Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 14, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through February 14, 2006 « Previous Next »

Paragkan
Wednesday, February 08, 2006 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह ninavi ... खासच!

Ninavi
Wednesday, February 08, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, दोस्त्स.
वैभव, जपमाळ घे हवीतर, पण लेखणी ठेवू नकोस बाबा!
अनघा, सूपरमॉम, आवडल्या कविता खूप.
गिरी, कविता मस्तच. पण नावाचा ( श्रुतयोजन) अर्थ नाही कळला.


Seema_
Wednesday, February 08, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सुंदर लिहिता रे तुम्ही लोक
निनावी sm प्रसाद,वैभव,गिरिराज,मेघा,अनघा सगळ्यानिच सुंदर लिहिलय. किंबहुना हे पानच सुरेख आहे अगदी


Ninavi
Wednesday, February 08, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाषांतर...

त्याला खरंतर म्हणायचं होतं..
' प्रिये, माझं कित्ती प्रेम आहे तुझ्यावर !!'
पण म्हणताना तो म्हणाला,
' हा काय ड्रेस घातलायस आज !!!'
आणि मजा म्हणजे तरीही तिला
ते न म्हटलेलं वाक्यच ऐकू आलं..
कारण परवाच तिनेही नाही का
' ए, तू मला कित्ती रे आवडतोस' चं ' भाषांतर'
' मी मुळी आता बोलणारच नाहीये तुझ्याशी..!!'
असं केलं होतं...!!


Hems
Wednesday, February 08, 2006 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि , दोन्ही कविता जबरदस्त !

Dineshvs
Wednesday, February 08, 2006 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि, मागणी मान्य झाली तर !

Priyasathi
Thursday, February 09, 2006 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घर झालंय वादळशान्त...
सुन्या झाल्यात भिन्ती
संवाद गेलेत हरवून...
आणि मुकी झालेत नाती. १
येण्या-जाण्या पुरतंच...
काम उरलंय दाराचं
सोफा खुर्ची याना....
ओझं झालंय भाराचं. २
स्वयंपाकघरात फोडणीचा....
दरवळत नाही वास
आणि कुणासाठी कुणाचा
इथं अडकत नाही घास. ३
दिवाणखाना वाट बघतोय....
आता कुणाचं पाऊल येतंय
घर भयाण शान्ततेची
कळत नकळत चाहूल देतंय. ४
आता घरच येईल प्रत्येकाच्या..
अंगावरती उसळून
भिन्ती शाबूत असूनसुद्धा...
छप्पर जाईल कोसळून. ५
कोन्डलेल्या भावनाना त्याआधीच...
मोकळी वाट करावी लागेल
घुसमट होत राहिली तर...
वेगळी वाट धरावी लागेल. ६
देवा अशी घरघर...
माझ्या घराला लागू नये
घरानेच शेवटी आधारासाठी....
दुसरं घर मागू नये. ७
प्रेम जिव्हाळा, आपुलकीनं...
ओथंबलेलं घर हवं
प्रत्येकाला आधारासाठी...
आपलं असं घर हवं. ८

गुरुराज गर्दे.
मोबा.९२२५५२२९८८



Bee
Thursday, February 09, 2006 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, तुला छांदोबद्ध कविता कशा काय जमतात लिहायला? खूपच गेय असतात तुझ्या कविता. काही खास अभ्यास वैगरे केला आहेस का?

Zaad
Thursday, February 09, 2006 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वळ

त्या दिवशी प्रथमच माझा
आवाज चढला होता
बोलामधला शब्द कडू पण
घशात अडला होता.

त्या दिवशी प्रथमच त्यांनी
नमते घेतले होते
वडिलपणाचा अर्थ समजले
महान केवढा होता.

दो पिढींच्या उंबर्‍यावरती
आई उभी कायमची
जिथे तिच्या अंगठ्याचा फक्त
वळ उमटला होता.


Hems
Thursday, February 09, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाग

आतल्या आत मिटून जाणं
स्पष्ट दिसतं तेव्हा ,
मिटलेले असतात डोळे ....

बंद डोळ्याआड
दिले , घेतलेले
कळत नकळते वार
हलक्या हातांनी झाकलेले व्रण
काही विसरलेले क्षण
काही न झेललेले पण ..
पण उघडतात डोळे आणि
वास्तवाच्या प्रकाशात
उजळून निघतो अपेक्षाभगाचा अंधार
तेव्हा किती चिमुकल्या भासतात आकांक्षा
चिमुकलेच कोसळतेपणाचे अंगार

एका हलक्या निश्वासाने मग
समजूत पटते मनाची
उध्वस्त वाटतं
..... आणि डोळे उघडतात ,
तेव्हा किमान एवढी जाग
आलेलीच असते !!


Ninavi
Thursday, February 09, 2006 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्यासवे...

लोचनांत जी उभी, तुझीच आसवे
रडायचे, हसायचे अता तुझ्यासवे

समजती मला कुठे हिशोब येथले
पदोपदी फसायचे अता तुझ्यासवे

रोज झेलुनी नवीन घाव अंतरी
जगावरी रुसायचे अता तुझ्यासवे

वेदनेस शब्द सूर ताल देउनी
कवन हे रचायचे अता तुझ्यासवे

वावरायचे असे कुठे न गुंतता
नसूनही असायचे अता तुझ्यासवे...


Paragkan
Thursday, February 09, 2006 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है Hems !!!!!

zaad: खासच!


Lalu
Thursday, February 09, 2006 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड, आवडली. निनावी, हेम्स छानच. हेम्स, ती ' पागोळ्या' टाक की गं पुन्हा.

Shriramb
Thursday, February 09, 2006 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


निनावी, सुंदर रचना! ...


Ninavi
Thursday, February 09, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड, हेम्स, मस्त.

सर्वांना अभिप्रायाबद्दल धन्यवाद.


Sarya
Thursday, February 09, 2006 - 10:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड, हेम्स, निनावी छान कविता. रुसायचे??? की रसायचे...!

Zaad
Friday, February 10, 2006 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, हेम्स...खूपच सुंदर!
मडळी, अभिप्रायाबद्दल धन्यवाद!


Priyasathi
Friday, February 10, 2006 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी नवीन कविता
दि.२५ जानेवारी ते ०९ फेब्रुवारी दरम्यान झालेली...
कवितेचं शीर्षक ३४;आईबाप&#३४;

माझ्या ह्रदयाचे दोन
कप्पे आज मी खोलतो......
एक आई, एक बाप
त्यांच्याविषयी बोलतो....१


Giriraj
Friday, February 10, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि,मी ऐकलेल्या एका कवितेवरून inspired म्हणून श्रुतयोजन... श्रुत = ऐकलेले, योजन = योजलेले!

अनिलभाई,काय नव्या लोकांना इकडे तिकडे पहायला लावतात हो!

दिवा घ्या = हलकेच घ्या!


Anilbhai
Friday, February 10, 2006 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिर्‍या,
येथे बघ

विडंबन तुझ्यासवे.. :-)

Ninavi
Friday, February 10, 2006 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई,
तुमचं हे अंग ( ढापण हो!) माहीत नव्हतं हां!!

Pkarandikar50
Saturday, February 11, 2006 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, तुझी गझल आणि कवितेविषयीचे विचार दोन्ही सही.
बापू.


Pkarandikar50
Sunday, February 12, 2006 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


रहाटगाडगे

कधी कधी माझीहि होते तलखी,
वाटते,आकण्ठ पिऊन टाकावा गारवा.
घटाघटा आवाज निघेपर्यन्त,
गळ्याचा मणी खालीवर करावा.

हवाहवासा वाटतो रश्शीचा विळखा,
गच्च आवळून घ्यायचे स्वत:ला.

अलगद उतरण्डीवर घसरायचे,
डुबक्या मारायच्या मनसोक्त.
भरभरून डचमळायचे,
शिन्तोडे मिचकावत डुलायचे.
पोटुशा बाईसारखे जड होईपर्यन्त,
हेलकाण्डत, भेलकाण्डत, मुरडायचे.

खाली पाहिल्यावर भोवळ यावी,
इतके वर वर चढायचे.

पुन्हा रिते होण्याकरता.
पहायचे आपलेच ओघळ,
जमिनीत शिरून खोलवर,
दिसेनासे होईपर्यन्त.

बापू.


Sarya
Monday, February 13, 2006 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-)                

Atul1
Monday, February 13, 2006 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया

मला तू हे केल तर आवडतोस
मला तू ते घातल तर आवडतोस

मला तू असा पाहिजेस
मला तू तसा पाहिजेस

हा माज़ा मी' चा पाढा
कारण मला तू माज़्या पेक्शा ऊन्च पाहिजेस!


Zaad
Tuesday, February 14, 2006 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

---------------------------------------------
सुकलेल्या ओठाला विचार
कहर सरत्या बहराचे
तुटलेल्या ता-याला विचार
श्वास ढळत्या प्रहराचे

सुकलेल्या ओठामध्ये त्या
असा पुन: विरघळलो मी
तुटलेल्या ता-यासम त्या
तुझ्यात पुन: निखळलो मी.


Meenu
Tuesday, February 14, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोध

माणसं किती वेंधळी असतात
सतत काही ना काही हरवतात...
पेन, पाकीट, चप्पल, किल्ली.........

काही असतात अजब वल्ली
जी स्वत:लाच हरवून बसतात
जन्मभर शरीराचं ओझं बाळगतं
स्वत:लाच शोधत बसतात






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators