Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 09, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » काव्यधारा » काहीच्या काही कविता » Archive through February 09, 2006 « Previous Next »

Vaibhav_joshi
Wednesday, February 01, 2006 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणीतरी आठवण काढतंय ...

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय , बाकी काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
" एका " सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव .. आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय , बाकी काही नाही

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय , बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत , डोळे पुसत , पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला , सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही

" कुणीतरी आठवण काढतंय ....
बाकी काही नाही ... "



वैभव !!!


Deemdu
Wednesday, February 01, 2006 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दांचे वैभव
-- -- -- --


Shyamli
Wednesday, February 01, 2006 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हे काहिच्या काही मधे का रे टाकलयस!!
किती सुन्दर आहे लिहिलेल सगळच!!!!!


Devdattag
Wednesday, February 01, 2006 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव इथे का रे?

Meghdhara
Wednesday, February 01, 2006 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव प्रत्येकाला आपली वाटतील अशी क्षणचित्रं!

यावेळी वैभव इन पाडगावकर फ़ॉर्म!

मेघा


Jaaaswand
Wednesday, February 01, 2006 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा...वैभवा..
अशक्य... अफ़ाट... अफ़लातून



Hems
Wednesday, February 01, 2006 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव , क्या बात है !

Ramachandrac
Thursday, February 02, 2006 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा, कुणीतरी तुझी आठवण काढत आहे, ( अरेSSS मी तर न्हवे???)

Meenu
Thursday, February 02, 2006 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो आला
त्यान पाहिल
समोरुन येणार्‍या सन्कटाना पाहुन त्याला आथवला अर्जुन आणि माश्याच्या डोळ्याच लक्क्ष्य
आव्हानाना सन्कटाना न जुमानाता तो मार्गक्रमण करत राहिला त्याच्या ध्येयाकडे
आणि.......................
आणि काय?....
ज़हालि धडक...............

ambulance मधुन त्यान hospital गाथल तडक



Vaishali_hinge
Thursday, February 02, 2006 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनात असते आग
जरी बाहेर फ़ुलली आसते बाग...

वाटते पेट्लाय गुलमोहर
जळतेय ती जास्वंद
कडवट तोंड करते करवंद....,
कारण मनात असते आग जी पेटवते बाग...

कुणी न मजला या जगात
संशय घेइ मि प्रत्येकाचा
दुधवालाही वाटे आज मला अतीरेकी
जेव्हा गुरखा पसरतो हात फ़क्त बीस रुपये दो शाब,
त्याचाही ठेवला जात नाही आब
कारण बाहेर जरी फ़ुलली बाग मनात असते आग...

सावलीची सोबतही नकोशी वाटते,
उग्गाचच पिल्लालाही मी दाटते...
शेजारी वाटतो पाकिस्थानी
सगळे मित्र वाटतात कारस्थानी....
कारण जरी बाहेर फ़ुलली आसते बाग मनात असते आग..

बोस मारतो बोंब
उठतो आगीचा डोंब
जळुन जातो मनातला हिरवा कोंब
आणता येत नाही सुखाचे सोंग
कारण......................................


Prasadmokashi
Friday, February 03, 2006 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" मी " चा " मी " शी संवाद

शब्दजुळवा :
शब्द खूप साठलेत....
काय करायचे ?
चल कविता करू ...
साहित्यिकांच्या जत्रेमधे
आपलाही एक झेंडा धरू ...

" आकाश " ला " प्रकाश "
अगदी sss... मस्त जुळतंय.
" रंग " ला " ढंग " चालेल ?
चालेल काय, चांगलं जोरात पळतंय.

आजकाल कवितांना
मागणी सुद्धा बरी आहे,
च्यायला, कोण बघतय
ती काव्यप्रतिभा काळी का गोरी आहे ?

