Slarti
| |
| Friday, October 12, 2007 - 8:04 pm: |
| 
|
मुळात अरेरे, अबब इ. उभयान्वयी अव्यये (आणि, व, पण, परंतु) नाहीत, ते भावनाप्रदर्शक उद्गार आहेत. च्यायला ही शिवी. ते 'तुझ्या आयला' चे अपभ्रष्ट रुप असावे.
|
'अबब!', 'अरेरे!' ही केवलप्रयोगी अव्ययं आहेत.
|
Badamraja
| |
| Monday, October 15, 2007 - 9:45 am: |
| 
|
मला वाटत "च्यायला" अस आपण वैताग आल्यावर सुद्धा बोलतो आणि त्या वेळेस कुणाच्या तरी आईचा उल्लेख आपण नक्कीच करत नसतो.
|
Slarti
| |
| Monday, October 15, 2007 - 9:59 am: |
| 
|
ती मूळ शिवीच, आता त्या शब्दाचा तो संदर्भ नाही राहिला एवढेच. आता हा शब्दही अबब, अरेच्चा यांसारखा झाला आहे. या शब्दाचे 'मायला' असेही एक रुप प्रचलित आहे.
|
Badamraja
| |
| Monday, October 15, 2007 - 10:16 am: |
| 
|
च्यायला ही शिवच पण कीती सहज हल्ली वापरली जाते. अश्याच जर बाकीच्या शिव्या सुद्धा वापरल्या गेल्या तर? बापरे आपली भाषा किती भयंकर होईल. कल्पना न केलेलीच बरी.
|
Dineshvs
| |
| Monday, October 15, 2007 - 5:02 pm: |
| 
|
Slarti या शब्दाचे मूळ कोल्हापुर भागात दिल्या जाणार्या एका लांबलचक शिवीमधे आहे. खरे सांगायचे तर मला हा संदर्भ माहित असल्याने, हा शब्द लिहितानाही मला अवघडल्यासारखे होते.
|
Bee
| |
| Tuesday, October 16, 2007 - 1:53 am: |
| 
|
बोलीभाषेत आलेले 'च्यायला' सारखे शब्द मला कधीच घृणास्पद वाटलेले नाहीत. आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त होतात असे वाटते..
|
Badamraja
| |
| Tuesday, October 16, 2007 - 6:47 am: |
| 
|
बी सुसंस्क्रुत मराठीत अजुन तरी च्यायला चा वापर असभ्य मानला जातो. पण च्यायला म्हटंल्या शिवाय आपला दिवस सपंत नाही.(भावना मुक्तपणे व्यक्त करण्याच स्वातंत्र्य)
|
Hkumar
| |
| Wednesday, October 17, 2007 - 6:06 am: |
| 
|
'च्यायला' ही शिवी नाही असे वपुंनी त्यांच्या एका लेखात म्हटले होते.
|
Maanus
| |
| Tuesday, January 08, 2008 - 4:15 pm: |
| 
|
शहर हे पुल्लीगी असले तरी काही वेळेस त्याला स्रीलींगी का संभोदतात? उ.दा. पुणे हे पुरातनकालीन शहर आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
|
Maanus 'ते शहर' हा शब्द आहे..(नपुंसक) तो पुल्लिंगी नाही (तो शहर)... आणि 'राजधानी' स्त्रिल्लिंगी म्हणून 'ती राजधानी'....
|
Maanus
| |
| Tuesday, January 08, 2008 - 7:24 pm: |
| 
|
हम्म. वेळ लागेल समजायला. ल ला दुसरी विलांटी दिल्यामुळे विनय ने तिकडे डेस्क वर डोके आपटुन घेतले असनार
|
Shraddhak
| |
| Wednesday, January 09, 2008 - 1:47 pm: |
| 
|
शहर हे पुल्लीगी असले तरी काही वेळेस त्याला स्रीलींगी का संभोदतात?>>> माणसा, योग्य शब्द ' संबोधतात ' असा आहे रे. 
|
'माणूस' च्या बाबतीत बर्यात गोष्टी जरा समजून घ्याव्या लागतात तो'बी' (तो पण) जरा हरवलेला असतो...
|