Bee
| |
| Friday, September 21, 2007 - 8:26 am: |
| 
|
दागदागिणे ह्या शब्दामधे दाग ह्या शब्दाचा अर्थ डाग असा होतो का? हिन्दीमधे आपण डाग ह्या शब्दाला दाग म्हणतो. दागिणे घडविताना त्यांना डाग देऊन घडवावे लागतात म्हणून कदाचित दागदागिणे असा जोड शब्द आपण करतो. बरोबर?
|
Ashwini_k
| |
| Friday, September 21, 2007 - 10:20 am: |
| 
|
कदाचित "फ़ळफ़ळावळ", "बागबगिचा" तसे "दागदागिने असेल.
|
Bee
| |
| Friday, September 21, 2007 - 10:50 am: |
| 
|
अश्विनी, असेल कदाचित.. मला जर wishpers and murmur ह्याचा मराठीमधे अनुवाद करायचा झाला तर तो 'कुजबुज आणि खूसूरफ़ूसूर' असा होऊ शकेल का? हिंदीमधे खूसुरफ़ूसूर की कुसूरपूसूर असा शब्द आहे ना..
|
Maanus
| |
| Saturday, September 22, 2007 - 3:41 am: |
| 
|
क्ष references सापडले की उत्तर टाकतो. अत्ता solid references नाहीत, पण जर तुला खुप जुन्या लिखाणाच्या (B.C. जमाण्यातल्या) images सापडल्या तर तुझ्या लक्षात येईल.
|
Zakasrao
| |
| Saturday, September 22, 2007 - 8:10 am: |
| 
|
तु जे दागदागिने विषयी विचारलस त्याविषयी नक्कि नही माहित पण आमच्या कोल्हापुरातल्या खेड्यामध्ये मी अशी वाक्य ऐकली आहेत "हं तेन व्हय दारुच्या नादात तिच्या अंगावर एक बी डाग न्हाइ र्हाउ दिला" अर्थात हे वाक्य काल्पनिक आहे पण साधारण असा डाग हा शब्द दागिन्यांविषयी वापरलेला ऐकल आहे मी.
|
Badamraja
| |
| Monday, October 08, 2007 - 8:48 am: |
| 
|
'केस' या शब्दाचे अनेकवचनी रुप काय आहे? किंवा केस हाच जर अनेकवची शब्द असेल तर त्याचे एकवचनी रुप काय असेल?
|
Zakki
| |
| Monday, October 08, 2007 - 12:19 pm: |
| 
|
एक केस, अनेक केस. एकवचन नि बहुवचन एकच. क्रियापदावरून ओळखायचे की एका केसाबद्दल बोलताहेत का अनेक. कागद याचेहि एकवचन व अनेकवचन 'कागद' असे आहे.
|
Bee
| |
| Tuesday, October 09, 2007 - 2:14 am: |
| 
|
मुर्ती चे अनेकवचन मुर्ती होते असे मी कुठेतरी वाचले होते. हे खरे आहे का?
|
Badamraja
| |
| Tuesday, October 09, 2007 - 10:04 am: |
| 
|
मुर्ती या शब्दाचे अनेक वचन "मुर्त्या" एकण्यात आले आहे. ती मुर्ती त्या मुर्त्या "मुर्त्या" हा शब्द बोली भाषेत प्रचलीत आहे, पण वाचण्यात कधी आला नाही.
|
माझ्या मते मुर्त्या हा शब्द चुकीचा आहे. मूर्ती, पत्नी, पती या शब्दाचे अनेकवचन तेच आहे. पत्न्या वगैरे नव्हे.
|
Bee
| |
| Wednesday, October 10, 2007 - 2:45 am: |
| 
|
वाचनात आला नाही असे का म्हणता.. सकाळ किंवा कुठलेही वर्तमानपत्र उघडून पाहिले की गणपतीची मुर्ती उल्लेखकताना कित्येक वेळा मी मुर्त्या हा शब्द वाचला आहे. मला तो कसासाच वाटायचा म्हणून इथे मुद्दाम विचारून घेतले. धन्यवाद.. त्याला ३ पत्नी होत्या. वरील वाक्य बरोबर आहे का कारण वर म्हणालेत तसे त्याला ३ पत्न्या होत्या हे चुकीच होईल.
|
बी, मूर्ती.. "मू" दीर्घा आहे रे.. माझ्या बॉसने पहिल्याच दिवशी सांगितलेलं.. "मूर्ख" आणि "मूर्ती" दोन्ही दीर्घच.. आणि मी मुर्त्या असं लिहिल्यामुळे त्याने झापले होते. त्याला तीन पत्नी होत्या. हे बरोबर.... (व्याकरण दृष्ट्या,,
|
Badamraja
| |
| Wednesday, October 10, 2007 - 7:15 am: |
| 
|
माझ्या एकण्यात जास्त आला आहे मूर्त्या हा शब्द. आणि हो मलाहि तो कसासाच वाटतो वाचतांना. त्या एवजी जर " गणपतिच्या मूर्ती " अस लिहील तर?
|
Bee
| |
| Wednesday, October 10, 2007 - 9:47 am: |
| 
|
पण आजच्या काळात ३ काय २ पत्नी असणेही दुर्लभ आहे त्यामुळे पत्नीचे अनेकवचन वापरण्याची संधी क्वचित कुणाला मिळत असेल धन्यवाद नंदीनी आणि बदामराजा.. परत मूर्खपणा करणार नाही
|
Farend
| |
| Wednesday, October 10, 2007 - 10:38 pm: |
| 
|
बी आता शब्दांबद्दलच बोलतोय तर 'दुर्लभ' शब्द असे सुचवतो की इच्छा आहे पण शक्य नाही, तेव्हा तसे काही आहे का? पूर्वी सकाळ केसरी वगैरे पेपर्स ची भाषा अचूक होती (हे पुण्याचे पेपर्स असल्याने पुणेरी भाषेच्या दृष्टीने), पण आता गडबड झाली आहे असे दिसते.
|
Psg
| |
| Thursday, October 11, 2007 - 8:03 am: |
| 
|
बी, २ पत्नि असणं 'दुर्लभ' नाही 'बेकायदेशीर' आहे. 'दर्शन' हे अनेकदा 'दुर्लभ' असतं. जसं की मधे काही वर्ष 'माधुरी दिक्षित'चं होतं
|
Hkumar
| |
| Thursday, October 11, 2007 - 1:57 pm: |
| 
|
{2 patnee asaNe kaahee samaajaata 'kaayadesheera' aahe!}
|
Zakki
| |
| Thursday, October 11, 2007 - 3:43 pm: |
| 
|
एक जुना नट धर्मेंद्र नावाचा, याने दोन लग्ने केली होती. मला वाटते दुसरी बायको हेमा मालिनी नावाची नटीच होती. तेंव्हा कोर्टाने म्हंटले होते की पहिल्या बायकोला हरकत नसेल तर दुसरे लग्न केले तरी चालेल.
|
Slarti
| |
| Friday, October 12, 2007 - 3:02 am: |
| 
|
अशी (पहिली) पत्नी मिळणे मात्र दुर्लभ !
|
Badamraja
| |
| Friday, October 12, 2007 - 6:44 am: |
| 
|
"च्यायला" हे एक उभयान्वयी अव्यय की अन्वय आहे, जस अरेरे,अबब,अरेच्चा इ. अस राजा गोसावी यांनी एका मराठी चित्रपटात म्हंटलेल आहे. मग "च्यायला" ही एक शिवी आहे की अनोपचारीक मराठी व्याकरणाचाएक भाग आहे?
|