कवी :
अरे,
अगदी उतरवायचीच म्हटल्यावर
भावनांचीही कमी नाही,
पण ती भावना तुझीच असेल
याची मुळीच हमी नाही

काळ्या अक्षरांनी कागदं भरतील
पण सांग तुझे मन भरेल ?
काळाच्या नदीत बुडवल्यावर
तुझ्यातला तुकोबा वर तरेल ?

वाहवा मिळेलही मित्रा
पण समाधान मिळणार नाही,

" आतल्या " माणसाची हाक जोवर
कवितेत झरणार नाही .....

~ प्रसाद



Vaibhav_joshi
Friday, February 03, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह ! प्रसाद खरंतर असं लगेच तुझ्यानंतर लिहीण्याचं धाडस करू नये पण कवीच्या मनस्थितीचा आणखी एक angle लिहून सगळ्यांनाच तीन दृष्टीकोण एकत्र वाचायला मिळावेत एवढीच माफक अपेक्षा आहे ...

सर्कस

बहुधा आता सुचणार नाही काही
किंवा कोण जाणे ... सुचेलही काही
प्रयत्न करायला काय हरकत आहे
तशी रोजची ...
अंगवळणी पडलेली कसरत आहे

कुठल्यातरी अज्ञात भावनेला छेदत
शब्दांच्या झोक्याकडे ... झोकून द्यायचं
आजवरच्या पुण्याईला स्मरत
अर्थाच्या दांडीला हमखास धरायचं

खाली बघायचं नाही
खोल खोल भिती साठते
प्रशंसेची जाळी
हटेल असे का वाटते

ह्या झोक्यावरून त्या झोक्यावर
फेकत रहायचं स्वतःला
हवेत गिरकी घेताना , टाळी वाजवून
खुष करायचं स्वतःला

सवंगड्याचा हात समजून
लेखणीस धरायचं
एकेका शब्दझुल्यावर दोघांनी
विश्वासाने झुलायचं

कधीतरी सवंगड्याचा
हात सुटणारच अन ...
कंठाशी येणारच प्राण
पण तोपर्यंत तरी
द शो मस्ट गो ऑन ...
द शो ...
मस्ट गो ऑन ...


वैभव !!!





Devdattag
Friday, February 03, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद आणि वैभव.. धन्यवाद
खरंच बरेच दिवस असंच वाटत होतं.लिहीत होतो पण मनाला रूचत नव्हत.म्हणून कविता विभागात काही टाकलं नाही.ठरवलय मनाला पटल्यावरच टाकीन पुढचं काही. नाहीच तर झुळूक आहेच.


Meenu
Friday, February 03, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, वैभव फारच सुंदर......

Sarya
Friday, February 03, 2006 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा प्रसाद, वैभव क्या बात है!!! पण दोघांनाही हे इथे का टाकावस वाटल? असो माझाही एक ताजा प्रयत्न बघा...

Sarya
Friday, February 03, 2006 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

     जोकर

एका अंधार्‍या खोलीत जातो; बसतो
माजघर म्हणा हव तर!
समईची ज्योत सारखी करून,
सुस्कारा सोडतो ऑक्सिजनचा...
कळीकडं बघता बघता पेंग येतेच -
मग उठायच जडशीळसं; आणि -
घ्यायचा पेन हातात, तशी वही सुद्धा...
उघडायची आठवणींची वही आणि
उतरवायच सगळं इकडून तिकडे...
कविता कविता काय करता?!
आयुष्याच गाणं बोटांवर नाचू लागलं
की मग मी रडायला मोकळा होतो.
दिसू लागतो हळूहळू मी: भंगलेल्या समाधीसारखा.
कोणीतरी ट्युब लावली की लगेच
वास्तवाची जाण होते.
पुन्हा शिरतो मी भुमिकेत सरळ
डोळ्यांवरची मरळ बनू लागते हुरळ!
थोड्या यंत्रवत हालचाली,
चित्रविचित्र संगीत आणि डोक्यात गाणं
" ये सर्कस है शो तिन घंटे का... "
नंतर सगळं रंगांमध्ये विरळ...
जोकर सगळ्यांनाच घालतो भुरळ.

सारंग


Vaibhav_joshi
Friday, February 03, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त .... हा काहीच्या काही चाच BB आहे ना ? टाकायची रे . सगळे आपलेच लोक आहेत ना इथे ?
सारंगची वाचल्यावर तर मलाही जाणवून गेलं की आपण टाकायला नको होती .
मस्त रे सारंग ! मित्रा , अतिशय खिन्न करून गेली तुझी कविता ...


Devdattag
Friday, February 03, 2006 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग मस्तच रे भो..
हटस् आॅफ़..


Shyamli
Friday, February 03, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय चाललय तुमच
ह्या BB च नाव काहीच्या काही कविता आहे ना?

का काही सुन्दर कवीता अस आहे

प्रसाद वैभव आणि सारंग मस्तच..........


Pama
Friday, February 03, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, वैभव आणि सारंग.. खूप सुंदर!!!!:-)
खरच, इथे का पण? या काहीच्या काही नाहीत कविता..


Meenu
Friday, February 03, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव नावाचा अजब गारूडी
बसला आहे म्हणतात वर
त्याच्या करमणुकीसाठी तो आपल्याला
नाचवतो जर
त्याच्याकडूनही का घेऊ नये करमणूक कर

साहेबाचा डोळा त्यानं कसा चूकवला?
स्वर्गामध्ये देऊन जागा
त्यानं साहेबाला पटवला


Neelu_n
Friday, February 03, 2006 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, कुणीतरी आठवण काढतंय .... एकदम मस्त... पण काहीच्या काही नक्कीच नाही:-)खरच.. पाडगावकारंच्या कवितांची आठवण झाली.
प्रसाद संवाद पण छान आहे.



Ninavi
Friday, February 03, 2006 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, प्रसाद, ' सर्कस ' आणि ' संवाद ' चा बीबी चुकलाय असं नाही वाटत?
अप्रतिम खरंच!!
सारंग,
I rest my case. मेल टाकल्ये.

Sarya
Saturday, February 04, 2006 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, ही लिंक तुझ्यासाठी खास!
इथे... मी लक्तरे हा शब्द वापरला आहे!!! आणि नशीबाने ही पोस्ट अजुन इथेच आहे. कारण बी बी चुकला होता:-(:-) आता काय म्हणशील? तारीख २००३ मधली आहे, म्हणजे ती कविता मी २००३ नंतर तर मुळीच लिहिली नाहीये. हो ना?
परत एकदा...

बींब - प्रतिबींब

मीच माझे बींब त्यांच्या बाहुलीवर पाहिले
अंतरंग प्रतिबींब माझे काळजातच राहिले

वेदना अन यातना तुच त्या वाहु दिल्या
मीही माझ्या लक्तरांना भार म्हणुनी वाहिले

जीविताची हाक आणि वास्तवाचा कोंडमारा
मीच त्यांचे चाबकाचे घाव पाठी साहिले

रात्र झाली आज तरिही वाट पाहे मी उद्याची
वेळ दवडाया उगाचच तेच गाणे गायिले


Kshipra
Saturday, February 04, 2006 - 1:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, अगदी उतरवायचीच म्हटल्यावर हे कडवे विशेष आवडले.

मनात आलेले दोन विचार

आतल्या मी चा आवाज ऐकण्याआधी आपल्या मनात लपलेली अनेक हिंस्त्र श्वापदे बाहेर काढायला लागतात. मग त्या आतल्या माणसाचा आवाज ऐकु येतो

दुसरे म्हणजे अजूनही आपण आत्मिक समाधानापेक्षा लौकिक अर्थाचे यश जास्त महत्वाचे मानतो. त्यामुळेही कधी कधी आतला आवाज ऐकुनही न ऐकल्यासारखे करतो


Mmkarpe
Saturday, February 04, 2006 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


परतताना मळ्यातुन आमची भेट झाली चुकून
चोरुन पाहत होती ती दडुन पानाआडुन

मिळाली नजरेला नजर झाली किमया अफलातुन
उतरत गेली मनात ती अलगद डोळ्यातुन

मी न राहिलो माझा त्या क्षणापासुन
टाकला जीव मी तिच्यावर ओवाळुन

उल्लेख तिचा माझ्या प्रत्येक गोष्टीत आवर्जुन
झोपेतही सतावते येवुन रोज स्वप्नांतुन

भेटिगणिक भिनत गेलीय ती अंगाअंगातुन
रक्त बनुन लगलिय वहायला आता रोमारोमातुन


Ninavi
Saturday, February 04, 2006 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, ' लक्तरे ' च्या आरोपातून ' बाइज्जत बरी '
आणि बाकीच्यांसाठी benefit of doubt दिला असं मी घोषित करते.
हा तुला स-आदर अर्पण
मला इथे दिवे द्यायची ( आणि लावायची ) बरीच सवय झाली आहे.

Prasadmokashi
Wednesday, February 08, 2006 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षिप्रा, तुझे दोन्ही विचार अगदी मनापासून पटले

Meenu
Thursday, February 09, 2006 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण आलात बर वाटलं
अजून तुपल्यामपल्यातलं प्रेम नाही पुरतं आटलं
जीर्ण झालं, विटलं कापड...
पण नाही अजून पुरतं फाटलं

वीटेल ते, फाटेल ते, आटेल ते....................

पुरतं आटुनही उरलं जर खाली काही
तुपल्यामपल्या नात्याची तीच तर कमाई




Meenu
Thursday, February 09, 2006 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता ऐक थोडे माझे
डोक्यावरचे उतरव ओझे
हो मस्त हलकफुलका....

घे आता कागद पेन
अरे! थांब... थांब......
झालास ना पुन्हा सुरु?
लागलास ना कविता करु?
यमक, उपमा, अलंकाराची करु नकोस कसरत सुरु...

ऐक माझे विसर कविता
आता मार कागदावर मस्त मस्त रेघोट्या
वाट्टेल तशा मार रेघा
आडव्या उभ्या गोल गोल...
भरुन टाक कागद आख्खा

समजु नकोस हे फोल
याचेदेखील आहे मोल

बघ.. बघ नीट त्या चित्राकडे...
मनावरचे तुझ्या सारे उमटलेले दिसतील तडे


Meenu
Thursday, February 09, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐक जरा थोडे माझे
उतरवून तर बघ ओझे
हो मस्त हलकाफुलका.......

तापलेल्या चर्चेमध्ये तू घे मस्त डुलका
विसर मुद्दा
विसर हुद्दा
वरती हास खदाखदा

ऐकून तर बघ माझे
उतरवून बघ ओझे
विसर आता सारा गलका हो मस्त हलकाफुलका...

बोल तुझ्या मनातला बोल
जाऊ दे गेला तर तोल
लागू दे लागला जर बोल

विसर जन
विसर तन, मन आणि धन

हो मस्त हलकफुलका
हो मस्त हलकफुलका......


Meenu
Thursday, February 09, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ्री फ्री फ्री

भूकेल्याला रोटी फ्री
खेळणार्‍याला गोटी फ्री
दांडू असेल तुमचा तर
आमच्याकडून वीटी फ्री.................

चिडणार्‍याला आठी फ्री
भांडणार्‍याला लाठी फ्री
रडणार्‍या बाळाला मात्र
घट्ट घट्ट मिठी फ्री................


Ninavi
Thursday, February 09, 2006 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, जवाब नही!!! सिक्सर मागून सिक्सर!!

Zaad
Thursday, February 09, 2006 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, दोन्हीही कविता केवळ अप्रतिम...
म्हणून आमच्याकडून
लिहीणार्‍याला पाटी फ्री!!!


Hems
Thursday, February 09, 2006 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू , " बघ.. बघ नीट त्या चित्राकडे...
मनावरचे तुझ्या सारे उमटलेले दिसतील तडे " ...

मस्त ! !





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators