|
पमा, मावळे, बी धन्यवाद! काही दिवसांनी अजुन थोड्या कविता पोस्ट करीन.
|
सुडोकू - एक गझल रिते हे रकाने भरावे कसे? सुखाचे सुडोकू सुटावे कसे? इथे हा असा अन तिथे तो तसा कुठे कोण हे ओळखावे कसे? ठरावीक जागा हरेकास हे खुळ्या आकड्यांना कळावे कसे! रकान्यांत काही कुणी ना बसे मनी आकड्यांच्या दुरावे कसे? छुपे आकडे हे दिसू लागता असे लेखणीने रुसावे कसे! जरी आकड्यांनी उतू चौकटी मनी शून्य माझ्या उरावे कसे अनतास जाण्या, नको चौकटी 'प्रसादा' तुला हे कळावे कसे!
|
Sarya
| |
| Monday, January 30, 2006 - 11:23 pm: |
| 
|
रावा ती बोलत होती तेंव्हा ती सांगत होती काही कळले ना पण राव्याला ती स्फुंदत नव्हती काही तो प्रेमभराने बोले त्याच्या छानुकल्या राणीला ती वार्याचीच कहाणी अन अंत नको वाणीला बोले ती " तू अन मी ही घरटे अपुले बांधू या " हसला तो खुलली काया " ये गाव नवा सांधू या " अन रहाटगाडीमध्ये तो जीव जाळुनी उभा दोर्याची किमया सारी का डाव मोडती सभा? तो थरथर हाले आणिक अस्फुटसे उगिचच बोले " तू सखी कशी हरली गे? ते प्रेम कुठेसे गेले? " " मी विश्वसलो तुजवर आणि पापण्यांत पाणी श्रमले एकेक भरारी भरता डोळ्यांतील रंगही दमले " " तुजवरी भरवसा केला हा रंक जाहला राजा तू गेली म्हणुनी नाही त्या घरी खुला दरवाजा " ......... " मी येथे आहे राजा नको उंच भरारी मारू. हा जीव चालला आहे तुजवीण कोण मज तारू? " " चोचीत अडकला आहे आपल्या घराचा स्तंभ काट्यात विष अन दिसतो नवजिवनाचा प्रारंभ " .......... ......... दोघांचे डोळे धुरके दोघांचा देह पडलेला ती विष पचवुनी आणि तो विरहाने उन्मळलेला सारंग
|
माघाची सुरुवात दोन दिग्गजांकडून झाली ..... वाह ! प्रसाद, खूप आवडली गझल. शेवटचा शेर तर खूपच. सारंग, भातूकलीच्या खेळासारखे उदास केलेस रे.
|
Hems
| |
| Tuesday, January 31, 2006 - 1:02 am: |
| 
|
प्रसाद , झक्कास कल्पना ! मनी शून्य माझ्या .. खास आहे ! सारंग , सुरेख जमली आहे कविता !
|
वाहवा !!!! प्रसाद बरयाच दिवसांनी ... मस्त आहे ... सारंग ... सुंदर कविता
|
तलखी .... भर दुपारीच अंधारुन आलेलं पक्षी अवेळी घरट्यात विसावलेले फ़ुलांनी माना टाकलेल्या मेघ न मेघ ओतप्रोत भरलेला सूर्य देखील अंधारात अडखळत पश्चिमेला निघालेला धरणी भेगाळल्या नजरेने - - वाट पाहते आहे... वारा पडला आहे चिडीचूप अन मीही बसून आहे खिडकीत बघत निसर्गाच हे हताश रूप किती वेळ झाला , चित्र बदलत नाहिये गरजतंय कधीच पण बरसत नाहिये .... अखेर उठतो मी , जड पावलं टाकत कपाटातून जुनी पत्रं काढतो डोळे स्थिरावतात तुझ्या अक्षरांवर ... त्या शब्दांवर ... " फ़क्त तुझीच " मग मात्र .... !!! वैभव !!!
