|
Abhishruti
| |
| Wednesday, February 08, 2006 - 9:41 am: |
| 
|
बर्याच दिवसानी काहीतरी लिहावस वाटल म्हणुन....
|
Abhishruti
| |
| Wednesday, February 08, 2006 - 10:00 am: |
| 
|
अचानक त्यादिवशी शरयू दुकानात भेटली. जवळजवळ वीस बावीस वर्षानी आम्ही भेटलो. आजुबाजुच भान न ठेवता आम्ही दोघी एकदम किन्चाळलोच ' शरे तू' , 'अन्जू तू' मग ' किती वर्षानी' 'कुठे होतीस' 'कशी आहेस' 'मुल किती, केव्हढी' इत्यादी प्रश्नाची न ठरवता उजळणी झाली. शरयू बहिणीच्या मुलीच्या लग्न-खरेदीसाठी आली होती. मी आपली सहज शोकेस मधली एक साडी आवडली म्हणुन अन्दाज काढायला आत शिरले होते. माझी ही सवय माझ्या घरच्याना अजिबात आवडायची नाही. पण कुठल्याही खरेदीला ठरवुन, जय्यत तयरी करुन जायला मला जमायचच नाही आणि चुकुन माकुन तस करुन गेल की मनासारख काही मिळायचच नाही. असो. पण आज याच सवयीने माझी बालमैत्रीण इतक्या वर्षानी भेटली की नाही? नेहमीप्रमाणे निरोप घेताना एकमेकीचे पत्ते, फ़ोन नम्बर याची देवाण घेवाण झाली आणि लवकरच नक्की भेटायच ठरल.
|
शरयू माझी ४ थी पासुन ते १२ वी पर्यन्तची वर्गमैत्रीण! छोट्या शहरात रहात असल्याने आमची घरही फ़ार लाम्ब नव्हती. घरातली वडिलधारीही एकमेकाना चांगली ओळखत. शरयूला दोन मोठ्या बहिणी, भाऊ नाही ( मुलासाठी तिसरा चान्स घेतला आणि ही झाली अशी गावात कुणकुण!) शरयूची घरची परिस्थिती बेताची! वडिल कुठल्याश्या दुकानात हिशोबाचे काम बघत. स्वभावाने बोलके पण तापट! आई साधी, शान्त आणि सहनशील गृहिणी! शरयू लहानपणापासुन एकदम हुशार, चुणचुणीत, गहूवर्णी, सडपातळ बान्ध्याची, लाम्बसडक केस आणि पाणीदार टपोरे डोळे! शाळेत आणि चाळीत सर्वांची लाडकी! मी त्यातल्या त्यात सधन घराण्यातली. त्यामुळे आमच्याकडे त्यांच येणंजाणं कमीच. माझे वडिल सुप्रसिद्ध डाॅक्टर, गावात आमचा दुमजली बन्गला, भोवती मोठ्ठी बाग, हौसेने बान्धलेल बॅडमिन्टन कोर्ट! माझे वडिल लोकांना अबोल वाटायचे ( त्यांचा पेशाच त्याला कारणीभूत असावा) माझी आई मात्र स्वभावाने लाघवी, सर्वांना आपलस करणारी! हायस्कुलमधे गेल्यावर शरयू आणि मी प्रथमच एका तुकडीत आलो. मग अभ्यासाच्या, खेळाच्या निमित्तने नेहमी भेटू लागलो. शरयूच घर जेमतेम दोन खोल्यान्च त्यामुळे अभ्यासाला तिने माझ्याच घरी याव अस मी सुचवायचे तिलाही ते पटायच. थोडा वेळ अभ्यास आणि थोडा वेळ खेळण्यात दिवस कसे जायचे कळायच नाही, जोडीला पोटभर गप्पा असायच्याच. घरच्या गरिबीच ओझं कधी शरयूच्या चेहर्यावर किन्वा वागण्यात जाणवायच नाही. ती आमच्या घरात अगदी सहजपणे वावरायची. कधीमधी घरुन खाऊचा डबा आणायची. कपडे बेताचेच असायचे पण नीटनेटके, स्वच्छ! मोठ्या दोघींपेक्षा शरयू खूप वेगळी आणि स्मार्ट होती. दहावीच्या परिक्षेत तिने बाजी मारली आणि तिची हुशारी सर्व गावाला कळली. बारावीतही आम्ही दोघीनी खूप अभ्यास केला. दोघीना मनासारखे मार्कही मिळाले माझ्या आवडीनुसार आणि घरच्या बॅक्ग्राउन्डमुळे मी मेडिकलला गेले शरयूला इन्जिनिअरिन्गला जायच होत पण घरुन पाठबळ नव्हत तरी कुठुनकुठुन माहिती काढुन, कर्ज मिळवुन, झालच तर माझ्या बाबांकडुन थोडे पैसे उधार घेऊन तिने तिचा हट्ट अखेरिस पूर्ण केलाच. दोघींचे मार्ग बदलले