|
Zakasrao
| |
| Wednesday, June 06, 2007 - 6:28 am: |
| 
|
अरे कोणाला ते गोट्यानी खेळताना एक नवीनच डाव आला होता आठवतो का? त्यात सर्वानी भाग घ्यायचा आणि पास( योग्य शब्द आठवत नाहिये) व्हायच. जो शेवटी राहिल त्याच्यावर डाव (राज्य) येणार आणि मग त्याला सगळे जण गदीपासुन ( हिन्नि किंवा गंडा होण्यासाठी जि छोटासा खोलगट खड्डा. काय एक एक शब्द आहेत यार लिहित गेल कि आठवतात हिन्नी गंडा आठवतय का?) लांब टोलवत न्यायचे आणि मग त्याला तिथपासुन लंगडी घालत यायला लावयच त्यावेळी त्याला चिडवण्यासाठी सगळेजण डाळ गुळ खाती आणि xxx जाती अस म्हणायचे. त्याला जितके भिडु आहेत तितक्यावेळा पाय टेकायला परवानगी असायची. अस्मादिकानी अशी शिक्षा २ वेळा भोगली आहे. एकदा हा खेळ खेळताना तर एकदा विटि दांडु खेळताना. ( आम्ही चिन्नि दांडु म्हणत होतो.). तर त्या डावात खेळताना आम्ही अस म्हणत होतो. १- एकलम खाजे २- दुबिक राजे ३- ????? ४- चारी चौकडा ५- पंचल पांडव हे अस १२ पर्यंत असायच मला पुर्ण आठवत नाही. कोणाला येत असेल तर इथे लिहा बघु. सये,मद्या,धोंडोपंत्या,चिवे.कराडकर या बघु इथे.
|
Lalu
| |
| Wednesday, June 06, 2007 - 1:49 pm: |
| 
|
झकासराव, इथले एक आणि त्याच्या खालचे पोस्ट वाचा. एकलम खाजे सई, हे छत्रपती आपल्याला भेटले नसावेत. ~D
|
लिंकमध्ये दश्शाचे वेगळेच काहीतरी आहे.. दश्शा गुलामा असे आहे ना...? अजून वकट लेन्ड नाल, मुंड आर झकू असेही आहे ना? मला वाटते हे तेलगू अंकमापन विटीदान्डू खेळताना वापरायचे. कदाचित हा विटीदान्डूचा डाव (त्याला गुजरागुजरी म्हणत) आंध्रातून आला असावा...
|
Zakasrao
| |
| Thursday, June 07, 2007 - 4:41 am: |
| 
|
लालु वाचल धन्यवाद लिन्क बद्दल. तुम्ही कोल्हापुरच्या आहात हे माहित नव्हते. तुम्ही आधी बर्याच गोष्टींची चर्चा केली आहे पण ते वेगळा फ़ॉंट असल्यामुळे वाचायला त्रास होतो म्हणुन मी नाही वाचल. परवा सहज आठवल म्हणुन लिहिल त्यावेळी उल्लेख झालेले डबडा स्पीक,आणि गोट्याचे सगळे डाव खेळलो आहे. वष्टर ची आठवण झाली वाचुन. तिथे सिगारेट च्या पाकिटाने खेळताना वष्टर वापरायचे. आता असे खेळ फ़ार कमी झालेत. मी ज्यावेळी जातो त्यावेळी लक्षात येतं. रॉबिन ते दश्शी गोंडा असेल बहुतेक असे वाटते.
|
Saee
| |
| Thursday, June 07, 2007 - 10:59 am: |
| 
|
नाही ना भेटले आणि काय हे लालू, एकीकडे 'आपल्याला' आणि आधी नुसतंच 'सई' असं एकेरी? शो. ना. हो.
|
Lalu
| |
| Thursday, June 07, 2007 - 1:11 pm: |
| 
|
'आपल्याला' म्हणजे, तुला आणि मला गं. ते दश्शी गुलामा बरोबर आहे. तिथेच धोंडोपंतांच्या एका पोस्ट मधे त्यांनी पुन्हा सगळे लिहिले आहे.
|
Enjoy ! एकलम खाजा दुब्बी राजा तिराण बोजे चारी चौकटी पंचिल पांडव सह्या दांडव सातिक टोले अष्टीक नल्ले नवनऊ किल्ले दश्शी गुलाबा अकल खरकटा बाळू मरकटा
|
झकासराव, तू म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय काढलास. कोल्हापूरात (सांगली, सातारा, कऱ्हाड; वगैरे सुध्दा) गोट्यांनी खेळताना आणि चिन्नी दांडू खेळतानादेखील, तू जे 'पास' होणे म्हणतोयस, त्याला 'सुटणे' म्हणायचो आम्ही. हिन्नी गंड खेळताना अजून वेगळा शब्दकोष वापरल्याचे मला आठवतेय. तो या एकलम खाजा ... पेक्षा थोडा वेगळा होता. अजून एक प्रकार होता ज्यात पांच ढांच अकरांच बकरांच आणि ठोकरांच असे गुण मिळायचे ! त्यात काही शब्द असे होते : पास होणे : सुटणे बाद होणे : ढीस क्रम पाडणे : चकणे (आधी चकायचे, मग त्या क्रमाने जनता खेळायची) क्रम पाडताना शेवटी राहणे : ढोक खड्डा : गद काही वेळा आम्ही काचेच्या गोट्यांनी न खेळता गारगोट्यांनी खेळायचो, त्या आकाराने मोठ्या असायच्या. त्याला 'वष्टर ' असे म्हणायचे. जो आधी 'बाळू मरकटा' मिळवायचा किंवा 'ठोकरांच' मिळवायचा, तो 'सुटायचा'. असे एकेक सुटले की जो शेवटी राहील, त्याच्यावर 'ताण' यायची. त्याचा 'वष्टर' इतर लोक मारत मारत लांब न्यायचे. जेव्हा सगळ्यांचा नेम चुकेल तेव्हा ताण संपायची. ती जिथे संपेल तिथून ताण आलेल्याला लंगडी घालत गदी पर्यंत परत यावे लागायचे. आणि ताण ज्यावर आली होती त्याला परत चकताना पहिल्यांदा चकायला लागायचे. चिन्नी दांडू खेळताना पहिल्यांदा मिळालेले गुण 'देवाला' देण्याचीही पध्दत होती, आठवतंय का ?
|
वरती गोट्यांचा जो डाव सांगितलाय त्याला आम्ही तंगी म्हणायचो. ज्याला शेवटी पळायला लागायचं त्याच्यावरती तंगी आली. हिन्नी गंड मधे एकदा हिन्नी झालं की गदी पर्यंत कानाला हात धरून ढोपरायची गोटी. गदीत पडली की तो परत गंड. अजून एक होता गोट्यांचा खेळ बेंदं म्हणुन. त्यात जोडीनी खेळायला लागायचं. एक चौकोन आखायचा आणि त्यात दुसर्या टीमच्या गोट्या ठेवायच्या. मग पहिल्या टीममधल्या मुलांनी त्यांना बाहेरून मारायचं. गोटीचा जो नेम धरतात मारायला त्याला आट्टं म्हणायचो. म्हणजे एखादा लय भारी खेळत असेल तर त्याची आट्टं चांगली एकदम.
|
मी लहानपणी एकदा पुण्याला गेलो सुट्टीत तर तिथे काही मुलं हिन्नी गंड खेळत होती. मी त्यांना विचारलं हिन्नी गंड खेळताय का तर ती हसायलाच लागली! तिथे त्याला ते राजा राणी म्हणत (काय तरी गोड नाव!)
|
Farend
| |
| Friday, June 08, 2007 - 10:06 pm: |
| 
|
अमेय कानाला हात धरून कोपराने ढकलायची गोटी त्याला बहुधा राजा राणी नाही आणखी काहीतरी वेगळे म्हणत (पुण्यात), नाव नक्की आठवत नाही.
|
Zakasrao
| |
| Saturday, June 09, 2007 - 8:28 am: |
| 
|
छत्रपती ठान्कु रे. तु कुठला आहेस? अरे पण आम्ही तर ज्या गोटीने नेम धरणे असे काम करायचो त्याला टोंब्याल म्हणत होतो. आणि वष्टर हे फ़रशीच्या तुकड्याला म्हणत होतो. त्याने सिगरेट ची पाकिटे खेळण्याचा खेळ होता. हिन्नि गंड मधे गदीत गोटी टाकण्याच्या आधी म्हणजे गंड होण्याच्या आधी आम्ही आपण कसे कॅरेम खेळतो तसे गोटी गदीत ढकलत होतो. एकदा गदीत ग़ोटी गेली कि गंड. मग आपली वित घालुन ति जिथे येते तिथे अंगठा ठेवुन गोटी डाव्या हातात पकडुन उजव्या मधल्या किंवा तर्जनीचा धनुष्य बनवुन द्यायची सोडुन नेम धरुन. अजुन जे गोट्या जिंकुन खेळण्याचा डाव होता त्यात एक गोटी काढली कि मग त्याला विषेश अधिकार यायचा त्याच नाव काय होत रे? पण तो दुसर्याना कंडाप करु शकायचा. कंडाप झाल कि तो गडी खेळातुन बाहेर व्हायचा. आणि ह्याच डावात गोटी बाहेर काढताना टोंब्याल रिंगणात राहिला कि बल्ल्या झाला अस म्हणत होतो आम्ही. मग जे काहि ठरले असेल त्याप्रमाणे त्याचा योग्य मोबदला डावात भरायचा किंवा ढिस(काय खतरा शब्द आहे ना हा) व्हायच. ह्या डावात बरेच जण कंडाप झाले आहेत आणि शेवटचे २-३ जण उरले कि त्यांच्यावर बाकिचे लोक दबाव आणायचे कि तुम्ही वाटुन घ्या आणि दुसरा डाव सुरु होउदे अस. नाहितर डाव लूट करतो. (म्हणजे सगळा डाव उधळुन लावायचा ज्याला जितक्या गोट्या मिळतील तितक्या पळवुन न्यायच्या) असाच एक बल्ल्या आपला टोंम्ब्याल दुसर्याच्या टोंब्यालला लागला आणि आपल्याला कंडाप करण्याचा अधिकार नसेल तर व्हायचा. पण ह्यात भरावा लागणारा मोबदला दुप्पट असायचा. अजुन एक डाव होता त्यात सगळ्या गोट्या रिंगणात टाकल्या कि त्यातील एकच गोटी दुसर्या गोटीला टच न होउ देता बाहेर काढायची आणि मग त्या डावात असलेल्या सगळ्या गोट्या त्याच्या. त्याला पळवुन अस म्हणत होते.
|
फरेन्द, गोट्यान्ना आणि खेळान्ना पुण्यात नाव वेगळि होती, मला काहीच आठवत नाही! त्या पान्ढर्या चिनीमातीच्या मोठ्या गोटीला आम्ही हन्टर म्हणायचो, अजुन पण कसल तरी नाव होत!
|
हे सर्व वाचून माझा जीव गलबलून गेला आहे, गळ्यात आवंढा आला आहे.. डोळ्यात पाणी येईल की काय असे वाटते.. अरे अरे काय हूक अप व्हायची पोरे या खेळाना. तासन तास. अभ्यासाचा फालूदा मग घरी आणि शाळेत मार. वगैरे... बल्ल्या आमच्याकडेही असे.गोट्या पेंगळायचा एक प्रकार असे. वर मी लिहिल्याप्रमाणे वकट,लेन्ड मुन्ड, नाल असे काहीतरी विटीदान्डूत मोजायची पद्धत होती त्यावर कोणी काही लिहिले नाही... एक 'कावड' म्हणून असे म्हनजे ५०० ची कावड. वगैरे मग जो कावड हरेल त्याने तोंड बन्द करून लंगडी घालीत यायचे. त्याने तोंड उघडून हसावे म्हणून विनोद (बहुधा अश्लीलच) केले जात. त्याचे दात दिसले की पुन्हा पहिल्यापासून लंगडीची शिक्शा.. ता. क. मोठ्या गोटीला (काचेच्या किंवा चिनी मातीच्या)आम्ही ढम्पर म्हनत असू. या गोष्टी मागच्या जन्मातल्या असल्यासारख्या वाटू लागल्या आहेत....)
|
मोठ्या चिनी मातीच्या गोटीला ’वष्टर ’ किंवा ’ढम्पर’ हे नाव अत्यंत योग्य वाटते. पण या गोटीला ’हन्टर’ म्हणणे म्हणजे अस्सल पुणेरीकरण म्हणायचे !!
|
अजून एक गम्मतशीर गोष्ट आठवली. टीम पाडून जिथे खेळावे लागायचे तिथे दोन लोक कप्तान व्हायचे आणि इतर सगळी जनता २ - २ च्य जोड्याने गळ्यात गळा घालून लांब चालत जायचे, ज्याला ’नाव पाडणे’ असे म्हणत. म्हणजे दोन कप्तान लोक आणि समजा इतर ८ लोक असतील, तर चार जोडपी तयार होत आणि ते नाव पाडून परत येत असत. म्हणजे दोघे मिळून ठरवत असत की माझे नाव ’बंडू’ आणि तुझे नाव ’खंडू’ वगैरे. परत आल्यावर एकेक जोडपे कप्तानांना सांगत : जोडी : ’आला आला घोडा’ कप्तान लोक : ’नावं काय फोडा’ जोडी : कुणाला घ्या बंडू, कुणाला घ्या खंडू एक कप्तान : आम्हाला बंडू मग जो बंडू झाला आहे तो त्या कप्तानाच्या टीम मध्ये जायचा. असा प्रत्येक जोडीचा वाटप झाला की टीम तयार व्हायची. टीम फ़ुल रॅन्डम ! कोणाला कोण येईल हे काही सांगता येत नसे. हीच गोष्ट पुण्यात फार सोफेस्टीकेटेड असते. उदा. ’आला आला घोडा’ वगैरे काही नाही. तिथे ’इन का आऊट’ करायचे. म्हणजे हातात एक अगदी लहान खडा घेऊन एक जण तो दोन्ही कप्तानांना दाखवायचा. ते दोघे ओके म्हणाले, की हा पंटर मुठीत तो खडा घेऊन लांब जाऊन तो टाकून दिल्याचे नाटक करायचा, किंवा खरोखरच टाकायचा. पण इतक्या लांबून कप्तान लोकांना नक्की काय झाले आहे हे समजायचे नाही. मग परत येऊन तो दोन्ही कप्तानांना विचारायचा, ’इन का आऊट ?’. एक कप्तान सांगायचा ’इन’ मग हा पंटर मूठ उघडून दाखवायचा की खरोखरच खडा ’इन’ आहे की ’आऊट’. जो जिंकेल तो एकेके खेळाडू मागून टीम पाडायला सुरूवात करायचा. म्हणजे आपल्या टीममध्ये कोण हवे आहे हे कप्तानाला आधी समजायचे. मग परत एकदा इन का आऊट करून आधी कोण बॅटींग करणार हे ठरायचे.
|
Farend
| |
| Saturday, June 09, 2007 - 7:24 pm: |
| 
|
छत्रपती, हे दोन्ही पुण्यात होते. in or out यालाच आम्ही बहुतेक आत का बाहेर म्हणायचो (लक्षात नाही, पण इंग्लिश मधे नसावे), आणि 'आला आला घोडा' हे ही असायचे. तुझा पुण्यातील कोणत्यातरी उच्चभ्रू वस्तीतील लोकांशीच फक्त संबंध आलेला दिसतोय असो पण हा कोल्हापूरचा बीबी आहे त्यामुळे आमची टिमकी गाजवत नाही पण बर्याच चांगल्या आठवणी आल्या, या लिहून ठेवायला पाहिजेत नाहीतर अजून काही वर्षांनी काहीच आठवणार नाही. ते 'आला आला घोडा' तर फार मस्त होते. कधीकधी त्या पोरांच्या स्वभावावरून कोणते नाव कोणी घेतले असेल ते ओळखायचा प्रयत्न करायचो आणि कित्येक वेळा बरोबर असायचा अन्दाज! वरती लिहिलेल्या खेळाला 'ढेल्या पेन्द्या' किंवा 'ठेल्या पेन्द्या' म्हणत असावेत, अजून आठवले तर लिहितो. रॉबिनहूड कावड आठवली, आणि एक 'अबक दुबक' ही होते, नक्की कसे खेळायचो कोणास ठाऊक? लिंबूटिंबू: आणि तसाच एक काचेचा असायचा त्याला आम्ही 'ढप' म्हणायचो. हंटर आणी बंटर दोन्ही शब्द वापरलेले आहेत.
|
Far end, अरे पुण्यात खेळताना कधी टीम पाडताना ’आला आला घोडा’ असे म्हणून टीम पाडलेली मला तरी आठवत नाही. आणि मी आपला साधा सामान्य माणुस आहे. कुठे उच्चभ्रू वस्तीमधे नाही वाढलो मी ! पण असो. पुणेरी बोली भाषेत बहुतेक शब्द व्याकरणाला अनुसरून असतात. पुणेकरांचे या बाबतीत कौतुक करायलाच हवे.
|
Farend , अरे जर राजा राणी म्हणजे हिन्नी गंड नव्हे तर मग राजा राणी कसा होता? मी जो सांगितला तो डहाणूकर मधल्या गंधर्व नगरीत खेळणार्या मुलांचा मला आलेला अनुभव.
|
पूर्वी Berkeley नावाची एक सिगारेट मिळायची. कोल्हापूर मध्ये त्याचा उच्चार ’बरकली’ असा केलेला मला आठवतोय. अर्थात, हा मराठी शब्द नव्हेच.
|
|
|