Sneha21
| |
| Thursday, June 08, 2006 - 8:50 am: |
| 
|
म्रिन्मयी खरच अप्रतिम शब्द आहेत....धन्यवाद
|
Ananta
| |
| Sunday, June 11, 2006 - 10:55 am: |
| 
|
अप्रतिम collection...!!! keep it coming...!!!
|
Janki
| |
| Wednesday, July 12, 2006 - 8:45 am: |
| 
|
युवराज, ख़ुपच छान, मस्तच आहेत रे.
|
युवराज सुंदर... अजुन टकत जा.. कुठल्या श्यारचे आहे ते पण सांगत जा.. आणि काही पुस्तके माहित असतील तर ती पन सांग..!!!
|
Neel_ved
| |
| Wednesday, July 12, 2006 - 10:48 am: |
| 
|
भाउसाहेब पाटणकरांचीच मराठी मुशायरा आणि जिंदादील हि पुस्तके वाचा, फार सुंदर आहेत....
|
लाख दु:खे भोवताली,दु:ख आपुले मग बघू येऊ दे हृदयात त्यांना कोण कुठले मग बघू. तु अगोदर पावसा रे पावसावाणी बरस आमुच्या ह्या पेरणीचे काय ठरले मग बघू -दिपक अंगेवार
|
लोक म्हणती देव ज्याला,आरशासम भासला तो शोधले तर मिळत नाही, पाहतो तर मीच आहे. -दिपक अंगेवार
|
Vaatsaru
| |
| Wednesday, August 09, 2006 - 2:13 am: |
| 
|
>> शराब का वेगळी ही लावणी ग. दि. मांची आहे
|
Ninavi
| |
| Wednesday, August 09, 2006 - 6:17 pm: |
| 
|
भाऊसाहेब पाटणकरांची थोडी शायरी मला आठवते तशी.. सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे तो कवींचा मान, तितुकी पायरी माझी नव्हे आम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो सम्मानितो हासू, तसे या आसवां सम्मानितो जाणतो अंती अम्हा मातीच आहे व्हायचे ना तरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे मानतो देवासही, ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतुकेच की तो आमचा कोणी नव्हे
|
अप्रतिम कलेक्शन युवराज. तुझ्यातील हा गुण माहित नव्हता. असच एक एक शेर पोस्ट करत जा.
|
मला आवडलेली गझल पोस्ट करतोय आशा आहे की तुम्हाला पण आवडेल. मनाच्या तळाला तुझी याद आहे किती काळ झाला तुझी याद आहे सखे रंग देऊ कसा मी नव्याने अजूनी घराला तुझी याद आहे तुझ्या दारचा तो जुना एक चाफ़ा तुझ्या अंगणाला तुझी याद आहे तशी चोरण्याची नसे बाब काही तरी या उशाला तुझी याद आहे असे ना कुणाचे कधी ऐकलेले खरे वाटण्याला तुझी याद आहे कशी याद यावी मला जीवनाची क्षणाला क्षणाला तुझी याद आहे -वैभव देशमुख तुझ्या आठवांनी रडू आवरेना अता हुंदक्यांना तुझी याद आहे -प्रणव प्रियंका प्रकाश संगीत आणि गायन- मनोज ठाकुर
|
ये जवळ तुजला जरा जवळून बघतो आज स्पर्शाने तुला बोलून बघतो पंख प्रीतीचे मिळाले एकदा की कोण या धरतीकडे पलटून बघतो लागता चाहूल ढळत्या यौवनाची आरसा का एवढा त्रासून बघतो मी तुला का घाबरावे सांग मृत्यू रे तुला मी जन्मल्यापासून बघतो -वैभव देशमुख संगीत आणि गायन- मनोज ठाकुर
|
जन्म सारा घाव सकळण्यात जातो, वार प्रेमाचा असा खोलात जातो. एक या वळणावरी धोकाच आहे ना कळे निसटून केव्हा हात जातो स्पर्श प्रेमाचा झटकणे शक्य नाही तो त्वचेतून आपुल्या हृदयात जातो. -वैभव देशमुख
|
सगळ्याच गझल खुप सुंदर आहेत....!!!
|
जगण्यामधूनी शब्दांशी मी भांडत जाता कोंडा उरतो जगण्याला या कांडत जाता. थोर जनांचे जीवन तुम्हा कधी न कळले फोटोमधूनी नुसती तत्वे टांगत जात. -प्रनव प्रियांका प्रकाश
|
पायाशी आला होता धावून फुलांचा रस्ता वेडात तुझ्या मी आलो टाळून फुलांचा रस्ता प्रेमाला तुझिया सोबत चालाया वेळच नाही तू काय मिळविले आहे मिळवून फुलांचा रस्ता बरसून तुझ्या अंगावर पाऊस सुगंधी झाला अन गंध स्वत:चा गेला विसरून फुलांचा रस्ता या जन्मी ओळख नाही होणार तुझी काट्यांशी तू भाळावरती आली गोंदून फुलांचा रस्ता ते वेड तुझ्या प्रितीचे ही ओढ तुझ्या भेटीची आगीतून चालत आलो समजून फुलांचा रस्ता सांभाळ स्वत:ला थोडे हे रडणे थांबव आता जाईल तुझ्या अश्रूंनी वाहून फुलांचा रस्ता -वैभव देशमुख
|
वर दिलेल्या गझलेतील शेवटचा शेर बाकी राहिलाय, तो इथे देतो. हाताला देऊन हिसका ते दिवस पळाले मागे अन पायाखालून गेला निसटून फुलांचा रस्ता.
|
दिसतो तुला जरी मी हिरवा अजून आहे; हृदयात खोल माझ्या वणवा अजून आहे. विसरून वाट जातो माझ्याच मी घराची, वळणावरी जुन्या त्या चकवा अजून आहे. माझाच चेहरा तो दिसतोय डोळियांना, की आरसा तुझा हा फसवा अजून आहे. मृत्यू म्हणे निघाला भेटावयास मजला, आहे असे खरे की अफवा अजून आहे. -वैभव देशमुख
|
दिशादिशांना भोवळ येई इतकी वणवण केली कोणी? वाटेलाही ठणका लागे इतके थकले पाय कुणाचे? -चंद्रशेखर सानेकर
|
तुझे भास होती मला सारखे, दिसे विश्व सारे तुझ्यासारखे. तुझा संग होता मला लाभला, उभे वर्ष गेले क्षणासारखे. नभी चांदण्या या दुधासारख्या, तुझे भेटणे हे मधासारखे. गडे मी वितळलो धुक्यासारखा, तुझे स्पर्श होते उन्हासारखे. -वैभव देशमुख
|