Bee
| |
| Thursday, November 02, 2006 - 5:53 am: |
| 
|
वानवळा म्हणजे रुचकर पदार्थातून चवीपुरता पाठविलेला एखादा घास. आधीच दात आमलेत मग हा रुचकर पदार्थाचा वानवळा कसे खाऊ शकणार? पण ह्या म्हणी वापरायच्या कश्या हाही एक जालिम प्रश्न आहे. अर्थ कळून तशी संधी येत नाही की ह्या म्हणी आठवाव्यात.
|
पूनम वानोळा.. म्हणजे नमुना..उदा: शेतकरी शेतात काही पिकले तर ओळखिच्यांच्या घरी पाठवतात किंवा आमच्या बागेत काही निघाले तर चवीपुरते.. शेजारी किंवा.. ओळखिच्यांकडे पाठवतो.. नलिनि.. पटली ग म्हण
|
निर्लज्जम सदा सुखी या (म्हणीचा)वाकप्रचाराचा अर्थ एका श्ब्दात कुणाला सांगता येइल का?
|
Psg
| |
| Thursday, November 02, 2006 - 9:45 am: |
| 
|
धन्स बी, लोपा लोपा, एकच शब्द हवाय का? * 'बेफ़िकीर' चालेल का?
|
well from the behavioural oint of view.. how about PAKISTAN
|
Bee
| |
| Thursday, November 02, 2006 - 10:44 am: |
| 
|
टॉन्ट मारणार्या व्यक्तीसाठी काही खास म्हण आहे का? मला फ़क्त एकच माहिती आहे. लेकी बोले सुने लागे. अजून एखाद दुसरी असेल तर सांगा पाहू.. नन्दिनी, पाकिस्तानी निर्लज्ज असतील पण सुखी नाही. पण इथे त्यांची हेटाळनी आपण का करावी? माझ्यासारखी सलज्ज व्यक्ती तरी करू नये हेच म्हणेल.
|
म्हणीचा अर्थ त्याना पुरेपुर लागु होतो. यामधे पाकिस्तानी नागरिक नाही तर त्या देशाचे सरकार अपेक्षित आहे.
|
Nalini
| |
| Thursday, November 02, 2006 - 10:52 am: |
| 
|
पूनम, वनोळा(वानवळा) देणे म्हणजे लोपाने सांगितले तसे की आपल्या शेतात,बागेत पिकलेली गोष्ट किंवा घरी बनवलेली एखादी वस्तु, पदार्थ नातेवाईकांना, शेजार्यांना, ओळखीतल्या लोकांना भेट द्यायची प्रथा.
|
Lopamudraa
| |
| Thursday, November 02, 2006 - 10:58 am: |
| 
|
नंदिनी.. exactly ... पकिस्तानला.. अगदी बरोबर फ़िट बसतो.. हा शब्द..!!!
|
Bee
| |
| Thursday, November 02, 2006 - 11:10 am: |
| 
|
नंदीनी, पाकीस्तान हा शब्द नाही देशाचे नाव आहे :-)
|
आपण हा शब्द म्हण समजवण्यासाठी वापरतोय. जास्तच खोलात शिरायचे झाले तर ते विशेष नाम आहे.. 
|
Zakki
| |
| Thursday, November 02, 2006 - 12:33 pm: |
| 
|
पण पाकीस्तान सुखी नाही! त्या ऐवजी मी च निर्लज्ज माणूस सदा सुखी आहे! मला इथे अनेकदा लोकांनी नावे ठेवली, असे लिहू नका म्हंटले पण मी पडलो निर्लज्ज! मी अत्यंत सुखात आहे! नि लिहीतोच आहे! लाज वाटेल अशी कृत्ये करायची नि कुणि बोलले शिव्या दिल्या तरी त्याकडे लक्ष न देता आपण आपले सुखी रहायचे!
|
खरं सागायचे तर पाकिस्तान म्हणजे गिरे तो भि टाग उपर आहे.
|
Naatyaa
| |
| Thursday, November 02, 2006 - 6:56 pm: |
| 
|
पण ह्या म्हणी वापरायच्या कश्या हाही एक जालिम प्रश्न आहे. अर्थ कळून तशी संधी येत नाही की ह्या म्हणी आठवाव्यात. >>> म्हणींचे cheat sheet बाळगत जा जवळ..
|
निर्लज्जम सदा सुखी या (म्हणीचा)वाकप्रचाराचा अर्थ एका श्ब्दात कुणाला सांगता येइल का? >>>>>> झक्की!!!!!
|
Seema_
| |
| Thursday, November 02, 2006 - 7:59 pm: |
| 
|
माझ्यासारखी सलज्ज व्यक्ती तरी करू नये हेच म्हणेल. >>>>>>>>>> सलज्ज वैगरे विशेषण नव्या नवरी साठी असतात ना ? इथे कस काय हे ?
|
Bee
| |
| Friday, November 03, 2006 - 3:54 am: |
| 
|
लेकीचं लेकरु आणि कावळ्याचं पिल्लु सारखच >> नलिनी, वरील म्हणीचा अर्थ माहिती असल्यास सांगतेस का? मी वाट बघतो आहे. सीमा, मग सांग बघू सल्लजेतेला पर्यायी पुरुषी शब्द?
|
Seema_
| |
| Friday, November 03, 2006 - 5:07 am: |
| 
|
माझ्यासारखी सलज्ज व्यक्ती तरी करू नये हेच म्हणेल -----> माझ्यासारखी भीडभाड असणारी किंवा लाज लज्जा असणारी व्यक्ती तरी ..................... ते पुरुषी शब्द वगैरे मला माहीत नाही .
|
वाघ्याचा केला पाग्या, मूळ स्वभाव जाईना अन् यळकोट म्हणता राहीना अर्थात, कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी माणसाचा मूळ स्वभाव कुठेतरी उचल खातोच.
|
Ram3
| |
| Monday, April 02, 2007 - 8:22 am: |
| 
|
आई मरु देइना अनि बाप जगू देइना
|