विषय बदलले आणि गावंही बदलली. पहिल्यासारखा सम्पर्क आता रहाणार नाही या विचाराने मन खट्टू झाले पण दोघींच्या पुढे मोठ्ठी स्वप्नवाट होती. पुढे गावी आलो की न चुकता मी तिच्या घरी व ती माझ्या घरी आवर्जुन येऊन जायची. मधुन मधुन पत्रातुन खुशाली कळायची. माझ मेडिकल सम्पायच्या आधीच ती चांगल्या मार्कानी पास झाल्याच व चांगली नोकरी मिळाल्याच कळल. लागोपाठ एकेक करुन तिच्या मोठ्या बहिणींच्या लग्नाचीही खबर कळली. वडिलांना कर्ज फ़ेडायला, मुलींची लग्न करायला शरयूनी खुपच हातभार लावला म्हणुन गावात सगळ्याना तिच कौतुक होतं. पुढे तिचही लग्न घाईगडबडीत झाल मी जाऊ शकले नाही. पण तीन वर्षानी माझ्या लग्नाला मात्र ती सहकुटुम्ब हजर होती. खूष दिसत होती, कर्तबगारी, आनंद चेहर्यावरुन ओसंडुन वहात होता. नवराही मस्त उमदा आणि हॅन्डसम होता, छोटं पिल्लू दीड वर्षाच होत. आतासुद्धा घर, नोकरी वगैरे साम्भाळुन ती एम. ई. करत होती. पुढे नोकरीच्या निमित्ताने ती परदेशी गेली आणि त्यानंतर पठ्ठी आज भेटली.
|
अशीच एक दिवस विजिटला गेले होते एका पेशंटच्या घरी आणि लक्षात आलं की इथेच कुठेतरी शरयूच घर आहे अस ती म्हणाली होती. लगेच मोबाईल लावला आणि मी येतेय अस कळवल. ड्रायव्हर बरोबर असल्याने घर लगेच सापडल. मला पाहून शरयू खूष झाली. " शब्द दिल्याप्रमाणे आपणहून आलीस, खरच बरं वाटलं बघ! नाहीतर म्हंटल या डागदरणीला कुठे वेळ होतोय? ", " अग, मला काही इतर डाॅक्टरांसारखी २४ तास ड्युटी नसते. मी पडले मानसशास्त्राची डाॅक्टर! त्यामुळे मला जमत माझ्यासाठी थोडा वेळ काढायला. " शरयूच घर छान प्रशस्त होत, बर्यापैकी व्यवस्थित ठेवल होत. घरात ती आणि मी दोघीच असल्याने मनसोक्त गप्पा रंगल्या. मस्तपैकी काॅफ़ी आणि पोहे झाले. शरयूच्या हाताला चव होती. स्वभावही पहिल्यासारखाच बोलका, मोकळा! वयपरत्वे शरिर पहिल्याइतक सुडौल राहिल नव्हत पण बेढबही वाटत नव्हत. सगळ काही आलबेल होत. घरातल्या प्रत्येक वस्तुवरुन सुबत्ता कळत होती. तिचा मुलगा इन्जिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता आणि मुलगी बारावीत, नवरा कुठल्यातरी टूरवर... नेहमीप्रमाणे! शरयू सांगत होती " सर्वजण आपापल्या रुटीनमधे बिझी असतात. मी मात्र माझी धावपळ आता बंद केली. पहिल्यासारखी नोकरीची धावपळ, घरातली कामं, आजारपणं ही सगळी सर्कस जमत नाही ग आता! " सहाजिकच होत. आम्ही दोघींनीही आता पंचेचाळीशी ओलांडली होती. माझी काय पार्ट टाईम ड्युटी होती, नवर्याच्या हाॅस्पिटलमधेच मी एक केबिन घेऊन प्रॅक्टिस करत होते. हळूहळू मी ही रुग्णांची संख्या कमीच केली होती. घरी सासू-सासरे असल्याने तरुणपणी कधी घराकडे फ़ारसं पहावं लागलं नाही. हाॅस्पिटलच्या इमारतीतच घर असल्याने मुलांच्या वेळा साम्भाळता आल्या. आता मुलं मोठ्ठी झाली, त्यांचे व्याप वाढायला लागले आणि सासू-सासर्यांचही वयं झालं. ते थकले तशी मी घरात जास्त लक्ष घालू लागले. तसच शरयूचही झाल असणार! त्यानंतर शरयूच आणि माझ फ़ोनवर बोलणं व्हायच पण भेट घडेना. मग आम्ही ठरवून चौघानी डिनरला जायच ठरवलं शरयू आणि सुमीत वेळेवर आले, गप्पा रंगायला लागल्या. दोघही परदेशातले काही विनोदी तर काही सुखद अनुभव, गमतीजमती सांगत होते. शरयू छान दिसत होती. गुलाबी रंगाची शिफ़ाॅन साडी, त्यावर नाजुकसा मॅचिंग सेट, केस मोकळे सोडलेले, माफ़क मेकप! मला एकदम तरुणपणीची शरयू आठवली. मग एकदम वाटलं की घरी गेले होते तेंव्हा अगदीच अवतारात होती ही त्यामुळे ही मोहकता जाणवलीच नाही. गप्पांच्या ओघात हळूहळू माझ्या लक्षात आलं की आजकालच्या जगात, सद्ध्या काय चाललय इत्यादी विषयात शरयूला काही इन्टरेस्ट राहिलेला नाही. This is strange! मला थोडस विचित्र वाटलं पण मी माझ्यातल्या मानसशात्रज्ञाला बाजूला सारलं. नवरा म्हणतो ते काही खोटं नाही आजकाल मला सगळीकडे काहीतरी प्राॅब्लेम शोधायची सवय झाली आहे.
|
Ek_mulagi
| |
| Friday, February 10, 2006 - 12:08 pm: |
| 
|
छान लिहतेयस, Interesting . पुढच्या भागाची वाट पाहतेय.
|
Jai_jui
| |
| Friday, February 10, 2006 - 12:34 pm: |
| 
|
छान कथा आहे, पुढचा भाग लवकर येऊ दे
|
Psg
| |
| Saturday, February 11, 2006 - 6:30 am: |
| 
|
background छान जमली आहे.. आता उत्सुकता ताणू नको! लवकर लिही
|
एक दिवस सुमीत अचानक माझ्या दवाखान्यात आला. म्हणाला इथेच जवळ क्लाएंटकडे मिटिंगसाठी आलो होतो. I knew that he deals with foreign clients only पण म्हंटल असेल कोणी इथे आलेला. तो पाचच मिनिट बसला पण अस्वस्थ वाटला. काय बोलाव या संभ्रमात असल्यासारखा! मग म्हणाला येईन परत वेळ मिळाला की! हे सगळच असंबद्ध होत. पण मला माझी शंका खरी असल्यासारख वाटू लागल . होत खर अस, एरवी सुद्धा आपले प्रश्न दुसर्याबरोबर discuss करायला माणसाला संकोच वाटतो मग मी तर पडले मानसोपचारतज्ञ! तो गेला आणि माझ विचारचक्र सुरु झालं काय प्राॅब्लेम असावा, कोणाला असावा. पण मला बुद्धीला जास्त ताण द्यायला लागला नाही. सुमीत दोन दिवसातच परत आला. मी त्याला चहा बरोबर सरळ माझी मदतच आॅफ़र केली. " काय झालय बोल, मी तुमची जवळची मैत्रिण आहे अस समज आणि काय मनात आहे ते स्पष्ट सांग " तो जरा सटपटला पण लगेच बोलताही झाला. त्याने शरयूला न कळत तिला counselling करायची मला विनंती केली. मी त्याच्याकडुन सर्व ( मला न माहित असलेला भुतकाळ वगैरे ) परिस्थिती ऐकुन घेतली. त्याच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या काही वर्षात शरयू खूप विचित्ररित्या बदललेय. ती फ़ारच अलिप्त, नीरस आणि निष्क्रिय वागतेय. मनं कोणासमोर मोकळं करत नाही, विचारल तर काही नीट सांगत नाही, आरडाओरडा करते, arguments करते, सार्या घरादारावर चिडचिड करते, इतरांबरोबर स्वतःवरही राग काढते. त्यामुळे मुलही तिच्यापासुन दूरच रहातात वगैरे वगैरे. गंमत म्हणजे बाहेरच्या माणसाला ही गोष्ट सांगुनही खरी वाटणार नाही अस! हे सगळं मलाही shocking च होत, कारण मला माहीत असलेली शरयू म्हणजे शब्दांचा, भावनांचा, हुशारीचा आणि कर्तबगारीचा नुसता धबधबा! आनंदाच आणि उत्साहाच उधाण! अस का बर झालं असेल? सुमीत अगदी मनापासून विनंती करत होता. She needs help please will you ... ? त्याच वाक्य सम्पायच्या आत त्याचे जोडलेले हात हातात घेऊन मी promise केल की मी शक्य तितके प्रयत्न करीन. एक मैत्रिण म्हणुन, एक स्त्री म्हणुन आणि एक मानसोपचारतज्ञ म्हणुन मी नक्कीच तिला मदत करु शकेन असा मला आत्मविश्वास होता.
|
Zelam
| |
| Monday, February 13, 2006 - 1:13 pm: |
| 
|
मस्त आहे अभिश्रुती, वाट बघतेय पुढच्या भागाची.
|
Meenu
| |
| Tuesday, February 14, 2006 - 2:57 am: |
| 
|
हं! कथेनी छान पकड घेतली आहे!
|
अभिश्रुती नेहमीप्रमाणेच छान लिहीतेयस. लौकर टाक पुढची गोष्ट.
|
छान temo जमलाय मजा येतेय,लिह लवकर
|
दोनच दिवसानी मी शरयूला घरी surprize visit दिली. दुपारचे अडीच वाजले असतील, शरयू लोळत पडली होती. साधारणसा गाऊन, केस अस्ताव्यस्त बहुधा अंघोळही केली नसावी. मला पाहुन ती नेहमीप्रमाणे खुष झाली. एकंदरीत तिचा अवतार पाहुन मला ओशाळल्यासारख झाल. ' बर नाही का ग तुला? मी उगाचच डिस्टर्ब केल बघ! ', ' नाही ग, तसं काहीही नाही. उद्योग नव्हता काही म्हणुन लोळत पडले होते एव्हढच. अग, सकाळी नऊ साडे नऊनंतर साडे पाच सहापर्यंत कुत्र सुद्धा फ़िरकत नाही इकडे. ' माझं जेवण वगैरे व्हायचय का, काॅफ़ी घेणार का? तिची विचारपूस नेहमीची. मग बोलता बोलता तिने आजं जेवण केल नसल्याच कळलं मग मात्र दोघीनी चहाबरोबर थोडस खाऊन घेतलं . हे सगळ चालू असताना तिच्या नकळत मी तिच्या हालचाली कडे निरखून पहात होते. फ़ारसा काही बदल मला तरी जाणवत नव्हता. सहजच मी विषय काढला ... वेळ कसा घालवतेस ग आता? .... सकाळी साडे पाच पासुन नऊ पर्यन्त नुसती धावपळ असते. सगळ्यांचा चहा, नाश्ता, दबे आंघोळी. हे कुठाय ग मम्मी, शरू माझा रुमाल दे, अस चालू असत. पण साडे नऊ नंतर चिडीचूप. निवांत वेळ असतो. मग बाईच्या सहाय्याने कधी खोल्या आवरते, कधी कानाकोपरा झाडुन घेते. स्वैपाक तर अर्धा झालेलाच असतो. मग पेपर वाचते अगदी शब्दनशब्द. T.V. बघते, त्याच त्या रटाळ अवास्तव सिरियल्स! सगळ्यात म्हत्वाच काम म्हणजे सगळ्यांच्या वाटा बघत बसते ... शेवटच वाक्य जरा frustrating वाटल. " full-time job ची सवय ना तुला त्यामुळे बोअर होणारच. ", " हो ग, सुरुवातीला सहा महिने तर वेडच लागायची पाळी पण आता सवय झाली हळूहळू. शरिराच्याही काहीबाही तक्रारी चालू असतात. आपल्या वयातल्या बायकांचा commom problem!" अशा काही भेटींवरुन माझ्या इतकं लक्षात आल की शरयूला आता पूर्वीसारख्या मित्रमैत्रिणी, सोशल्-सर्कल नाही. बाहेर पडायच ती शक्या तेव्हड टाळते. पूर्वी आम्ही हिला ' जनसम्पर्क अधिकारी ' म्हणायचो. सर्वांशी ओळख, मैत्री, गप्पा! नीटनेटके रहाण्याची आवड त्यामुळे इतरांवर छापही चांगली पडायची. तिच्या सानिध्यात एखादा दुर्मुख, निरुत्साही माणुस देखील घडाघडा बोलायला आणि जोमाने कामाला लागायचा. सगळ्या परिस्थितीशी हासत-खेळत लढुन तिने यश सम्पादन केल होत. आणि आता अचानक ... शरयू हुशार होती त्यामुळे तिच्या नकळत तिच्या मनातलं काढुन घेणं सोप्प नव्हतं. माझी कसोटीच होती. प्रत्येक कारण मी पडताळायला सुरुवात केली. नोकरी सोडावी लागली म्हणुन तर हिला ... पण ती तर तिने स्वेच्छेने सोडली, आईबाबा आता हयात नाहीत म्हणुन कदाचित, किंवा मेनापाॅजचा परिणाम! यातलं काहीही किंवा सर्व संमिश्र असू शकत. Rule of elimination प्रमाणे जाऊ आणि कारणापेक्षाही तिला या अवस्थेतुन बाहेर काढणं म्हत्वाच आहे पण कारण कळल्याशिवाय ...? .. म्हणजे परत आधी अंड का आधी कोंबडी ...
|
Ninavi
| |
| Thursday, February 16, 2006 - 10:03 am: |
| 
|
अभिश्रुती, छान लिहीत्येस. लवकर येऊ दे पुढचं. 
|
दरम्यान सुमीत मला वेळ मिळेल तसा येऊन भेटू लागला. मी त्याला आधीच सांगितल की मी खूप आणि तुला असंबद्ध वाटतील असेही प्रश्न विचारेन. शक्य तेव्हढी खरी आणि आठवून उत्तर दे म्हणजे आपल्याला लवकरात लवकर मार्ग काढता येईल. शरयूची ही अवस्था गेल्या दोनतीन वर्षातीलच असावी आणि या वर्षात मेजर घटना म्हणजे तिच्या आई आणि वडिलांचा लागोपाठ झालेला मृत्यू! त्या पाठोपाठ तिला होणारा मासिक पाळीचा त्रास आणि गर्भाशय काढुन टाकण्याचा निर्णय! या सर्वाने तिच्या मनात आणि शरिरातही एक पोकळी निर्माण झाली जी भरून निघत नव्हती. सुमीतच्या बोलण्यावरून ती चिडचिडी झाली आहे, पटकन रागावते, पटकन रडू लागते, बर्याच गोष्टी तिच्या अजिबात लक्षात रहात नाहीत. रात्री तिला स्वस्थ झोप लागत नाही. सतत कसलातरी विचार करत असते, कसली तरी तिला भीती वाटते, टेन्शन वाटत. मला तर ही सगळी depression चीच लक्षण वाटत होती किंवा डिल्युजनही असू शकेल. मला अचानक आठवल की काॅलेजात असताना शरयू डायरी लिहायची. मी सुमीतला त्याबद्दल विचारल तर तो म्हणाला लिहिते अजुनही कधीकधी. कोणाची पर्सनल डायरी वाचण मनाला पटत नसल तरी त्याने तिच भल होणार असेल तर का नाही! सुमीत म्हणाला तो लवकरात लवकर मला आणुन देईल, अर्थात त्या लवकरात लवकर वाचुन परत जागच्या जागी जायला हव्या होत्या. दोन दिवसानी त्यानी तीन डायर्या आणुन दिल्या. एकेक पान उलगडताना अस वाटल की किती छान लिहिते ही, याचा नक्कीच आपल्याला फ़ायदा होईल. तिच्या जीवनपटावरील मनाची, विचारांची स्थित्यंतर लक्षात येऊ लागली. शरयूने शिक्षणापासून, लग्न संसारापर्यंत सर्व स्वतःच्या हिकमतीवर, स्वतःच्या हट्टाने, कष्टाने केल होत. कठीण परिस्थितीतून आईवडिलांना बाहेर काढलं होतं. त्यांची कर्ज फ़ेडली होती, म्हातारपणी त्यांची सेवा केली होती. सर्वात लहान असून कायमच जास्त जबाबदारीने आणि समजुतीने वागत आली होती. नवर्याला योग्य साथ दिली होती. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची हिम्मत तिने वारंवार दाखवली होती.मुलांच करुन, घरदार सांभाळून स्वतःची करिअर केली. थाम्बावस वाटलं तेंव्हा ही धावाधव बंद करण्याचा निर्णयही कोणाची पर्वा न करता, न घाबरता घेतला. विश्रांतीची खरी गरज आता आहे अस तिला मनापासून वाटू लागल होतं. मुलांचेही व्याप वाढत होते, आईवडिलही थकले होते. त्यांच्याकडे, घराकडे आता जास्त लक्ष देता येईल या विचाराने ती खूष होती. मुलांचे लाड करायचे होते, आईवडिलांची सेवा करायची होती. फ़ावल्या वेळात नाटक, सिनेमा, गाण्याच्या मैफ़िली, नवर्याबरोबर लाम्बच्या टूर्स .... जे जे राहून गेल ते ते सगळ करायच होतं . पण वडिल अचानक हार्ट फ़ेल्युअरने गेले, आईही एकदम खचली तिनेही अंथरूण धरलं. काही दिवसात तीही स्वर्गवासी झाली. त्या दुःखातून बाहेर पडायला शरयूला थोडा वेळ लागला. सावरल्यानंतर परत ती पहिल्यासारखे बेत मनात आखू लागली पण वेळ फ़क्त तिच्याकडेच होता .... इतर कोणालाच वेळ नव्हता. सर्वजण आपापल्या रूटीन मधे बिझी होते. तरी कधीतरी हे शक्य होईल अशी आशा ती मनी बाळगुन होती. पण ही गोष्ट घरातल्या कोणाच्याच लक्षात येत नव्हती. त्यातच तिला मासिक पाळीचा भयंकर त्रास होऊ लागला, ती ऍनिमिक झाली, शेवटी औषधोपचार बंद करुन गर्भाशय काढुन टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर काही दिवसाच्या विश्रांतीनंतर सर्व रुटीन परत सुरु झाले. रोजचा दैनंदिन व्यवहार, स्वैपाकपाणी, पत्रव्यवहार, बॅंकेची काम, कोणाच्या लग्नाला मदत, कोणाला हाॅस्पिटलमधे भेटायला जा, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष ठेव, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा जपा, नवर्याच्या टूर्स! पण हळूहळू यातला interest कमी होऊ लागला. सगळी काम स्वतः अंगावर घेऊन करायची सवय तिला महागात पडायला लागली. वयपरत्वे ते जमेना. पण हे तिच्या मनाला मान्य होत नव्हत. इतरांनी तर काय तिला गृहितच धरल होत. वेळेअभावी किंवा जाणीवेअभावी तिच्या पदरात प्रशंसा आणि विश्रांती दोन्हीही पडत नव्हती. जाणुनबुजुन कोणी असं करतं नव्हतं . घरची काम, बाजारहाट वगैरे ती अगदी नोकरीचा overtime चालू होता तेंव्हाही करत होतीच की. त्यामुळे सर्वाना त्याची सवयच झाली होती. कोणाला तिची ही अवस्था लक्षातच आली नाही कारण कोणाला तिच्याशी संवाद साधण्याएव्हढीही उसंत नसायची. संवाद, 'communication' ही माणसाची मूलभूत गरज आहे. अन्न, वस्त्र, निवार्याइतकच संवादाचही माणसाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळेच माणसानी भरलेल्या घरात ती निराळी आणि एकटी पडली होती.
|
Megha16
| |
| Friday, February 17, 2006 - 4:34 pm: |
| 
|
अभिश्रुती कथा खुप छान आहे सलग वाचल्याने खुपच छान वाटली. आज च्या धावपळीच्या आयुष्यात शरयु सारख्या बरयाच स्त्र्या असतील.तुझ्या कथे नी त्याच्या मनातील प्रश्न अगदी समोर येत आहेत.
|
सुंदर ग! तुझ्या कथेने प्रत्येक हळव्या स्रीच्या भावनांना आधार वाटेल..्आ विचार प्रत्येक घरात झाला पाहीजे
|
श्रुती नेहमीप्रमाणेच छान लिहिलेयस. थोडक्यात आटोपली पण मॅच्युअर..
|
Mita
| |
| Saturday, February 18, 2006 - 2:30 pm: |
| 
|
संपली?? .... .. ..
|
Megha16
| |
| Saturday, February 18, 2006 - 4:05 pm: |
| 
|
कथा संपली? मला वाटल होत की आता खरी सुरवात होईल. काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय...
|
दोस्तहो, धन्यवाद अगदी मनापासून! आणि दिरंगाईबद्दल क्षमस्व! गजा, कथा सम्पलेली नाही, सम्पवू का लवकर? दोनच दिवस थाम्ब!
|
Psg
| |
| Tuesday, February 21, 2006 - 6:01 am: |
| 
|
छानच लिहिली आहे! explanation छान आहे, पटण्यासरख आहे.. पटकन संपवू नकोस..जशी संपायला हवी तशीच संपव ग..
|
Continue ... सुमीतला डायर्या परत देताना मी माझा डाय्गनोसिस बरोबर दिशेने चाललाय व घाबरण्याचे कारण नाही असे सांगितले. त्याचवेळी मला एकदा शरयूच्या सर्व कुटुम्बीयांना एकत्र भेटायचय असही सांगितल अर्थात शरयूच्या अनुपस्थितीत! मी चौकशी केली 'Just as an individual has a mood, so does a family. Is the family atmosphere a serious or playful one?' सुमीत जरासा गोंधळला. हे सगळ अस जमवुन आणायला हव होत की मुलांना कसलाही संशय येता कामा नये . सहज मी घरी आलेय अस दाखवुन थोडी माहिती आणि थोड समुपदेशन दोन्हीही साधायला हव होत. माझ्यासाठी हे नेहमीच होत पण शरयू माझी जवळची मैत्रिण असल्याने emotional involvement होती. त्यामुळे मी ही केस माझ्या एका सहकारी मानसोपचारतज्ञाबरोबरही discuss करणार होते. सुमीतला मात्र हे सगळ अवघड वाटतं होतं अनायसे लवकरच असा योग आला, शरयूला एका लग्नकार्यासाठी बाहेरगावी जावे लागले आणि आमची मिटिंग ठरली. मी मावशी या नात्याने मुलांसाठी मिठाईचा डब्बा घेऊन गेले आणि शरयू घरात नाही हे मला माहित नसल्याचा बहाणा केला. मोठ्या मुलाने अदबीने विचारपुस केली, मुलीने पाणी दिले. दोघं अगदी normal आणि वागायला नम्र वाटली. मी सहज गप्पा मारण्याच्या भरात शरयूचं बालपणं कस कष्टात गेलं, प्रत्येक गोष्टीसाठी तिला किती धडपडायला लागल त्याचे काही किस्से सुनवले, जोडीला थोड्या गमतीजमतीही सांगितल्या. दोघही मुल मग आपापल्या कामाला निघुन गेली. मी आणि सुमीत दोघेच घरी होतो. सुमीत स्वभावाने शांत, करिअर मधे स्वकर्तृत्वाने यशस्वी झालेला पण शरयूपेक्षा जरा सधन कुटुम्बातला! शरयूची जिद्द, धडपड पाहुनच तो तिच्या प्रेमात पडला होता त्यामुळे तो शरयूला समजुन घेईल आणि या अवस्थेतुन बाहेर काढेल याची मला आशा वाटत होती. मी जास्त चरिताचर्वण न करता शरयू आता रूटीनला, कष्टाला कशी कंटाळून गेलेय, तिला तुम्हा सर्वांच्या साथीची आत्ता खरी गरज आहे. जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी झगडाव लागलं की शेवटी शेवटी स्वभाव चिडचिडा होतो वगैरे सांगितले. उपाय किंवा बदल म्हणुन काय काय करता येईल याचा सल्ला मी क्लिनिकवर आल्यावर देते असे सान्गुन मी निघाले. माझ्या सहकारी मित्राबरोबर चर्चा केल्यानंतर मी काही निर्णय घेतले व सुमीतला बोलावलं . सुमीत आल्यावर त्याला स्वतः किती वेळ शरयूसाठी देता येईल ते विचारले, त्याच्या वेळापत्रकात थोडा बदल करावा लागेल असही बजावलं . मी सुद्धा काही वेळ देण्याचे कबूल केले. मुलांशीही चर्चा करायला सांगितली. यानंतर प्रत्येक आठवड्याला त्यानी फ़ोनवरती किंवा प्रत्यक्ष भेटुन मला रिपोर्ट द्यायचा असं ठरलं . पहिल्याच आठवड्यात मी काही चमत्कार expect करत नव्हते तरी मला आणि सुमीतला थोडा, अग्गदी थोडा positive बदल जाणवला. या गोष्टीचा एक असा फ़ायदा झाला की सुमीतला आशेचा पहिला किरण गवसला. पुढे मी शरयूला भेटुन माझ्या सोशल वर्कबद्दल वगैरे चर्चा केली आणि त्यासाठी तिच्यासारख्या माणसांची कशी गरज आहे हे पटवून दिले. एकदोनदा गाण्याच्या मैफ़िलीला घेऊन गेले. पुस्तकभिशीचं वेड माझ्याप्रमाणे तिलाही लावून दिलं . माझ्या संग्रही असलेली पुस्तकं शरयूने झपाट्याने वाचुन काढली. हे सर्व होताहोता एक वर्ष उलटलं . मुख्य म्हणजे शरयूला कसलाही संशय आला नाही किंवा कोणताही बदल, घटना आकस्मिक वाटली नाही. हळूहळू शरयूची कळी खुलणार याची मला खात्री वाटू लागली. तशी माझ्यासमोर ती एकदाही abnormal वागायची नाही. खरी गोम तिथेच होती. आपली ही अवस्था लोकांना कळू नये याचा ती आटोकाट प्रयत्न करायची. तिला मनीच्या व्यथा कुठे मांडता येत नव्हत्या आणि मनातील विचार बोलून दाखवण्याइतकं कोणी जवळच वाटतं नव्हत किंवा समजा त्या माणसाने आपल्याला समजुन नाही घेतल तर अशी भीती वाटत असावी. त्यापेक्षा चाललय हे असच चालू द्यावं . खरं तर तिचा हा विचारही बरोबरच होता कारण माझ्या सारख्या व्यक्तीनी या गोष्टीचा अभ्यास केलाय म्हणुनच मला त्या कळू शकतात. इतर लोक म्हणतील ' हीला काय कमी आहे, सोन्यासारखी मुलं आहेत, नवरा चांगला आहे. घरदार, पैसालत्ता सर्व काही आहे. उगाचं आपलं काहीतरी, मोठ्या लोकांची श्रीमंती दुखणी! ' माझी आजी सुद्धा अशा लोकाना ' सूख दुखतय, दुसर काही नाही! ' अस म्हणताना मी लहानपणी ऐकलं होतं पण हाच विषय घेतल्यामुळे त्याचं कारण आणि महत्व कळलं होतं . शरयू आता बीझी आहे, माझ्या फ़्रेंडसर्कल मधे माझ्यापेक्षा जास्त popular आहे. शरयूचं घरही आता आनंदी आहे. जाणता अजाणता हातून घडलेली चूक दोन्ही बाजुनी दुरुस्त झाली आहे. माझ्या बालमैत्रिणीला खूष पाहून मी ही खूष आहे. समाप्त.
|
Megha16
| |
| Tuesday, February 21, 2006 - 10:51 am: |
| 
|
अभिश्रुती शेवट छान केला आहेस पण मला वाचताना अस वाटल की तु धावता शेवट घेतलास. कारन शेवट्चा भाग वाचन्या आधी वाटल होत की अजुन पुढे खुप काही येणार आहे. पण तस ही तु थोडक्यात का होईना बरयाच प्रश्नाची ऊत्तर दिली आहेत. पुढ्ची कथा लवकरच येऊ दे. मेघा
|
Megha16
| |
| Tuesday, February 21, 2006 - 10:52 am: |
| 
|
अभिश्रुती शेवट छान केला आहेस पण मला वाचताना अस वाटल की तु धावता शेवट घेतलास. कारन शेवट्चा भाग वाचन्या आधी वाटल होत की अजुन पुढे खुप काही येणार आहे. पण तस ही तु थोडक्यात का होईना बरयाच प्रश्नाची ऊत्तर दिली आहेत. पुढ्ची कथा लवकरच येऊ दे. मेघा
|
|
|