Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 26, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » काव्यधारा » झुळूक » Archive through February 26, 2006 « Previous Next »

Devdattag
Thursday, February 23, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या शेवटच्या प्रवासि
संगति तुझिया सदा असेन
हात देण्या मी तुला गं
त्या सरणावरति उभा असेन


Shyamli
Thursday, February 23, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!
*पण तरी नका अस लिहु
please


Meenu
Thursday, February 23, 2006 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटच्या या प्रवासात जर
अशी आश्वासक साथ असेल
अग्निशलाकांमधे जर हाती तुझा हात असेल
जळताना माझ्या ओठी समाधानाचे स्मित असेल

मीनाक्षी


Meenu
Thursday, February 23, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्ता सुंदर... हे लिहायचच राहिलं

Shyamli
Thursday, February 23, 2006 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु,.. .. .. .. ..
सुरेख!!!


Devdattag
Thursday, February 23, 2006 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या जळण्यात सखये
माझा प्रेमळ कावा असेल
अग्निशलाकेस राणी
चंदनाचा ओलावा असेल


Meenu
Thursday, February 23, 2006 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या वेढ्यापुढे राजा
अग्निचा वेढा फिका पडेल
तुझ्या प्रेमाचा शिडकावा
चंदनाहुनही सुखद असेल
तुझ्यामाझ्या राखेतून उद्या
पारिजातकाचा सडा पडेल


Jaaaswand
Thursday, February 23, 2006 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह रे वा...
सर्वच अफ़ाट अन अशक्य आहेत.. :-)
लगे रहो...


Gash16
Thursday, February 23, 2006 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


नगरी माझ्या सुखाची
आता उजाड आहे...
गावात वेदनान्च्या
माझे बिर्हाड आहे..

--गणेश.


Jaaaswand
Thursday, February 23, 2006 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



मित्रांनो..सगळे मस्त लिहिताय...

सरण वेदना जळणं..वगैरे... negative थोडे बास करूया...
थोडे उगाचच भरून आल्यासारखे झालय...
जरा मोकळं करण्याचा हा प्रयत्न...

जगण्यात विखुरल्या माझ्या
अनिश्चिततेच्या कल्पना
मात्र मृत्यूस मारले तेव्हा
होती निश्चिंत भावना

जास्वन्द...


Jaaaswand
Thursday, February 23, 2006 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो..

थोडे आपल्या धर्माबद्दल.. I mean क्रिकेट बद्दल... :-)

क्रिकेट मंडळाने आपल्या
केली सौरव ची दैना
मधेच बासुंदी पिऊन गेला
वीस वर्षाचा रैना

जास्वन्द...


Ninavi
Thursday, February 23, 2006 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंद,
पेटत्या वणव्यातही घरकूल आम्ही थाटतो
चालतो काट्यांत अन वाणे फुलांची वाटतो
घाबरूनी आसवांना प्रेम का होते कुठे?
दुःख अमुचे पाहुनी गहिवर सुखाला दाटतो..


Jaaaswand
Thursday, February 23, 2006 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि..मस्तच ग... :-)

वैश्वानराच्या हृदयी उत्स्फ़ुर्तता तिच्यातली
मिठीत घेऊनी त्याला नाचलो तिच्याशी
नाही मिटलो पुरते ते तिच्या आसवांनी
कधी ओल्या कडांत कधी भासलो नभाशी

जास्वन्द...


Mavla
Thursday, February 23, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


स्रुष्टी

मी नभ मेघांत फ़िरतो, ती मजला वाहुन नेते,
मी जलधरात बरसतो, ती धरणीत प्राशुन घेते,
जन्म न मजला स्मरतो, ती मजला जन्म देते,
मी धरणीत रुतुन बसतो, ती मजला अंकुतरे.......

मावळा


Devdattag
Thursday, February 23, 2006 - 10:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेटू दे वणवे त्यात आम्ही आसवांना जाळतो
हाय आम्ही फुलावरी पण काटा अमुच्यावरी भाळतो


Heartwork
Saturday, February 25, 2006 - 2:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थाम्बलो नाही, थबकलो आहे
समजु नका की, मी सम्पलो आहे
अजुन काहि सूर आहे, वेदनेत माझ्या
आत्ता कुठे माझ्या व्यथान्ची, भुपाळी गायलो आहे


Athak
Saturday, February 25, 2006 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा एकसे बढकर एक
वणव्यात सुद्धा गारवा मिळवणारे हे कवीमन धन्य धन्य


Shyamli
Sunday, February 26, 2006 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लीहायच आहे काहीतरी
सुचत नाहिये....
लेखणिला आज
काहीच रुचत नाहीये..

श्यामली!!!


Shyamli
Sunday, February 26, 2006 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु रुसला
लेखणि रुसलि
सगळेच का असे रुसतायत
माझे सुर मला सोडुन
दुसयांना का
जाऊन मिळतायत?..

श्यामली!!!


Shriramb
Sunday, February 26, 2006 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तुझ्या अबोल्यावर कविता लिहावी
म्हणून लेखणी घेतली
तर लेखणीतही तूच!
आणि तुझा अबोला!


Shyamli
Sunday, February 26, 2006 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय मागते रे मी?
फक्त तुझी एक नजर
तीही देण्यास तुझी
किती ती काटकसर

श्यामली!!!


Shyamli
Sunday, February 26, 2006 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणे अबोला
मी कुठे धरलाय
तुझ्यातच थोडासा
मानभावीपणा आलाय

श्यामली!!!


Shyamli
Sunday, February 26, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधीतरी कुठेतरी
कुणीतरी भेटुन जात
सुख माझ घेऊन,
आणि सल मात्र देऊन जात

श्यामली!!!


Shyamli
Sunday, February 26, 2006 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंडतोयस गावभर
आणि म्हणे
असतेस तुच मनी
दिवसभर

श्यामली!!!


Dineshvs
Sunday, February 26, 2006 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, तु पण कविच का ?
बहुतेक सगळे कविता करणारे माझे मित्र असले तरी या बाबतीत मी मठ्ठ तो मठ्ठच.
बाकि या चारोळ्या आवडल्या.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators