|
हेम्स सुरेख आहे उजळलेला अंधार. झाडा दोन्ही कविता सुरेख आत आत उतरणार्या. अतुल अगदी पटलं रे. खरंच. निनावी भाषंतर किती गोड आहे. आणि तुझी गझल निर्विवाद छान आहे. सारंग हे एवढं सगळं कशासाठी लिहीलंय? यापेक्षा तू सांगतोयस तसल्या कविता करून इथं पोस्ट कर ना.
|
सांरग कविचे मन खुपच दुखावलेय वाटते चला झाड आणि मीनु च्या सुन्दर कवीतांमध्ये सगळे विसरुन जा!
|
Himscool
| |
| Tuesday, February 14, 2006 - 7:21 am: |
| 
|
माझ्या मैत्रिणीने केलेली कविता तू तू झंकारील्या मम ह्रुदयाच्या तारा तुझ्याच स्पर्शाचा खेळ हा सारा तुझ्यावाचुन अन्य कुणा नाही इथे थारा हेच संगतोय हा लडिवाळ वारा तुझ्याशी जरी होतात दररोज भांडण टंटे कित्येकदा मन होते निराश घंटोन घंटे तरी तुझ्याच विचारांना मन देते थारा हेच संगतोय हा लडिवाळ वारा दोन क्षण दुरावताच जाणवते तुझी उणीव जरी सोबतीला तू माझा असल्याची सुखकारी जाणीव तुझे प्रेम जणु श्रावण धारा हेच संगतोय हा लडिवाळ वारा तुझ्या प्रेमाने मी गेलेय चिम्ब भिजून कितीदा तरी मी आजाराने असते निजून तू भरवतोस पिल्लांप्रमणे चारा हेच संगतोय हा लडिवाळ वारा कवयित्री अर्चना
|
Ninavi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 9:49 am: |
| 
|
भक्ताचा अभंग... त्याच्या इच्छेवीण | पान ना हालते | जग हे चालते | त्याच्यामुळे || सांगती सज्जन | कोणाला जनांत | कोणाला मनात | सापडतो || मलाही दिसला | बसला रानात | कपाळाला हात | लावलेला || देऊळ सोडून | इथे कुठे देवा | काय करू सेवा | विचारले || म्हणे परागंदा | झालो जगातून | राहिली ना खूण | माझी कोठे || दगडाधोंड्यांना | घालताती हार | भक्तीचा बाजार | मांडलासे || पालखी घालुनी | मिरविती पोथ्या | रस्त्यात आरत्या | म्हणतात || आषाढी कार्तीकी | गाठती पंढरी | चेंगराचेंगरी | नुसतीच || सूख विसरले | नाही समाधान | एक अवधान | सुबत्तेचे || करावी वाटते | यांची विनवणी | मस्तक ठेवुनी | पायांवर || नको पूजापाठ | नको नमस्कार | नको सोपस्कार | फुकाचे ते || थोडे प्रेम थोडी | सह अनूभूती | एकमेकासाठी | थोडा वेळ || आणि थोडी चाड | असू दे सत्याची | माझ्या अस्तित्वाची | तीच खूण || परदुःखे तुझा | अश्रू ओघळेल | मलाही कळेल | आहेच मी || तुझ्या अंतरात | झरा जो भावाचा | त्याच रे देवाचा | मीही भक्त ||
|
Moodi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 9:57 am: |
| 
|
निनावी तू इतके सुंदर कसे लिहू शकतेस ग? निव्वळ अप्रतीम!!पण खरे तर आमचे शब्दही कमी असतात दाद द्यायला.
|
Meenu
| |
| Tuesday, February 14, 2006 - 11:07 am: |
| 
|
निनावि खरच सुंदर लिहीलय अगदी!
|
निनावी क्लास!!!! आणखी येऊदे!
|
Meenu
| |
| Tuesday, February 14, 2006 - 11:20 am: |
| 
|
ऐक ना... ए एकदा ना मला तूझी व्हायचयं तूझी होऊन तूझ्यात रहायचयं तूझ्या ह्रदयाची धडधड मी आतच बसून पाहीन तूझ्याआधी तूझा विचार मीच जाणुन घेईन आली तूला आठवण की हसतच मी सामोरी येईन पण... पण याचाही मग मला कंटाळा येईल मला वाटेल तू माझ्यासाठी झुरावस माझ्यासाठी उसासे टाकत वेड्यासारखं फिरावस.. मग..? मग तू माझी आठवण काढलीस तरी, मी आतच बसून राहीन तूझे उसासे ऐकून गालातल्या गालात हसत राहीन तूझ्या उबेत बसून तूझीच गम्मत पहात राहीन...
|
Pama
| |
| Tuesday, February 14, 2006 - 12:53 pm: |
| 
|
मीनू, तुझ्या कविता खूप सुरेख आहेत. किती सहज सोप लिहितेस.. साध्या शब्दांतही खूप मोठा आशय सांगून जाण्याची आणि थोडक्या शब्दात बराच अनुभव व्यक्त करण्याची ताकद असते हे तुझ्या कविता वाचून पटते. लिहित रहा असच छान छान.. झाड, छान निनावे, सही लिहिल्यास सगळ्याच कविता..
|
Shyamli
| |
| Tuesday, February 14, 2006 - 12:56 pm: |
| 
|
निनावी,मीनु सहिच.. .. ..
|
निनावी मीनु मस्तच............... लिहीत रहा पटापट
|
Pama
| |
| Tuesday, February 14, 2006 - 6:57 pm: |
| 
|
प्रेमदिन.. आज' त्याने' खास' तिच्यासाठी' आणला होता मोगरा, तिला कळू न देता. संध्याकाळी, रम्य वेळी, सूर्य अस्ताला जाता.. गुपचुप काढून तिला देणार होता. किलबिलणारे पक्ष्यांचे थवे, परतत होते घरट्यात, तेव्हा घेतला थरथरता, तिचा हात हातात.. 'किती सुरेख दिसतेयस', म्हणत प्रेमाने माळला. 'चला, तुमच काहीतरीच' म्हणत, ती ही लाजली गोडशी, आणि ठेवली हातात, त्याच्या आवडत्या शिर्याची बशी.. 'तुला कसे गं कळले?', त्याचा उगाचच प्रश्न, आणि त्यावर तिच खट्याळ, खुदकन हसणं.. थरथरत्या हातांनी तिने सारले मागे, भुरभुरणारे केस.. अन त्याच्या अधु डोळ्यांनी पुन्हा घेतला होता, तिच्या हृदयाचा वेध..
|
Ninavi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 8:35 pm: |
| 
|
धन्यवाद दोस्त्स. पमे, सही! 
|
निनाविचे अभन्ग आणि मिनूची हळवी, हळुवार कविता.. फारच छान. बापू.
|
निनावी, सारन्गशी वाद झाल्यापासून तुझ्या प्रतिभेला जोमदार धुमारे फुटतायत. आम्ही त्याचे आभार मानायला हवेत, तुला चेतवल्याबद्दल. बापू.
|
Shyamli
| |
| Wednesday, February 15, 2006 - 12:04 am: |
| 
|
पमा, आवडलय एकदम. छानच आहे

|
झाड .... " वळ " खूपच मस्त आहे ... शेवटच्या कडव्याने नाव सार्थ केलंय कवितेचं ... कहर सरत्या बहराचे पण खासच ... हेम्स ... जाग मस्त ... पंच सुरेख आहे ... मीनु .... शोध पेक्षा ऐक ना जास्त आवडली ... निनावी ... अभंग अप्रतिम जमलाय ... पमा ... प्रेमदिन टचिंग ... किती सुरेख दिसतेस आणि अधू डोळे ... paradox अप्रतिम ... एकच वाटून गेलं की दृष्टीशी संबंधितच पूर्ण कविता ठेवत शेवट असा केला असता तर जास्त परिणाम साधला गेला असता का ? nevertheless its a damn good one
|
Bee
| |
| Wednesday, February 15, 2006 - 4:25 am: |
| 
|
मीनु, शोध खासच आहे! अगदी खरे आहे प्रियासाठी, घर आणि नंतरची चारोळी पण छान आहे.. पण कधी सांगतोस आईबापांबद्दल?
|
Yog
| |
| Wednesday, February 15, 2006 - 3:24 pm: |
| 
|
वाल्मिकी एका कुडीतून दुसर्या कुडीत.. रन्ग रूप बदलत, पुढचा थाम्बत नाही अन मागचा दमत नाही तोवर त्या बजबजाटात चालत, वासना मरत नाही अन त्राण जात नाही तोवर दोन गोड क्षण चघळत, मन पिचत नाही अन मार्ग सम्पत नाही तोवर कणकण आकांक्षांचे वारूळ बान्धत, काम सम्पत नाही अन दाम उरत नाही तोवर आतड्याचे घामटे ओरपत, मुन्गीतला मनुष्य तरिही जगतो..... अन एकाच क्षणात, माजलेल्या शक्तीच्या चित्काररथाखाली भरडत चिरडत धुलिकणातील एक लाल ठिपका होवून सम्पतो. मुन्गीतला मनुष्य असाच सम्पतो.... अन मरा मरा म्हणत वाल्मिकी हसतो!
|
निनावी, तुझी प्रतिक्रिया तितकिशी पटली नाही बुवा. माझ्या मते, तुझ्यापेक्षा चान्गल्या' कविता फक्त तूच लिहू शकतेस, सारन्ग किंवा अन्य कुणीही नाही. तूच तुझ्या कवितांची चान्गल्या' आणि वाईट' अशी वर्गवारी केलीस ना( तसे करणे अयोग्य असेच मला म्हणायचे आहे पण तरीही),तरी तुला रद्दड वाटलेली कविता माझ्यासारख्या एखाद्या वाचकाला भन्नाट वाटू शकेल, त्याचा काय नेम सान्गावा? प्रत्येक कविता हा प्रतिभेचा एक आविष्कार असतो. 'अमुक कविता तमुक कवितेपेक्षा चान्गली आहे' असे आपण रोजच्या व्यवहारात म्हणून गेलो तरीहि, खरे तर आपल्याला म्हणायचे असते, 'अमुक कवितेपेक्षा तमुक कविता मला जास्त आवडली' किंवा अमुक कविता मला आवडली अथवा आवडली नाही'. निदान मला तरी असे वटते की चान्गली' किॅंवा वईट' कविता असूच शकत नही. तुला जसे वाटते तसे तू लिहीत जा, वाचकान्नी ज्याच्या त्याच्या आवडी-निवडीनुसार आस्वाद घ्यावा, हेच योग्य! बापू.
|
Ninavi
| |
| Thursday, February 16, 2006 - 12:22 am: |
| 
|
बापू, कुठली माझी प्रतिक्रिया? पण तुम्ही म्हणताय ते पटलं मला. १००%. धन्य(वि?)वाद. ( आणि याला म्हणतात जित्याची खोड!)
|
Limbutimbu
| |
| Thursday, February 16, 2006 - 12:32 am: |
| 
|
निनावी, छान लिहितेस पण..... म्हणे परागंदा | झालो जगातून | राहिली ना खूण | माझी कोठे || दगडाधोंड्यांना | घालताती हार | भक्तीचा बाजार | मांडलासे || पालखी घालुनी | मिरविती पोथ्या | रस्त्यात आरत्या | म्हणतात || आषाढी कार्तीकी | गाठती पंढरी | चेंगराचेंगरी | नुसतीच || एकेकाळी या ओळीन्मध्ये दडलेल्या भावार्थाच्या मताचा मी पण होतो! मात्र.... थोडे प्रेम थोडी | सह अनूभूती | एकमेकासाठी | थोडा वेळ || या ओळिन्च्या अर्थाची अनुभुती वारी, रस्त्यावरल्या महा आरत्या यावेळेस झाली तेव्हा मत बदलले! आणि म्हणुन वरल्या आधीच्या ओळी पटल्या नाहीत, तरीही, तुझी शब्दरचना वेधक आणि वेचक हे! ( मागुन एक आवाज.. एऽऽ लिम्ब्या, पळ हिथन, हा V&C नाहीये, विकृत कुठचा! ) DDD
|
Ninavi
| |
| Thursday, February 16, 2006 - 1:16 am: |
| 
|
लिंब्या, मलाही मी तुझ्याएवढी मोठी झाले की कळेल मग ते. विनोद राहू दे, कुठल्याच सोपस्कारांना माझा विरोध नाही. फक्त त्यामागची भावना लोपता कामा नये. त्यांचं नुसतं कर्मकांड होऊ नये इतकंच म्हणायचं आहे. जो देव सर्वत्र आहे तो दगडाधोंड्यात नाही असं मी कसं म्हणेन? पण ज्याला तो दगडात दिसतो त्याला माणसात बघता आलाच पाहिजे, नाही का? कौतुकाबद्दल धन्यवाद. ( आणि V&C करायचा असेल, तर नवा बीबी उघडू का?) 
|
>>>> पण ज्याला तो दगडात दिसतो त्याला माणसात बघता आलाच पाहिजे, नाही का? अगदी बरोबर! >>>> ( आणि V&C करायचा असेल, तर नवा बीबी उघडू का?) कश्श्याऽऽला नविन बीबी? त्या हुसेनच्या बीबीवर जा की! अन त्याच्या चित्रात काहीना सौन्दर्य पण दिसत, तर त्यान्ना देव पण दिस्तो हे का ते विच्चार! दिसत नस्ला तर बघायला शिकिव DDD विश यू ब्येस्ट लक!
|
Zaad
| |
| Thursday, February 16, 2006 - 4:38 am: |
| 
|
योग, 'वाल्मिकी' खूपच आवडली. शेवट तर ग्रेटच!!
|
|
|