Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 30, 2008

Hitguj » Language and Literature » भाषा » मराठीची विविध रुपे » कोल्हापुरी » Archive through January 30, 2008 « Previous Next »

Robeenhood
Tuesday, June 12, 2007 - 1:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो तर अबक दुबक तिबक होतेच ना. एकनाथांचे एक भारूडही आहे अबक दुबक तिबक नावाचे.टीम सिलेक्शनचा हा प्रकार आमच्याकडेही होता. दोन जण कप्तानाकडे यायचे अन म्हणायचे आड्यारं फोड कोणी घ्या लिम्ब कोणी घ्या बाभळ ई.
बर्कले सिगरेट्ला आम्हीही बर्कली म्हणायचो. काही नुसतेच बर्कल. आम्ही ती कधी कधी(चोरून)ओढायचोही:-)


Robeenhood
Tuesday, June 12, 2007 - 1:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक तीन तांदळ्या नावाचा प्रकार असे. म्हणजे हा दोन्ही प्रतिस्पर्धी बाजूला खेळत असे.याचे काहीच नुकसान नसे. याची खेळायची हौस भागे अन जबाबदारी काही नसे.
तसेच दुबळ्याखेळाडूला आणखी एक बोनस डाव दिला जाई. त्याला आमच्याकडे 'पोट्या' म्हणत.फारच दुबळा अगर मिस मॅच असेल तर दोन अथवा तीन 'पोटे' दिले जात.म्हणजे तो बाद झाला तरी त्याने तितक्या वेळा पुन्हा खेळायचे.


Chhatrapati
Tuesday, June 12, 2007 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तीन तिघाडा काम बिघाडा !

तीन लोक जेव्हा एखादे काम करायला निघतात आणि त्यातल्या एकाला जाणवते की आपण तीन लोक आहोत त्यामुळे हे काम होणार नाही, तेव्हा तो हे वाक्य म्हणून दाखवतो.

यावर उपाय म्हणून एक दगड बरोबर घेतात. तो दगड म्हणजे चौथ्या माणसाचे प्रतिनिधित्व.


Zakasrao
Tuesday, June 12, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छत्रपती (खरतर मला तुला कोल्हापुर ष्टाईलीत हाक मारावी वाटतेय पण तुझ नाव म्हणजे आमच आदर स्थान म्हणुन छत्रपतीच. नायतर मदन चा मद्या,बबन चा बबन्या ही नेहमीची खासियत) जियो यार मी ते डाव पाडणे पक्क विसरलो होतो तु आठवण करुन दिलिस. ग्रेट.
मोठ्या चिनिमातीच्या गोटीला गारगोटी म्हणत होतो आम्ही.
ते सिगरेट च नाव काय आठवत नाहिये.पण एक निळ्या रंगाच पाकिट होत त्याची किंमत १०० होती खेळातली बहुतेक charms asel आणि चारमिनार (पिबळा हत्तीच ना?) म्हणजे सगळ्यात कमी किंमत असलेल पाकिट अस आठवतय.
आणि हो मांजर आडव गेल कि एक दगड घ्यायचा छोटा आणि त्याला काहितरी नाव द्यायच आणि तो आपल्या पुढे टाकायचा हा प्रकार आम्ही केलाय.
लहानपणी चिंचोके वापरुन पण खेळलोय. त्यात एक चिंचोका घ्याय्चा बर्‍यापैकी मोठा. तो टोंबेल. त्याला आणखी मोठा करायचा असेल तर त्याला पाण्यात भिजवायचा आणि एखाद्या बैलगाडीखा चाकाखाली (लोखंडी धाव असलेल्या बैलगाड्या होत्या त्यावेळी) टाकायचा मोठा होण्यासाठी.
अरे हो ह्या सगळ्यात भोवरा विसरलो की. रन्गबरंगी भोवरा फ़िरताना मजा यायची. तो ज्यावर फ़िरतो त्या लोखंडी छोट्या भागाला आम्ही आरी किंवा आरी म्हणत होतो.
काहिजण त्याची असलेली आर काढुन त्यात दुसरी मोठी जास्त तोक वाली किंवा जास्त फ़ताडी आर घालायचे. कारण एकच दुसर्‍याच्या भोवर्‍यात ती घुसली पाहिजे. भोवरा ज्याने फ़िरवायचा त्या दोर्‍याला नाडी म्हणत होतो. अजुन काहितरी शब्द आहे पण आठवत नाहिये.


Farend
Tuesday, June 12, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भोवर्‍याचे तीन 'हात' होते ना? खालचा, मधला आणि वरचा, यापैकी वरच्या हाताने दुसर्‍या भोवर्‍यावर मारता यायचा.

काही सराईत लोक तो मधल्या हाताने हवेत उडवून, नाडी मोकळी करून पुन्हा स्वत:च्याच तळहातावर फिरवत ठेवायचे.

कधीकधी भोवर्‍याभोवती नाडी बांधल्यावर भोवरा निसटून नुसते शंकूच्या आकाराचे नाडीचे वेटोळे हातात यायचे :-)


Swati_rajesh
Tuesday, June 12, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chhatrapati yanche KOP darshan vachale. Pratyaksh KOP la jaun aalesarkhe vatale.(Mi UK madhe rahate.)Pan mi Kolahapuri aahe.

Chhatrapati
Tuesday, June 12, 2007 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पुसट आठवतंय त्याप्रमाणे बहुतेक 'Four Square' नावाची सिगारेट मिळायची त्याच्या पाकीटाला सर्वात जास्त गुण होते. चारमिनारच्या पिवळ्या पाकीटाला सर्वात कमी गुण असायचे. 'WILLS' चे पाकीट यादोन्हीच्या मधे कुठेतरी असायचे !



Robeenhood
Wednesday, June 13, 2007 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारमिनार म्हणजे पिवळा हत्ती नव्हे. चारमिनार ही सर्वात स्वस्त सिगरेट होती. ५ पैशाला दोन मिळत. पण भलतीच कडक. चारमिनार ओढणारा डेअरिंगबाजच मानला जायचा. पिवळा हत्ती म्हणजे Honey dew . हिच्या पिवळ्या पाकीटावर हत्ती व खजुराच्या झाडाचे चित्र असे. म्हणून तिला पिवळा हत्ती म्हणायचे. अत्यन्त फुसकट माल. बहुसंख्य बिगिनर्सची 'संथा' पिवळ्या हत्ती पासूनच व्हायची:-) पिवळा हत्ती नाव एवढे प्रसिद्ध की ९५ टक्के लोकाना तिचे नाव हनी ड्यू आहे हेच मुळी माहीत नसायचे. फ़िल्टर आणि मेंथॉलयुक्त अशी कूल नावाची सिगरेट होती.ती कधीतरी चवीत बदल म्हणून ओढून पाहीली जायची. त्यातून थंडावा देणारा धूर येत असे. पण त्याने 'किक' बसायची नाही. बाकी फिल्टरचे ब्रॅन्ड सामान्यासाठी नसतच. फ़ोर स्क्वेअर हा त्यात खूपच पॉप्युलर. ५५५ ही तर चित्रपटातले व्हिलनच ओढायचे.(तसेच ती वॅट ६९ नावाची दारूची बाटलीही फक्त चित्रपटातच दिसायची!)
निळू फुले एका मराठी चित्रपटात स्टायलिशपणे व कुर्र्यात ५५५ चे पाकीट काढून शायनिंगमध्ये उघडतो आणि त्यातून हळूच बिडी काढून आरामात पेटवतो असे दृश्य आहे!!

एक रॉयल नावाची ब्राऊन रंगाची सिगरेट होती. तिचा धूर चक्क गोड लागायचा!! पण तीही फक्त रुचीपालटापुरतीच. ...

सिगरेटची मोकळी पाकीटे गोळा करून सहा पाकीटांचा षटकोनी डबा तयार करून तो शो पीस म्हणून टांगून ठेवणे हाही प्रकार असे....


Chhatrapati
Wednesday, June 13, 2007 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू दिलेली माहिती अतिशय मौल्यवान आहे !!
सिगारेटबद्दल माझे ज्ञान शून्य आहे.

याचा अर्थ चारमिनारचे पाकीट पिवळे नसायचे तर. पिवळे पाकीट Honey Dew चे. चारमिनारचे पाकीट बहुदा पांढरेच होते. खूप लहानपणीचा खेळ असल्यामुळे बारकावे आठवत नाहीत.



Sunilt
Wednesday, June 13, 2007 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा रॉबिनहूड काय याद दिलवलीत !

आता मला सिगरेट सोडून २ तपे उलटली पण अजूनही ते दिवस आठवतात.

पॉकेटमनीच्या पहिल्या आठवड्यात ६५ पैशांना मिळणारी ५५५, डनहील, मार्ल्बोरो इ.

दुसर्‍या आठवड्यात २० पैशांना मिळणारी विल्स, फ़ोर स्क्वेअर इ.

तिसर्‍या आठवड्यात त्याहूनही स्वस्त अशा ब्रिस्टॉल, चारमिनार, पिवळा हत्ती इ.

आणि चवथ्या आठवड्यात तर चक्क शिवाजी, संभाजी, गणेश इ. !!!!


Chhatrapati
Thursday, June 14, 2007 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेध कोल्हापूरचा माझ्या लहानपणीचा (सुमारे १९८० ते १९९०) : पुढे …

मागे लिहिले होते त्याप्रमाणे कोल्हापूर मध्ये अनेक पेठा आहेत, त्यातल्या सर्वात प्रसिद्ध दोन म्हणजे 'मंगळवार पेठ' आणि 'शिवाजी पेठ'. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या दोन्ही पेठेतल्या रिक्षा अतिशय सुरेख नटवलेल्या असतात. प्रत्येक रिक्षा अगदी लख्ख ठेवलेली असते. रिक्षामध्ये अनेक झिरमिळ्या, अर्धपारदर्शक पडदे, मागच्या सीटच्या दोन्ही बाजूला एक दोन नट्यांची चित्रे, अतिशय उत्तम प्रकारचे संगीत (झंकार बीट्स खुलून ऐकू येतील असे) आणि बहुतेकवेळा सुवास, असे चित्र अनुभवायला मिळते. रात्री शांत वेळी घराजवळून जर रिक्षा जात असेल, तर आधी फक्त ’धुडुम धुडुम’ असा आवाज येतो, मग आपल्या लक्षात येते की रिक्षा येतेय आणि त्यात झंकार बीट्सचे गाणे लागले आहे ! रिक्षाच्या आतील आसनांची मान चांगली उंच, बसायला सोपे पडेल आणि बसल्यावर जास्त सुखदायी वाटेल अशी घडवून घेतलेली असते. रिक्षाच्या मागच्या बाजूला जी लांबट गोलाकार खिडकी असते, ती या सजावटीमुळे झाकून गेलेली असते. रिक्षावाल्याला जर मागे पाहावे लागले (म्हणजे त्याला मागे पाहण्याची चुकून इच्छा झालीच) तर तो डोके बाहेर काढून मागे सहज पाहू शकतो, त्यामुळे या खिडकीची गरज भासत नसावी. रिक्षाच्या बाहेर जे रेक्झिन लावलेले असते त्यावर महाराष्ट्राचा भगवा झेंडा हमखास रंगवलेला असतो, 'आंबाबाई प्रसन्न' किंवा तत्सम नक्षीदार अक्षरे रंगवलेली असतात. कधी कधी आरश्याजवळ एक भगवा झेंडा फडकवलेलाही दिसतो. जरूरीपेक्षा बरेच जास्त आरसे रिक्षाला लावलेले आढळून येतात. काही आरसे खूप मोठे असतात. कधी कधी रिक्षावाला गिऱ्हाईकाबरोबर संवाद साधण्यासाठी यातल्याच एखाद्या आरशात पाहून बोलतो. त्यातून एखादी ’ललना’ जर मागे आसनस्थ असेल, तर रिक्षावाला हा आरसा व्यवस्थित हलवून तिचा चेहरा दिसेल असा ’सेट’ करून घेतो. रिक्षात पंखे लावल्याचेही मला आठवते. रिक्षावाल्याच्या उजव्या बाजूला आणि क्वचित मागेही एखादा पंखा असतो. त्यावेळी CD नवत्या, त्यामुळे रिक्षावाल्याकडे गाण्याच्या cassettes असायच्या. फार मोठ्या आवाजात गाणे लावल्यावर जर रिक्षावाल्याला आवाज कमी करण्याची विनंती केली, तर त्याला त्याचा अपमान केल्याची भावना येते. जर रिक्षावाला तरूण असेल, तर चांगले स्वच्छ धुवून इस्त्री केलेले खाकी कपडे त्याने घातलेले दिसतात. अर्थात, रिक्षा चालवण्याचे काम अभिमानाने केले जाते. रिक्षा हे वाहन तसे खूप उघडे असते. रिक्षावाल्याच्या दोन्ही बाजू आणि गिऱ्हाईक बसतो त्या आसनाच्याही दोन्ही बाजू उघड्याच असतात ! पण कोल्हापूरात पावसाळ्यात कधी कधी रिक्षाला मागच्या आसनासाठी दोन्ही बाजूला ताडपत्रीची दारे असल्याचे मला आठवतेय ! रिक्षावाला मात्र पाण्याचे थेंब आनंदाने झेलायचा … ! शाळकरी मुलांची वाहतुक करणाऱ्या रिक्षांखेरीज असली रिक्षा पुण्यात पाहिल्याचे मला आठवत नाही, .

मागे आसनावर बसल्यावर आपल्यासाठी लिहिलेल्या अनेक सूचना दिसतात, फक्त कोल्हापूरात नाही, तर सगळीकडच्याच रिक्षांत. त्यातली सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे “मीटरप्रमाणे पैसे देणे”. पण माझ्या अनुभवाप्रमाणे कोल्हापूरात मीटरप्रमाणे भाडे घेण्याची पद्धत नवती. आता माहिती नाही. मीटरवरचे आकडे कार्डवरती असलेल्या कोष्टकाप्रमाणे वाढवून भाडे घेण्याची पद्धत सध्या सगळीकडेच रूढ झाली आहे. दुसरी एक सूचना म्हणजे “रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत गाडी रिकामी परतीचा आकार दीडपट आकारला जाईल”. या वेळेत गिऱ्हाईकाला सोडून जर रिक्षा रिकामी परत येणार असेल, तर येतानाचे अर्धे भाडे गिऱ्हाईकाने द्यायचे असा त्याचा अर्थ. एकदा आम्ही उशीरा बस स्टॅंडवर पोचलो आणि वेळ बिकट होती, रात्रीचे १२ तर वाजून गेले होते आणि पहाटे ५ वाजेपर्यंत तिथे थांबणे म्हणजे मूर्खपणा होता, त्यामुळे या दीडपट भाड्याच्या प्रसंगाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले. मला अजून आठवतेय, आम्हाला रिक्षावाल्याने अस्सल कोल्हापूरी भाषेत सांगितले “दीडपट भाडं द्यावं लागंल, आधीच सांगून ठेवतो, नंतर विव्हळायचं नाही !”. रिक्षाच्या आत असतात तश्या बाहेरही सूचना असतात. ’सुरक्षित अंतर ठेवा’ व ’तीन प्रवाशांकरिता’ अथवा ’तीन उतारूंसाठी’. पण सुरक्षित अंतराची पाटी गिऱ्हाईकासाठी नसावी. (बसस्टॅंडच्या विषयावरून आठवले, तिथे एक दुकान होते, ज्यात ’यळगूडचे मसाला दूध’ मिळायचे, फार स्वादिष्ट असायचे !! कोणाला आठवतेय का ?)

माझ्या भावाने मला कोल्हापूरात रिक्षा करण्याआधी रिक्षावाल्याबरोबर तपासून पाहण्याचा तीन गोष्टी सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे, ’कार्ड आहे का ?’ दुसरी म्हणजे ’कार्डाप्रमाणे भाडे घेणार का ?’ आणि तिसरी म्हणजे ’दहाचे सुट्टे आहेत का ?’. (त्यावेळी दहाची नोट ’मोठी’ होती. एकची आणि दोनची नोट प्रचारात होती ! ) जर या तीनही प्रश्नाचे उत्तर ’हो’ आले, तर नंतर भांडण होण्याची शक्यता कमी असते, असे त्याचे म्हणणे होते.

पुणेकरांना कदाचित आश्चर्य वाटेल, पण पूर्वी मीटर चालू न करता काही वेळा आधीच भाडे ठरवून रिक्षा करण्याची पध्दत होती. माझ्यामते टांगा करताना ही रीत असावी आणि सवयीमुळे ती पुढे चालू राहिली असावी. कोल्हापूरात रेल्वे स्टेशनच्या बाहेर अगदी दहा वर्षापूर्वीपर्यंत टांगे असायचे. मला असे वाटते की टांग्यातून जायला फार मजा येते , बैलगाडीपेक्षा जास्त !



Zakasrao
Thursday, June 14, 2007 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यात ’यळगूडचे मसाला दूध’ मिळायचे, फार स्वादिष्ट असायचे !! कोणाला आठवतेय का >>>>>>..
ते दुकान अजुनही आहे.
काही रिक्षांमधे आपल काहि विसरल का असही लिहिलेल मी पाहिलय. सगळ्या रिक्षा फ़ायबर टफ़च्या आहेत आताही (९८% म्हणायला हरकत नाहि) बाकी सजावटीच वर्णन चोक्कस केलत.
मला एका मित्राने संगितले होते की रिक्षाचीही सौंदर्य स्पर्धा असते. त्यात बरेच रिक्षावाले भाग घेतात. त्याने अशी स्पर्धा २००१ साली पाहुन आलाय. त्यात त्याच्या कोणीतरी नातेवाइकाने भाग घेतला होता.
अशा स्पर्धांमधे रिक्षाची स्वच्छता,त्यातील आरामदायीपणा.त्यात असलेल्या सुविधा पाहतात आणि निर्णय देतात. त्याच्या त्या नातेवाइकाच्या रिक्षामधे FIRST AID KIT देखील होत.


Karadkar
Thursday, June 14, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधारण १९७९-८० च्या आसपास कोल्हापुरमधे अर्धे दार असलेल्या काहीरिक्शा असायच्या तीच रिक्षा असेल तर आत बसेन असे आज्जीला सांगितलेले आठवतेय :-)

Zelam
Thursday, June 14, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छत्रपती आवडलं रिक्षापुराण.
त्या दारंवाल्या रिक्षा पावसाळ्यात मुंबईत देखील सर्रास दिसायच्या. पडदेवाल्या पण असायच्या. मला दारंवाल्याच प्रचंड आवडायच्या कारण काहीतरी special वाटायचं ना!


Karadkar
Thursday, June 14, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्ण दार वाल्या पावसाळ्यात. पण कोल्हापुरात अर्धे दार असलेल्या सर्रस असायच्या. काय खासियत होती माहीत नाही. ते दार असेल तर मला रिक्षात कडेला बसायला मिळायचे म्हणुन ती रिक्षा हवी असायची.

Karadkar
Thursday, June 14, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावसाळ्यातल्या पन्हाळा ट्रिप बद्दल लिहा रे कुणीतरी. काय सही मजा यायची ना?

आमच्या सिनिअर्स नी अम्हाला वेलकम पार्टी तिथे दिलेली. जून महिना, पावसाळी वातावरण, पन्हाळा हे समिकरण फ़ारच फ़िट्ट झालय डोक्यात.

Savyasachi
Friday, June 15, 2007 - 12:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'विव्हळायच' नाही ??? हा हा हा.... फ़ार हसलो या शब्दाला...

Ram3
Sunday, July 22, 2007 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ankhin kahi shabd

80 t 5 ghalun Pal
Means....
Run fasst as possible as Bajaj M80 runs.


aaila shala shikun kai kon sarpanch hot vhaay.....

arrrr char booookkk shikun mala iddyaa shikavtos .....

Tuzya barshyat mi jevalo hai .........

kanakhali jaal nighal ...... jast bollas tar....




Zakasrao
Tuesday, January 29, 2008 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोलला (फ़ारेंड) काही कोल्हापुरी शब्दार्थाचे अर्थ कळावेत म्हणून इथे आलो.
परत एकदा जुन्या काळात रमुन गेलो. :-)
इकडे आधी बरेच शब्द आले आहेत. आताच एक मला आठवला.
"किच्च" हा शब्द पुष्कळ ह्या अर्थाने किंवा "किती" अशा प्रश्नार्थक अर्थाने वापरला जायचा. :-)
आम्ही किच्च्या चिंचा खाल्या
किंवा "तुमच भात किच्च झाल" ही उदाहरणे. (इथे भात म्हणजे शेतात आलेल भात पिक)
आता हा शब्द ऐकायला देखिल मिळणार नाही कदाचित. खेडोपाडी देखिल नाही.
अजुन एक म्हणजे "नंदाळ" ह्यालाच मी अजुनदेखिल झुणक्याची धामटी म्हणतो (माय फ़ेवरीट :-)) बेसन पोळी म्हणु सहकता (अंड्याची पोळी च्या चालीवर. पण अंड्याची पोळी हा शब्द आताशा ऐकायला मिळत नाही.)
अरे हो जाता जाता.
शेतात पेरणी सुरु असली की बियाण कोणत ह्याची चर्चा मस्त असायची.
एक बियाण होत "तालुका पंचायत" नावाच. आणि आचा अपभ्रंश झाला होता "तुला काय पंचायत" ह्यामुळे भांडण होता होता राहिली आहेत अस काका बोलले मला एकदा पेरणी करताना :-)



Gajanandesai
Wednesday, January 30, 2008 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'किच्चं' हा शब्द 'किस्तं' पासून आला (किस्तं हा पण त्याच अर्थासाठी कोल्हापूराकडे बर्‍यापैकी प्रचलीत आहे) आणि किस्तं हा 'कितीसं' चा अपभ्रंश आहे असे वाटते.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators