Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 03, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » काव्यधारा » झुळूक » Archive through February 03, 2006 « Previous Next »

Pama
Thursday, February 02, 2006 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरोपाच म्हणून तरी,
बोलशील अस वाटल होत..
किती वादळ सुटून गेली..
मनात आभाळ साठल होत..


Pama
Thursday, February 02, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय वैभव.. बरेच दिवसानी भेट झाली!
जास्वंद, देवदत्त.. एकदम मस्त..
मीनू.. छान लिहितेस.. लिहित रहा..


Jaaaswand
Thursday, February 02, 2006 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


बाय रे वैभव...

तुला निरोप देताना आता
बोलायची हिम्मत कुठे ?
अश्रूंचीच गळाभेट आहे
शब्दांची किंमत कुठे ?

जास्वन्द...


Vaibhav_joshi
Thursday, February 02, 2006 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" होय , " नाही " च्या झुल्यावर
तुझं मन हिन्दोळे घेत होतं
स्पर्श बिलगले होते मला
डोळ्यांतलं पाणी निरोप घेत होत


Jaaaswand
Thursday, February 02, 2006 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जा तुला वाटतेय तर
माझे काही बिघडत नाही
तुलाच दिले आहे सगळे
बिघडायला काही उरत नाही

जास्वन्द...


Vaishali_hinge
Thursday, February 02, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा जास्वंद छान म्हणु कि सुन्दर मनातले......

Devdattag
Thursday, February 02, 2006 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जाते या दोन शब्दांवरच माझी हरकत होती
तुझ्या माझ्या मतांमध्ये फ़क्त इथेच फ़ारकत होती


Jaaaswand
Thursday, February 02, 2006 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाण्याआधी तुला एकदा
श्वासांत मला भरून घ्यायचय
त्याच एका आठवणीवर तर
पुढचं आयुष्य जगून पाहायचय

जास्वन्द...


Ninavi
Thursday, February 02, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! काय मस्त लिहीतायत सगळे! मीनू, छान लिहीतेस. तुझं झुळुकेवर स्वागत.

Shyamli
Thursday, February 02, 2006 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस रे काय म्हणुन कीती
केली विनवणी
स्वप्नांच गदळ साठल होत
पण तुझ्या मनी
श्यामली!!!


Ameyadeshpande
Thursday, February 02, 2006 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही गोष्टी आपल्या नसतातच कधी...
त्यान्ना उगाच का धरून ठेवावं?
त्यातून काहीच साधणार नसतं...
मग ओंजळीतून त्यान्ना जाऊ तरी द्यावं...


Ninavi
Thursday, February 02, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्यर्थ येथे शोधसी तू मागच्या खाणाखुणा
व्यर्थ आता मागसी पार्‍यास तो चेहरा जुना
सोडुनी हे गाव सारी दूर गेली पाखरे
कालची वाळूतली वाहून गेली अक्षरे


Jaaaswand
Thursday, February 02, 2006 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुकार काही माझी स्वप्ने
स्वप्नातही तुलाच शोधतात
काही डोळ्यांत साठून काही
ओठांना अर्घ्य देउन जातात

जास्वन्द...


Jaaaswand
Thursday, February 02, 2006 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हाय श्यामली


झेपली नाही ' जाग ' तेव्हा
स्वप्नांचे झाले गदळ
तगलो नाही, तरी माझेच होते
शेवटच्या पेल्यातले वादळ

जास्वन्द...


Vaibhav_joshi
Thursday, February 02, 2006 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजही जपल्यात त्या खाणाखुणा ती पावले
आजही आयुष्य माझे त्या क्षणांवर चालते
तू जरी गेली निघोनी , प्रीत ना गेली कुठे
याद ती येते तुझी अन लाज माझी राखते



Ninavi
Thursday, February 02, 2006 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्वास येतो श्वास जातो चालते हे ह्रदयही
एकट्याने चालण्याची होत जाते सवयही
भेटलो नव्हतोच तेव्हा काय मी जगलेच नव्हते?
का अता ही शून्यता येऊन एकान्ती भिववते?


Shyamli
Thursday, February 02, 2006 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा खुप दिवसांनी मैफल अशी सजलि
निरोपा निरोपितच पण रात्र आजची संपली

हाय जास्वदा, वैभव, पमा,देवदत्त, अमेय

वैशालि कस वाटतय आता तुला झुळुकेवर


Vaibhav_joshi
Thursday, February 02, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


श्वास येणे श्वास जाणे हे मुळी जगणे नव्हे
एकट्याने चालणे हे चालणे नाही खरे
तू जरा चालूनी ये ना दोन केवळ पावले
थांबलो तेथेच आहे , का मनी भय दाटले


Shyamli
Thursday, February 02, 2006 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भय नाही रे मनी
थोडीशी मी भांबावले
संगती चालु कशी
फक्त दोन पाऊले?

श्यामली!!!


Supermom
Thursday, February 02, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वैभव, श्यामली

खरेच सुन्दर


Pama
Thursday, February 02, 2006 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सात फेरे चालताना, तू वचन मजला दिले
दोन माझे दोन तुझे, श्वास ही जडले असे,
जाणले ना काय भाळी, दैव माझ्या जोडले,
थांबला कोठे कसा तू, ते मला का न दिसे..


Shyamli
Thursday, February 02, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वादळ नाही रे हे
फक्त ऊलघाल मनाची
मीलनांती वीरह
हीच तर रीत प्रितीची

श्यामली!!!


Vaishali_hinge
Thursday, February 02, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली मस्तच ग काव्यवाचनाचा आनंद घेतेय... यु कंटीन्यु वाचकाची भुमीका जास्त छान वाटु लागलीये...

Meenu
Friday, February 03, 2006 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद. छानच फ़ोरम आहे हा......

तुझ्या माझ्यातला संवाद संपला
आणि सुरू झाली बोलणी
आपल्यातलं मेतकुट सपल
उरलं फक्त नातं अळणी


Jo_s
Friday, February 03, 2006 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनं एकदा जुळली की
हे असं घडणार
दुर शरीरं जातात
मनांत अंतर कसं पडणार

सुधीर


Ajit_gokhale
Friday, February 03, 2006 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरे ही झुळुक नाही आपण याचे नाव भन्नाट वारा ठेवायला हवे

Niru_kul
Friday, February 03, 2006 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर, तुमच्याकडून साभार....

मनं एकदा जुळली की,
हे असंच घडणार;
भेट जरी घडली नाही तरी,
दुराव्यात नक्कीच अंतर पडणार.


Niru_kul
Friday, February 03, 2006 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनाचं हे नातं,
कसं भावनेशी सान्धलेलं;
जन्म-जन्माच्या पुण्याईने,
तुम्हा सर्वाशी बान्धलेलं.

पार्थसारथी......


Meenu
Friday, February 03, 2006 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी दाटुन येते मरगळ
कधी प्रवाह खळखळ
सांगु कुणाला माझीया मनाची ग तळ्मळ
शब्दांमधे ऊतरेना कीती झाली आत झळ





Santotar
Friday, February 03, 2006 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dovad<a tuJyaa saazI

farkt GyaayacaI hÜtI
tr mana jauLvalao kXaalaa
XaaMt JaÜpvaayacaM navhtM
tr hat ka zovalaasa ]Xaalaa

saMtÜYa


Santotar
Friday, February 03, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

XyaamalaI tujyaasazI

ivarhatunaca fuTtIla
p`ItIcao navao AMkur
p`ItI AaplaI janmaacaI
ivarh Aaho xaNaBaMgaur


Jo_s
Friday, February 03, 2006 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारकत घेतलीस?
म्हणून काय झालं
तूझ ही मन साक्ष देईल
मी किती प्रेम केलं


Himscool
Friday, February 03, 2006 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रानो, मी आज पहिल्यान्दाच इथे भेट दिली आहे. आणि तुमच्या चारोळ्या वाचून खूप मस्त वाटले... मी काही तुमच्या सारखे लिहिणे अवघड आहे पण तुमच्या चारोळ्याना दाद देण्याचे काम नक्की करणार
हिमान्शु



Devdattag
Friday, February 03, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्याविना आम्हास गे
ना कुठलाच मोह होता
लाकडांआधी जळणारा
तो अमुचाच देह होता


Seemad
Friday, February 03, 2006 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळेच सुन्दर......
थोडा बदल

विखुरलेले सगळे
गोळा करण्याच केला
केविलवाणा प्रयत्न
आले बोलावणे...........!
सान्गु कसे,जरा थाम्ब
गोळा करताना गुन्तलेत दोरे,
गाठ सुटता सुटेना..
मन निघता निघेना
क्शणात...........
तुझ्या सन्गे येताना
भय आटत आटेना.







 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators