाच्या घरी गेलेले तर सोडाच पण कोनाशी बोललेले हसलेले देखील आवडत नसे त्यांना.घरात सगळे होते तरी बाहेर खेळायला खुप आवडत. वयच होते तीचे खेळायचे. तशी वडिल घरी नसल्यावर आई पाठवत असे बाहेर तीला आणि ताईला नेहाची मोठी बहीण नेत्रा, तीची एकमेव मैत्रीण. तशी नेहा खुप बोलकी तीतकेच बोलके काळेभोर डोळे,लांब काळ्या केसांच्या दोन्ही खांद्यावर येणा-या वेण्या, गोरी गुलाबी गाल. पटकन कोणालाही आवडुन जाईल अशी!
अशीच एक दिवस खाली खेळत असतांना बगल्यातल्या काकीच समोर आल्या आणि तीची विचारपुस केली. फार प्रेमळ स्वभाव होता त्यांचा!
आता नेहा रोज त्यांच्या बगल्यात जाऊ लागली. अर्थातच वडिलांच्या नकळत. हळुहळु परागची तीची खुप गट्टी जमली. मे आणि दिवाळीच्या सुट्टीत यांच्याकडे खुप वर्दळ असे. मग पत्ते, कारम, अंपल-चपल तसेच ओल्या वाळुतले किल्ले त्यांची सजावट अश्या एक न अनेक खेळ खेळत मोठे होत होते.एक दोनदा वडिलांना समजले की नेहा खाली खेळत असते तीला चांगलाच दम दिला त्यांनी.
आज दहावीचा पहिलाच पेपर बराच वेळ नेहा खाली रेंगाळत उभी रहीली पण पराग कुथेच दिसत नव्हता.
जड पावलांनी ती सेंतर कडे जयला निघाली. सगळे लक्ष पराग कडे लागले होते पण पराग सोडुन सगळेच तीला best of luck देउन जात होते.&#३४; पराग कुठे आहेस रे तु?&#३४; ती खुपच अस्वस्थ झाली होती. सेंटर आले तरी त्याचा कुठेच पत्ता नव्हता. ती शाळेच्या गेट पर्यत आली.. नतर पसेज मध्ये.. सगळे आपले रूम शोधत होते आणि ही परग ला! आत रूम मध्ये जयची बेल झाली ती board कडे जयला निघालीच होती तित्क्यात कोणीतरी मागुन खाद्यावर थाप पडली मागे वळुन बघते तर पराग!....... तीला काय बोलावे तेच सुचेना..तोच म्हणाला best of luck चल तुझी रूम दाखवतो.




Moodi
Tuesday, January 17, 2006 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच लिहितियस. पण याच आठवड्यात पूर्ण कर उत्सुकता वाढवु नकोस.

Kmayuresh2002
Tuesday, January 17, 2006 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुड..किप ईट अप.. लिहीत जा.. जमेल हळुहळु:-)

Dineshvs
Tuesday, January 17, 2006 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेझी, कुठलेहि चिन्ह टाकताना <!> असे टाक, म्हणजे नीट दिसेल.

Daizy
Wednesday, January 18, 2006 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मुडी, मयुरेश,दिनेश काय बोलु ? हा ! होसला अबजाई का शुक्रिया !



Moodi
Wednesday, January 25, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाई लिही आता तू पण.. ~D
या आठवड्यात पूर्ण कर ग, उत्सुकता वाढतेय.


Ammi
Wednesday, January 25, 2006 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सम्पली कि काय? .... टाका पुढची कथा लवकर.. क्रुपया..

Rupali_rahul
Saturday, January 28, 2006 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे डैझि पुढे लिहिण्याचि कृपा करशिल का????? वाट बघुन बघुन थकले मी.....

