|
Pama
| |
| Wednesday, February 15, 2006 - 11:49 am: |
| 
|
जयावी, निवावी.. छानच!.. पण इथे का? बापू.. सहीच!! मीनू.. तुझ्या बाळाला शुभेच्छा देण्यासाठी........... अग, नको म्हणूस तिला' भटक भवानी', अत्ता कुठे येतेय तुझ्या कवितेला जवानी. 'परक्याच धन' म्हणून नको उजवून टाकू, लाडाव जरा तिला, नको बहर तिचा झाकू. 'हुशार आहे हो!' म्हणून कौतुक तिच बघ, पोरगी तुझ नशीब काढेल दुनियेमधे मग. 'कुठे ठेऊ कुठे नको', अस होईल तुला, मिळेल सगळ्यांकडून जेव्हा शाबासकी तिला. लेखणी तुझी झिजली, तेव्हा झालीस श्रीमंत, नको करूस काही जळल्या पोळल्याची खंत, हळू हळू तुझ्यापाशी ती मन मोकळ करेल, तुझा आनंदाचा डोह तीच शिगोशिग भरेल..
|
Shyamli
| |
| Wednesday, February 15, 2006 - 11:55 am: |
| 
|
पमा.. .. .. .. 
|
Jayavi
| |
| Wednesday, February 15, 2006 - 12:01 pm: |
| 
|
निनावी, वैभव, देवदत्त, वैशाली, पमा.........तुमच्या प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं !! मीनू, अगं लेकुरवाळी झालीस ना, मग हे सगळं आलंच पमा, क्या बात है !!
|
Ninavi
| |
| Wednesday, February 15, 2006 - 12:24 pm: |
| 
|
पमा, सहीच!! ... ... ...
|
Devdattag
| |
| Wednesday, February 15, 2006 - 11:55 pm: |
| 
|
वाटले एकदा लहान होऊन मजेत खेळावा भातुकलीचा खेळ पेरभर कांदा चिरावा अन खावि पोटभर चुरमुर्याची भेळ इवलेसे ताट इवलिशी वाटी इवल्याश्या भांड्यात बिस्किटची भाजी वाजवावी तोंडाने कुकरची शिट्टी 'साप येईल' म्हणून रागवावी आजी मागतो हेच आता तुजपाशी खरंच देवा परत असे घडावे दमून भागून करूनी भांडण हळूच आईच्या कुशीत जाउन रडावे
|
Meenu
| |
| Thursday, February 16, 2006 - 12:13 am: |
| 
|
पमा, मस्त... आता तुझ्या म्हणण्याप्रमाणेच करते
|
देवदत्ता, पमा मस्त................ अजुन एक भतुकलीचा खेळ ग! आट्यापाट्यांचा खेळ ग सुरु झाला बालपणी संपत नाही अजुन ग.... गालावरती सरीता ग! असायची चिंता भातुकलीच्या खाउची सगळं आवरुन आता पुरे कर मैत्रीणिंशी गप्पाटप्पा, म्हणुन पाठीत मिळायचा धपाटा तरीही भातुकलीचा मोह नाही आवरायचा ग.... आणि यायच्या गालावरती सरीता ग! लक्ष ठेवणारे किती तारुण्याच्या चालीवर, बोट नाही ठेवायचे समाजाच्या नियमांवर, आयुष्याची वाट शोधायची या काट्यांच्या वळ्णावर असे हे वेडं मुक्ततेचे वेध घेणारे वय ग अन आवळायचे नियमांचे पाश ग..... मग यायच्या गालावरती सरीता ग! लक्ष दिव्यांच्या उत्सवात दोन नजरा मिळती आणि सप्तपदी चालती, आपला रस्ता त्याच्यामागे कायमचा बदलायचा ग, मायेचा पदर अन बाबांची ओली नजर, कायमची सोडतांना...... यायच्या आणि फ़िरुनी गालावरती सरीता ग त्याचे जे ते सगळे माझे, माझे ते त्याचे का नाही ग! आपली वाट आपण नाही बनवायची, त्याच्या मागे चालत रहायचे अपमान, मान, स्वाभिमान.... सगळं काही सोडत सोडत उरतात फक्त गालावरती सरीता ग......
|
Devdattag
| |
| Thursday, February 16, 2006 - 3:54 am: |
| 
|
वैशाली.. छानच आहे..पण हे म्हणजे.. परी तू बीबी चुकलासि
|
Devdattag
| |
| Tuesday, February 21, 2006 - 4:50 am: |
| 
|
सकाळी उठून जेंव्हा घेतो हातात कागद अन लेखणी रंगवावी म्हणतो जेंव्हा काही स्वप्नं देखणी तेंव्हा कधी जमतो तिथे भुतांचा मेळावा कधी असतो पर्यांचा एक खेळावा कधी शिकवते फुलराणी एक नवा धडा कधी येतो घाशिराम घालत पिचकार्यांचा सडा कधी लुटतो लक्ष्मीधर धैर्यधराला मुसक्या बांधून मग लक्ष्मीही येत हसत सखाराम बरोबर नांदून ओथेल्लो येतो रुमाल नाचवत करतो संशयाचं जाळं दाट नॉस्ट्र्डमस मग पणती घेउन शोधतो आपल्या अंधारात वाट हम्लेट म्हणतो तळीरामाला तूच माझ्या बापाचं भूत सिंधूही बसते कातत सुधाकराच्या कपड्याचं सूत मग सगळी पात्रे सगळ्या व्यक्ती एकएक करून विरून जातात जाता जाता माझ्या देखण्या स्वप्नांना उध्वस्त करून जातात
|
Shyamli
| |
| Tuesday, February 21, 2006 - 4:59 am: |
| 
|
देवदत्ता मस्त जमलय रे! वैशाली भातुकलीचा खेळ मस्तच.....
|
देवदत्त, तुझ्या सन्कल्पनेवरुन पुढे चालू...... सकाळि जेव्हा उघडतो काॅम्प्युटरचे मुखडे मान्डतो मनाशीच मान्डे की आजतरी लिहिन, लाखमोलाचे तुकडे! कस्चे काय अन फाटक्यात पाय हुसेनच्या हैदोसात रन्गुन जाय जिहादिन्च्या भितीन हाऽऽय खाऽऽय यस्जीरोडवर कोण पुसत नाऽऽय पन्तोजिन्च्या साळत नियम काऽऽय? धा टक्क्यान्वर इन्ग्लिश, बोलुक नाऽऽय तिकडबी डाळभात शिजना लाखमोलाच तुकड रचेना अस्स बरच काय अन काय जोडत जायच बघ! 
|
Limbutimbu
| |
| Wednesday, February 22, 2006 - 4:54 am: |
| 
|
अरे? आख्ख्या चौविस तासात हिथ कोण फिरकलच नाही? नन्दुरबारच्या कोम्बड्याना बर्डफ्ल्यूची लागण काहीच्याकाही कवितान्ना लिम्ब्याचे गोन्दण हुसेनच्या बीबीला एकनाथी आधार यस्जीकरान्चा येकच वार बुधवार बुधवार DDD
|
दाराच कुलुप काढ कोपर्यात चपला काढ दिवे लाव, बघ माझी आठवण येते का?? फ़्रिजमधुन बाटली घे ग्लासात थंड पाणी घेउन पी थोडा वेळ शांत बस, बघ माझी आठवण येते का?? औषधांचा डबा उघड त्यातुन अमृतांजन काढ ते तुझ्या टेंगुळांवर चोळ, बघ माझी आठवण येते का?? औषध लावताना टेंगुळ दुखेल दोन चारवेळा आई SS गं मेलो म्हणशील टेंगुळावरुन हात फ़िरविताना, बघ माझी आठवण येते का?? तुझीच आणी फ़क्त तुझीच, सॅंडल
|
Shyamli
| |
| Thursday, February 23, 2006 - 7:07 am: |
| 
|
लिंबु भाऊ.... रुप ये हुई ना बात....
|
Priyasathi
| |
| Thursday, February 23, 2006 - 10:11 am: |
| 
|
आम्ही डीएसके विश्व काव्यकट्टा धायरी,पुणे ४११०४१ तर्फे राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे. निवडक निमंत्रित स्पर्धककवींचे कवीसंम्मेलन आणि बक्षिसवितरण समारभ रविवार दिनांक २६ फेब्रु.२००६ रोजी दु.३.३० वा डीएसके विश्व धायरी,पुणे ४११०४१ येथे होणार आहे. तरी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. सर्वांनी कविता ऐकण्यासाठी अवश्य उपस्थित रहावे. निमंत्रक सौ.प्रिया राज गर्दे. सयोजिका. राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा डीएसके विश्व काव्यकट्टा धायरी,पुणे ४११०४१. संपर्क्: ९२२५५२२९८८.
|
Mavla
| |
| Thursday, February 23, 2006 - 12:58 pm: |
| 
|
मी, फ़क्त तुझाच असतो.... भल्या सकाळी, सवयीने उठतो आळस झटकुन, सुरेख नटतो कामाला जाताना ख़ुशित आसतो कारण रात्रीचा मी, फ़क्त तुझाच असतो.... दीवस तापतो, जेवनाची सुटी होते प्राण कंठशी येतो, भुक मोठी होते मग डोळे मिटुन आठवत असतो की रात्रीचा मी, फ़क्त तुझाच असतो.... सध्याकाळ होते, सुर्य मावळतो, थकुन जातो, हळवा होतो, तुझिच आठवण साठवत असतो की रात्रीचा मी, फ़क्त तुझाच असतो.... हळुच, अलगद, चन्द्र उगवतो, व्यथित अन मी, कातर होतो, तु घेते हळुच, मी मिठीत हसतो अन रात्रिचा मी, फ़क्त तुझाच असतो.... तु माझी, तु माझी, फ़क्त तु माझीच.................झोप. मावळा.
|
लाईफ .... तेच तेच लाईफ साला रोज तेच लाईफ सेम प्लेस , सेम ग्राऊंड , सेम तीच फाईट उठायचं , निघायचं , तोंड वर करून बोलायचं खोटं खोटं तोंडभर हसून पाठ फिरताच म्हणायचं व्हॉट अ ब्लडी फूल दिवस झाला स्पॉईल माझा , मूड होता कूल सदाकदा कंपॅरिझन , कोण रॉंग , कोण राईट तेच तेच लाईफ साला रोज तेच लाईफ नक्की काय हवं अजून तेच कळत नाही सांगतं कुणी समजावून तरी वळत नाही रूटीन झालंय , बोर झालंय , बसायचं रडत आयुष्यात थ्रिलिंग कसं काहीच नाही घडत? तेच डोळे , तीच स्वप्नं , रोज तीच नाईट तेच तेच लाईफ साला रोज तेच लाईफ चिंधीचोर मेन्टॅलिटी .. आभाळाचे ड्रीम खाण्याआधी वितळणारे जणू आईसक्रीम मरणं आहे ड्रेड्फुल आणि जगणं सुद्धा स्केरी जाऊ कुठे , सांगु कुणा आयुष्याची स्टोरी सेम प्लेस , सेम ग्राऊंड , सेम तीच फाईट तेच तेच लाईफ साला रोज तेच लाईफ वैभव !!!
|
वैभवा... सुरेख रे,नेहमीप्रमाणेच ( पण मध्यतरी कुठे गायब होतास रे )
|
Mmkarpe
| |
| Friday, February 24, 2006 - 9:27 am: |
| 
|
वैभव लाइफ एकदम टचिंग क्लासच....!
|
Shyamli
| |
| Sunday, February 26, 2006 - 6:50 am: |
| 
|
भेट...? रोजच भेटणे रोजच रुसणे रोजच असतात नवे बहाणे.... आज काय मीत्र आलाय आत्ता येतो तु थांब मी मात्र जातोय जरा लांब... मी आहेच रे! तु मात्र ये! जाती वाट येती करुन घे असे,म्हणले की येतो कळवळा डोळ्यातुन वाहतो भळाभळा... सांग ना राणी कशी मला भेटशील पहीली वहीली भेट आपुली कशी साजरी करशील.... भेटला की मात्र भरभरुन वाहतो माझ्या डोळ्यात स्वत्:ला पाहतो.. हे बघुन मी जाते हरकुन तो मला कटवतोय हेही जाते विसरुन..... श्यामली!!!
|
शामली, एकदम सही, सुरेख कविता.
|
संकटांची गर्दी ते आले, ते आले ओकत गरळ, घालत गोंधळ माजवत हल्कल्लोळ, घेउन पेटता लोळ.... बघे म्हणाले, आता तु जिंदगी आवर मी मनाला म्हणाले तु सावर घे धाडकन उडी त्यावर....... माझ्या अचानक प्रतीहल्ल्याने ते बावचळले, धुम पळाले, आणि निखारे निवले संकटांचा अग्नी शांत झाला आणि लोकं म्हणाले देव पावला!!!
|
|
|