|
Himscool
| |
| Wednesday, February 22, 2006 - 7:52 am: |
| 
|
मेधाच्या विचारांशी पूर्णपणे सहमत
|
Ek_mulagi
| |
| Wednesday, February 22, 2006 - 10:24 am: |
| 
|
गोष्ट आवडली. पण शेवट घाई घाईत केल्यासारख वाटल. पुढच्या लिखाणाची वाट पाहतेय.
|
Pama
| |
| Wednesday, February 22, 2006 - 10:26 am: |
| 
|
अभिश्रुति, छानच लिहिलयस.. पण लवकर लिही म्हणून मागे लागले सगळे म्हणून आटोपती घेतलीस का? मलाही शेवट पटकन गुंडाळून टाकल्यासारखा वाटला.
|
Vinaydesai
| |
| Wednesday, February 22, 2006 - 2:21 pm: |
| 
|
पमाच्या विचारांशी बर्यापैकी सहमत...
|
अभिश्रुति, मस्तच लिहिलय ! मला खास करुन जाणवलेली गोष्ट म्हणजे दोन मैत्रिणींची हि कथा आहे. आपल्याकडे एकुणच दोन पुरुष मित्रांबद्दल जेव्हढे साहित्य म्हणा वा सिनेमे म्हणा वा गाणी म्हणा असतात, त्यामानाने दोन स्त्री मित्रांबद्दल मात्र फारसे काहीच नसते. कदाचित म्हणूनही मला तुझं लिखाण जास्त आवडलं असेल. पण खरच छानच लिहिलय. caÝkTcaa rajaa
|
पमाच्या मताशी मी ही सहमत आहे खरंतर मी सुरुवातीलाच गोष्ट सम्पेपर्यंत प्रतिक्रिया इथे टाकू नका अशी विनंती करते कारण कधीकधी त्याचा असा परिणाम होतो, लिंक थोडी डिस्टर्ब होते किंवा वाचकाना घाई झाली की त्याचा संसर्ग लेखकालाही होतोच. Of course this is not an excuse to end it abruptly ... पण मला वाटलं की मी सुमीतच्या आणि अंजूच्या प्रत्येक प्रयत्न किंवा प्रयोगाअबद्दल लिहित बसले असते तर कदाचित रटाळ झालं असत. प्रतिक्रिया अत्यंत आवश्यक आहेत, तरच आपल्या चुका किंवा त्रुटी समजतात आणि सुधारणाही करता येतात, त्याचबरोबर आपल्या लिखाणाची खासियत काय आहे किंवा वाचकांना आपल्या लिखाणातलं नक्की काय आवडतं हे समजतं. दोस्तानो, परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद! चौकटचा राजा, बरं वाटलं तुमची प्रामाणिक प्रतिक्रिया वाचून! मी आणि माझी मैत्रिण एकमेकीना अजुनही खूप close आहोत बहुतेक त्याचाच परिणाम असावा.
|
श्रुती, हे लक्षातच आले नव्हते! so sorry कथा संपल्याशिवाय मी शक्यतो प्रतिक्रिया नाहीच देत. पण मला खरच वाटले की गोष्ट संपली! क्रमशः किंवा समाप्त असे शब्द आल्यावर बरे पडते. पण या कथेत शेवट घाईत'उरकून टाकला' असे वाटते खरेच पण त्या नादात काही राहून गेले असे नाही वाटले.
|
Seema_
| |
| Thursday, February 23, 2006 - 12:15 pm: |
| 
|
मला आवडली कथा. मी नेहमी म्हणुण लिहुन पुर्ण झाल्याशिवाय वाचतच नाही.
|
Sashal
| |
| Monday, February 27, 2006 - 12:13 pm: |
| 
|
छानच लिहीली आहे गोष्ट .. कथेची simplicity च खूप आवडली ..
|
कथा छानच आहे, कथाशयही चांगला आहे. एकटेपणामुळे बरेच मानसिक ताणतणाव निर्माण होतात आणि त्याचा परीणाम हा शरीरावर होतोच. याचा विचार करण्याची आज सर्वानाच वेळ आली आहे. बाहेरचे ताणतणाव एव्हढे आहेत की काही विचारु नका!!... त्यामुळे ही कथा वाचुन नुसते बप्प बसु नका तर आपल्यावरही अशी वेळ येवु नये याचा विचार आपण केला पाहीजे!!!... असो. मन करारे प्रसन्न|सर्व सिद्धीचे कारण||... हे तुकराम महाराज सांगुन गेले. असो. कथा वाचुन काय वाटले म्हणता...!! आमच्या शाळेत पहीला तास भाषेचा असायचा आणि शेवटचा गणिताचा!!.. त्ये आटवल. .. पर आबिसुरतीताई... तुमची ही सरु काई देवाधरमाच करत न्हवती का?.. न्हाय म्हजी पुजा आर्चा... रामपारी आंग धुन पुजा करावी मान्सान. आता ही बया आंगुळबी करत नसल त काय म्हनाव मान्साला... देवाच नाव घियाला काई पैस पडत न्हाईत उलट आसली मानसोपचाराची येळ येत न्हाई. आता आमची आज्जी... तिला कोन जवळच हुत?.. तस समदीच हुती.. पर तरी बी सगळी आपली आपापल्या ह्यात!!. पर कशी हुती... आनि तुमची ही सरु!!!... म्हनुन आपन काय करायच ठरीवल हाये म्हाईती हाये? पुजा, संध्या, देवाच जे म्हनुन काय करता यीळ त्ये करुन पुन्हा कर्मे ईशु भजावा. अहो धर्माचे बाह्यांग हे समाजाला आणि व्यक्तीला.. दोहोना फायदेशीर आहे.. असे काय करतां?? आपला सला येकच " अनंतफंदीचा फटका!! " ... खोट न्हाय!!... पर सगळ्याला हे शीक्रेट म्हायती न्हाय त्ये बराय!!!.. न्हायत मानसोपचारतज्ञ काय खात्याल?
|
Tanya
| |
| Tuesday, February 28, 2006 - 2:37 am: |
| 
|
अभिश्रुती... कथा खरच खुप छान आहे. रोजच्या धकाधकीच्या व्यापात स्वतकडे, स्वत्:च्या माणसांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. खरच विचार करायला लावणारी कथा लिहीलीस. अजुन तुझ्याकडुन वेगवेगळ्या विषयांवरच्या कथा वाचायला आवडतील.
|
Jayavi
| |
| Tuesday, February 28, 2006 - 8:38 am: |
| 
|
अभिश्रुती, खूप आवडली तुझी कथा. सगळ्या घराच्या गरजा भागवता भागवता, घरच्या स्त्रीच्यासुद्धा काही गरजा असतात हेच मुळी कोणाच्या लक्षात येत नाही. खरं तर मानसोपचाराची गरज सगळ्या कुटुंबालाच असते अशावेळी. तुझ्या गोष्टीतला शरयूचा जोडीदार समजूतदार होता म्हणुनच सगळं काही विस्कटण्याआधीच सावरल्या गेलं. असंच तुझं लिखाण सुरु राहू दे. खूप खूप शुभेच्छा !!
|
|
|