Daizy
Saturday, January 28, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

excuse me ! कुठे ऊतरायचे आहे ? ह्या प्रश्नाने नेहा एकदम भानावर आली. ...... तिस-या सीटवर सरकुन तीने पुन्हा डोळे झाकुन घेतले.
त्यानतर पराग व त्याच्या घराचे शहरापासुन जरा बाहेरच राहायला गेले. समोरच्या बगल्यात दुसरे कुणीतरी रहायला आले. तीची व त्याची भेट जवळ जवळ नाहीच. दोन वर्ष गेले. बारावी झाली, डिग्री च्या शेवटच्या वर्षाला क्लास लावला. पहिल्या दिवशी तीच्या मनात फ़क्त त्याचेच विचार होते.तो कुठुनतरी बघतो आहे व अचानक आपल्यासमोर येईल, नाहीतरी Surprise द्यायची सवयच होती त्याला. पण तो आला नाही.मधल्या काळात तीचे वाचनाचे वेड आणि परागबरोबरचे क्षण हेच तीच्या बरोबर होते. ताईचे लग्न झाले. कॉलेज मध्येमैत्रिणी झाल्या. तीच्या सोज्वळ सोदर्यामुळे अनेकजण तीच्या एका कटाक्षसाठी आतुर असत. पण तेचे डोळे फ़क्त पराग ला शोधत.
आज क्लास सुटला. नेहमीप्रमाणे मैत्रिणीबरोबर स्टॉपकडे आली. आणि .......... समोर पराग !!! तीचा प्रथम विश्वासच बसेना. " अरे तु ईकडे कसा ? कुठे होतास ? कधी आठवण पण नाही आली ना ? काकी कश्या आहेत ? तु कोणत्या कॉलेजला अरे तुझी तर डीग्री झाली असेल ना ? मग आता काय करतोस ? फ़ोन नबर तरी दे. बघतोस काय नुसता, बोल काहीतरी. ओळखतोस ना ? की विसरलास ?" " झाले ! " ईतकेच बोलला तो. आणि ती नुसतीच हसली. " अरे ही माझी मैत्रीण लीना, लीना हा पराग !" तो नुसताच हसला. " वेळ आहे ?" तीने लीनाकडे बघीतले लीना समजले ती बोलली " काकींना सांग माझ्याकडे आली होती म्हणुन !" तीला खुप बरे वाटले. तीला निरोप देउन ते निघाले. " कुठे जायचे ?"" तुझे पप्पा बघणार नाहीत तीथे. " तीने चमकुन त्याच्याकडे बघीतले तो प्रथमच तीच्या वडिलांविष्यी बोलला. म्हणजे त्याला सर्व ठाऊक होते तर !
एका छोट्याश्या छान हॉटेलमध्ये कोप-यातल्या टेबलावर जाउन ते समोरासमोर बसले. किती बदल झाला होता त्यात. जवळ्जवळ ५.८ ९ फ़ुट उंच, डोळ्यावरचा चष्मा नसल्याने त्याचे ते तांबुस डोळे सांयकाळच्या तांबुस किरनांमुळे अधीकच मोहक दिसत होते. व्यायामामुळे उंचीला शोभणारा पिळदारपणा.एखाद्या पिक्चरचा हिरो शोभावा असा. आजुबाजुचे आपल्यावर जळतात असे तीला क्षणभर वाटुन गेले.
परागनेच बोलायला सुरवात केली " कशी आहेस ?, " घरचे कसे आहेत ?"
त्यानतर ते ब-याच वेळा भेटले.बोलले.क्लासला बाय्-बाय करुन फ़िरायला गेले. तो तीला घरीही घेउन गेला. नेहाला त्याच्या बरोबर खुप बरे वाटत पण कधी जर घरी हे सगळे कळाले तर ? सगळे कळत असुनही ती त्याच्याबरोबर खुश होती. एकटी असतांना तीच्या मनात त्याचेच विचार असत. एकटीच कशाला पण तीच्या प्रत्येक क्षणात तो असे.
आज सुट्टी होती दुपारचे जेवण करुन ' देवदास ' बघत बसली ईतक्या वर्षांनी भेटणा-या पारो देवदासला विचारते " मै कभी याद नही आई देवा ?" नेहा बघता बघता विचारात पडली. परागला येत असेल का आपली आठवण ? त्याच्या ईतकीच त्यालाही मी आवडत असेल का ?
तीच्या प्रश्नाला लवकरच उत्तर मिळाले. थडी-ताप आल्याने ती चार पाच दिवस क्लासला गेली नाही. लीना तिला बघायला घरी आली. तीने सांगीतले ," पराग रोज स्टॉपवर उभा असतो. त्यानेच आज मला तुला भेटायला सांगीतले. खुपच अस्वथ्थ होता. बिचारा देवदास !"" ये काहीतरीच काय ?" नेहाचा चेहरा लाजुन लाल झाला होता.



Arunima
Saturday, January 28, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

daizy छान ग. लवकर टाक आता पुढचा भाग.

Rupali_rahul
Monday, January 30, 2006 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेझी छान पणा आत्ता पटपट टाक पुढचा भाग.....

Daizy
Thursday, February 02, 2006 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यानतर पराग आणि ती जवळ जवळ रोजच भेटत. पण तीही कधी त्याला काहीबोलाली नाही आणि तोही. तशी तो स्वत्:हुन काही सांगेल अशी अपेक्षाही नेहाने केली नव्हती कारण मुळातच तो अबोल, लाजरा. पण प्रेम व्यक्त करायला हवेच का ? ते क्रुतीतुनही दिसते, अश्या विचारांचे ते दोघे. १०-११ वर्षाच्या मैत्रीत कधीही कसले आकर्षन नव्हते. त्यांचे मित्र्-मैत्रीनी नेहमी " प्रेम असावे तर असे " म्हणत.
पण काळाला हे मंजुर नसावे. तीची वार्षीक परिक्षा झाली. सुट्ट्या सुरु झाल्या. एक दिवस अचानक घरी काही पाहुणे आले. अचानक ? नाही फ़क्त नेहाला ते माहीत नसावे. तीला दाखवण्याचा कार्यक्रम झाला. लग्नाची तारीखही ठरली. पराग ला तर काहीच माहीत नव्हते कारण सुट्टीने सगळ्यांचीच ताटातुट केली. ............. कायमचीच.

स्टेशन आले तशी ती उतरली आणि चालू लागली जड पावलांनी.घरी आली. अजुन यश आला नव्हता. तीने सांयकाळचे स्नान उरकले. देवापुढे दिवा लावला. फ़्रीज उघडुन भाजीला काय आहे ? सुरण! चला तेच करते यश ला खुप आवडते माझ्या हातची ही भाजी. तीने मसाला भाजला एकीकडे भात टाकला. पीठ मळले. भात झाल्यावर भाजी फ़ोडनीला घातली. चपात्या केल्या. खास यशला आवडते म्हणुन त्याबरोबर तीने कोशींबीरही केली. सगले आवरुन झाले. टेबल वर सगळे छान मांडुन ठेवले. हे सगळे करत असतांना तीच्या मनातले सगले विचार बाजुला पडले होते. मनाविरुध्द लन्ग होऊनही नेहाने सगळे कसे सहज स्विकारले होते का ती तसे भासवत होती ?
लग्नानतर तीची व परागची भेट नाही. लीना भेटली ती सांगत होती तीला भेटला होता एकदा अचानक लग्न केले नव्हते त्याने अजुन !
नेहाच्या लग्नाला ६-७ वर्ष झाली होती तेव्हा ! आणि लीना भेटुन दोन वर्ष !! अजुनही तसाच असेल का तो एकटा माझी वाट बघत असेल का?

टिंग टॉंग ........ टिंग टॉंग ............ टिंग टॉंग
दरावरची बेल वाजली तशी नेहा घाई घाई उठली व दरवाजा उघडला. यश आजही
पिउन तर्र आला होता. कसाबसा सोफ़्यावर येउन तो पडला. त्याच्याबरोबर आलेल्या मित्राकडे नेहाने बघीतले तसा तो खाली मान घालुन निघुन गेला. नेहाने त्याला नीट झोपवले आणि स्वत्: तिथेच बसली उघड्या खिडकीतुन दिसणा-या काळोखाकडे बघत ..........


Megha16
Friday, February 03, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेझी
लवकर पुर्ण कर ग कथा.आता अजुन वेळ लावु नकोस ग लिहायला.ऊत्सुकता वाढत चालली आहे.


Hemanta
Saturday, February 04, 2006 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kuNyaa javaLcyaa vya>Icaa AnauBava vaaTtÜya.. mast ilahIlaoya....² AavaDlaI kqaa.

Jai_jui
Saturday, February 04, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Katha chanch ahe. Daisy, pudhe lavkar kihi ga, utsukata etaki tanun thevu nakos.

Rupali_rahul
Monday, February 13, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेझी लवकर पुर्ण कर कथा.....

Moodi
Monday, February 13, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेझी एवढा उशिर का? आम्हा वाचकांचा काय गुन्हा? लवकर लवकर!!

Dineshvs
Monday, February 13, 2006 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेझी आपल्या सगळ्यांची आठवण काढत बसते, म्हणुन तिला कथा लिहायला वेळ मिळत नाही.

Daizy
Tuesday, February 14, 2006 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व मायबोलीकर मित्र्-मैत्रीणींना धन्यवाद.मला माहीत आहे की मला लिहायला उशीर झाला आहे.पण बहिणीच्या चिमुकलीचे Heart चे ऑपरेशन आहे. त्यामुळे ही दिरगाई.जस्लोक हॉस्पीटल ला सोमवारी..

तरी मी लिहण्याचा प्रयत्न करेल.

क्षमस्व,
daizy


Moodi
Tuesday, February 14, 2006 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॉरी डेझी, कारण आज कळले.
पण तुझ्या भाचीचे ऑपरेशन चांगले व्हावे अन तिची लवकरात लवकर तब्येत बरी व्हावी अश्या शुभेच्छा.


Kishori
Tuesday, February 14, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

haya doj,hIÊ gaÜYT Cana ilahIto Aahosa... tuJyaa BaacaI cyaa Aa^proXana saazI XauBaocCa....

Kishori
Tuesday, February 14, 2006 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

haya DoJaIÊ gaÜYT Cana ilahIto Aahosa... tuJyaa BaacaI cyaa Aa^proXana saazI XauBaocCa....




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators