Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 10, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » काव्यधारा » चित्र कविता » Archive through February 10, 2006 « Previous Next »

Gash16
Tuesday, January 31, 2006 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tu

Menikhil
Tuesday, January 31, 2006 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुन्दर तू नार
उडे केस हळुवार
दिल घायाळ करती
असा तुझा शिणगार

तुज उपमा कोणाची
चन्द्र चान्दण्या फुलान्ची
नक्शत्र तारकान्ची
निळ्या नाजुक मोराची

तुझे चितर पहाता
उर भरुनीया येतो
गोड बोलणे ऐकता
मोह उफाळुनी येतो

नारी माझिया भूमिची
रती शोभे मदनाची
चमके कान्ती सोनियाची
अशी किमया या मातिची

शत प्रणाम या मातीला
जन्मा घाली वीरबाला
सौन्दर्याने ही भरला
नखशिखान्त गाभारा


Zaad
Wednesday, February 01, 2006 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या स्तनांवर चंद्र कोरला तेव्हापासून
घुमते आहे अंगामध्ये तुझेच गाणे
भिडते आहे आत्म्यालाही
तुझ्या मिठीचे गर्द बहाणे
तुझे मागणे मागितले तू अशा सहजपणे
गळते आहे रोमांचातूनि
ग्रीष्मामधले लख्ख चांदणे....!


Sparsh
Wednesday, February 01, 2006 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकच प्याला मदनाचा
प्राशुन मज गेली
ती एक रात्र अशी होती
ती एक रात्र अशी होती...

चान्दण्या रात्री दोन चन्द्र
घेऊन आली होती
एकात चन्द्र सामावला होता
एकात रात्र सामावली होती

ती एक रात्र अशी होती
ती एक रात्र अशी होती...


Vaibhav_joshi
Wednesday, February 01, 2006 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रूपगर्विता ....

कुंतलास सोडशी वारियावरी असे
पाहुनी तुला , मला लागते जणू पिसे
काय होतसे मला काय सांगू तुला
ह्या दिशांदिशांमध्ये तूच तू मला दिसे

पापण्या मिटून तू का बरे लाजते ?
कंचुकी तुझी कुठे यौवनास झाकते ?
अंतरी तुझ्या प्रिये का तहान जागली
मेघ दाटता तयांस नीर मागू लागली

एक चंद्रकोर त्या नभात रेखली कुणी
वाटते जणू तुझी " कला " च फ़क्त ती
रूपगर्विताच तू भासशी मला सखे
पूर्णिमा तुझ्यारुपे लाभली मला इथे


Pama
Wednesday, February 01, 2006 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यौवनाची रात आहे, आज तू येशील ना?
विझत आहे गात्र माझे, तेवुनी जाशील ना?

चंद्र आहे सोबतीला, जाळितो मजला परि,
उलटला प्रहर, तो ही, आणखी सजला पहा,
बहरलेले रूप माझे, लेवुनी जाशील ना?

छंद तुझ्या आठवांचा, लागला आता जिवा,
पापण्यांना पूर येतो, दाटला अन कंठ हा,
प्रीत माझी बाहुपाशी, रे सख्या घेशील ना?

माळले हे केवड्याचे, श्वास केसातून मी,
का नकोसा होत आहे, कंकणांचा नाद ही?
स्तब्ध सार्‍या रानवेली, साद तू देशील ना?

साज हा श्रृंगार सारा, व्यर्थ का रे आज ही?
साजणाच्या चाहुलाची, आस ना सुटली तरी,
अंतरी हे जाणते मी, आज तू येशील ना?


Ninavi
Wednesday, February 01, 2006 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी भेट व्हायची फिरूनी
कलेकलेने आशा विझते
सरण्याआधी कृष्णपक्ष ये,
अवस कधी का सांगुन येते?


Chaukatcha_raja
Wednesday, February 01, 2006 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा चंद्र असा विझलेला,
शांत निजलेला

मीही अशी विझलेली,
डोळे मिटलेली

म्हणे कुणी,
असे ही बारबाला
प्यावा हिच्याच हातुन प्याला

करे कुणी,
दौलतजादा मजवरी
निजवी मला त्यासंगे शेजेवरी

मारे कुणी,
शेरे निलाजरे
नयन होती माझे बावरे

म्हणे कुणी,
चालू कलियुग आहे
पण अजुनहि द्रौपदी मात्र वस्त्रहरणातच आहे

हा चंद्र असा विझतो आहे
मीही अशी झिजतेच आहे,
दर रात्री विझतेच आहे......









Kmayuresh2002
Wednesday, February 01, 2006 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह वाह,बहोत खुब... :-) सही कविता आहेत मंडळी:-)

Sarya
Thursday, February 02, 2006 - 1:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याच कविता छान!!!
पमा छान कविता...
वैभव, रुपगर्विता!!!
चौकटचा राजा...! बहोत अच्छे...!!!


Menikhil
Thursday, February 02, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरदस्त वैभव! तुझ्यकडे कविता करण्यची शिकवणी लावायला हवी :-)

Moodi
Thursday, February 02, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कुठुन आणता रे ही शब्दांची खाण, शब्द काय जणू नवरत्नेच!!
दाद द्यायला आमचे मात्र शब्द संपले..


Menikhil
Thursday, February 02, 2006 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोज रात्री शीळ घालुन मी तुला जागे करवे
रोज रोज मज हट' म्हणुनी त्या कुशीवर तू वळावे
पावसाने रोज येउन मग तुला जगे करवे
चान्दोबाने डाव साधुन ढगामागुन डोकवावे

रम्य धरेने चिम्ब होउन रातराणीगत मोहरावे
मग कौलान्च्या खाचेमधुनी चन्द्राने का तुला पहवे?
प्रश्न येउन असे वरवर रत्रभर मी का झुरावे?
अन मलमली चादर ओढुन रात्रभर तू स्वस्थ निजावे?


Meghdhara
Thursday, February 02, 2006 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा अप्रतिम! व्यर्थ का रे आज ही.. व्वा!
वैभवा वाटते जणु तुझी कला.. काय म्हणावे?
झाड, या यौवनेची इतक्या वर्षांची तपश्चर्या सुंदर पोचते पण तुझे मागणे... पुन्हा वाचले तरी कळत नाहिये.

मेघा



Vaishali_hinge
Thursday, February 02, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंद्रा

मुग्ध तु लुब्ध मी
स्तब्ध आसमंत सारा,

तुझ्या चदेरी तेजात विरघळले,
तरी सजनास ना कळाले...

तु विरहाचा सोबती,
नि माझ्या एकांताचा सांगाती

झाले मन मोहरुन आकाशासव
घनगर्द नीळे

अधीर लोचन,
नाही भागत त्यंची त्रुष्णा

एकु येतोय अवेळीच,
वाजवतोय पावा त्या
कुब्जेसाठी क्रुष्णा,

तु सख्या कधि येतोस का..
क्षितीजावर तुझ्या चांदणीविना

निखरलीय का कधी सजनी सजनाविना
कोण समजवेल या वेड्या मना

तुझी साथ अन बित्या क्षणांची आठ्वण
धुंदी कशी ती उतरत नाही,

आणि क्षणा.. क्षणांनी चढ्णारया रात्रीबरोबर
चढत जातो साज या तरुण्याच्या नक्षीवर..............


Zaad
Friday, February 03, 2006 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

@Meghadhara...
tichi itakya varshanchi tapashchrya purn zali ti kewal tyachya maganine....tine jya goshtichi itakya aaturatene waat pahili ti gosht tyane matra kiti sahajpane magitali asa tila watatay....

Meenu
Friday, February 03, 2006 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आस

तुझ्या मीलनाची आस
नको कळाया जगास
म्हणुनिया मिटले मी
आसुसल्या नेत्रांस

उरोजांचे हे उभार
तुझ्यविना झाले भार
धगीस मझ्या आतल्या
करीती उगी साकार

तुझी माझी भेट प्रिया
नाही शक्य प्रत्यक्षात
चंद्र होऊन तु येशी
धगीस या शमवाया


Vaibhav_joshi
Friday, February 03, 2006 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह ! मीनू मस्तच .... फक्त शेवटच्या कडव्यातली दुसरी ओळ खटकतीय , मला वाटत ती पहिली ओळ असायला हवी !

Meenu
Friday, February 03, 2006 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वैभव खरच की मलाही ती खटकत होती पण काय बदल करावा ते मात्र सुचल नाही...

Thank you!

Pendhya
Saturday, February 04, 2006 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त आहेत सर्वांच्या कविता.
झाड, बर्‍याच कालांतरानंतर तुझं पोस्टिंग झालं.


Gash16
Sunday, February 05, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nirdosh

Chaukatcha_raja
Sunday, February 05, 2006 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू चंद्र एक कोर
मी टंच एक पोर

हा असा रात्रीचा दुसरा प्रहर
माझ्याही यौवनाला आलाय बहर

सांग सखया आज राती तरी तू येशील का?
त्या धूंद प्रणयाच्या सागरात मला नेशील का?

नशीली ग्लानी, थरथरते काया
तुझ्याच स्मरणात रमते मी राया

भार यौवनाचा आता उरात सोसवेना
तुझ्याशिवाय काहिच मज आठवेना

सोडला केशसंभार आज मी मुक्त
मिलनाच्या ओढीने जाहले नेत्र ही आरक्त

अवखळ नजरेच्या स्पर्शाने तापली कानशिले
गालांवरही फुलली माझिया लाल लाज फूले

नववधुसम केला आज मी श्रुंगार
स्वीकृतीचा येऊ दे तुझाही हुंकार

येऊ दे आता अपुल्या प्रीतीला भरती
मालवून टाक चांदण्या, रात आहे सरती

हे इतुकेच साजणा, तू मजसाठी करशील ना
ही रात मिलनाची पुढेही, तू नित्य स्मरशील ना

सांग चांदव्या, आज राती तरी तू येशील ना
धूंद प्रणयाच्या सागरात खोल खोल मला नेशील ना....


Ajit_gokhale
Monday, February 06, 2006 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याच्या आधीच्या चीत्रासाठी

कृष्ण्सुंदरी

शामवर्ण हा तुला शोभतो सुडौल काये वरी
रुपतुझे ग पाहुन झुरति किती गौर सुंदरी

नाजुक बांधा तुला लाभला विपुल केश संभार
कृत्रीम ऐशा प्रसाधनांचा नलगे तुज आधार

काळ्या पाषाणातुन जणु घडविली तुझी ही मुर्ती
अप्सराही हाय बोलीती ऐकुन तुझी किर्ती

मृगनयनी तु खुलुन दिसते काजळ डोळ्या वरी
कर्णफुलेही शोभुन दिसती तुझिया कानांवरी

भालावरती चंद्रकोर ती वेणीमध्ये फुले
पाहण्यासग तुला धावती तरुण वेडी मुले

चालतुझी पाहुन सखये होतो मी हैराण
खलास करुनी टाकी मजला तुझ्या नयनांचे बाण

हिमगौर्‍या त्या आंधारातही तोंड सदा लपवीती
हीतशत्रु तो पाहील म्हणुनी मना मधे घाबरती

काजळतनये तुझ्या मना मधे ही भिती कधि नच येते
श्रुंगाराची याचमुळे का जास्त मजा मज येते

सुवर्णजडीत रत्न माणके ऊठुन दिसती तनु वरी
सोन्याच्या तेजापुढती झाकुन जाती हिमगौरी

हाय बीचारी तु काळी म्हणती जन ते माघारी
फीदा तुझ्यावर असती राणी सौंदर्याचे खरे पुजारी


Pendhya
Thursday, February 09, 2006 - 10:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निर्दोष!

ओढलो गेलो ह्या काळाच्या भोवर्‍यात,
गोवलो गेलो ह्या कारथानी राजकारणात,
आज मुक्त होऊनही, नाही मुक्त मी,
माझ्या ह्या अंधारमय जीवनात

मी आहे एक शापीत जीव,
नाही केला मी कधी कुणाचा दुस्वास,
सोडुनी गेले माझे सोबती,
माझंच घर वाटे मला कारावास,

झालो आहे आज मी एक पिंजर्‍यातला पक्षी,
पंख असुनही नाही त्राण ऊडायला,
मन सांगे जा ऊडून ह्या पिंजर्‍यातून,
पण शरीर नाही येत साथ द्यायला

हा क्षणही विरेल, आहे ही आशा,
संपेल हा बंदीवास केव्हातरी,
नव्या किरणांतून ऊगवेल तो " आज " ,
वाट पहातो मी ऊंबरठ्यावरी





Ekrasik
Friday, February 10, 2006 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव पमा अतीशय सुन्दर कविता




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators