ते बहुतेक "आई जेवू घालेना आणि बाप भील मागू देईना" असे आहे
|
Mansmi18
| |
| Friday, April 13, 2007 - 1:55 pm: |
| 
|
लश्करच्या भाकरी भाजणे. पन्क्तिप्रपन्च. कुणी अर्थ सान्गेल का? धन्यवाद.
|
लष्कराच्या भाकर्या भाजणे हे 'घरच्या भाकर्या भाजायच्या सोडून लष्कराच्या भाजणे' असे वाचले तर अर्थाचा अंदाज येईल. अर्थ आहे की जे आधी करायला हवे ते काम सोडून काही संबंध नसलेल्या कामात वेळ / श्रम घालवणे. पंक्तिप्रपंच : म्हणजे पार्श्यालिटी करणे
|
लष्कराच्या भाकरी भाजणे हे पूर्वी फुकट अथवा वेठ बिगारीने करावयाचे काम असे. म्हणून आधी nonproductive नन्तर निरर्थक असा अर्थ आला... पंक्ती प्रपंच म्हणजे एकाच पंक्तीला जेवायाला बसलेल्या व्यक्तीना पदार्थ वाढताना भेदभाव करणे. चांगले पदार्थ आवडत्या, माणसाला वाढणे. परिस्थितीने गरीब असणार्या, निराश्रीत, नावडत्या नातेवाईकास चांगले पदार्थ न वाढणे मात्र त्याच्या शेजारच्या मानसास चांगले पदार्थ वाढणे. आपल्या संस्कृतीत असे करणे निंद्य म्हणून पाप मानले आहे....
|
Disha013
| |
| Friday, April 13, 2007 - 5:02 pm: |
| 
|
'बाजारात तुरी अन भट भटणीला मारी' या म्हणीचा अर्थ काय आहे? ही म्हण मला आजपर्यन्त समजलेली नाही.
|
Shonoo
| |
| Friday, April 13, 2007 - 5:53 pm: |
| 
|
रॉबीनहूड डोम्बल निंद्य आणि पाप. पेशव्यांच्या कालापासून खाशांच्या पंगती वेगळ्या आणि चिल्लरखुर्दा लोकांच्या वेगळ्या असत. पदार्थ वेगळे, वाढणार्यांचे attitude वेगळे. खाशा पंगतीत सुवासिनी बायका असत वाढायला. बाकीच्यांना वाढपे आणि पाणके. खाशांना पाट, चौरंग, चांदीचे ताट, ता.म्ब्या भांडी असा थाट असे. बाकीच्यांना पत्रावळ नाहीतर केळीचे पान. अतिशय rigid चातुर्वण्य hierarchy वर आधारलेली संस्कृती आपली. नैनं छिंदंती शस्त्राणी म्हणायचं आणि माणसाच्या सावलीने विटाळ होतो म्हणायचं Theater of the Absurd
|
शोनु, हुडाने एकाच पंक्तीला बसलेल्या २ व्यक्तींमधे केलेला भेदभाव अस लिहील आहे. वेगवेगळ्या पंक्तीत बसलेल्या नाही.
|
Farend
| |
| Saturday, April 14, 2007 - 3:13 am: |
| 
|
अरे मला वाटायचे की पंक्ती प्रपंच म्हणजे जेवायला बसलेल्या सर्वांचे झाल्यावर सर्वांनी उठायचे अशी प्रथा. तर मग पूर्वी 'आडवे' (बहुधा इतर लोकांच्या काटकोनात) पान वाढणे म्हणजे दुय्यम वागणून अशीही काहीतरी भानगड होती ना? दिशा 'बाजारात तुरी...' म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळायच्या आत त्याचे काय करायचे यावरून भांडण.
|
आमच्या जिल्ह्यात चिचोंडी पाटील नावाचे गाव आहे. त्याला महादू पाटलाची चिचोन्डी असेही म्हणतात. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे फार पूर्वी महादू पाटील नावाचा पाटील होऊन गेला.तो दोन्ही जेवणाच्या वेळी गावात माणसे पाठवून गावात जेवायचे उपाशी कोणी राहिले आहे का याची चौकशी करी. असल्यास त्याला आपल्या पंक्तीस जेवायला आणी. सर्व जेवले आहेत याची खात्री झाल्यावर तो जेवत असे.म्हणून त्या गावाला महादू पाटलाची चिचोन्डी म्हणतात. असेही लोक होते. खाशांच्या आणि चिल्लरांच्या पंक्ती वेगळ्या ठेवणे गैरच होते. असे शाहू महाराजानी केले नाही म्हणून तर शाहूंचे नाव कोल्हापुराच्या बाहेर आहे. आणि पेश्व्याना पुण्याच्या बाहेर कोणी मान देत नाही... वैयक्तिक जीवनात पंक्तीप्रपंच करण्याची खोड बायकाना फार असते असे संशोधनांती दिसून आले आहे
|
Disha013
| |
| Monday, April 16, 2007 - 3:45 pm: |
| 
|
thanks farend. hjgyg hvghyg hggu hugu mjbj
|
Mansmi18
| |
| Monday, April 16, 2007 - 4:57 pm: |
| 
|
मैत्रेयी, हूड, आणि इतर धन्यवाद. मला वाटले होते कि "घरचे खाउन लश्करच्या भाकरी भाजणे" असा वाक्प्रचार आहे.
|
रिकामा नाव्ही भिन्तीला तुमड्या लावी....
|
असे दिसतेय की इथे जनरली लोक फार लिहित नाहीत. २१ मे च्या लेखाला २१ मे ला च उत्तर किती वेळा मिळालं असेल ? तरी मी त्यातल्या त्यात ’ऍक्टिव्ह’ बोर्डावर लिहू पाहतोय. तरी इथे आपला चमू जमला आणि आपण नवसाहित्याची देवाण घेवाण करू शकलो, नुसत्या भिंतीला तुमड्या नाही लावत बसलो, तर सगळा मंच रंगीबेरंगी होवून जाईल. आपले मत कळवा, पटलं नाही तर शिव्या देखील घाला. -- छत्रपती.
|
ए, तुझ्या पाटलाची गोष्ट लई आपिल झाली राव. पण ते दिवस गेले आता. पाटीलकीही संपत आली आणि एकेकाळचा पाटलाचा दरारा आणि गावात मिळणारा मानही गेला. बाय द वे, वैयक्तिक जीवनातला पंक्तीप्रपंच म्हणजे नक्की काय ? उदाहरण द्याल काय ? -- छत्त्स.
|
Liladhar
| |
| Thursday, May 24, 2007 - 1:28 pm: |
| 
|
shivaji fonts send me
|
छत्रपती ओकेच अता नविन सारव भिती................क्वानाड(कोनाड) किती
|
तेलही गेले तुपही गेले हाती राहिले धुपाटणे,, मधल्या धुपाटणे चा अर्थ काय?
|
Deshi
| |
| Saturday, June 23, 2007 - 3:49 am: |
| 
|
धुपाटणे >> ज्याचा दोन्ही बाजु मध्ये काही ठेवु शकतो अशी वस्तु. उदा. द्यायच झाल तर hour glass मध्यभागी बंद करुन जर दोन्ही बाजु उघडल्या तर जे पात्र होईल ते.
|
देवळात देवापुढे धूप घालून ओवाळण्याचे जे पात्र असते त्याला धुपाटणे म्हणतात. ते दुसरे काही ठेवायला वापरत नसावेत. निरांजनाप्रमाणे दोन्ही बाजूंनी खोलगट असते. (साधारण नारळाच्या करवंटीपेक्षा जरासे मोठे) त्यातला वरचा भाग धूप घालण्यासाठी वापरतात. खालचा भाग बूड / स्टॅंड म्हणून उपयोगात येतो. त्या म्हणीमागे लहानपणी एक कथा सांगितली जायची. 'फार फार वर्षापूर्वी...' type गोष्ट. एक गृहस्थ असतो. आणि त्याचा एक वेंधळा नोकर असतो. एकदा ते प्रवास करत असताना मुक्कामाला एका देवळात उतरतात. संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करायची असते. बाकी शिधा त्यांनी सोबत आणलेला असतो. तेल आणि तूप तेवढे बरोबर आणलेले नव्हते. मालक नोकराजवळ पैसे देतात आणि वाण्याच्या दुकानातून तेल आणि तूप आणायला सांगतात. नोकर पैसे घेतो पण हे आणायचे कशातून हा मोठा प्रश्न त्याला पडतो. तो इकडे तिकडे बघतो तेव्हा देवापुढचे धुपाटणे त्याच्या नजरेस पडते. ते उलट-सुलट करून बघतो आणि त्याचा आकार बघून, "हे बरे आहे! तेलाचा आणि तुपाचा प्रश्न मिटला!" असा विचार करून तो खूश होतो. ते घेऊन तो वाण्याकडे जातो आणि धुपाटणे पुढे करून पावकिलो तूप घाला म्हणतो. वाणी त्याने पुढे केलेल्या धुपाटण्यात तूप घालतो. नंतर हा म्हणतो तेल घाला. वाणी तेल काढायला जातो एवढ्यात हा ते धुपाटणे उलटे करून खालच्या भागात तेल घेण्यासाठी वाण्यापुढे करतो. यात आधी घेतलेले सगळे तूप धुपाटणे उलटे केल्यावर सांडले आहे, हे त्याच्या लक्षातही येत नाही. वाणी तेल घेऊन येतो आणि याने पुढे केलेल्या पात्रात तेल देतो. पैसे देऊन हा नोकर परत देवळात येतो आणि ते धुपाटणे मालकापुढे धरतो. मालक म्हणतात, "शाबास, तेल आणलेस! आणि तूप कुठे आहे, आता तेही घेऊन या म्हणजे आपण स्वयंपाकाला सुरुवात करू." अधीरतेने हा म्हणतो, "तूप? तूप पण आणले आहे, हे बघा!" असे म्हणून तूप दाखवण्यासाठी तो ते धुपाटणे उलटे करतो. या प्रकारात ते तेल पण सांडून जाते. मालक कपाळावर हात मारून घेतो आणि म्हणतो, "तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे."
|
Zakasrao
| |
| Saturday, June 23, 2007 - 10:48 am: |
| 
|
गजानन अगदी बरोबर. हि गोष्ट मी शाळेत शिकलोय. मराठीच्या पुस्तकात होती.
|