Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 09, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » काव्यधारा » झुळूक » Archive through February 09, 2006 « Previous Next »

Shyamli
Friday, February 03, 2006 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान ग सीमा!!
बयाच दिवसांनी आलीस
क्षण अस लिही kshhaNa


Jaaaswand
Friday, February 03, 2006 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मित्रांनो
थोडा बदल.... विरह वेदनेत :-)

पुरे झाले तुझ्यामुळे
माझे सर्व रडायचे बहाणे
तू नाहीस.. तर अजून येतील
आता माळायचे आहे गाणे

जास्वन्द...


Meenu
Friday, February 03, 2006 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तूझ्या प्रेमाचे उमाळे
आता यायचे थांबले आहेत
आनदाचे सारे सोहळे
आता दिसू लागले आहेत

प्रेमापलीकडेही आहे खूप काही या जगात
आता मला कळू लागले आहे



Meenu
Friday, February 03, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तूझ्या प्रेमात पडले म्हणजे काय झाल
कामामधल लक्ष उडाल म्हणजे का प्रेम झाल
तूझ्याशी बोलताना जीव माझा दडपला
तोंड फक्त उघडलं आवाज मात्र हरपला

दूर तूला पाहूनही पाय लटपटत होते
रात्र रात्र मी फक्त कूस बदलीत होते

हे कसल भलत सकट
कशी मी सामोरी जाऊ
गालावरल्या लालीला पावडर तरी कीती लाऊ

वैर्‍यावरही कधी अशी वेळ येऊ नये
लग्नानतर स्वप्नातला तो राजकुमार भेटू नये
भेटला जर चूकुन तर चूकुनही सामोरे जाऊ नये


Meenu
Friday, February 03, 2006 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जळो मेलं ते प्रेम
ज्यानी मला जाळलं
फुंकुन ताक पीतानाही
जसं तोंड पोळलं


Devdattag
Friday, February 03, 2006 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, वैभव आणि सारंगच्या काहिच्या काही नसलेल्या काहिच्या काही कवितांवरून मला माझीच एक जूनी चारोळी आठवली.

शब्द जंजाल सोड आता
अरे, महत्व अर्थास आहे
गीता.. सार जीवनाचे
जाण त्याची पार्थास आहे


Pama
Friday, February 03, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, छान लिहिताय.. हाही angle आहेच.. :-)
मीनू.. छान लिहितेस..


Pama
Friday, February 03, 2006 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण म्हणत प्रेम बीम सार झूठ आहे,
आयुष्य जगण्याची ही कुठली रीत आहे?
प्रेमभंग झाला तरी त्यातही सुख आहे,
विरहामधे झुरणे ही प्रेमाची जीत आहे..


Jaaaswand
Friday, February 03, 2006 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रीतीबद्दल शंकाच नाही
मला प्रियेची चिंता आहे
ज्योती तर तेवायचीच आहे
दिवा हा मिणमिणता आहे

जास्वन्द...


Devdattag
Friday, February 03, 2006 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वन्दा..प्रीती, प्रिया आणि ज्योती? :-)

अरे ही प्रीयेची चिंता तूझी अकारण आहे
आज तुझ्याकडे उद्या कूणाकडे प्रीती तिची तारण आहे :-)


Pama
Friday, February 03, 2006 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओंजळ धरली दिव्याभवती,
जेव्हा दोन्ही हातांची..
लख्ख प्रकाश उजळून गेली,
मिणमिणती ज्योती..


Meenu
Friday, February 03, 2006 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तूझ्या प्रीतीमधे अशी काही मी जळले
सरणावर जळाया आता सांग काय उरले


Jaaaswand
Friday, February 03, 2006 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पमा, मीनू मस्तच


कळेल का ग कधी तुला
उद्देश माझ्या जळण्याचा
अंधाराची तमा तर नव्हतीच
सूर्य होता जागवायचा

जास्वन्द...



Jo_s
Friday, February 03, 2006 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय चाललय
नुसती जाळा जाळी
येउदे जरा मंद
गारव्याची झुळूक ओली



Sparsh
Saturday, February 04, 2006 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या गरम श्वासांशी
जेव्हा माझे नाते जुळळे
ख़र सांगु, शहारे काय असतात
हे तेव्हा मला कळळे...

हि झुळुक कशी आहे?


Dilippwr
Saturday, February 04, 2006 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा हे मात्र अगदि खर आहे. बरे

Yogi050181
Saturday, February 04, 2006 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि झुळुक स्पर्श करुन गेलि...

