सारगा, वाचुन तुझ्या या सुंदर कवीता.... ह्रुदय आमचे प्रफ़ुल्लीत झाले......
|
ऊनपाऊस .... माझं तुझं भेटणं .... जणू ऊन्हाने पावसाला बिलगणं एकाची काहिली काहिली होता दुसरयाने रिमझिम रिमझिम बरसणं दोन अतिशय विरुद्ध अस्तित्वांना एकमेकांना भेटायची अपार ओढ अन समर्पणातही ... स्वतःचे अस्तित्व टिकवायची चढाओढ पण अशी दोन स्वतंत्र अस्तित्वं जोपासतच रंगवायचं असतं .... एक आयुष्य ! त्याशिवाय कसं उमटणार मनाच्या क्षितिजावर .... इंद्रधनुष्य ? वैभव !!!
|
अप्रतिम...................................................तुझ्याअ शेकडो चम्त्कारांना........शेक्डो... नमस्कार अजुन काय सांगणार
|
Ninavi
| |
| Thursday, February 02, 2006 - 9:08 am: |
| 
|
जियो वैभव!!!!! शिल्लक आणि इंद्रधनुष्य... ...व्वा!! तुझी वाट डोळ्यांमधे रेखलेली.. मस्त. पमा, भिन्गरी मस्त आहे. सारंग, प्रयत्न केलास तर यापेक्षा चांगलं आणि original लिहू शकशील.
|
Meghdhara
| |
| Thursday, February 02, 2006 - 9:58 am: |
| 
|
नको रे साचलेले मनातले जरी वाहू दिले नाही म्हणू नको जीवलगा मनी साचलेच नाही स्मरलेले कोरलेले जरी ओघळले नाही म्हणू नको प्रिय सख्या काही स्मरलेच नाही भावविश्वी तडजोडी जरी स्विकारल्या काही म्हणू नको रे मैतरा भाव उरलाच नाही जीव अंकुरला आहे भौत रुप जरी नाही म्हणू नको रे नको रे जीव जडलाच नाही. मेघा
|
Ninavi
| |
| Thursday, February 02, 2006 - 10:05 am: |
| 
|
सोबत एकदा अश्रूंना म्हटलं असे दिवसाढवळ्या येऊन डोळे भिजवू नका चारचौघात असे लाजवू नका.. एकटी असेन घरात तेव्हा करा सोबत अंधारात.. म्हणाले, ' आम्ही तरी काय करू.. एकटी तरी बरी असतेस गर्दीत मात्र फारच एकाकी दिसतेस.... '
|
मेघा आवडली सुन्दर इमोशनल
|
Kandapohe
| |
| Thursday, February 02, 2006 - 8:46 pm: |
| 
|
निनावी सुंदर!! शब्द वैभव! या पुढे आम्ही नुसते वैभव लिहीतो. शब्द तु लिहीत जा. 
|
Sarya
| |
| Thursday, February 02, 2006 - 10:30 pm: |
| 
|
निनावी छान! ओरिजनल लिहायचा प्रयत्न चालुच आहे पण ओरिजिनल म्हणजे मनाला पटेल असच ना की आणखी काही वेगळ??? असो धन्यवाद...
|
Niru_kul
| |
| Friday, February 03, 2006 - 1:52 am: |
| 
|
मेघा छान...... नको रे उत्तम जमली आहे. निनावी.... कविता मस्तच आहे. वैभव...... अप्रतिम.....
|
Pama
| |
| Friday, February 03, 2006 - 8:39 am: |
| 
|
सर्वांना धन्यवाद. पण मला काहीतरी राहिल्यासारख वाटतय मला भिंगरीत..तरी टाकली होती तशीच.. सारंग.. आवडली. वैभव..वा! मस्त!! मेघा.. छान आहे कविता. निनावे.. सही आहे!
|
Giriraj
| |
| Friday, February 03, 2006 - 10:05 am: |
| 
|
विंदांची एक कविता अगदी पिच्छाच सोडेना! सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी सांगू कसे सारे तुला सांगू कसे रे याहुनी शेवटी काहिष्या त्याच रुपात ही उतरून आली......
|
Giriraj
| |
| Friday, February 03, 2006 - 10:16 am: |
| 
|
श्रुतयोजन काळोख माझे भेदूनी तू भेटसी स्वप्नांतुनी ही सोडवेना आस रे जरी सत्य आहे जाणुनी हे स्वप्न माझे नांदते या नयन-सरीतेच्या तटी अवचित येता पूर मग हा गाव जाई वाहुनी वाटे अजुनी रान हे मधुकूजनाने जागते ते स्वप्नखग गेले कुठे बीज आठवांचे पेरुनी नाहीस माझा जीवनी परि प्रेम माझे जाणुनी तू भेटनाऽ स्वप्नांत रे काळोख माझे भेदूनी काळोख माझे भेदूनी! गिरीराज
|
Neelu_n
| |
| Friday, February 03, 2006 - 11:07 am: |
| 
|
मेघा, नको रे सुंदर जमलीय. निनावी, गिरी सुंदर.. वैभव तुला तर कोपरापासुन दंडवत.. तुझ्या शब्द्सामर्थ्यापुढे आमचे शब्द्च फिके आहेत. मागे मी तुला २-३ वेळा विचारले होते.. तु काव्यसंग्रह काढलायस का? नसेल तर जरुर काढ..
|
Supermom
| |
| Saturday, February 04, 2006 - 9:31 pm: |
| 
|
मनमोराने अवचित, फ़ुलवावा रंगपिसारा चांदण्याच्या तनूवर उठे निशब्द शहारा उषेच्या चाहुलीत सरावे गंधित प्रहर मुक्या जुईलाही यावा कसा बेभान बहर निळ्या नभाच्या झुंबरी उजळावे लक्ष दिवे उमलत्या रातराणीला स्फ़ुरावे गीत नवे श्वासाश्वासांना लाभावी रेशमाची कोवळीक साथ एका जन्माची युगायुगांची जवळीक
|
Yog
| |
| Sunday, February 05, 2006 - 2:46 am: |
| 
|
वाह, मस्तच!! !! !!
|
Shyamli
| |
| Sunday, February 05, 2006 - 2:54 am: |
| 
|
छाने ग sm मुक्या जुईला....... आवडल
|
Anagha_nz
| |
| Sunday, February 05, 2006 - 6:14 am: |
| 
|
खुप दिवसानी कविता लिहावीशी वाटली........ती अशी........ विरहाच्या एका गर्द संध्याकाळी ओथम्बलेले ढग पाहुनही मनमयुराने जेन्व्हा पिसारा मिटला तेन्वहा मीरेने गायलेली विराणी आणिकच आर्त झाली होती. आज मात्र तु येणार ह्या आशेने सगळे रुतु वसतीला माझ्या अंगणात, मयुरनर्तन माझ्या मनात, कोवळ्या पालवीने डोकावलय फ़ान्दीआडुन, डोळ्यांच्या म्रुगजळात डोकवतो आहेस तु वसंतरुतु होउन.
|
Anagha_nz
| |
| Sunday, February 05, 2006 - 6:16 am: |
| 
|
कविता देवनागरीच्या चुकांसकट तुमच्या स्वाधीन
|
Bhagya
| |
| Sunday, February 05, 2006 - 4:42 pm: |
| 
|
माझ्या दोन जीवलग सख्यांनी कविता लिहिल्यात! sm , तुला तर लहानपणाच्या सगळया आठवणी बहाल आहेतच. तुला अजून काय देणार? पण अनघा, जियो. अजून येउ दे जोरात. खुप छान लिहिल आहेस. sm , तू पण अजून लिहायला हवय....
|
आयला.... इकडे धमालच सुरु आहे!.... कोणाकोणाची नाव घ्यायची... सगळेच साॅलिड सुटले आहेत! ('सुडोकू' वरच्या प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनापासून आभार!)
|
मागच्या पानावरून पुढे सुरु उलटून गेली पानं जी जी हिशेब त्यांचा कशाला करू आयुष्य माझं, आहे कधीचं मागच्या पानावरून पुढे सुरु! तेच मायने, तेच रकाने त्याच त्या शब्दांमधे बरबटलेली पाने आशय नसलेल्या आठवणींच्या पोथ्या घट्ट उराशी कशाला धरू? आयुष्य माझं, आहे कधीचं मागच्या पानावरून पुढे सुरु! त्याच बेरजा, त्याच वजाबाक्या सगळ्याच स्वप्नांचा हा गणिती खाक्या कसले भागाकार, कसले गुणाकार अन कसले हातचे मनात धरू आयुष्य माझं, आहे कधीचं मागच्या पानावरून पुढे सुरु! कधी भरती, कधी ओहोटी सुखाची आशाच कधी वांझोटी भटकी गलबतं, फाटकी शिडं सुटले किनारे..... कुठले स्मरू? आयुष्य माझं, आहे कधीचं मागच्या पानावरून पुढे सुरु! नजरा उपाशी, श्वास अधाशी भुकेलीच निजलेली स्वप्न सारी उशाशी नव्या उषेच्या नव्या गीतांमधे प्राण माझे मी कशाला भरू? आयुष्य माझं, आहे कधीचं मागच्या पानावरून पुढे सुरु!
|
कविता पोस्ट केल्यावर अनेक शब्दांवरचे अनुस्वार गायब होत आहेत... हे कस टाळायच कोणी सांगू शकेल का?
|
वा प्रसाद, maajhM ऐवजी maajhaM असे लिहिलेस तर ते " माझं " असे उमटले जाईल.
|
जमलं रे... thanks a lot!
|
Ninavi
| |
| Wednesday, February 08, 2006 - 12:03 am: |
| 
|
मंजूर होते... नाव ते ह्रदयावरूनी खोडणे मंजूर होते वाकणे जमलेच नाही, मोडणे मंजूर होते पापण्यांतच बांधलेली पाखरे त्याच्या स्मृतींची लाडकी, तरिही अखेरी सोडणे मंजूर होते भासला भगवंत जो तो कोरडा पाषाण होता मूर्त ती अपुल्याच हाती फोडणे मंजूर होते आटला नजरेतला जेव्हा उमाळा भावनांचा वाळली सगळीच नाती तोडणे मंजूर होते सोडुनी वहिवाट ज्यांनी पाळली ध्येये निराळी नाव त्या गणतीत माझे जोडणे मंजूर होते
|
Meenu
| |
| Wednesday, February 08, 2006 - 2:50 am: |
| 
|
वा! निनावी खुपच सुंदर! !!!
|
वा निनावी... सुरेख! >>मूर्त ती अपुल्याच हाती फोडणे मंजूर होते.... क्या बात है!
|
Giriraj
| |
| Wednesday, February 08, 2006 - 4:39 am: |
| 
|
व्वा! निनावी,दहा गाव बक्षीस! }
|
आह !!! एक एक शेर म्हणजे .... वाचूनी वाटून गेले लेखणी ठेवून द्यावी घेवूनी जपमाळ हाती ओढणे मंजूर आहे दिवा बिवा घेवू नका , हे गंभीरपणे लिहीले आहे ... अप्रतिम !!!
|
Jayavi
| |
| Wednesday, February 08, 2006 - 8:15 am: |
| 
|
निनावी, जबरदस्त !! वैभव, तुझी प्रतिक्रिया पण सॉलीड !! पण तसं करायचा विचारही करु नकोस हं
|
Meenu
| |
| Wednesday, February 08, 2006 - 9:14 am: |
| 
|
नको आता.. नको आता परत जाऊस नको पुन्हा जीव लाऊस नको आता खिडकीतुन एकट्याने बघु पाऊस नको आता पाहूस वाट कि पुन्हा येईल तीच लाट पुन्हा कधी होईल तुझी माझी एक वाट नको आता घालुस गळ काळजामध्ये उठेल कळ आणि पुन्हा ठसठसतील जुन्या जखमांचे वळ नको आता शोधु आधार नको होणे उगाच भार एकट्यानेच कर जमेल तर भवसागर पार नको आता खेळूस खेळ आता थोडा उरला वेळ आता रोव पाय घट्ट थोडी हो निगरगट्ट
|
Meenu
| |
| Wednesday, February 08, 2006 - 9:21 am: |
| 
|
continuation to earlier but could not complete properly आता रोव पाय घट्ट थोडी हो निगरगट्ट
|
Milindaa
| |
| Wednesday, February 08, 2006 - 10:06 am: |
| 
|
निनावी, चांगलं लिहीलं आहेस Meenu , तुम्ही तुमचं आधीचं पोस्ट एडीट करु शकता, मेसेज च्या उजव्या हाताला जे आयकॉन्स आहेत, त्यातल्या पेपर पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करा.
|
Ankulkarni
| |
| Wednesday, February 08, 2006 - 10:33 am: |
| 
|
......मन्जूर होते.... निनावि क्या बात है अस्मिता
|