|
Shonoo
| |
| Tuesday, June 27, 2006 - 11:53 am: |
| 
|
गजानन फार छान सविस्तर लिहिलेत त्याबद्दल धन्यवाद. एक्-दोन शंका आहेत्: परिक्षा बरोबर की परीक्षा? आम्हाला शाळेत परिक्षा पूर्व अनध्याय असे. आता कदाचित शिक्षकांना देखील याचा अर्थ पटकन उमगणार नाही. परिक्षण तर नक्कीच र्ह्स्व आहे. शिवाय यथामति अव्यय कसे काय?
|
शोनू, परीक्षा हा शब्द बरोबर आहे. आणि तो शब्द 'परिक्षापूर्व' असा (जोडून) होता का? तसा असला तर कदाचित तो इकार र्हस्व होत असावा. पण मला याबाबत माहिती नाही, जाणकार सांगतीलच. परीक्षण या शब्दात दीर्घ इकार असावा असे मला वाटते. (वर फच्या पोस्ट मध्ये हा शब्द आलाय.) यथामति यासारखे सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्यय म्हणूनही वापरले जातात. उदा. मी यथामति सांगतो. (त्यांना साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.)
|
Zakki
| |
| Tuesday, June 27, 2006 - 7:10 pm: |
| 
|
pooh, धन्यवाद. छान माहिती आहे. पाणिनीचा मृत्यु कसा झाला याची एक कहाणि आहे. व्युत्पत्तिशास्त्राच्या अभ्यासात दंग असताना जंगलामधे त्याला एक वाघ (व्याघ्र) दिसला. त्याचा वास फार दुरूनच येत होता. तेंव्हा एकाएकी पाणीनीला सुचले की 'व्याजिघ्रति स व्याघ्र:'. जिघ्रति महणजे वास येणे (मारणे!) नि वि + आ + जिघ्रति म्हणजे ज्याचा खूप दुरून वास येतो तो. तर व्युत्पत्ति सापडल्याच्या आनंदात तो पळून जायचे विसरला. आणि त्या वाघाने त्याला खाऊन टाकले!
|
झक्की, माझे काका संस्कृत पंडीत आहेत. भाषा व संत वांड्:मय (तुकाराम) ह्या वर त्यांनी Phd केली आहे, ते सध्या ओरंगाबाद ला असतात, तुम्हाला जर भाषेवर (अकलुजकंराशिवाय) कोनाला बोलायचे असेल तर मी त्यांचा नंबर तुम्हाला देतो.
|
Chafa
| |
| Tuesday, June 27, 2006 - 8:07 pm: |
| 
|
छान माहीती दिलीस गजानन. सुधीर, एवढे सगळे नियम लक्षात ठेवले तर उत्तमच; पण ते न ठेवताही साधारणपणे उच्चार जसा असेल तसेच लिहीले तर ते शुद्ध लिहीले जाईल. उच्चाराप्रमाणेच हे नियम ठरवले गेले आहेत. उदाहरणार्थ, शब्दरचना साधारण एकच असली तरी 'ही गोष्ट फार जुनी आहे' यात र्हस्व तर 'चवळीच्या शेंगा फार जून आहेत.' यात दीर्घ उच्चार आहेत. गजाननने म्हटल्याप्रमाणे वाचनाच्या सवयीनेदेखील शुद्धलेखनाला मदत होते. (पण याबरोबरच येणारा तोटा म्हणजे अशुद्धलेखन लगेच डोळ्याला खुपते. ) शोनू, हा असा गोंधळ 'पहीला' शब्दाबाबतही हमखास होतो. पण मलाही वाटते की इथे दीर्घ उच्चारच योग्य असावा. चू. भू. द्या. घ्या.
|
Zakki
| |
| Tuesday, June 27, 2006 - 10:04 pm: |
| 
|
केदार जोशी, धन्यवाद. आता कुणा पंडितांशी बोलण्याइतके मला काहीहि येत नाही. सग्गळे विसरलो. मुळात मॅट्रिक च्या पुढे संस्कृत शिकलोच कुठे? नि आता तर वयोमानानुसार लक्षात म्हणून काही रहात नाही. (एक फायदा - कुणि काही शिव्या दिल्या तरी त्या विसरून जातो, नि रागहि टिकून रहात नाही).
|
Bee
| |
| Wednesday, June 28, 2006 - 7:53 am: |
| 
|
केदार, अकलुजकरांशिवाय का पण.. काही खास? झक्की, अकलुजकर खूप छान लिहितात. ते Canada ला असतात ना.. मी त्यांचा बहुतेक मौज किंवा लोकसत्ता मध्ये 'मराठी भाषेतील चिमण्यांवरती कविता' ह्या विषयावर एक खूपच लांबलचक आणि सुरेख लेख वाचला होता. त्यावेळेपासून हा लेखक स्मरणात आहे. पण नंतर मात्र कधी काही वाचायला मिळाले नाही. आता चिमण्यांवर बर्याच नविन कविताही आल्या आहेत. तुम्ही पाणिनिच्या मृत्त्युबद्दल लिहिलेत त्याची एक वेगळी कथा आहे. ती मारोती चितमपल्लींनी एका लेखात सांगितली आहे. ते म्हणतात वाघाची शक्ती कशात असते हे दिव्य ज्ञान त्यांना प्राप्त झाले होते आणि ते ज्ञान आपल्या काही खास शिष्यांना देण्यासाठी झाडाखाली बसले होते. तेंव्हा ते ज्ञान कुणालाही मिळता कामा नये म्हणून वाघाने त्यांच्यावर झडप घालली आणि त्यांना नष्ट केले. चितमपल्लींनी ही गोष्ट अतिशय रंजकपणे सांगितली आहे, मला इथे ती रंजकता आणता आली नाही. पाणिनि, पतंजली ग्रेट आहेत. माझ्याकडे पाणिनींचा एक स्टॅम्प आहे. युरपमध्ये पाणिनी नावाचा एक प्रसिद्ध चित्रकार होऊन गेला.

|
बी, अरे झक्कीना त्यांचाशी बोलायचे होते ( जुन्या पोस्ट मधे त्यांनी तसे लिहिले आहे) म्हनुन तसे लिहीले. काही खास नाही. पाणिनि नावाचा ब्रेड पण असतो. एकंदरीतच या नावा भोवती एक वलय आहे. ते तिकीट सही आहे.
|
Pooh
| |
| Friday, June 30, 2006 - 6:22 pm: |
| 
|
केदार, पाणिनि ब्रेड नाही. त्याचा उच्चार पनिनी असा करतात. इटालिअन शब्द आहे.
|
Bee
| |
| Saturday, July 01, 2006 - 1:16 am: |
| 
|
म्हणजे तो चित्रकारही पनिनीच असेल मग.. पूह धन्यवाद. बरोबर उच्चार सांगितल्याबद्दल.
|
पूह, बी, केदार जोशी, झक्की .. कुठे आहात तुम्ही. व्याकरणाचे हे मैदान व्याकूळ झाले आहे. या लवकर, इथे आपण व्याकक्रीडा करूया. -- छत्रपती.
|
Maanus
| |
| Wednesday, September 19, 2007 - 8:19 pm: |
| 
|
an english proffesor wrote the words: "A woman without her man is nothing" on the chalkboad and asked his students to punctuare it correctly. all of the males in class wrote: "A woman, without her man, is nothing" all of the females in class wrote: "A woman: without her, man is nothing" punctuation is powerful
|
विरामचिन्हांबद्दल मला एक प्रश्न आहे. ही कोणत्या लिपीत सर्वात आधी वापरली गेली असावीत? रोमन, देवनागरी लिप्यांमधली विरामचिन्हं सारखीच कशी? जगातील इतर कुठल्या लिप्यांमधे याहून निराळी विरामचिन्हं वापरली जातात का?
|
Zakki
| |
| Thursday, September 20, 2007 - 7:23 pm: |
| 
|
संस्कृत व हिंदीमधे (निदान पूर्वी तरी) पूर्णविरामा ऐवजी (.), '|' हे चिन्ह वापरत.
|
Anilbhai
| |
| Thursday, September 20, 2007 - 8:20 pm: |
| 
|
आणि '||' हे चिन्ह पण होते ना श्लोकाचा शेवटी.
|
Disha013
| |
| Thursday, September 20, 2007 - 8:43 pm: |
| 
|
माणसा,सही आहे रे ते.म्हणजे बायकांनी लिहीलेलें हं
|
Maanus
| |
| Thursday, September 20, 2007 - 11:06 pm: |
| 
|
जपानी भाषेत पुर्णविराम असा ० काढतात, small empty circle . ----------------- पुर्ण विराम काही शब्द छोटे करताना देखील वापरले जातात. abbreviations उ.दा. कु. चि. सौ. का. श्री. ----------------- american english मधे प्रत्येक abbreviation नंतर period वापरतात. e.g. U.S.S.R. british लोक सगळीकडे full stop वापरत नाही BBC ----------------- रुपाया व पैसे ह्यांचे वर्गीकरण करताना . वापरला जातो १०९.९९ ----------------- computers मधे domain name seperate करायला period वापरतात www.maayboli.com www = subdomain maayboli = main domain com = i dont know what its called as but its domain file चे नाव आणि extension seperate करताना period वापरतात. ----------------- लेखी भाषेत, पुर्ण विरामानंतर मोकळी जागा सोडली जाते, बाकी गणित, संगणकात नाही. i think, japanese also dont leave empty space after period, i dont remember now, had attended japanese lecture only for six months
|
Maanus
| |
| Friday, September 21, 2007 - 12:13 am: |
| 
|
खुप पुर्वी विराम चिन्हे वापरत नसत. जी काही थोडीफार वापरली जात ती मोठ्याने बोलणार्या व्यक्तीस कुठे pause घ्यावा हे कळण्यासाठी असे. उ.दा. ई.स. पुर्वी ग्रीक लोक नाटक लिहीताना dot वापरत, बोलणार्याला कळण्यासाठी की pause घे. १८ व्या शतकापर्यंत विराम चिन्हांचा वापर फक्त मोठ्याणे बोलताना मदत म्हणुन होत असे. वाचन मनात देखील करता येते हे कळाल्यावर विरामचिन्हांचा वापर वाढला. म्हणजे लेखी मजकुर मोठ्या प्रमाणात बनायला लागले तेव्हापासुन. bible च्या जेव्हा खुप prints यायला लागल्या, तेव्हा punctuation popular झाले. वाक्यातले पहीले अक्षर मोठ्या लिपीत लिहायची प्रथा पण तेव्हाच पडली. printing चा शोध लागल्यावर विरामचिन्हे standardized झाली. credit for introducting a standard system is generally given to Aldus Manutius and his grandson. greek भाषेत, प्रश्न चिन्ह म्हणुन ; वापरतात, आणि , ; म्हणुन ते जरा उंच झालेला · वापरतात. अरेबीक भाषेत उलटा प्रश्नचिन्ह वापरतात. संस्कृत मधे विराम चिन्हे नव्हती, as very few people knew how to write & read , १६०० सालापासुन लोक | आणि || वापरायला लागले. (म्हणजे ज्ञानेश्वरांपासुन बहुतेक.) so basically as more and more people started to write and send the document to others to read, people started to use punctuation symbols.
|
Shonoo
| |
| Friday, September 21, 2007 - 12:55 am: |
| 
|
आम्हाला पण शाळेत असताना हिंदी लिहिताना असा पूर्णविराम वापरायला शिकवला होतं. आणि त्याला दंड म्हणत. स्पॅनिश मधे प्रश्नार्थक वाक्य असलं की त्याच्या सुरुवातीला उलटं Upside Down प्रश्नचिन्ह आणि वाक्याच्या शेवटी प्रश्न्चिन्ह लिहितात.
|
Ksha
| |
| Friday, September 21, 2007 - 4:35 am: |
| 
|
>>>संस्कृत मधे विराम चिन्हे नव्हती, as very few people knew how to write & read , माणसा, जरा याचा संदर्भ सांगतोस का बाबा?
|
|
|