Ninavi
| |
| Friday, May 19, 2006 - 1:35 pm: |
| 
|
मस्त माहिती मिळत्ये इथे. बोरीवरून ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी ही म्हण आठवली.
|
पारणे फेडणे म्हणजेच अशी सफलतापूर्वक समाप्ती करणे. To gratify some intense longing. इथे 'फेडणे' चा शब्दशः स्वतंत्र अर्थ नाही. आपण जसे नवस फेडणे म्हणतो तसेच. मखलाशी करणे : सारवासारव करणे. खनपटीस बसणे : पिच्छा पुरवणे. काळीज सुपाएवढे होणे : खूप आनंद होणे. मूठभर मांस चढणे : स्तुतीने हुरळून जाणे.
|
Chafa
| |
| Friday, May 19, 2006 - 8:29 pm: |
| 
|
गजानन, 'मूठभर मास चढणे' चा तू दिलेला अर्थ मला चुकीचा वाटतो. त्याचा अर्थ 'धीर येणे' किंवा 'आत्मविश्वास वाढणे' असा होतो. हुरळून जाणे असा नक्कीच नाही. तसेच, फेडणेचा शब्दशः अर्थ इथे नाही हेही थोडे गोंधळात पाडणारे वाटले. नवस फेडणे, पांग फेडणे, कर्ज फेडणे वगैरेमधे फेडणे म्हणजे परतफेड करणे हे कळते. पण पारणे फेडणे म्हणजे नक्की कशाची परतफेड करणे असे विचारायचे होते मला.
|
चाफा, सॉरी.. माझ्या पोस्टमुळे तुझा गोंधळ वाढला. मूठभर मांस चढणे याचा अर्थ मी अभ्यासलेल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात (इयत्ता दहावीच्या बहुतेक पुलंच्या 'उपास' या धड्याखाली) स्तुतीने हुरळून जाणे असा दिलेला मला पक्का आठवतोय. माझ्या माहितीप्रमाणे अजूनही शाळेत तेच पाठ्यपुस्तक आहे. अभ्यासक्रम अजून बदललेला नाही. असो, चूक भूल द्या घ्या.
|
फक्त स्तुतीनेच मूठभर मांस चढते असे नाही. मुलगा पहिला आला, अथवा जवळचे कोणी यश सम्पादन केले तरी अंगावर मूठभर मांस चढतेच.....
|
Chafa
| |
| Sunday, May 21, 2006 - 4:21 pm: |
| 
|
बरोबर, म्हणून 'हुरळून' जाण्याचा भाव त्यात दिसत नाही. हुरळून जाणे मधे थोडा गर्व दिसतो, अभिमान नाही. या दोन्हीमधे सूक्ष्म असला तरी महत्वाचा फरक आहे. मी अजूनपर्यंत तरी कुठेही हुरळून जाणे हा अर्थ अभिप्रेत असताना मूठभर मास चढणे हा वाक्प्रचार वाचलेला किंवा ऐकलेला नाही. उलट एखाद्या संकटाच्या, भीतीच्या क्षणी मदत मिळाल्यावर मात्र तो हमखास वापरला जातो.
|
चाफा, ते पाठ्यपुस्तक मी मिळवले. त्यात ज्या संदर्भात 'मूठभर मांस वाढणे' चा 'स्तुतीने हुरळून जाणे' असा अर्थ दिलेला आहे ते परिच्छेद माहितीसाठी खाली देतो. हा 'उपास' धडा पुलंच्या 'बटाट्याची चाळ' या पुस्तकातून घेतला आहे. त्यातले पंत स्वत:चे वजन कमी करण्यासाठी नाना प्रकारचे यशस्वी आणि (बहुतांश) अयशस्वी प्रयत्न करत असतात. पंतांच्या वजन कमी करण्याच्या विविध खटपटींसंदर्भात हा वाक्प्रचार आला आहे: ... पंधरवड्यात फक्त दोन वेळाच साखरभात झाला - एकदा अण्णा पावश्यांकडे सत्यनारायणाला आमचे मेहूण गेले तेव्हा आणि एकदा आमच्याच घरी मी उपास सुरू केला तेव्हा हिने सत्यनारायण 'बोलून' ठेवला होता त्या दिवशी. त्याशिवाय सोकाजीने चोरून एकदा कोळंबीभात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटरावांनी एकदा नागपुरी वडाभात पाठविला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यत: चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचा आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझी, माझ्या डाएटची चेष्टा करीत होती त्यांनीच "पंत, फरक दिसतोय हं!" अशी कबुली द्यायला सुरुवात केली. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुजकट शेजार्यालाही, "पंत, भलतेच की हो रोडावलेत!" असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढण्याची! पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. ...
|
Chafa
| |
| Monday, May 22, 2006 - 3:21 am: |
| 
|
धन्यवाद गजानन. पुलंच्या कोटीचा जवाब नाही. आणि इथल्या संदर्भात दिलेला अर्थ एकदमच गैर वाटत नाहीये हे खरेच. पण का माहीत नाही, तो 'हुरळून' शब्द मला इथे नकोसा वाटतोय. त्यापेक्षा (स्तुतीने) आत्मविश्वास वाढणे असे असते तर छान जमले असते. आणि त्या वाक्यातही 'प्रशस्तीने' असे स्पष्टीकरण दिलेले आहे. म्हणजे मूठभर मास वाढण्यासाठी स्तुतीची(च) गरज आहे असे नाही. असो, पुन्हा एकदा मुद्दाम पूर्ण उतारा दिल्याबद्दल धन्यवाद.
