Mahesh
| |
| Thursday, June 21, 2007 - 3:42 am: |
| 
|
आणी पाठलाग मधे असलेले गाणे आहे. नको मारूस हाक, मला घरच्यांचा धाक, भर बाजारी करीशी खुणा,करू नको पुन्हा हा गुन्हा
|
Zakasrao
| |
| Thursday, June 21, 2007 - 3:51 am: |
| 
|
पडलेली वस्तु परत घेता येते ना उचलुन. पण तिची बुगडी हरवली आहे आणि ती पुढे हे ही म्हणते कि माझ्या म्हातार्याला संगु नका. अर्थात चु. भु.दे.घे. कारण मला नीट गाण आठवत नाहिये.
|
मलाही या लावणीत 'सांडली'चा अर्थ 'हरवली' असा वाटतो.
|
Imtushar
| |
| Thursday, June 21, 2007 - 10:28 am: |
| 
|
पडलेली वस्तु परत घेता येते ना उचलुन. पण तिची बुगडी हरवली आहे >> सातार्याला जाता जाता माझे एक कर्णफूल पडले. कृपया ते माझ्या तीर्थरूपांना सांगू नका. येथे पडली हा अर्थ व्यवस्थित बसतो... आणि तसेही सांडली चा अर्थ पडली असाच आहे... गावाकडे हा शब्द सर्रास वापरला जातो.
|
इथे 'सांडली' हे 'हरवली' या अर्थाने वापरलेलं आहे... आणि वापराचे म्हणाल तर कोकणात 'सांडणे' हा शब्द 'हरवणे' या अर्थीच वापरला जातो.. फक्त 'पडली' असं असतं तर तिला ती उचलता आलीच असती...
|
केदार, "बुगडी माझी ..." हे गाणे १९५९ साली बनविलेल्या "सांगत्ये ऐका" ह्या चित्रपटातील असून. "झुमका गिरा रे ..." हे गाणे १९६६ साली बनविलेल्या "मेरा साया" ह्या चित्रपटातील आहे. तेव्हा कोणी कोणाचा अनुवाद केला>>>>>> सुनील झुमका गिरा रे ही लिहीलेल गाण नाही तर लोकगीत आहे. त्या गाण्याचा वापर फक्त त्या हिंदी पिक्चर मध्ये केला गेला आहे. त्यामुळे जरी तो पिक्चर १९६५ मध्ये आला तरी त्याचा उगम आधीचा आहे. शांता शेळक्यांनी देखील ही आठवन सांगीतली आहे. (ती नक्षत्र्यांचे देने हया कार्यक्रमात). जरुर बघ. त्या शिवाय अनेक गाण्यांचा अनुवाद त्यांनी केला आहे. तेच नाही तर मंगेश पाडगावकर हे देखील गाण्यांचा अनुवाद करायचे पण तो अनुवाद देखील अस्सल मराठी वाटायाचा. ( उदा. कबीराचे दोहे).
|
Farend
| |
| Thursday, June 21, 2007 - 4:35 pm: |
| 
|
गदिमांचं "विकत घेतला श्याम" हा मीरेच्या "माई री मै तो लियो पिया मोल" चा अनुवाद आहे ना?
|
Dineshvs
| |
| Thursday, June 21, 2007 - 5:29 pm: |
| 
|
पुर्णपणे नाही. गदीमानी, तोच तुक्याचा विठ्ठल आणि दासांचा श्रीराम, अशी मराठी फ़ोडणी दिलीय.
|
हो गाण्याची थिम तिथलीच आहे. दिनेश बरोबर त्यांनी आपला विठ्ठल त्यात घातला. हाच तर ग्रेट नेस की ते अगदी ओरीजीनल वाटत. ईंद्रायनी काठी हा मला बरेच दिवस कोन्यातरी संता ने लिहीलेला अभंग वाटायचा पण तो गदिमांनी लिहला आहे.
|
Pancha
| |
| Thursday, June 21, 2007 - 7:42 pm: |
| 
|
"मांडवली" चा अर्थ काय? हा मराठी शब्द आहे का?
|
Zakasrao
| |
| Friday, June 22, 2007 - 4:32 am: |
| 
|
दोन गुंड किंवा टोळ्या यांच्यात भांडणं झाले तर जो समेट व्ह्याय्चा त्याला मांडवली म्हणतात अस माझ हिंदी फ़िल्म्स बघुन वाढलेल (??) ज्ञान सांगतं. अजुन डीटेल्स माहित नाहित पण धोबळ मानाने त्याचा अर्थ समेट असाच आहे. विनय मी हि तो शब्द दोन अर्थाने वापरलेला ऐकलाय. पहिला पडणे,लवंडणे. उदा. पाणी सांडले. दुसरा अर्थ हरवणे. हा शब्द मी गावी ह्या अर्थाने ऐकलाय. माझ गाव कोकणात नाही पण तरीही ह्याच अर्थाने देखिल वापरतात. उदा. माजं पैसं सांडलं. आता हा शब्द ह्याच अर्थाने वापरणारी मंडळी फ़ार कमी उरली आहेत.
|
Sayuri
| |
| Wednesday, October 10, 2007 - 11:08 pm: |
| 
|
अलिकडे बर्याचदा 'रागीष्ट' असा शब्द ऐकला. उदा. यांचा स्वभाव जरा रागीष्ट आहे वगैरे.. असा शब्द मराठीत आहे का? माझ्या ऐकण्यानुसार 'रागीट' आणि 'कोपिष्ट' असे शब्द आहेत...
|
Amruta
| |
| Thursday, October 11, 2007 - 4:46 pm: |
| 
|
रागीष्ट हा शब्द मी तरी पहिल्यांदाच ऐकला ... बाकी रागीट आणी कोपिष्ट हे शब्द बरोबर आहेत.
|
Sayuri
| |
| Saturday, October 13, 2007 - 4:39 am: |
| 
|
हो ना अमृता. मी होम मिनिस्टर मध्ये अनेकदा ऐकला 'रागीष्ट' हा शब्द!
|
Hkumar
| |
| Monday, October 15, 2007 - 7:05 am: |
| 
|
'दिवे घ्या हो' या काही मायबोलीकरांकडून वापरल्या जाणार्या वा. चा अर्थ काय?
|
Slarti
| |
| Monday, October 15, 2007 - 7:26 am: |
| 
|
काही ???!!! काही जण वापरत नसतील... दिवे घ्या = ~D = पणती वगैरेचे चित्र = take it lightly
|
Hkumar
| |
| Wednesday, October 17, 2007 - 2:07 pm: |
| 
|
धन्यवाद, दिवे घेतले हो! पण, उगम काय या वा. चा?
|
Slarti
| |
| Wednesday, October 17, 2007 - 2:28 pm: |
| 
|
take it lightly चे मराठीकरण आहे ते.
|
Hkumar
| |
| Thursday, October 18, 2007 - 2:44 am: |
| 
|
मस्त आहे हो हे मराठीकरण
|