Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 14, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » काव्यधारा » झुळूक » Archive through February 14, 2006 « Previous Next »

Sparsh
Friday, February 10, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोले तैसा चाले
त्याला हे जहरी जग डसले
पण त्यातुनही जो वाचला
त्याने यशाचे शिखर गाठले


Rupali_rahul
Friday, February 10, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडुनही एका छोटासा प्रयत्न....

यशोशिखरावर असुनही
मनाला त्याचा आनंद नाही
तुझ्याविना सर्व व्यर्थ
जगण्यालाही अर्थ नाही
जगण्यालाही अर्थ नाही....

रुप


Shyamli
Friday, February 10, 2006 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा! रुप! मस्तय.. .. .. ..

Sparsh
Saturday, February 11, 2006 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या जाण्याचे दु:ख
कधीच वाटले नाही
वाईट याचेच वाटते कि
तु मागे वळुनही पाहत नाहीस....


Gharuanna
Saturday, February 11, 2006 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaLUna maagao phaNao sahja Xa@ya hÜto
kaLjaI maaJaIca malaa mana tabyaat navhto


Gharuanna
Saturday, February 11, 2006 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tUJyaa vaodnaolaa Xabdacaa paJar Aaho saBaÜvatI maa~ maJyaa gaVacaaca vaavar Aaho

Nilyakulkarni
Saturday, February 11, 2006 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मनात असुनही माझे
पाउल तुज़्याकडे येउ शकत नाही
फक्त एवढ्याचसाठी सख्या मी......
मागे वळुन पाहिले नाही


Sparsh
Monday, February 13, 2006 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ही आता तुझ्यासारखंच मनसोक्त जगायच ठरवलंय
तु आहेस...ठिक आहे, नहीस...तर विसरयचं ठरवलंय
खुप केलं आजवर, तुझी उणीव, तुझी उणीव
पण तुच परकं बनवल्यावर मी ही अनोळखी व्हायचं ठरवलंय
मी ही आता तुझ्यासारखंच मनसोक्त जगायच ठरवलंय
तुझं नाव लिहीण्याची सवय अजुन गेली नाही
तुझी जागा अजुन मी दुस-या कुणाला दिली नाही
पण खुप वाट पाहिल्यावर, मी हि वाट बदलायचं ठरवलंय
मी ही आता तुझ्यासारखंच मनसोक्त जगायच ठरवलंय
मी ही आता तुझ्यासारखंच मनसोक्त जगायच ठरवलंय...!


Shyamli
Monday, February 13, 2006 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विभा,
वा वा काय मस्त लिहिलय
अगदी छानच


Shyamli
Monday, February 13, 2006 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विभा तुझी परवानगी आहे अस समजुन,

सोडुन सोडुन तु जाणार
आणि मी का म्हणुन कुढायच
मी पण आता ठरवलय
तुझ्या माझ्यातल गुपित तसच ठेवायच
आणि तरीपण मस्त जगायचय

श्यामली!!!
चुक दुरुस्त केलिये ग!


Sparsh
Monday, February 13, 2006 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद श्यामली
फक्त वीभा असं नाही विभा' असं लिही....


Meenu
Monday, February 13, 2006 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवण

जेव्हा जेव्हा पाऊस पडेल
तूला माझी आठवण येईल
जेव्हा कोणी पावसात भिजेल
तूला माझी आठवण येईल
पावसात भिजलेल ओलं पाखरु
जेव्हा कधी पंख झटकेल.....
तूला माझी आठवण येईल
तूला माझी आठवण आलेली मलाही कळेल....
ओल्या मातीचा सुगंध होऊन मी तूला भेटायला येईन
तूझ्या श्वासांमधून भरुन तूझाच अंश बनुन जाईन...............


Meenu
Monday, February 13, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवण

आठवण काय कोणाचीही येते
लाडक्याची दोडक्याची
आवडत्याची नावडत्याची
रोजच्या रस्त्यावर ठरविक वेळी दिसणार्‍या माणसांचीही
आपल्याला जो विसरुन गेला अशा सुद्धा मित्राची
आठवण काय कोणाचीही येते.....



Meenu
Monday, February 13, 2006 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी कधी...

अचानक कधी कधी ओळखीचा गंध येतो..
आणि मला परत भूतकाळात घेऊन जातो
नव्या कंपास पेटीचा, खोडरबराचा वास मला
छोट्या शाळेतल्या बाकावर घेऊन जातो...

कधी कधी परत तीच ती वेळ येते..
आणि मला भूतकाळात घेऊन जाते
दुपारी बारा वाजता मराठी गाणी लागतात
आणी बाबांच्या शेजारी बसून जेवताना प्यायलेल्या,
ताज्या ताकाची चव परत एकदा जिभेवर रेंगाळते
अगदी आत्ताच ताक प्यायल्यासारखी.......



Vaibhav_joshi
Monday, February 13, 2006 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु ... तुमच्या ह्या आधीच्या आणि ह्या पुढील सर्व कवितांना एकच अभिप्राय ... सुंदर !!! तुमच्या सर्वच कवितांमध्ये भावनांची प्रामाणिकता आणि उत्कटता हमखास आढळते अन ह्यापलिकडे मला तरी सुंदर कवितेची दुसरी व्याख्या माहीत नाही ... कवितेच्या बीबीवर टाकल्या तर बरं होईल ...

Shyamli
Monday, February 13, 2006 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय होतय ते कळत नाहिये?
कळाल तरी वळत नाहिये
कळुन वळुन काय ऊपयोग?
सत्यात जर येणारच नाहिये

श्यामली!!!


Pkarandikar50
Monday, February 13, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, खरोखर सुन्दर कविता.
बापू.


Nilyakulkarni
Monday, February 13, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु छानच आहेत सर्व अगदि मोजक्या शब्दात
मांडलस बघ सार


Marathimanasi
Monday, February 13, 2006 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, खरोखर सुन्दर कविता.सुरेख!

Sparsh
Tuesday, February 14, 2006 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच्या दिवशी मला तुझ्याकडे
एक मागणं मागायचंय
माझ्या नावानंतर मला
तुझं नाव लिहायचय



Meenu
Tuesday, February 14, 2006 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी....मानसी तु काय लिहील आहेस ते मला दिसत नही नुसते चौकोन दिसतात अस कशामुळे?

वैभव,

लिहायला घेते तेव्हा एखाद दोनच ओळी डोक्यात असतात आणि प्रत्यक्ष लिहीताना एकदम बाकीच्या सुचत जातात आणि त्यामुळे माझा बीबी चुकतो पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मी योग्य बीबी वर टाकायची काळजी घेईन


Niru_kul
Tuesday, February 14, 2006 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी राजा तुझ्या मनाचा,
तू माझ्या स्वप्नाची राणी;
मी चन्द्र शीतल या नभीचा,
तू माझी ध्रुव चान्दणी.

पार्थसारथी.....


Jayavi
Tuesday, February 14, 2006 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निल्या, मीनू, श्यामली, मस्त !! और आने दो..... :-)

Shyamli
Tuesday, February 14, 2006 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न जाणो कशी मी
तुझ्यात अडकत गेले
तुझ्या माझ्यात जे घडले
ते नात्याच्या पलिकडले


श्यामली!!!


Shyamli
Tuesday, February 14, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंग गंध ताल लय
सगळ तुझ्यातच एकवटलय
जाणिव फकत तुझ्या असण्याची
तिथेच मन नादावलय


श्यामली!!!


Vaibhav_joshi
Tuesday, February 14, 2006 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह ! श्यामली , सुरेख ....

Sparsh
Tuesday, February 14, 2006 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उठतंय बसतंय
थांबतंय पळतंय
तुझ्या प्रेमात माझं मन
असं वेड्यासारखं करतय!!


Shyamli
Tuesday, February 14, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी अडकत डोळ्यात
कुणी अडकत ओठात
माझ मात्र मन
अडकतय तुझ्या शब्दा-शब्दात!

श्यामली!!!


Pama
Tuesday, February 14, 2006 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, ही तुझ्यासाठी..:-)

डोळ्यांच्या कडांना,
थेंबांच कोंदण,
आठवणींत भिजतय,
मनीच आंगण..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators