Santotar
| |
| Monday, January 30, 2006 - 11:50 pm: |
| 
|
Ba`YTacaar kÉna nao%yaaMnaI doXaacaI Aba`u vaoXaIvar TaMgalaI maaNasaanao jaatpatIcyaa naavaaKalaI maaNausakI ivaBaagalaI pUNyaa%myaaMnaa ja,nma GaoNyaasaazI XaÜQaavaI laagato kusa caaMgalaI Aata inala-j,ja laÜkaMnaa ivanavaNaI kÉna svaatM~dovaI pNa qaklaI
|
काल मी तुझ्यापासुन वेगळी झाले, खर सांगु आनंद झाला यातच सगळ आल शरीराची संवेदना मनाची वेदना खाली मान पापण्यांचे पान गळ्यातच अडकलेली गाण्याची तान... सगळ कस जाणवु लागल आता जगण मला खुणावु लागल!.....
|
Ninavi
| |
| Tuesday, January 31, 2006 - 9:30 am: |
| 
|
वैशाली, सुरेख! ... ... 
|
Sparsh
| |
| Wednesday, February 01, 2006 - 4:38 am: |
| 
|
नमस्कार नेहमीच कसा त्याला माझा विसर पडतो दु:ख मात्र दरवेळी न चुकता देतो...
|
Devdattag
| |
| Wednesday, February 01, 2006 - 4:48 am: |
| 
|
पडलाय त्याचाही विसर आपल्याला हे त्यालाच दाखवून द्यायचं तुझ्यामाझ्याकडचं सुखं दु:ख आपल्यातच वाटून घ्यायच
|
Meghdhara
| |
| Wednesday, February 01, 2006 - 7:07 am: |
| 
|
वैशाली पापण्यांचं पान व्वा! मेघा
|
Niru_kul
| |
| Wednesday, February 01, 2006 - 8:25 am: |
| 
|
शब्द संपण्याची वाट बघतोय, भावना जळण्याची वाट बघतोय; भर मध्यान्ही क्षितीजावर ऊभं राहून, सूर्य विझण्याची वाट बघतोय. पार्थसारथी.....
|
Jaaaswand
| |
| Wednesday, February 01, 2006 - 9:56 am: |
| 
|
सूर्य विझतील तारे पेटतील अशक्य हा अट्टाहास आहे भावनांच्या तव स्वप्नांतला झालेला सत्याचा भास आहे जास्वन्द...
|
Shyamli
| |
| Wednesday, February 01, 2006 - 10:07 am: |
| 
|
जास्वंदा तुझेच शब्द मागेपुढे करुन सत्यातल्या स्वप्नालाही सोनेरी तास आहे विझणार्या सुर्यालाही किरणांची आस आहे श्यामली!!!
|
Jaaaswand
| |
| Wednesday, February 01, 2006 - 10:41 am: |
| 
|
श्यामले मस्तच ग... सत्य-सूर्याच्या लख्ख उजेडात स्वप्नांचीही थोडी गदळ असेल डोळ्यांनाही कळून चुकेल जेव्हा गालांवरही थोडे काजळ असेल जास्वन्द...
|
Shyamli
| |
| Thursday, February 02, 2006 - 1:01 am: |
| 
|
तुझ्या लखलखत्या स्वच्छ ऊजेडात स्वप्नातली गदळ मावळुन गेली गालावर ओघळलेल्या काजळाला गर्द गुलाबी करुन गेली श्यामली!!!
|
Meenu
| |
| Thursday, February 02, 2006 - 3:21 am: |
| 
|
Hi I am new member here...not a very good poet just putting few lines. There are few mistakes in devnagari written by me as i do not know how to right few things. मी वीणलेल्या नात्यान्ची वीण उसवत जाताना........... उसवत जात.. माज़्या आतही काही तूटलेले काही धागे आणि जीर्ण काही... भकासपणे त्यान्च्याकडे पाहताना मी म्हणाले “आता थाम्बवायलाच हवय वीणकाम आणि नको आटापिटा थिगळ लावण्याचाही... ”
|
Meenu
| |
| Thursday, February 02, 2006 - 3:29 am: |
| 
|
आयुष्य सार एकसुरी रात्रीनन्तर येणार्या दिवसान्च्या सरी कसलाही आवाज नसलेली एक सन्ततधार अशावेळी मोहवते कडाडणारी वीज......... दीपवणारी वीज आणि धरु जाता तीला क्षणार्धात जाळणारी.........
|
मीनू, रात्रीनंन्तर येणार्या दिवसांच्या सरी.....वाह छान ! लिहित रहा. वैशाली, really good one
|
Sarya
| |
| Thursday, February 02, 2006 - 3:41 am: |
| 
|
मीनू छान... उसवण... सुरेख!!!
|
शामलीचे काजळ गुलाबी करुन गेले नि मीनु ची विण खरच उसवुन गेली, जस्वदाचे काजल मस्त...
|
हळूहळू का होईना स्थित्यंतर घडलंच ना? पायाच मजबूत नव्ह्ता घर बिचारं कोलमडलंच ना?
|
आत कोरड्या असणारया डोहांत तरंग कसे उमटणार ? हातात हात घेवून चालण्याने " रेषा " थोडीच एक होणार ?
|
भळभळणारी जखम नाहीच मुळी आसवांचा निचरा आहे फक्त तसं विशेष कुठं काय घडलंय ? पारदर्शी मनावर चरा आहे फक्त !
|
तुझ्यातल्या शिल्पकाराला कोण जाणे काय आवडून गेले माझ्या पाषाण्हृदयाचेही किती सुंदर शिल्प घडून गेले
|
आता जाता असं व्यवहारी वागू नकोस दोन चार श्वास राहू दे इथे सगळंच परत मागू नकोस
|
Jaaaswand
| |
| Thursday, February 02, 2006 - 7:41 am: |
| 
|
व्वा झकास रे वैभवा.. जखमेवरून एक पूर्वीची झुळूक आठवली.. का अचानक ह्या व्यथेला खारा रंग आला आहे जखमेतुनी आज बहुदा अश्वत्थामा रडला आहे जास्वन्द...
|
कसे मनाकडून मनाला निरोप वेगळेच पोहोचत गेले ? मी फुले पसरत गेलो .... तुला काटे बोचत गेले ....
|
Jaaaswand
| |
| Thursday, February 02, 2006 - 7:47 am: |
| 
|
झालीसच जर व्यवहारी तर सगळेच घ्यावे द्यावे लागेल जाताना तुला श्वासांबरोबर मलाही बरोबर न्यावे लागेल जास्वन्द...
|
Devdattag
| |
| Thursday, February 02, 2006 - 7:47 am: |
| 
|
पारदर्शी मनावरची एक रेषाही बरच सांगून जाते एका हलक्याश्या चर्यानेही मनाची काच दुभंगून जाते
|
" छे रे , असं काही नाही " म्हणतानाही खंतावली होतीस ना ? जोडायचा आटोकाट प्रयत्न करताना तूच तुटत गेली होतीस ना ?
|
तू गेलीस आता ..... मी जरा सावरू लागलोय एक " मोरपीस " सोबत घेतलंय आणि जगणं आवरू लागलोय
|
'' जाऊ नकोस " म्हणालो मी आवाज आतला ऐकू आला नाही " कवाडं " मिटूनच निघाली होतीस उंबरयाचा हुंदका ऐकू आला नाही
|
Pama
| |
| Thursday, February 02, 2006 - 7:55 am: |
| 
|
कधीकाळी श्वास असेही, तुझ्या साठी अडायचे, आता अडल्या श्वासासाठी, किती घाव खुडायचे...
|
Pama
| |
| Thursday, February 02, 2006 - 7:58 am: |
| 
|
'जाऊ नकोस' म्हणून नुसत डोळ्यांनी सांगून बघायचस, धावत आले असते रे.. तू पाऊल तरी टाकायचस..
|
Devdattag
| |
| Thursday, February 02, 2006 - 7:59 am: |
| 
|
स्वत:ला सावरण्याचा हा अट्टाहास फुका आहे खरतर तू गेलीस तेंव्हापासून माझा आवाजही मुका आहे
|
Jaaaswand
| |
| Thursday, February 02, 2006 - 8:00 am: |
| 
|
तू गेलेल्या वाटेवर जाण्या मन माझे धजावत नाही ढग नेहमीच दाटून येतात मोर मात्र नाचत नाही जास्वन्द...
|
हाय पमा ... एकाच वाटेवर चालताना ध्येय वेगळे जाहले पाठीला पाठ होती विरुद्ध दिशेला पावले
|
मस्त रे जास्वंद , पमा , देवदत्त ...... चालू दे , मी निघतोय ऑफ़िसमधून ....
|
Meenu
| |
| Thursday, February 02, 2006 - 8:05 am: |
| 
|
बर झाल पुलाखालुन खूप पाणी वाहुन गेल जाताना तळातला सारा गाळ घेऊन गेल नितळ नव्या पाण्यातून दिसणारा तळ पाहताना तळाबद्दल खूप काही नव्याने कळत गेल
|