Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 23, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » काव्यधारा » झुळूक » Archive through February 23, 2006 « Previous Next »

Sparsh
Wednesday, February 22, 2006 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार!!

कसं म्हणु जाताना
सारं काही घेऊन गेलास
सोबतीला थोडं खारं पाणी
अन गोड आठवणी देऊन गेलास


Sparsh
Wednesday, February 22, 2006 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेम करताना असं करावं
कि आपल्याला पाहुन कुणाला वाटावं
कि आयुष्यात एकदाच प्रेम करावं
पण असं करावं...!


Shyamli
Wednesday, February 22, 2006 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा.. .. .. ..
गणेश, विभा....
मस्तच....


Gash16
Wednesday, February 22, 2006 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अहो, मुलान केल मुलीवर
त्याला तुम्ही प्रेम म्हणणार...
मुलान केल मुलीवर...
त्यालाही तुम्ही प्रेम म्हणणार...
मग मी करतो मैत्रिणीवर...
त्याला तुम्ही काय म्हणणार...?????

--गणेश.



Gash16
Wednesday, February 22, 2006 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


श्यामली आभारी आहे तुझा...
:-) गणेश


Sparsh
Wednesday, February 22, 2006 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद श्यामली!!

प्रेम असो वा मैत्री
नातं विश्वासाचं असतं...
आयुष्यात चालताना रस्ते मिळतील अनेक
पण दोन घटका सावली देणारं
झाड विसरायचं नसतं...
प्रेम असो वा मैत्री
नातं विश्वासाचं असतं


Meenu
Wednesday, February 22, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसं सांगु माझा जीव तूझ्यात कीती गुंतलाय
प्रतिक्षण तूझी वाट पाहताना तीळ तीळ तुटलाय


Shyamli
Wednesday, February 22, 2006 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय बाई हे असे गुंतणे
ऊगाच एकमेकात अडकणे
समजेचना मला
माझेच आज वागणे

श्यामली!!!




Jaaaswand
Wednesday, February 22, 2006 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मैत्रिण म्हणायची मला
गुंतून तर बघ कधी कुणात
हल्ली फ़क्त एवढेच म्हणते
चांदणे सोडवतेय बसून उन्हांत

जास्वन्द...


Shyamli
Wednesday, February 22, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घे रे!! परत तुझ्याच ओळी

चांदण्याची काय चुक
जर बसायचच होते उन्हात
सोडवयचाय बराच गुंता
आज चाललाय जो मनात

श्यामली!!!


Vaishali_hinge
Wednesday, February 22, 2006 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त जास्वंद!!

गुंतणे सहज असते प्रिया
कळत नाही
जोवर उन्हात चांदणे दिसत नाही,
तोवर पावले तुझ्याच घराकडे का चालु लागतात
वळत नाही............


Meenu
Wednesday, February 22, 2006 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो किती सहज म्हणाला गुंतला जीव सोडवुन घे
आणि पाठ फिरवल्यावर वळलाही नाही मागे




Shyamli
Wednesday, February 22, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय वैशालि

हे सगळे बघुन माझं मन
बजावतय मला
आवर भावनांचा पसारा
अन
जराशी सावर स्वत:ला

श्यामली!!!


Meenu
Wednesday, February 22, 2006 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो म्हणाला उन्हात चांदणे दिसणे हा भास आहे
सत्य तळपणारा सुर्य, चंद्र हा आभास आहे
त्याचा व्यवहारी दृष्टीकोन आणि माझा हळवेपणा
दोघांमधला आमच्या, हा मोठा विरोधाभास आहे



Meenu
Wednesday, February 22, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती सहज वाटलं त्याला गुंतला जीव सोडवून घेणं
जस त्याचं माझ्याकडे पाठ फिरवुन चालु लागणं
मलाही जर जमेल कधी त्याच्यासारखं वागणं
खर सांगते सुकर होईल उरलं आयुष्य जगणं


Meenu
Wednesday, February 22, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या जीवाला हा नसता गुंतण्याचा शाप आहे
माझ्या प्रेमाचा स्विकार तू केलास तर
जगाच्या दृष्टिने ते पाप आहे
माझ्या शापाला मात्र हाच एक उ:शाप आहे


Meenu
Wednesday, February 22, 2006 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू हो म्हणशील तर जगण्याला अर्थ आहे
तू जवळ घेशील असण्याला अर्थ आहे
तूझ्या कुशीत आलं तर मरणही सार्थ आहे
तूझी न होता मरणं माझ्यासाठी अनर्थ आहे


Jaaaswand
Wednesday, February 22, 2006 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मस्त रे मित्रांनो.. I mean मैत्रिणिंनो :-)

सही जवाब एकदम......



दुवा देतो एवढीच आता
तुझी हास्ये खेळावी आरश्यात
स्वप्नांतल्या तुझ्या कळ्यांची
फ़ुले तिथेच व्हावी उश्यांत

जास्वन्द...


Meenu
Wednesday, February 22, 2006 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुवा तुझी नामी होईल
उ:शाप नाही मिळाला तर दुवाच तुझी कामी येईल


Vaishali_hinge
Wednesday, February 22, 2006 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय श्यामले!

दुवा नको साथ हवी,
मरण आले तरी
सुटु नये...
अशी गाठ हवी!

हातात तुझ्या,
सुगंधी पाकळी व्हावी
काया माझी,
नजरेत तुझ्या मिसळुन जावी
छाया माझी


वैशाली!!!


Jaaaswand
Wednesday, February 22, 2006 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळ्यांत मी तुझ्या त्या
पाहिला बिलोर गोडवा
कधी दाटून येता पाणी
त्यात ओशाळला गारवा

जास्वन्द...


Vaishali_hinge
Wednesday, February 22, 2006 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशी का नजर तुझी हळवी,
रात्रंदिन मला छळावी....

अशी वेडी ही प्रित
ओल्या नजरेतुनच का कळावी!!!


Gash16
Thursday, February 23, 2006 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


काही न लाज उरली
या पावसास आता...
बेघर करित सुटला
बघ आपणास आता...

-- गणेश


Meenu
Thursday, February 23, 2006 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निघाले रे आज
हा शेवटचाच प्रवास
आजतरी साथ दे
सरणावर चढायला जरा थोडा हात दे


Shyamli
Thursday, February 23, 2006 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु नको अस लिहुस ग.. ..
please





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators