|
Milindaa
| |
| Thursday, February 16, 2006 - 8:28 am: |
| 
|
तर नवा बीबी उघडू का? <<< कशाला ? याच बीबी ची व्याप्ती वाढव ना.. देव दगडात बघावा की प्राण्यांत की लाकडात, भावना लोपल्या नाहीत तर त्यांचं काय करता येईल ? इ. विषय घेता येतील अगदीच गेला बाजार जर देव सगळ्यांमध्ये आहे तर मराठी माणसांना पुरस्कार का मिळत नाहीत ? इ. पण चालेल
|
Ninavi
| |
| Thursday, February 16, 2006 - 9:24 am: |
| 
|
मिलिन्दा, मी नवीन आयडी घेईन म्हणते..आयेकुबीव्यावामि ( आमचे येथे कुठल्याही बीबीची व्याप्ती वाढवून मिळेल) 
|
Jayavi
| |
| Thursday, February 16, 2006 - 10:54 am: |
| 
|
निनावी, अगं काय लिहितेस गं तू !! अभंग तर केवळ अप्रतिम !!!! मीनू, सुरेखंच !! पमाशी अगदी सहमत. पमा, प्रेमदिन एकदम सही ! योग, मला फ़ारशी नाही कळली
|
Ninavi
| |
| Thursday, February 16, 2006 - 12:53 pm: |
| 
|
अता मी... तुझ्या ओठिचे हसू न माझे, तुझा कोण लागतो अता मी अशी उराची करून झोळी तुझे दुःख मागतो अता मी.. मला नको आठवू म्हणालो अखेरचे सूज्ञ वागणे ते तुझ्या आठवांसवे नांदतो खुळ्यापरी वागतो अता मी.. कधी मला सांगता न आल्या, कधी तुला ऐकुही न गेल्या मलाच त्या ऐकवीत गोष्टी इथे रोज जागतो अता मी.. तुटून जी चांदणी निखळता अशक्य ते दान दे म्हणालो तिचे निखारे धरून हाती मनास या डागतो अता मी.. नसो जगाला फिकीर माझी, कधीच त्याची तमा न केली खराच आता फकीर झालो, स्वतःसही त्यागतो अता मी...
|
Jaaaswand
| |
| Thursday, February 16, 2006 - 1:02 pm: |
| 
|
निनावे... अग काय हे...... कोपरापासून नमस्कार तुला अशक्य आहेस...
|
Zaad
| |
| Friday, February 17, 2006 - 2:38 am: |
| 
|
असल्या शृंगाराने झाडाचे हलते मूळ पानांच्या जाळीला चंद्राचे भलते खूळ. जळणार्या किरणालाही पालवी फुटते येथे क्षितीजाची देखील रेषा हलकेच मिटते जेथे. असल्या शृंगाराची नसते रीत-भात काही आत्म्यास बिलगणारी ही वात तेवत राही. करप उराची बडवून बुडवावे डोळ्यांत चंद्र पानांच्या जाळीचे द्यावे मग खुशाल बहरू रंध्र. असल्या शृंगाराची नको आस कासावीस इच्छेस देऊनि फाटा इच्छाच जन्मते हमखास.
|
Arnika
| |
| Friday, February 17, 2006 - 1:11 pm: |
| 
|
झाड, मस्त लिहिलय एकदम! निनावी.......यावेळी रॉकेट एकदम जोरात सुटलय...जाम सही आहेत सगळ्या कविता. फार आवडल्या!
|
Shyamli
| |
| Friday, February 17, 2006 - 1:19 pm: |
| 
|
झाड, मस्तय आवडल.. .. ..
|
Arnika
| |
| Friday, February 17, 2006 - 1:30 pm: |
| 
|
रुसलेले शब्द... कवितेचे शब्द सुचत नाहीत गद्यात तर ते मुळीच बसत नाहीत, लेखणीच्या लांब प्रवासानतरही मनातल कागदावर मांडत नाहीत. काळी शाई, रगीत शाई, विचारांचा गुंता सोडवायची घाई पण कागदावर हल्ली यमक जुळतच नाही, अश्रुंना वाट कुठे मिळतच नाही! कसल्या जाळ्यात अडकलेत आज हे शब्द? कागदी मळवाट नाकारुन,मनात राहिलेत स्तब्ध... पण कुठेतरी यमक नक्की जुळतय, ते माझ मलाच कळतय, कागदावर उतरत नसलं तरी माझ गाण ओठावर खेळतय... लिहिता आलंच पाहिजे का ते? गाऊन नाही का चालणार? सूर्- ताल मनात जुळवून मैफिल नाही का रंगणार? श्रोता, गायिका मीच असेन गाण असेल शांत... कारण आखलेल्या ओळींतच डौलात बसण हा नाहिये प्रत्येकाचा प्रांत! चु.भू.द्या.घ्या मायबोलीकर! अर्निका
|
Ninavi
| |
| Friday, February 17, 2006 - 1:40 pm: |
| 
|
झाड, ' पानांच्या जाळीला चंद्राचे खूळ' मस्त! आर्निका, छान रंगल्ये मैफ़िल. अजून येऊदे. ( कागद नकोच, डायरेक्ट टाईपच कर.) 
|
Shyamli
| |
| Friday, February 17, 2006 - 1:42 pm: |
| 
|
काय भन्नाट लिहीलयस ग! होतिस कुठे ईतके दीवस?
|
चकित विपर्यासाच्या सोनेरी कान्कणाची मगरमिठी अपसमजाची बेडी जाड मजबूत लोखण्डी. ना विस्मय ना वाटला कधी खेद ओळखीचेच हे, अनर्थाचे उच्छाद. रोजच पडतात माझ्या आन्गणात सडे त्याच्या अमन्गल विष्ठेच्या दुर्गन्धाचे. तरी आणतो भरूनी नव्या शब्दान्चे घडे, विक्रमाला जसे येते वेताळाचे बोलावणे. माझ्या या वान्झ खटातोपाने मझे मलाच चकित व्हायला होते! बापू.
|
Pama
| |
| Friday, February 17, 2006 - 3:18 pm: |
| 
|
धन्यवाद मित्रांनो. वैभव, लिहिताना सगळी कविता दृष्टी संबंधित असावी असा विचार करून लिहिली नव्हती, त्यामुळे तुझ्या प्रश्नाच उत्तर आता देण कठिण आहे. आहेस कुठे आजकाल? निनावे.. सही!! योग.. छान उतरलीय. झाड.. मस्त जमलीय. आर्निका.. सुरेखच! बापू, वा! कुठे होतात?
|
Ninavi
| |
| Friday, February 17, 2006 - 4:08 pm: |
| 
|
धन्यवाद, दोस्त्स!! ... ... ... 
|
Pama
| |
| Friday, February 17, 2006 - 4:43 pm: |
| 
|
जिद्द... ढवळून सारी स्वप्ने माझी, कुठे शोधली खोळ तळाशी, दुष्काळाच्या गर्तेमध्ये, राहून गेले एक तळाशी. गढूळलेल्या उण्यापुर्या त्या, रोगटलेल्या पाण्यावरती, राहून गेले एक कसे ते, चिकटून होते शेवाळ्याशी. होती सोबत चुकचुकणार्या, रातकिड्यांच्या आवाजाची, पिऊन गेले रात काजळी, डगमगले ना परी मुळाशी. कसली त्याची जिद्द म्हणावी, जगण्याची कि गुदमरण्याची? सोयरीक ही जुळवत होते, गरगरणार्या पाचोळ्याशी. इथेच आहे बहर फुलांचा, दिसेल तारा माथ्वावरती, भरेल तेव्हा कळशी माझी, हितगुज चाले आभाळाशी.
|
Sarang23
| |
| Friday, February 17, 2006 - 10:18 pm: |
| 
|
good one Pama!
|
best ,manaachee jidd ...................... !
|
माझा भारत असायचा तेजाचा पर्वत माझा भारत करायचा तार्यांशी शर्यत माझा भारत कितीक नेते, किती लफंगे, भ्रष्टाचारी लुटणार्यांची बनला दौलत माझा भारत निखार्यांसही रंग येथल्या हिरवे-भगवे युगायुगांचा आहे धुमसत माझा भारत महाल होते सोन्याचेही इथे एकदा कर्ज अताशा आहे मागत माझा भारत दिल्लीमधला हरेक नेता सुखात आहे जरी कधीचा पडला खितपत माझा भारत सरकारांचे वाचुन धोरण प्रश्नच पडतो कुणास आहे कळला कितपत माझा भारत जरी भासतो एक तरी हा असे वेगळा याचा भारत, त्याचा भारत, माझा भारत इथे घेतला कोट्याधींनी शोध सुखाचा अता चालला आहे हरवत माझा भारत असे छेद अन असे विभाजन हवे कशाला तुमचा - माझा एकच भारत, माझा भारत जरी भटकलो दूरदूरच्या देशांमध्ये सदैव असतो माझ्या सोबत माझा भारत जळून माझी राख रहावी 'या' मातीतच अनंतातही यावा संगत माझा भारत - प्रसाद
|
Naadamay
| |
| Saturday, February 18, 2006 - 12:24 am: |
| 
|
inanaavaIÊ saundr² Ap`itma sÔurlaya²
|
Sarang23
| |
| Saturday, February 18, 2006 - 2:40 am: |
| 
|
सही रे प्रसाद... छान!
|
Jayavi
| |
| Saturday, February 18, 2006 - 3:47 am: |
| 
|
अर्निका, जबरदस्त !! बापू, मस्त !! पमा, 'हितगुज चाले आभाळाशी' सही !!! प्रसाद, तुला दंडवत रे !!!
|
पमा, जयावी, धन्यवाद. प्रसाद, सुरेख. बापू.
|
Ninavi
| |
| Saturday, February 18, 2006 - 7:06 am: |
| 
|
धन्यवाद, नादमय. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. 
|
Shyamli
| |
| Saturday, February 18, 2006 - 7:12 am: |
| 
|
पमा निनावी, बापु, प्रसाद मस्तच
|
Ninavi
| |
| Saturday, February 18, 2006 - 7:26 am: |
| 
|
प्रसाद, महान! ... ...
|
|
|