Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 15, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » काव्यधारा » काहीच्या काही कविता » Archive through February 15, 2006 « Previous Next »

Ninavi
Thursday, February 09, 2006 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड, खाणार्‍याला वाटी फ़्री!!

Sarya
Thursday, February 09, 2006 - 10:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मिनू!!! छान सगळ्याच

Pkarandikar50
Friday, February 10, 2006 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनू, दोन्ही कविता मस्त आहेत.
बापू.


Meenu
Friday, February 10, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zad, bapu, hems, ninavi, sarya

धन्यवाद मंडळी!!! म्हणजे तुम्हाला पण मजा आली ना फ्री फ्री..- वाचून? मला लिहीताना पण मजा आली. आधी वाटल हे काय काहीतरीच? पण त्या ओळी पाठच सोडीनात मग लिहील्या......

झाड माझी पाटी पाठवून द्या.... :-)


Jayavi
Saturday, February 11, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए काहीच्या काही मधे इतक्या सुरेख कविता आहेत मग आमच्यासारख्यांनी कुठे लिहायचं :-(

तरी पण आज कुवेतमधला पाऊस बघुन सुचलेली काहीच्या काही कविता टाकतेच

भिजरी सकाळ

सर्द थंडीतली गारठलेली सकाळ...
गच्च ओली अन स्तब्ध सकाळ
पावसाचं अर्ध्य स्विकारुन मुकाट
संन्यस्त वृक्षांवरचा सुना किलबिलाट
रात्रभर पडून मरगळलेला पाऊस
रिपरिप अजूनही सुरुच !
लोचट धुकं, रेंगाळणारं,
गोठलेलं सारं सारं
आळसाच्या पांघरुणात लपेटलेला आसमंत
घड्याळाचे काटेही शांत, निवांत
सारं काही मंदावलेलं, सुस्तावलेलं
झोपेची चादर डोळ्यांवर ओढलेलं
वाट बघतंय चैतन्याची,
एका ऊबदार किरणाची
कुठे आहेस तू ?




Moodi
Saturday, February 11, 2006 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया खुप गो sss ड. मस्त उस्फुर्त, का ग थांबलीस इतके दिवस? आता तू पण सामिल हो या रथीमहारथींमध्ये.

Pkarandikar50
Saturday, February 11, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


शेजारी

जन्माला येताना, आई वडील निवडण,
आपल्या हातात नसत.
तसच काहीस,
शेजार्‍यान्च्याहि बाबतीत.

आता माझाच शेजारी पहा ना.
तसा बरा आहे पण थोडासा चक्रम.
दर दोन-चार दिवसानी काहीतरी
कुरापत काढून भाण्डायची सवय त्याला.

असच एकदा आला तणतणत माझ्या घरी.
'तू, पाहून माझ्या बायको कडे,
हसतोस कुत्सितपणे.
पुन्हा काढशील ना तिची खोडी,
तर मोडून ठेवीन तुझी तन्गडी,
याद राख' म्हणाला.

मी शान्तपणे म्हटले, 'बर बुवा,
नाही हसणार मी पुन्हा तीला.
पण एक सान्गतो, एईकून ठेव.
मी एक तर तीला नाही हसत
आणि माझ हसण, मुळीच कुत्सित नसत.
माझी बायको जेम्व्हा, खाते माझ डोक,
तेम्व्हा मी जाम वैतागतो.
तेव्हढ्यात तुझी बायको दिसली समोर,
तर माझ्या मनात येतो, एक मजेशीर विचार.
आणि माझ,ना, मलाच हसू येत.
वाटत, देवाच जरा चुकलच बर का,
जी शिक्षा त्याने तुझ्या बायकोला दिली
ती खर तर माज्या बायकोला
मिळायला हवी होती!'

बापू.



Nilyakulkarni
Saturday, February 11, 2006 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा बापु मस्तच
..जया छान आहे अजुन असेच छान वचायला मिलुदे
निल


Pkarandikar50
Sunday, February 12, 2006 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी, कुवेतमधे आधीच पावसाची मारामार. खरे तर कधीतरी येणार्‍या पावसाचे अप्रूप वाटायला हवे पण तुझा अनुभव साफ वेगळा, त्यामुळे कविता वाचनीय झल्येय.
बापू.


Meenu
Monday, February 13, 2006 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू मस्त आहे कविता...

Pkarandikar50
Monday, February 13, 2006 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निल्या मीनू, धन्यवाद.
बापू.


Jayavi
Monday, February 13, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, निल्या, बापू, मनापासून आभार :-).बापू, अहो आजकाल कुवेतमधे सुद्धा भरपुर पाऊस पडतो. प्रचंड झोंबणारा वाराही सोबत असल्यामुळे नकोसा होतो हो कधीकधी.

बापू, तुमची कविता सुध्दा एकदम झकास हं :-)


Meenu
Tuesday, February 14, 2006 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता झाली हो....

एकदा मला कविता झाली
तू म्हणशील कशावरुन ती तू नाही केली?
शप्पथ रे मी नाही केली तरीही मला कविता झाली

दोन ओळी विचित्रशा सतत डोक्यात घोळू लागल्या
काळ वेळ न पाहता येऊन मला छळू लागल्या
सारख आपलं कागदावर आम्हाला लिही म्हणू लागल्या

रंगलेल्या चर्चेमधे मी शून्य बघु लागले
हात एकदा भाजला आणि दुध खाली लागले
एक दिवस छळाला या मी पुरी वैतागले

जवळच पडलेल्या चिठोर्‍यावर ओळी त्या लिहून काढल्या
मग मला मस्त हलकं हलकं वाटलं
वाटलं आता तरी आपण त्या जाचातून सुटलो
त्या दिवशी रात्री मला स्वस्थ झोप लागली

सकाळीही मी अगदी मूडात होते चांगल्या
आणि इतक्यात.... दोन ओळी वेगळ्याच डोक्यात घोळू लागल्या


Jayavi
Tuesday, February 14, 2006 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मीनू, मस्तच गं !! बाळ आणि बाळंतिण सुखरुप आहेत ना :-) !

Chinnu
Tuesday, February 14, 2006 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, सुरेख लिहितेस ग! :-)

Ameyadeshpande
Tuesday, February 14, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू तुझ्या कवितांनी काव्यधारेवर मस्त अभिषेक घातला आहे...एकदम सिंपल आणि स्वीट...!

Ninavi
Tuesday, February 14, 2006 - 8:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्यातला मी...

मजाच आहे, मनात माझ्या अजून तो एक ' मी' रहातो
जगा दिसे चेहराच माझा, तळात तो डोकवून जातो

कधी कुणाचे बरे करावे, कधी कुणी चांगले म्हणावे
'परंतु कर्तव्य तेच होते' कशास तो ओरडून जातो

तसा न वाईट मी तरीही चुकून काही प्रमाद होता
कुणा दिसो ना दिसो तयाला दिसून तो लाजवून जातो

यशात सामील दोस्त होती, कसे समाधान यास नाही
जरा विसावा मला न देता क्षितीज का दाखवून जातो

फसेल का ही उडी म्हणूनी परी कधी घाबरून जाता
कसा दिलासा बनून येतो कसा मला सावरून जातो...


Ninavi
Tuesday, February 14, 2006 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, अश्या ' होतात' ना आपण होऊन म्हणूनच इतक्या छान असतात तुझ्या कविता!
' करायची' वेळ तुझ्यावर कधीही न येवो हीच शुभेच्छा!


जयावी, मस्त. ही इथे का?

बापू,


Ameyadeshpande
Tuesday, February 14, 2006 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू मला श्री तशी सौ नाटकात सुनील बर्वे म्हणतो ना "तुम्हाला ही चारोळी होईल " ते आठवलं :-)

Vaibhav_joshi
Wednesday, February 15, 2006 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी , निनावी , ह्या कविता इथे का ? दोन्ही मस्त आहेत ...

बापू ... सॉलिड एकदम !!!

मीनू .... कविता छान आहे


Shyamli
Wednesday, February 15, 2006 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए मीनु!
साहिच आहे ग!
निनावी क्या बात है!
जया तु का थांबलियेस
बापु,


Devdattag
Wednesday, February 15, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, निनावि, जयावि, बापू मस्तच

Meenu
Wednesday, February 15, 2006 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी, बाळ बाळंतिण सुखरुप पण पुढच ऐक

कविता झाली आणि खरी पंचाईत झाली
जिथे तिथे भटकभवानी नाक खूपसू लागली

छोट्याशा प्रसंगाची कविता झाली
कोणाच्या कटाक्षाची कविता झाली
कोणी रागावलं त्याची कविता झाली
कोणी बघून हसलं त्याची कविता झाली
कोणी लागट बोललं त्याचीही कविता झाली

भवान्यांना उजवताना लेखणी माझी झिजली


Vaishali_hinge
Wednesday, February 15, 2006 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु जयावी, निनावी लगे रहो.......... कविता मनात आल्यावर कागदावर उतरेपर्यंत जी घालमेल होते ना ती खरच असह्य्य असते...........

Pkarandikar50
Wednesday, February 15, 2006 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, वैभव, देवदत्त Thanx. बापू.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators