|
|
Thread |
Posts |
Last Post |
  | Archive through January 30, 2002 | 35 | 01-31-02 4:40 am |
  | Archive through April 10, 2003 | 35 | 04-10-03 1:35 pm |
  | Archive through May 27, 2003 | 35 | 05-27-03 7:37 am |
  | Archive through June 09, 2003 | 35 | 06-09-03 4:25 am |
  | Archive through September 04, 2003 | 35 | 09-04-03 6:32 pm |
  | Archive through September 12, 2003 | 35 | 09-12-03 7:37 am |
  | Archive through October 06, 2003 | 35 | 10-06-03 12:55 pm |
  | Archive through January 16, 2004 | 35 | 01-16-04 4:53 pm |
  | Archive through May 29, 2007 | 20 | 05-29-07 4:52 am |
  | Archive through June 11, 2007 | 20 | 06-11-07 11:58 pm |
  | Archive through January 30, 2008 | 20 | 01-30-08 1:15 pm |
Farend
| |
| Wednesday, January 30, 2008 - 10:38 pm: |
| 
|
धन्यवाद झकास, पण सांगितले नाहीस येथे अजून टाकले आहेस, सहज लिंक बघितली म्हणून कळाले. भाताची मला एक नेहमी गंमत वाटते... शेतात तो भात असतो, मग त्याचा तांदुळ होतो आणि घरी शिजवला की परत भात
|
Hkumar
| |
| Friday, February 01, 2008 - 3:21 pm: |
| 
|
'अनुभव' च्या २००७ दिवाळी अंकात 'कोल्हापूरकी' हा मल्हार अरणकल्लेंचा लेख आहे. त्यात 'बोला की, या की, बसा की' या खास बोलीचा उल्लेख आहे. कोल्हापूरकरांनी जरूर वाचावा.
|
कोल्हापुरी जगातले सर्वात शिस्तशीर नागरिक आहेत. नेहमी बोलताना ते "शिस्तीत जा", "शिस्तीत जेवा" असा हुकूम देत असतात. "शिस्तीत जेवा" म्हणजे नक्की काय? कोल्हापुरी सोडून इतर सर्वजण बेशिस्त आहेत अशी कोल्हापुरकरांची समजूत आहे का?
|
अहो शिस्तीत म्हणजे सावकाश जेवा, सावकाश जा. (पाहुण्यांसाठी वगैरे "शिस्तीत जेवा" अशी आदब दाखवली जाते. नाहीतर "घिसाड-घाई करू नको!" असं सणसणीत वाक्य येतं.)
|
शेतात असते तेव्हा 'तें भात'.. घरी आल्यावर 'तो तांदुळ' आणि शिजल्यावर होतो 'तो भात'....
|
सतीश, तो हुकूम नाही तर प्रेम व्यक्त करण्याची "क्वोल्लापुरि स्टाय्ल" आहे. "शिस्त" हा शब्द कोल्हापुरात निष्कारण आणि अनावश्यक रित्या जास्त रूढ आहे. पण नेमका कोणता माणुस बोलतोय आणि त्याचा बोलण्याचा सूर कसा आहे, हे जाणून घेतले, तर "शिस्त" या शब्दाचा अर्थ "शिस्त" असा न राहता, गजानन-देसाईंनी लिहिल्याप्रमाणे, "सावकाश" किंवा "मनापासून, आनंदाने" किंवा "परिस्थितीसाठी योग्य" असा आहे, हे समजते. कोल्हापूरकरांनी "शिस्त" या शब्दाचे cliche या प्रकारात परिवर्तन केले आहे. "शिस्त" या शब्दाचे भाऊ-बहीण : व्यवस्थीशीर, शिस्तीनं, पद्धतशीर, बेशीस्त; वगैरे.
|
शिस्त या शब्दाचा दुसरा उगम जवळ असलेल्या कानडी भाषेच्या प्रभावातून आअहे. "शिस्त" झाले म्हणजे व्यवस्थित झाले,"शिस्त" आहे म्हणजे छान आहे,असा अर्थ त्या भागातील कानडीत होतो. या "शिस्त"चा व discipline चा सम्बन्ध बरेचदा नसतो-सतिशराव
|
रवी उपाध्ये, आपण एकदम झकास सांगितलेत ! कोल्हापूर जिल्हा दक्षिण महाराष्ट्रात "मोडत" असल्यामुळे कानडी भाषेचा मोठा पगडा कोल्हापूरकरांवर पडला आहे. पु. ल. देशपांड्यांनी लिहिल्याप्रमाणे, "ताई", "आक्का" आणि "आण्णा" या सर्वात जिव्हाळ्याच्या लोकांना मराठीमध्ये स्थान देण्याचे श्रेय कानडी भाषेला जाते. मला आठवते त्याप्रमाणे, कोल्हापूरात कोणत्याही अनोळखी स्त्रीला "आहो ताई" असे संबोधण्याची रीत आहे.
|
|
|