Bee
| |
| Saturday, October 15, 2005 - 12:57 am: |
| 
|
malaahI Ô> naahI hoca jaast barÜbar vaaTto. naahIyao ho Kro tr naahI Aaho (acao short form Aaho. karNa Aaho ha Xabd jar vaa@yaacyaa XaovaTI Aalaa tr %yaacaa ]ccaar yao saarKa hÜtÜ mhNaUna tÜ
naahI laa icakTvaUna %yaacao naahIyao kolao Asaavao. kolayaMÊ JaalayaM ho caukIcao Aaho kaÆ
|
Bee
| |
| Saturday, October 15, 2005 - 1:04 am: |
| 
|
jaovaNaasaar#yaa mah<vaacyaa kamaat KDo yao} Xaktat tr baÜlaIBaaYaot ikMvaa ilaKaNaat ka naahI saayaÜÊ malaa saaMgat jaa gaM cauka.. malaa %yaacaI inataMt garja Aaho AaiNa maI eKaVa ivaVaqaa-saarKa
naohmaI eoktÜhI kuNaI saaMigatlao tr.. toMvha laxa AsaU do..
|
malaa vaaTto kIÊ ihMdItlyaa nahI hO va$na naahI Aaho / naahIyao ha Xabdp`yaÜga marazIt Aalaa Asaavaa.
|
Chafa
| |
| Saturday, October 15, 2005 - 2:26 pm: |
| 
|
rcanaa AaiNa gajaanana Qanyavaad. pTlaM tumhI ilahIlaolaM.
|
Pha
| |
| Thursday, May 11, 2006 - 11:24 am: |
| 
|
V&C वर एका ठिकाणी बी ने - 'आलंकारिक' शब्द योग्य का 'अलंकारिक' शब्द योग्य? - असा प्रश्न विचारला होता. त्या अनुषंगाने खालील माहिती लिहीत आहे : >>>>ते खरच आलंकारीक आहे की अलंकारिक आहे? दोन्हीही नाही. योग्य शब्द 'आलंकारिक' असा आहे(पहिलं अक्षर 'आ' आणि 'रि' र्हस्व इकारयुक्त आहे.). 'इक' प्रत्ययान्त शब्दात सर्वत्र र्हस्व इकारच असतो. जसे : वैधानिक, औद्योगिक, क्रमिक. 'इक' प्रत्ययान्त शब्दांचा अजून एक गुणधर्म म्हणजे त्यांचे पहिलं अक्षर लघु असेल तर (जनरली .. cbdg ) दीर्घ / गुरु होतं. उदा. : १. 'अ' चा 'आ' : प्रतिनिधी - प्रातिनिधिक, समर - सामरिक, अध्यात्म - आध्यात्मिक, सप्ताह - साप्ताहिक, अधुना - आधुनिक. २. 'इ' चा 'ऐ' : दिन - दैनिक, लिंग - लैंगिक. ३. 'उ' चा 'औ' : उद्योग - औद्योगिक, उपचार - औपचारिक. ४. 'ए' चा 'ऐ' : वेद - वैदिक. यातल्या १ नं. च्या उदाहरणांप्रमाणे 'अलंकार' या शब्दापासून 'आलंकारिक' हा शब्द योग्य आहे.
|
Chafa
| |
| Thursday, May 11, 2006 - 2:29 pm: |
| 
|
फ, छान माहीती दिलीस. पण तू दिलेल्या नियम क्रमांक १ ला खुद्द 'अ' नेच सुरु होणारे शब्द अपवाद असतील का? जसे अनुवंशिक, अगतिक, अल्पसांख्यिक, अनुनासिक हे शब्द अगदी रूढ आहेत. 'आध्यात्मिक' बद्दलः मूळ शब्द 'आध्यात्म' असा आहे ना. (?) म्हणून मला वाटतंय की 'अलंकारिक' बरोबर असावा. चू. भू. द्या. घ्या.
|
Shonoo
| |
| Thursday, May 11, 2006 - 4:27 pm: |
| 
|
अलंकृत असा देखील शब्द आहे ना?तो आलंकृत नाही लिहीत. पण सालंकृत म्हणतात स + अलंकृत ते कसे काय?
|
चाफा, अपवादही असणारच. मूळ शब्द 'अध्यात्म' असा आहे. 'आलंकारिक' बरोबर आहे. तुझ्याप्रमाणे मलाही अगतिक हा शब्द बरोबर वाटतोय.
|
इकडे फ़िरताना मी बर्याचदा पाहिलयं की काही जण "प्रश्ण" लिहीतात... मला जेवढं शाळेत शिकलेलं आठवतं त्यावरून तो शब्द "प्रश्न" आहे म्हणजेच 'ण' च्या ठिकाणी 'न' आहे पण उच्चार मात्र 'ण' चा करायचा असतो. ह्या मागे कोणता नियम आहे कुणी सांगेल का? अजून एक म्हणजे "सिंह" असं लिहीत असलो तरी त्याचा उच्चार "सिंव्ह" असा आहे पण तसा फ़ारसं कुणी करत नाही. जाणकारांनी कृपया हे समजावण्याची मदत करावी अशी विनंती.
|
Maetrin
| |
| Wednesday, December 20, 2006 - 5:14 pm: |
| 
|
ek prashn: don "ch" hyamadhe gondhal hoto.lihitana he don kase lihave? 1: चमचा चटणी चौकोन.... etc 2: चांडाळ चमत्कार चेंडू आचंबा ......etc donhi madhe "ch" ucchyarat pharak ahe,pan kase lihayche te ajun kalle nahi.koni madat karel kaay?
|
Asami
| |
| Wednesday, December 20, 2006 - 6:29 pm: |
| 
|
लिहिताना काही फरक नाही , फक्त उच्चार वेगळे आहेत.
|
Robeenhood
| |
| Wednesday, December 20, 2006 - 7:12 pm: |
| 
|
देवनागरी लिपीचा हा प्रमुख दोष आहे. च वर्गातील सर्व व्यंजनाचे दोन दोन उच्चार आहेत... च,च्य. छ,छ्य, ज,ज्य. झ,झ्य... त्याला काही इलाज नाही. आपल्याकडे सरपंच म्हणतो तर विदर्भात सरपंच्य. असा उच्चार करतात. त्याला काही निश्चित नियम नाहीत...
|
अमेय, मी 'प्रश्ण' असा उच्चार मराठी जाणकारांकडून ऐकलेला नाही.... मात्र 'सिंह' चा उच्चार 'सिंव्ह' असाच व्हावा असं लहानपणापासून शिकलो.. पण आता मात्र 'सिंहगड' किंवा 'सिंह' असाच उच्चार ऐकायला मिळतो... आमच्या ओळखीतली एक मुलगी काही तरी समजावताना ' See.. हं' असं म्हणायची.. म्हणून एकदा तिला माझा मित्र 'वा.. ग' म्हणून ओरडला...
|
Maetrin
| |
| Friday, January 12, 2007 - 3:52 pm: |
| 
|
धन्यवाद मित्रानो! "च" सारखाच दुसरा प्रश्ण, * जर्दाळू, जट्टा, जादू.. *जहाज, जाळ, जब्बर.. हे कसे लिहायचे?
|
खरं तर मराठीत अशी यासाठी वेगळी अक्षरं नाहीत.. आपल्या माहीतीवरून तसा तसा उच्चार केला जातो.. त्यामुळेच कुणाला फुलराणीतलं (फ़ुलराणी नव्हे) 'एक होता राजा (जाळातला ज) आठवतंय का? इंग्रजीतला फ़ (Fool) मराठीत नाही (फुगा)... पण मग फ आणि फ़ मधला फरक जसा टिंबाने दर्शवता येतो, तर च, ज इत्यादींसाठी अशी सोय करायला हरकत नाही.. बॅट, बॉल सारख्या उच्चारांसाठी आपण अर्धचंद्र घेतलाच आहे... आता ती सोय कशी करायची हे मात्र शोधावं लागेल.. कदाचीत मायबोलीतून शिकून सगळेच ही सोय वापरू लागतील्ल (Copyright) 
|
Sayuri
| |
| Thursday, February 08, 2007 - 9:11 pm: |
| 
|
हल्ली बर्याचदा मराठी वर्तमानपत्रात 'अमेरिकी' असा शब्द वाचला. उदा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1581352.cms माझ्या मते 'अमेरिकी' हा हिंदी शब्द आहे. उदा. http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/1542466.cms मराठीमध्ये आपण 'अमेरिकन' म्हणतो..नाही का?
|
Maitreyee
| |
| Sunday, February 11, 2007 - 11:55 pm: |
| 
|
अमेरिकन हा शब्द मराठी कसा असेल इअंग्रजीच आहे! american.. चा उच्चार फ़क्त.
|
Raadhika
| |
| Monday, February 12, 2007 - 10:58 am: |
| 
|
अमेरिकी हा मराठी शब्द आहे. जसे राजस्थान चे रहिवासी राजस्थानी, पंजाब चे पंजाबी, तसे अमेरिके चे अमेरिकी... अमेरिकन हे इंग्रजी ( american ) आहे. विनय, फ़ मराठी भाषेत घेतला गेला आहे का?
|
Yogy
| |
| Monday, February 12, 2007 - 11:23 am: |
| 
|
अमेरिकी हा मराठी शब्द आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले रहिवासी हे मराठी किंवा महाराष्ट्रीय आहेत. महाराष्ट्रीयन हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. आपण तामिळनाडूइयन, बंगालीयन किंवा गुजरातीइयन असे शब्दप्रयोग करत नाही हे लक्षात घ्यावे.
|
नाही राधिका, माझ्या माहितीत तरी नाही.. पण तसा वापरायला लागलो तर प्रचलीत होईल तो..
|