|
Shyamli
| |
| Thursday, February 23, 2006 - 4:32 am: |
| 
|
.. .. .. .. काय लिहायच रे?
|
Puru
| |
| Thursday, February 23, 2006 - 5:16 am: |
| 
|
करपे, तुज्या कवीता जीवन्त वाटतात! Guys, how to write Zha in devnagari? I tried, it became jya
|
Shyamli
| |
| Thursday, February 23, 2006 - 5:23 am: |
| 
|
पुरु असे लिहुन बघ बर jha =झ
|
Puru
| |
| Thursday, February 23, 2006 - 5:39 am: |
| 
|
तुझे बरोबर आहे! Rather, I felt so stupid; had tried all other weird combinations except that one. Can Maayboli admin provide help-link just below this dialog-box of posting? (listing some obvious tricky Marathi words/letters & how to write them)
|
Puru
| |
| Thursday, February 23, 2006 - 5:43 am: |
| 
|
Oops! The help/instructions link is already there! Today is not my day, BFN 
|
never mind , hotaa hai!
|
बंदिनी .... तिची का रंगते मेंदी नका मागू खुलासा तिच्या रंध्रांत मी अद्यापही आहे जरासा जरी नाहीत भेटी , बोलणे नाही आता जगाच्या उंबर्याला लंघणे नाही आता कुणाला ना कळू देताच ती स्मरते मला मनातील एक कप्पा .. राखलेला .. आपलासा कसा दाबून ठेवी हुंदका ती कोण जाणे कसे ते बंद झाले ओठही शिवल्याप्रमाणे कधी बेबंद झाले जर जुने आनंदगाणे दिशांना ऐकू जाई फक्त तो हळवा उसासा किती पायात बेड्या घातलेल्या आपल्यांनी असे जखडून नेले ती जणू की बंदिनी तरी पाहून गेली एकदा मागे वळूनी मला जगण्या पुरेसा तेवढा आहे दिलासा
|
Shyamli
| |
| Thursday, February 23, 2006 - 6:45 am: |
| 
|
.. .. .. ..काय रे!! लिहलयस छान पण.... प्रतिक्रीया काय लिहावी समजत नाहिये
|
Shyamali, Zaad, Pama मी, एक माणूस तुम्हाला आवडल्याच तुम्ही कळवलय. धन्यवाद. vaidhav,तुझी दोस्तांनो खूप छान वाटली. बापू.
|
आम्ही डीएसके विश्व काव्यकट्टा धायरी,पुणे ४११०४१ तर्फे राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे. निवडक निमंत्रित स्पर्धककवींचे कवीसंम्मेलन आणि बक्षिसवितरण समारभ रविवार दिनांक २६ फेब्रु.२००६ रोजी दु.३.३० वा डीएसके विश्व धायरी,पुणे ४११०४१ येथे होणार आहे. तरी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. सर्वांनी कविता ऐकण्यासाठी अवश्य उपस्थित रहावे. निमंत्रक सौ.प्रिया राज गर्दे. सयोजिका. राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा डीएसके विश्व काव्यकट्टा धायरी,पुणे ४११०४१. संपर्क्: ९२२५५२२९८८.
|
Meenu
| |
| Thursday, February 23, 2006 - 9:24 am: |
| 
|
रणांगण थकलेय मी.. खरच सांगते खूप खूप थकलेय मी लढून लढून स्वत:शीच आता अगदी थकलेय मी मन माझ पेटतं रणांगण कधी युद्ध कधी लढाई कधी घनघोर रण काम, क्रोध, मद, मत्सराच्या शत्रुचं माजलयं तण शत्रु कसला हा रावण... विवेकाचा शिपाई फुंकतो शंख माणुसकीच्या भात्यावर चढतो चांगुलपणाचा बाण सुरु होतं तुंबळ युद्ध दोन्ही पक्ष जिंकण्यास आता असतात कटीबद्ध लढून लढून दोन्ही पक्ष दिवसाखेरी थकतात निद्रादेवीच्या साम्राज्यात क्षण काही टेकतात सकाळ होईल या विचारानेही पाचावर धारण बसते जाग येताच मनात माजणार पुन्हा रण असते माजणार पुन्हा रण असते.....