Dilippwr
Monday, February 06, 2006 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुतु हिरवा होताना
वाटते हुन्दडावे रानात
वासरु होवुन
ठिपकत रहावे
घनवर्शा चे
तुशार होवुन


Chinnu
Monday, February 06, 2006 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा दिलीप सुंदर आणि हिरवीगार झुळुक!

Sparsh
Monday, February 06, 2006 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवणींवर जगु म्हणतो
पण जगता येत नाही
धुक कितीही मोहक असल तरी
पाऊल पुढे टाकता येत नाही


Dilippwr
Tuesday, February 07, 2006 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिरवा रावा

नभ निळाई
शुभ्र चान्दणे
मन्द गन्धीत हवा
दूर डोन्गरी
नदिकिनारी
शिळ घुमवतो
रावा


Jaaaswand
Tuesday, February 07, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विभा....

तुझ्या चारोळी पुढे......

आठवणींवर जगून आम्हां
धुक्यात नाच-नाचता येते
धुंदीची बेधुंदी आमच्या
स्वप्नांना शिरस्ता देते

जास्वन्द...


Sparsh
Tuesday, February 07, 2006 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण तो पुन्हा हरवुन गेला
येता येता हाती निसटुन गेला
मी राहिले धरुन आस त्या क्षणांची
अन तो सारे क्षण विस्कटुन गेला



Meenu
Wednesday, February 08, 2006 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्यक्त होण अपरिहार्यच असेल तर
व्यक्त व्हावं प्राजक्ताच्या बहरासारखं
सुगंधानं व्यापुन सारा आसमंत
व्यक्त व्हावं सागराच्या घनगंभीर लाटेसारख
प्रत्येकाला अन्तर्मुख करण्यासाठी
व्यक्त व्हाव बरसणार्‍या ढगासारखं
ज्यानी व्हावी शांत सुगंधी तप्त भूमी
नाहीतर रहावं अव्यक्त, मुक उमलण्या आधी
गळुन गेलेल्या कळीसारखं


Jaaaswand
Wednesday, February 08, 2006 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह....मीनू....
भले ... मस्तच आहे एकदम



Meenu
Wednesday, February 08, 2006 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्री

नाही बोललो आपण
हसलोसुद्धा नाही साधं
म्हणून का नाही उरली मैत्री आपली?

जेव्हा कळल मैत्रीच्या सीमारेषा
आता पाळल्या जाणार नाहीत
तेव्हाच वेळं आली होती खरी मैत्री निभावण्याची

त्रास होईल
त्रास होईल एकटीनी डब्यातला घास खाताना

ENJOY नाही करता येणार मस्त जोक तुझ्यावीना
आता नाही खेचणार आपण एकमेकांची
आता जाणवेल पोकळी

पण ते सर्व सहज करता येईल आपली सुंदर मैत्री निभावण्यासाठी.....
आपली सुंदर मैत्री निभावण्यासाठी


Ninavi
Wednesday, February 08, 2006 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, जवाब नहीं!!!! अंतर्मुख केलंस खरंच!

Niru_kul
Thursday, February 09, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नाना नख लावणे,
ही तिची जुनीच सवय;
पण माझी स्वप्नंही आहेत वेडी,
त्याना तिचंच नख हवंय.

पार्थसारथी........


Ninavi
Thursday, February 09, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी राहून जाते योजलेले बोलणे
कधी भलतेच काही ऐकणारा ऐकतो
मला हे पाहताना नवल भारी वाटते
कसा पांगूळगाडा या जगाचा चालतो..?


Lalu
Thursday, February 09, 2006 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भलत सलते का होईना
'ऐकतो' हे काय कमी होतं?
नाहीतर आम्ही ओरडतो एका कानात
दुसर्‍या कानातून बाहेत जातं!




Shriramb
Thursday, February 09, 2006 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


ऐकीवातल्या गोष्टींचं
सगळंच असतं भलतं सलतं
काही जातं हसण्यावारी
काही मात्र भलतंच सलतं



Hems
Thursday, February 09, 2006 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐकलेल्याच किती ऐकावं
किती यावं डोळा पाणी
आपल्याच हाती ठेवावे शर
खुणगाठ मनोमनी


Lalu
Thursday, February 09, 2006 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेम्स, कुठे गायब आहेस गं? :-)
छान लिहितायत. मी उगाच पचकले मधे.


Ninavi
Thursday, February 09, 2006 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू, असू दे असू दे. आम्हाला सवय झाल्ये.

Lalu
Thursday, February 09, 2006 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे दुसर्‍या कानाने सोडून देतेस तर! ~D




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators