|
Raadhika
| |
| Monday, February 12, 2007 - 2:40 pm: |
| 
|
तसे उर्दू मध्येही बरेच उच्चार (उदा. खौफ़ मधील ख, गैर मधील ग) आहेत, त्यांच्यासाठीही मराठीत वेगळी सोय नाही, पण मला नाही वाटत यामुळे फार काही गैरसोय होते म्हणून.
|
दिसतं एक.. पण म्हणायचं दुसरं.. अशी गैरसोय नवीन माणसाची होतेच.. हिंदीमध्ये बैंक, बोल (Ball) असं लिहिलेलं वाचून आपण हसत नाही, कारण सवय असते... पण नवीन माणसाला वाचायला सांगितलं तर हसू येईल... गुजराथी भाषेवर असे बरेच विनोद आहेत (कारण ती माणसं लिहिल्याप्रमाणे उच्चार करतात, समजून उच्चार बदलत नाहीत) तेव्हा गैरसोय ही मानण्यावर आहे...
|
Shonoo
| |
| Thursday, April 05, 2007 - 11:48 am: |
| 
|
साने गुरुजींच्या एका पुस्तकाच्या नावात 'संस्कृति' असं वाचलं. मी आतापर्यंत संस्कृती असा शब्द आहे समजत होते. साने गुरुजींच्या पुस्तकाच्या नावातच प्रकाशक घोटाळे घालणार नाहीत असं वाटतं. मग नक्की speling काय? संस्कृती कधी वापरावे, आणि संस्कृति कधी
|
Dineshvs
| |
| Thursday, April 05, 2007 - 5:11 pm: |
| 
|
मी जाणकार नाही, पण सुटा शब्द असला तर संस्कृति आणि प्रत्यय लागला तर संस्कृतीच्या, संस्कृतीत असे लिहायचे, असे वाटते.
|
Hkumar
| |
| Wednesday, October 10, 2007 - 2:06 pm: |
| 
|
एक चुकीचा लिहीला जाणारा शब्द आहे 'आंघोळ'. त्याचे शुद्ध रूप आहे ' अंघोळ'. मूळ संस्क्रुत फ़ोड आहे अंग + ओल. असे मला सं च्या शिक्षकांकडून समजले.
|
Badbadi
| |
| Monday, November 12, 2007 - 2:23 pm: |
| 
|
ध्रुव बरोबर आहे कि धृव?? दिवाळी अंकात ह. ह. च्या कथेत धृव वाचून माझं confusion झालं. माझ्यामते ध्रुव बरोबर आहे. पण जाणकरांनी सांगावे बरोबर काय ते!
|
Shonoo
| |
| Tuesday, November 13, 2007 - 1:38 pm: |
| 
|
माझा अंदाज असा आहे की धृव बरोबर असणार. त, (थ) , द, ध, न, सगळ्या शब्दांना रुकार लावला की असेच लिहितात तृप्ती, तृष्णा, दृष्टांत, नृपती नृशंस इत्यादी.
|
Asami
| |
| Tuesday, November 13, 2007 - 7:38 pm: |
| 
|
मला वाटते दोन्ही बरोबर आहेत. फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी आहे
|
Nvgole
| |
| Wednesday, November 14, 2007 - 6:20 am: |
| 
|
शोनू, 'संस्कृती' हे मराठीत बरोबर आहे. 'संस्कृति' हे संस्कृतात. नवे मराठीचे शुद्धलेखनाचे नियम येण्यापूर्वी मराठीतही 'संस्कृति' हेच बरोबर ठरे. तेव्हा साने गुरूजींच्या लेखनात तसे असणे साहजिकच आहे. आता मात्र आपण मराठीतल्या नव्या नियमांनुसार 'संस्कृती' असे लिहायला हवे.
|
Kedar123
| |
| Sunday, January 20, 2008 - 5:42 am: |
| 
|
मला कीनै विराम चिन्हांबद्दल बद्दल एक कुतूहल आहे. . असेल तर पूर्ण विराम म्हणतात ; असेल तर अर्ध विराम म्हणतात : असेल तर अपूर्ण विराम म्हणतात. आता माझी एक भयाण शंका: एक टींब असेल तर जर 'पूर्ण विराम' असतील तर दोन टींबांसाठी 'परि पूर्ण' विराम म्हणायला हव नाही का? तो 'अपूर्ण विराम' कसा काय बर??????
|
Chafa
| |
| Monday, March 10, 2008 - 2:58 am: |
| 
|
सध्या मायबोलीवर "म्हणलं", "म्हणली" यासारखे शब्द बरेच वाचनात येतात. हे शब्द "म्हणाले / म्हणालो", "म्हणाली / म्हणाला" असे वापरावेत.
|
थोडी सुधारणा चाफा त्याने म्हटले तो-म्हणाला ते-म्हणाले मी-म्हणालो/ मी- म्हटले ती-म्हणाली तिने-म्हटले -
|
कृपया कानडाहू विठ्ठलू कर्नाटकू चे निरूपण कोणी कराल का?
|
Zakki
| |
| Monday, March 10, 2008 - 11:18 am: |
| 
|
म्हणलं हा शब्द मी वापरला आहे, तो चूक आहे. म्हंटले, हे बरोबर आहे, बोलताना, म्हंटलं हे चालते. त्यातहि अनुच्चारित अनुस्वार लिहायचे नाहीत हा नियम मी शाळा कॉलेज उत्तीर्ण होऊन गेल्यावर आला, म्हणून माझा घोटाळा होतो, कधी देतो अनुस्वार तर कधी नाही. 'म्हनल' असे लिहीले तर ते ग्रामीण भाषेतले समजावे. शुद्ध मराठी कुठे वाचायला मिळेल का हो? आजकाल कथा वास्तव करायला, किंवा गंमत म्हणून, इंग्रजी, हिंदी, ग्रामीण, भोजपुरी वगैरे काहीहि शब्द वापरतात. गंभीर लिहावे तर कित्येक इंग्रजी किंवा हिंदी शब्दांना अगदी तोच अर्थ व्यक्त करायला मराठी शब्दच सापडत नाहीत. असले तरी ते नेहेमीच्या लिखाणात, बोलण्यात नसतात. त्यामुळे इंग्रजी, किंवा हिंदी शब्द तसेच रहातात. एका दृष्टीने पाहिले तर ह्या अश्या रीतीने भाषा संपन्न होते. नि अगदी शुद्ध मराठी बोलण्यात, वापरण्यात कुणाला काऽहीहि गम्य नसल्याचे आढळून येते. मग र्हस्व, दीर्घ, धृव काय नि ध्रुव काय?
|
Shonoo
| |
| Monday, March 10, 2008 - 11:51 am: |
| 
|
वि स खांडेकरांची दोन धृव नावाची कादंबरी आहे. माझ्याकडे अनवधानाने त्याच्या दोन प्रती आल्या होत्या एकीवर धृव असं लिहिलं होतं अन दुसरीवर ध्रुव! वि स खांडेकरांची दोन धृव नावाची कादंबरी आहे. माझ्याकडे अनवधानाने त्याच्या दोन प्रती आल्या होत्या एकीवर धृव असं लिहिलं होतं अन दुसरीवर ध्रुव! कोल्हापूर भागात 'मी म्हटलो' असं सर्रास म्हणतात. अजुनही काही ठिकाणी 'म्या म्हनलू' असं स्त्रिया अन पुरुष दोघांच्या वापरात असतं. समानता म्हणजे अशी असावी:-)
|
सीमाभागातील मुळची कानडी लोकं हमखास स्त्रीलिंगी कर्त्याबरोबर क्रियापदाचे पुल्लिंगी रुप वापरतात. उदा: "मी जातो" असे कानडी बायका हमखास म्हणतात.
|
' ध्रुव'च पाहिलंय मी लिहीलेलं, धृव नाही. तसंच क्रुर हे कृर असं नाही लिहीत. मला नक्की माहीत नाही, पण ( क् + रु = क्रु) आणि ( क् + ऋ = कृ) असावं.
|
Zakki
| |
| Tuesday, March 11, 2008 - 1:57 am: |
| 
|
मला वाटते कानडी लोक 'आमचं बायको' असेहि म्हणतात!
|
कानडीमध्ये मराठी सारखे "मी जातो","मी जाते" हा प्रकार नाही.स्त्री व पुल्लिन्गावर क्रियापद अवलम्बून नाही.म्हणून ही गफल्लत.पण "जातो"हे का select केले हा कुतुहलाचा मुद्दा- कानडीत ना म्हणजे मी होगुत्तेने म्हणजे जातो/ किन्वा जाते आमच बायको ला मात्र तर्कसन्गत उत्तर नाही
|
Karadkar
| |
| Tuesday, March 11, 2008 - 11:21 pm: |
| 
|
होगुत्तेने म्हणजे जातो/ किन्वा जाते >> होगतेनी किंवा होगतेने असे म्हणतात
|
Chafa
| |
| Wednesday, March 12, 2008 - 12:36 am: |
| 
|
रवी, 'म्हटले' चा वापर जोडल्याबद्दल धन्यवाद. मी फक्त "म्हणलं", "म्हणली", "म्हणला" या चुकीच्या शब्दांसाठी म्हणाला / म्हणालो किंवा म्हणाली / म्हणाले यांचा वापर सुचवला होता. स्वाती, क्रुर मधे क्रु बरोबर आहे. पण कृपा, कृषिप्रधान, कृतघ्न सारख्या या शब्दांमधे 'कृ' च वापरला जातो. याचा ठराविक असा नियम दिसत नाही. मी धृव, धृतराष्ट्र, कृष्ण वगैरे शब्द दोन्ही प्रकारे वापरलेले बघितले आहेत. सवयीने मी लिहीले आहेत तसेच वाचायला बरोबर वाटतात.
|
चाफा क्रुर नाही क्रूर
|
होगुत्तेने हा लिहिण्याच्या कानडीतील होगतेने हा बोलचालीच्या कानडीतील उपयोग
|
|
|