|
Devdattag
| |
| Tuesday, January 31, 2006 - 1:55 am: |
| 
|
क्या बात हैं. बहोत खुब. लगे रहो प्रसाद, सारंग आणि वैभव.. अप्रतिम
|
Devdattag
| |
| Tuesday, January 31, 2006 - 2:59 am: |
| 
|
एक बरीच जूनी कविता पोस्ट करतोय.. मन मन पाउल एकटे चालतांना थांबलेले मन पावलांची वाट थांबून चाललेले मन नभातले पाणि नभामूळे तारलेले मन काळे काळे नभ पाण्यामूळे भारलेले मन तान्हुले तान्हुले हातांच्या झोक्यांमधले मन हात माउलीचे स्वप्न हृदयी साठलेले
|
सुडोकु, देवदत्त आनि तलखी मन सगळ्याच सुंदर
|
श्रावणसरी मनावरी भिजले मी का ग? परसदारी ओले अंगण दारात मी का ग? आल्या सरी सपका मारीत गंध दरवळे धुंदित मी का ग? भरुन आले मन त्या नभाला सोबत रिते होई आभाळ पण मन असे साकाळ! का ग?
|
माझी नविन कविता... "priyasathi"... घर झालंय वादळशान्त... सुन्या झाल्यात भिन्ती संवाद गेलेत हरवून... आणि मुकी झालेत नाती. १ येण्या-जाण्या पुरतंच... काम उरलंय दाराचं सोफा खुर्ची याना.... ओझं झालंय भाराचं. २ स्वयंपाकघरात फोडणीचा.... दरवळत नाही वास आणि कुणासाठी कुणाचा इथं अडकत नाही घास. ३ दिवाणखाना वाट बघतोय.... आता कुणाचं पाऊल येतंय घर भयाण शान्ततेची कळत नकळत चाहूल देतंय. ४ आता घरच येईल प्रत्येकाच्या.. अंगावरती उसळून भिन्ती शाबूत असूनसुद्धा... छप्पर जाईल कोसळून. ५ कोन्डलेल्या भावनाना त्याआधीच... मोकळी वाट करावी लागेल घुसमट होत राहिली तर... वेगळी वाट धरावी लागेल. ६ देवा अशी घरघर... माझ्या घराला लागू नये घरानेच शेवटी आधारासाठी.... दुसरं घर मागू नये. ७ प्रेम जिव्हाळा, आपुलकीनं... ओथंबलेलं घर हवं प्रत्येकाला आधारासाठी... आपलं असं घर हवं. ८ गुरुराज गर्दे. मोबा.९२२५५२२९८८
|
Sarya
| |
| Tuesday, January 31, 2006 - 5:22 am: |
| 
|
प्रसाद मोकाशी, अहो उगाच कुठे दिग्गज वगैरे... तुमच प्रेम आहे हे जास्त महत्वाच... धन्यवाद. प्रसादा, तुझ्या गझलचे चाहते आहेत रे मायबोलीवर, माझ्यासारखे. सुडोकू... क्या बात है. सरळ तुझी शैली आहे...! मक्ता बडिया है...! वैभव, काय बोलू??? देवदत्त छान आहे रे. वैशाली लिहित रहा. गुरुराज, आणि कुणासाठी कुणाचा इथं अडकत नाही घास छान!
|
Ninavi
| |
| Tuesday, January 31, 2006 - 9:27 am: |
| 
|
प्रसाद, सुडोकू अप्रतीम. वैभव, छे! तू खरंच अशक्य आहेस. मला आता या पानावर प्रतिक्रियेशिवाय काही लिहायचा धीरच होणार नाही.
|
Pama
| |
| Tuesday, January 31, 2006 - 10:42 am: |
| 
|
प्रसाद.. सुडोकू!!.. वा!! वैभव, सुरेख.. सारंग, देवदत्त, वैशाली.. छानच आहेत सगळ्यांच्या कविता.
|
Mmkarpe
| |
| Tuesday, January 31, 2006 - 11:33 am: |
| 
|
माझ्यासारखच... परसातल वठलेलं झाड... उभ एकटच उदास... बंदिस्त कुंपनाआड... जोम होता तोवर पुरवले पाखरांचे लाड... लागता उतरता काळ... झाली सारी नजरेआड... वयापरत्वे गळाला... हिरवा पर्णसांभार... सुकलेल्या फांद्याचा डोईवर असह्या भार... या वळनावरच जिण... असहाय लाचार प्रत्येक वादळात लागतो... शोधायला आधार तरिही जगनं चालुच आहे... सोशित प्रहार मागत विधात्याकडे... येणारा एकेक दिस उधार जपत उरलेली मोडकी घरटी भकास... लेऊण डोळ्यात... पाखरं परतण्याची आस...
|
Mmkarpe
| |
| Tuesday, January 31, 2006 - 11:50 am: |
| 
|
आजची दुनिया एक मेळा जे जे मिळेल करावे गोळा आप आपले कांडण दळा सत्य अन इमानदारीला जाळा भ्रष्टाचाराचा फुलवा मळा मस्त ऐष आरामात लोळा हा एकचि मंत्र आगळा मणुसकीचा सुटला लळा नाही उरला कुणाचा भरवसा केसांनी कापती गळा पैशांच्या जपती माळा माणसाने सोडला ताळा न्यायरक्षकच करताहेत अन्यायाकडे कानाडोळा इथे बळी तो कान पिळी पिसला जतोय जीव भोळा माजलाय गोंधळ सावळा समाज झालाय बावळा हातावर हात चोळा स्वस्थ बसुनी पहा चाळा नाहितर उठा! तरुणांनो उठा! विचारांच्या तल्वारी पाजळा या अंधाराला चिरा पसरुद्या नवा उजाळा.
|
शिल्लक .... अता राहिल्या दुबळ्या भिंती छप्पर घेवुन गेला धागा धागा उसवुन केवळ लक्तर ठेवुन गेला गात्रांगात्रांमध्ये पेरले किती लाघवी गंध असा भेटला उराउरी घमघमले अवघे स्पंद " वस्त्रा " वरती डाग राहिला , अत्तर घेवुन गेला धागा धागा उसवुन केवळ लक्तर ठेवुन गेला श्वास गुंफले अचूक त्याने माझ्या श्वासांमध्ये श्वास घ्यावयावाचुन काही नुरले हातांमध्ये हृदयावरती आठवणींचा पत्थर ठेवुन गेला जगण्यापुरते नशीब का बलवत्तर ठेवुन गेला ? अवतीभवती पोकळ भिंती देवू साद कुणाला ? कोसळते आभाळ नित्य मी मागू साथ कुणाला ? छताविना घर उजाड हे प्रत्यंतर देवुन गेला अता राहिल्या दुबळ्या भिंती छप्पर घेवुन गेला वैभव !!!
|
Niru_kul
| |
| Wednesday, February 01, 2006 - 7:10 am: |
| 
|
सान्जवेळी..... दूर क्षितीजावर जेव्हा, सूर्य मावळत असतो; तुझ्या आठवणीचा समुद्र, मनात माझ्या उसळत असतो. डोळ्यात अश्रु साचतात, मन माझं भरुन येतं; ह्रदयाची स्पंदनं वाढतात, भावनाविश्व दाटुन जातं. अश्रुच्या प्रत्येक थेबात, माझं प्रेम साचलेलं असतं; त्या हळव्या क्षणी, मन माझं थिजलेलं असतं. काळजाचा ठोका चुकतो, त्या कातरवेळी; भावनाच्या मर्यादा तुटतात, त्या संध्याकाळी. तुझ्या आठवणीचे समुद्रपक्षी, घरट्याकडे परतू लागतात; काळोख्या त्या रात्री, तुझी स्वप्नं मात्र जागतात. देऊन जातेस मला, तू तेच जुनं आभाळ पुन्हा; मी पण मग वेड्यासारखं, तुझंच चित्र काढत बसतो पुन्हा पुन्हा......
|
Priyasathi
| |
| Wednesday, February 01, 2006 - 10:01 am: |
| 
|
माझी नवीन कवीता... दिनांक ३१/१२/२००५ ची पंख छाटलेल्या पक्ष्यासारखं........ गळून गेलंय मन..... जगण्याची उमेदही दिवसेंदिवस कमी होतेय की काय......? अभद्र विचार मेंदू पोखरतात....... वाळवी लागते आतमध्ये......सुन्न होतं डोकं... या अवस्थेला नेमकं काय म्हणतात...? कळत नाही..... पण सगळी ताकद आणि प्रतिकारशक्ती क्षीण होत चाललेय.... मनाचीही अवस्था झालेय...ऊसाच्या चिपाडासारखी पण कदाचित.... हीच लक्षणं असावीत..... 'फिनिक्स' पक्ष्याच्या जन्माची.......!!!! गुरुराज गर्दे. मोबा.९२२५५२२९८८.