|
Maudee
| |
| Monday, May 22, 2006 - 6:14 am: |
| 
|
गजानन, मला वाटते की मख़लाशी करणे याचा अर्थ ख़ुशामत करणे असा आहे..... सारवा सारव करणे म्हणजे मला वाटते की एख़दी चुकीची गोष्ट घडुन गेल्यानंतर ती कशी चुकुन घडली किन्वा दुसरा काही पर्यायच नव्हता अशी काहीतरी कारणे देणे. Am i communicating?
|
Bee
| |
| Monday, May 22, 2006 - 7:18 am: |
| 
|
मूठभर मांस वाढणेच्या बाबतीत मला असे वाटते की एखाद्या अशक्त शरीरात मांस वाढल्यामुळे जशी त्या मनुष्याची शक्ती वाढते व त्याला बरे वाटते तसे एखाद्यावेळी कुणाच्या प्रेमळ शब्दाने, आधाराने, मदतीमुळे आपल्या अंगात बळ येते. मग हे मूठभर मांसाचे बळ मनाचे असो वा शरीराचे.. मनुष्यामध्ये उमेद निर्माण करणारे असते. पारणे फ़िटणे बरोबर आहे की पारणे फ़ेडणे? पहिलेच बरोबर आहे असे वाटते. फ़ेडणे, फ़िटणे दोन्हीचा अर्थ मात्र एकच होतो.
|
माउडी, मखलाशी करणे चा अर्थ सारवा सारव च बरोबर आहे. सारवा सारव चा तू जो दिलायस तोच अर्थ मखलाशी करणे चा आहे.खुशामत नव्हे.
|
चाफा हो ना, पुलंच ते.. बी, मला वाटते 'येणे' आणि 'आणणे' मध्ये जसा फरक आहे तसाच 'फिटणे' आणि 'फेडणे' मध्येही आहे.
|
Mansmi18
| |
| Thursday, April 19, 2007 - 3:46 pm: |
| 
|
फ़ेडणे आजच्या खेळाने सचिनने डोळ्याचे पारणे फ़ेडले. फ़िटणे सचिनच्या आजच्या खेळाने डोळ्याचे पारणे फ़िटले. चु भु द्या घ्या. (वरील वाक्य १० वर्षापुर्वीचे आहे
|
Sayuri
| |
| Friday, June 15, 2007 - 8:01 pm: |
| 
|
आताच कुठेतरी 'गेलाबाजार...' असा शब्द वाचला. 'आनंदाचं झाड' चित्रपटातही विहंगनायक यांच्या 'गेलाबाजार..' असं सारखं म्हणण्याच्या लकबीवर विशेष भर दिलाय. या शब्दाचा काय अर्थ आहे? मी असा वाक्प्रचार आधी ऐकलाच नव्हता...
|
Sashal
| |
| Friday, June 15, 2007 - 9:11 pm: |
| 
|
मी प्रयत्न करून बघते मला समजलेला अर्थ सांगता येतोय का त्याचा .. या शब्दाचा अर्थ salvage सारखा असावा असं वाटतं .. म्हणजे पुर्वी बाजार भरायचे, आठवड्यातून एकदा वगैरे .. तर समजा एखादी गोष्ट एका आठवड्याच्या बाजारात विकली गेली नाही तर मग तीची काहि value रहात नाहि .. मग अगदीच फ़ुकट जाण्यापेक्षा, 'गेला बाजार' अमुक अमुक किम्मत मिळाली तरी खूप असा वाक्यप्रयोग होत असावा .. Does this make sense?
|
Saurabh
| |
| Friday, June 15, 2007 - 9:24 pm: |
| 
|
बी, फेडणे आणि फिटणे मधला फरक हा कर्तरी ( active ) आणि कर्मणी ( passive ) असा आहे.
|
Sayuri
| |
| Sunday, June 17, 2007 - 5:59 am: |
| 
|
Sashal,असा असु शकेल 'गेलाबाजार' चा अर्थ. मला अजिबातच माहित नव्हता हा शब्द त्यामुळे अर्थाचा उलगडा होईना. धन्यवाद.
|
Bee
| |
| Monday, June 18, 2007 - 1:43 am: |
| 
|
सर्वप्रथम गेलाबाजाराचा आणि बाजाराचा काहीच संबंध नाही वाक्यातील अर्थ लक्षात घेऊन गेलाबाजार म्हणजे मागिल काही दिवसात असा होतो, असे नि माझे मत. सौरभ, जुन्या पोष्टचे उत्तर दिल्याबद्दल दोनदा धन्यवाद
|
Zakasrao
| |
| Monday, June 18, 2007 - 6:29 am: |
| 
|
मला तर गेला बाजार चा अर्थ कमीत कमी असा वाटतो. एक उदाहरण देतो. आनंदाच झाड मधे त्या वडीलांच्या तोंडी एक वाक्य आहे कि त्यांच्या बायकोला गेला बाजार एक लाख तरी सायनिंग अमाउंट मिळेल. त्याच्या आधी त्यांचा मुलगा म्हणालेला असतो कि ५०००० मिळेल.
|
Gurudasb
| |
| Monday, June 18, 2007 - 6:43 am: |
| 
|
: " गेला बाजार " चा अर्थ " घडून गेलेली गोष्ट " आतापेक्षा चांगली किंवा वाईट होती असे सुचित करायचे असते . असे माझ्या वाचनात आले होते .
|