Meenu
| |
| Tuesday, February 28, 2006 - 4:14 am: |
| 
|
vaibhav , यावेळी येईन तेव्हा मागीन मलाच' तुझ्याकडे आसवेच उरतिल बाकी दिल्यावर मला, तुझ्याकडे भरण्या आता ही पोकळी तुझिया मनाची आठवे घे ठेवुनी सुखद थोड्या त्या क्षणांची
|
मला न सांगता ह्रुदयात येउन धडकतो, कधी मनात येउन स्म्रुतीचित्रे जागवतोस, अश्रु बनुन आठ्वणीतुन ओघळत राहतो, संपव हा अबोला.... एकदा तरी साद घाल, अन भेट जसा, स्वप्नात भेटलास काल!!!
|
हाय मीनु, श्यामली, देवदत्त,वैशाली आजही हे तुझे येणे जाणे त्या बदलत्या ऋतूप्रमाणे डोळ्यांत आषाढ तुझ्या अन ओठी वसंताचे उखाणे
|
देव, श्यामली, वैशाली, HW , सुधीर, मीनु.. सुंदर.. वैभव.. नेहमीप्रमाणेच उच्च..
|
Meenu
| |
| Tuesday, February 28, 2006 - 4:32 am: |
| 
|
बोल शब्दांच्या रुपातील तोकडे कळविण्या भावना मूक ती आर्जवे नजरेतली भावली माझ्या मना शब्द आणि मौन करिता तुलना जाण मौनाचेच जड ते पारडे
|
>>आसवे ती नकोच मला >>आठवांचे काय करु >>तु नसता तेच रे >>माझ्या जीवाचा आधारु श्यामली.. मी expert नही.. पण मला जे सुचते तसे गेय करण्याचा प्रयत्न करत आहे.. आसवे नकोच मला ती आठवणींचे काय करु? हात तुझा हातात हवा या तुच जीवाचा आधारु
|
धन्यवाद दीप ... मौन राहतात ओठ नेत्र बोल बोलती रोज रोज ही अशी संभाषणे चालती
|
Devdattag
| |
| Tuesday, February 28, 2006 - 4:38 am: |
| 
|
दाटले डोळ्यात तुझिया ते श्रावणाचे मेघ होते आसवे म्हणतिल कोणी मजसाठी ते वेद होते
|
Shyamli
| |
| Tuesday, February 28, 2006 - 4:42 am: |
| 
|
धन्यवाद दीप.. .. .. ..
|
दुःख ही लाभू नये मजला सुखाने फक्त हे हेतू ऋतूंनी पाळले दोष का द्यावा बरे ग्रीष्मास त्या श्रावणाने आसवांना जाळले
|
घेऊनी जा आसवे अन आठवे ही दोनचार हात हा हाती हवा तोच माझा एक आधार
|
Devdattag
| |
| Tuesday, February 28, 2006 - 4:53 am: |
| 
|
श्यामलि, असे काहिसे? आसवे नकोच मजला आठवांचा करते प्रतार आठवेच अरी तरीही आठवांचा असे आधार
|
Meenu
| |
| Tuesday, February 28, 2006 - 4:56 am: |
| 
|
साधीशीच हि दुपार नाही ढग नाही आभाळ मधूनच एखादे पान हलते आहे माझ्या मनातही आज ह्याच दुपारचे ऊन आहे नाही राग, रुसवा, द्वेष निरव शांतता फुलते आहे
|
Shyamli
| |
| Tuesday, February 28, 2006 - 5:01 am: |
| 
|
देवा हे छान आहे पण माझा आशय असा आहे मला आसवे नको आहेत आणि तु नसतना तुझ्या आठवणि हाच आधार आहे जाउ दे नन्तर बघीन काय सुधारणा करयची ते आत्ता चालु दे पुढे
|
Prem869
| |
| Tuesday, February 28, 2006 - 5:09 am: |
| 
|
वैभव अप्रतिम, सुरेखच. श्यामली, दीप, मीनु, देवदत्ता सुन्दरच. वैभव अप्रतिम!
|
थोडी ओली थोडी सुकी नेहेमीचीच दुपार रणरणत्या उन्हाला आसवांची किनार
|
श्यामली.. आसवे नकोच मजला ते पापण्यांतले पाणी एकांतीही साथ मज देती गोड तुझ्या आठवणी प्रेम धन्यवाद
|
Shyamli
| |
| Tuesday, February 28, 2006 - 5:25 am: |
| 
|
हं हे जवळ वाटतय आज नको रे ही आसवे नकोच कधी ही पुन्हा घेऊन जा ना मलाच सखया संशय का मनी ऊरला श्यामली!!!
|
Meenu
| |
| Tuesday, February 28, 2006 - 5:32 am: |
| 
|
vaibhav why r u not leaving tears today? मान आज आसवांचेही आभार करती वेळीच वाहूनिया हलका भार रात्र अंधारी असो की असो सोनेरी दुपार नको घेऊस वाटुनिया आसवांचा भार
|
Shyamli
| |
| Tuesday, February 28, 2006 - 5:35 am: |
| 
|
ए वीषय बदला खरच झालेली पहीली भेट किंवा होणारी पहिली भेट चला लिहा बघु छान छान
|
वैशाली.. तुझ्या एव्हढ्या सुंदर कविता इथे न देता खास कवितांच्या बीबीवर दे.. नियम असा नाही, पण शक्यतो इथे छोटे, हलके फुलके काव्य, चरोळ्या, रुबाया.. असा काव्य प्रकार देतत.. तुझ्या सुंदर कविता त्या विभागात दिल्यास अजुन वाचक वर्ग मिळेल.. तू Lincolnshire ला आणि तुझा व्यवसाय नायब तहसिलदार.. हे कसे बुवा.. ?? कवितेत उत्तर दिले तरी चालेल..
|
Jaaaswand
| |
| Tuesday, February 28, 2006 - 5:52 am: |
| 
|
मस्त रे मित्रांनो... एकदम झकास..वाटतेय..झूळूक वर आता माझ एक छोटासा प्रयत्न.. सुन्न एकांत वाट देईल वळणे अस्फुट काव्यांची गर्द कालरातीत घडतील स्वप्ने वेड्या काजव्यांची जास्वन्द...
|
तशा शेकडो घडल्या भेटी अजूनही ते तेच प्रत्यंतर प्रत्येक भेट तिच्यासंगती पहिल्या भेटीइतकीच सुंदर
|
Shyamli
| |
| Tuesday, February 28, 2006 - 5:58 am: |
| 
|
वा वैभव सुन्दर.. .. .. ..
|