|
Meenu
| |
| Thursday, February 23, 2006 - 9:40 am: |
| 
|
सांभाळ मित्रा तूला आहे गळ आपली मैत्री तूच सांभाळ माझ्या आत तूला सांगते राम आणि रावण आहे एकाच वेळी मनात माझ्या कैकेयी नि कौसल्या नांदते आहे दोन्ही पक्ष तुल्यबळ कधी हा तर कधी तो प्रबळ कैकेयी आपल्या मैत्रीसाठी वनवासाचा वर मागेल रावण पुढे सरसावेल मैत्रीवरती करेल वार अशावेळी नको मित्रा, वाटून घेऊस माझा भार हात जोडते तूला, माझा नको करु तिरस्कार आनंदी ते क्षण आठव सरशी शेवटी रामाची शिकलो आपण आठव आठव..... म्हणून मित्रा तूला गळ सरु दे थोडा काळ तेवढी आपली मैत्री सांभाळ तेवढी आपली मैत्री सांभाळ
|
Mavla
| |
| Thursday, February 23, 2006 - 1:44 pm: |
| 
|
सखे मी तुझाच आहे सखे मी तुझाच आहे मी बीज तु अंकुर मी दास तु ईश्वर तुज विन देह नश्वराचा प्राणात अंश तुझाच आहे... सखे मी तुझाच आहे.... सखे मी तुझाच आहे.... मी नर तु मादा, मी क्रुष्ण तु राधा, तुज विन मी अधुरा हा नियम स्रुष्टीचाच आहे.... सखे मी तुझाच आहे.... सखे मी तुझाच आहे.... मी पुत्र तु आई मी बंधु तु ताई तुज गर्भ हाच गाभारा तीथे जन्म माझाच आहे...... सखे मी तुझाच आहे.... सखे मी तुझाच आहे.... मावळा.
|
Ninavi
| |
| Thursday, February 23, 2006 - 4:48 pm: |
| 
|
आठवीतो.. आठवीतो तुझे बहाणे ते लाजुनीही पुन्हा पहाणे ते नाव माझे बळेच टाळूनी घेतलेले खुळे उखाणे ते श्वास आता तुझे कुठे, होती भास कैसे उदासवाणे ते शांततेला पुन्हा तडा जातो येत कानी तुझेच गाणे ते काय सांगू मनास मी आता वागते का मनाप्रमाणे ते?
|
उडवून गेला क्रुद्ध वारा उत्साहाच सर्व पिसारा आता उरल्या आम्च्यावरती नुसत्या घामाच्या धारा वाटले होते उडू कधितरी पंख पसरूनी अफ़ाट अखंड गगनी आमच्या स्वप्नांवरती परी जाहला वास्तवाचा क्रूर मारा आता उरले स्वप्न न काही नाहि उरले डोळे ते हळवे त्य डोळी अता रणरणतो हतबलतेचा शुष्क निखारा भूतकाळ विस्मरून आता जगतो आहे,जगतो आहे भोवताली आम्ही आमुच्या घेऊन विखुरता अयुष्य पसारा
|
Mmkarpe
| |
| Friday, February 24, 2006 - 8:52 am: |
| 
|
सर्वच जण छानछान लिहिताहेत.... मीनु, पुरु धन्यवाद.....
|
Mmkarpe
| |
| Friday, February 24, 2006 - 8:58 am: |
| 
|
अमरावती जिल्ह्यात धरमतर या धरनातुन पाणी सोडावे म्हनुन आंदोलन करनार्या शेतकर्यांवर झालेल्या गोळिबारात एका शेतकर्याचा म्रूत्यू झाला. त्या दुर्बळ जीवाची ही कहाणी..... पाणी.... कोणी म्हणती पाणी याला कोणी म्हणती जीवण या पाण्यापायीच त्याने दिधले की हो जीवन... तो मातीचा लेक नाही माहिती काही या सरकाराला तर काळिजंच नाही.... गेला पाणी मागाया तो पसरुनी झोळी सत्ता वर्दीच्या धुंदित त्यांनी मारली गोळी... धारातिर्थी पडला तरिही मागत होता पाणी..! पाणी..! बलिदान त्याचे व्यर्थच गेले नाही मिळाले मरुनही पाणी..!
|
Supermom
| |
| Friday, February 24, 2006 - 11:47 am: |
| 
|
माझ्या रक्ताळलेल्या कोवळ्या स्वप्नांना, हलकेच उचलून हृदयाशी धरलंस, कोमेजलेल्या माझ्या मनाच्या पाखराला, दिलेस नवे पंख, तुझ्या प्रीतीच्या उभारीचे. तुझ्या हातात हात घालून, सौख्याच्या हिरवळीवरून चालताना, एकच प्रश्न विचारायचाय मला---, राजसा,तुझी कशी रे उतराई होऊ मी?
|
Supermom
| |
| Friday, February 24, 2006 - 12:39 pm: |
| 
|
गर्जत वर्षत, घन मेळावत आला श्रावण, आला श्रावण. आकाशीच्या भव्य मंडपी मेघांचे घनघोर नर्तन. लाजत हासत, स्पर्शे फ़ुलवित आला श्रावण,आला श्रावण तरुसुमनांच्या अंगोपांगी मधुपांचे सुमधुर गुंजन हितगुज सांगत, मने मोहरत आला श्रावण,आला श्रावण श्याम सावळ्या घननीळाचे करिते राधा अबोल चिंतन.
|
Champak
| |
| Friday, February 24, 2006 - 1:56 pm: |
| 
|
Karpe....... agadi Dil Se re !!!
|
Lahari
| |
| Saturday, February 25, 2006 - 12:18 am: |
| 
|
करपे चान्गली आहे कविता, सुपरमोम गर्जत बर्सत ग्रेट वाटली
|
Heartwork
| |
| Saturday, February 25, 2006 - 3:00 am: |
| 
|
खूप लाटा सोसल्या पण, काल ति येऊन गेलि वाळुचि माझि घरे, तिजसवे वाहुन गेलि दूर होता राहिलेला, तो नभातच चन्द्रमा जिन्दगि माझि ऊभी हि, काजवे पाहुन गेलि रोज मी दुख़ासवे केला असा सौदा नव्याने क्षण सुखाचे झेलताना, आसवे राहुन गेलि विसरलेल्या त्या स्म्रुतिना, मि जरा स्मरले स्वतहाशी अन पुन्हा अश्रुन्मधे ति, आठवे न्हाउन गेलि
|
मस्त रे .... कल्पना सुंदर किती ह्या , अल्पश्या शब्दांत आल्या , गझल होणे दोन मात्रांच्यामुळे राहून गेली तरीही मस्तच !!!
|
Heartwork
| |
| Saturday, February 25, 2006 - 5:02 am: |
| 
|
वैभवा, तुझ्याइतक चान्गल नाहि जमत लिहायला रे, पण तरिहि प्रयत्न केला तर............. ज्या लिहिल्या त्या कविता ठरल्या कधि न जुळलि गाणी व्यवहाराच्या कुशीत जगलो स्वप्नान्ची झाली फ़क्त कहाणी तुझ्या सर्वच कविता खुपच दर्जेदार आहेत.
|
मंडळी, मनोहर सप्रे विख्यात व्यंगचित्रकार यांची एक सुन्दर कविता मी हितगुजच्या व्यंगचित्रकार ह्या BB वर टाकलीय. अवश्य वाचा. बापू.
|
|
|