|
Giriraj
| |
| Wednesday, February 01, 2006 - 10:19 am: |
| 
|
वैभवा,तलखी मस्तच! शायरमित्र प्रसाद,क्या बात है! सुडोकूवरही गज़ल! धृवा,बहरानंतर अगदी सही! सारंग,अवेळीचा सडा मस्तच!(तुझ्या ना-ना कळा मला दुसर्यांकडून कळतातच आहेत!) वैशाली, Hmmmm! कविमित्र प्रसाद,आता तुझ्यासारख्या दिग्गजाची एखादी येऊ दे!
|
राजकुमारा... अजुनही चंद्राच्या इशारयावर लाटा थिरकतात, अन झावळ्या एकमेकींना बिलगुन कुजबुजतात... मग आठवणींच्या झुळ्कीने उठते किणकिण ह्रुदयातुन थांब सख्या जाउ नको मनातुन........... उदास एकट्या सायकाळी.... क्षितीजावर दिसते चांदणी, आठ्वुन जाते मनावरचे गोंदण...ती हळवी रेंगाळ्णारी नजर, आणि सप्तसुरांची लहर रोमारोमातुन.............. थांब सख्या...... तु स्वप्नातला राजकुमार,स्वप्नातल्या कळीसारखा कधीही न फ़ुलणारा सक्ती नाही तुज साक्षात येण्याची, मनाच्या गावचा मनाच्याच झुल्यावर झुलवरे .... हाती हात घेवुनी...... थांब सख्या...... भरल्या जगात अचानक येतोस माझ्या एकाकी मनाला सोबत करतोस, कधी मारव्याच्या साथीने, कधी कवितेच्या ओळीतुन, सतारीच्या सुरातून उमटतो धपापत्या उरातुन............ थांब सख्या जाउ..... अजुनही येते लाजत पहाट, पक्षांची गुंजरव करते मनात प्रवेश, निनादत रहतो कोकीळेचा सुर, उगाचच काळ्जात हुरहुर... सतेज तुझे अस्तित्व जाणवते आणि ठसठसणारया वेदनांवर सुखाच्या लहरी उठवत राहते, म्हणुन म्हणते थांब सख्या..... वेड्या चकोराला आजही चांदण्याची आस आहे अबोध मनाला संवेदनांचा भास आहे, मला माहीत आहे तु एक रम्य अतिशियोक्ती आहेस, नेणिवेच्या पलिकडचा आहेस.... माझ्या आत्ममग्न प्रतीमेचा श्वास आहेस.... म्हणुन म्हणते थांब सख्या जाउ नको..... मनातुनी
|
Pama
| |
| Wednesday, February 01, 2006 - 1:23 pm: |
| 
|
भिंगरी.... फिरत राहिले गरगर, कधी हातात, कधी जमिनीवर. याने अस त्याने तस, ज्याने जस हाताळल तस. दोरासारखी लपेटून होती, घट्ट, न सुटणारी नाती. पुन्हा पुन्हा येऊन बिलगत, पुन्हा हिसका देऊन फिरवत. माझ्या पायाखाली काय होते, कुणी पर्वा केली त्याची? दगड माती तुडवत, फिरत होते स्वतः भवती. कधी वरून खाली आपटल, कधी अलगद टेकवल, कधी प्रेमान सांभाळल, कधी लटपटले पाय, म्हणून कायमच टाळल. एकदा भोवळ येऊन पडले, सांगा काय कुणाचे अडले? 'तिचा मोडलाय कणा, नाही उभी राहू शकत.' आता अडगळीच्या जागी, बसलीय मुक्ति मागत. 'आम्ही फेकू तस, तू फिरत रहायच असत, भिंगरीच्या नशीबात, दुसर काहीच नसत...'
|
इथे तर महान कवितांचा पाऊस पडु लागलाय.. आता कुणाकुणाला आणि काय काय म्हणुन प्रतिक्रीया द्यायची.. प्रसादशिर,खूप दिवसांनी..गझल एकदम सही रे बाकीचे असेच बरसत रहा
|
पमा ... भिंगरी मस्त आहे ... आवडली ... गुरुराज ... फिनिक्सचा पंच छान नवीन कविता आणि नवीन कल्पना ..... वैशाली , निर _ कुल , लगे रहो ...
|
पराधीन ... कसे द्यायचे मी तुला श्वास कोरे पराधीन मी , साद देऊ नको रे उभा जन्म हा लावला मी पणाला अता तू मला आठवूही नको रे कसा रंगला खेळ निर्व्याज होता , कुणा बाहुलीला , कुणी भावलेला कुणी लावली दृष्ट भोळ्या क्षणांना तुझी बाहुली ना तुला लाभली रे तुझे सूर देहात झंकारणारे तुझे शब्द रंध्रास गोंजारणारे कुणी वेगळा साज छेडे अता हा तुझे गीत नाही तुझे राहिले रे तुझी धूळ मी मस्तकी लावलेली तुझी वाट डोळ्यांमध्ये रेखलेली कशी आपली वाट झाली निराळी ? कशी आगळी पावले वाजली रे ! वैभव !!!
|
Sarya
| |
| Thursday, February 02, 2006 - 1:36 am: |
| 
|
Vaibhav good one re!!!
|
Shyamli
| |
| Thursday, February 02, 2006 - 1:44 am: |
| 
|
पमा भिंगरी मस्तच आहे ग! छान!!!!!!!!!!!!!! वैभव............ सारंग सुंदर...... प्रसाद अनतास जाण्या....सहिच वैशाली छान लिहितेस
|
Niru_kul
| |
| Thursday, February 02, 2006 - 1:48 am: |
| 
|
शापित..... पुन्हा त्या हळव्या क्षणाच्या, आठवणी मला येतात; पुन्हा त्याच जुन्या स्वप्नाची, साठवण मला देतात. तुझ्या त्या पाऊलवाटेकडे, मन मला खुणावते; पुन्हा त्या शापित वळणाकडे, रस्ते मला नेतात. निळ्या आकाशावर, मी काढत असतो तुझं चित्र; त्याच वेळी मेघ नेमके, नभ झाकोळून जातात. मनाची पानझड, हास्याने झाकतोय मी; पण मुठीमध्ये माझ्या, पाने वाळकीच येतात,पाने वाळकीच येतात....... पार्थसारथी.....
|
Sarya
| |
| Thursday, February 02, 2006 - 3:45 am: |
| 
|
शाब्बास रे निरज! (ही एक दाद) शापित छान आहे...!!!
|
वैभव, as usual सगळ्याच कविता महान. पमा, भिंगरीची व्यथा खरीखुरी. गुरूराज, फिनिक्स अप्रतिम. निरज,वैशाली तुमच्या कविताही छानच. लिहित रहा, आम्हाला आनंद देत रहा
|
वैभव नेहमिप्रमाणे....... !!!!!!!!! निरु कुल छान, फ़िनीक्सचेई कल्पना छानच...पमाची भिंगरी, आणि कर्पेंचे वठलेलेले झाड छान कल्पना
|
Sarya
| |
| Thursday, February 02, 2006 - 4:07 am: |
| 
|
मोकाशी साहेब तुम्ही टाका काहीतरी...
|
Sarya
| |
| Thursday, February 02, 2006 - 4:19 am: |
| 
|
पुरे झाले हे तुझे आता पुरे झाले बोलणे माझे खरे झाले ती पहा ती फाटली झोळी सांडले दाणे बरे झाले फोडली का बाटली त्याने? पोर त्याचे कापरे झाले लक्तरे उध्वस्तली माझी कावळेही हावरे झाले... तू दिले ते रंगही कोरे; अंग माझे बावरे झाले. का अशा जख्मा उरी केल्या? घाव सारे मोगरे झाले!!! सारंग
|
आयला ... हे मोगरा लिहीलं गेलं की असं काय होतं ... लक्तरे आणि मोगरे दोन्ही शेर अप्रतिम
|
|
|