पाहिले नव्हते तिला पण मी तिला माहित होतो, मी कधी काळी तिच्याही यौवनाचे गीत होतो. खूप काही हारलो पण काय हरलो नेमके मी? हे तरी कळले कुठे की काय मी मिळवीत होतो. तशी मलाही हवी होती ऊब मायेच्या घराची, पण घराच्या कल्पनेने जन्मभर मी भीत होतो. -चंद्रशेखर सानेकर.
|
ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला, तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला. प्रश्न मी साधेच केले टाळले ज्यांना असे तू, अन खुलाशांचाच सारा अर्थ मग बदलून गेला. एकटा आहे मुळी मी हीच सोबत खूप आहे, अन कुणा मग दोष देऊ हात जर निसटून गेला. जो तुझा आहे दिवाणा तो तुझ्या शहरात आहे, सांग मग तो कोण होता जो शहर सोडून गेला? -चंद्रशेखर सानेकर.
|
दीपक अंगेवार आणि विजय आव्हाड यांच्या 'काळजाची वात' आणि 'जगण्याच्या खोल तळाशी' या गझल संग्रहांचे प्रकाशन दिनांक २८ डिसेंबर २००६ रोजी सायंकाळी रविंद्र नाट्यमंदिर येथे होत आहे आणि सर्व गझल प्रेमींसाठी हा कार्यक्रम मोफ़त आहे.
|
तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा, यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी. -चंद्रशेखर सानेकर
|
मराठी शायरी आवर्जून वाचणाय्रा माझ्या सर्व मित्रांस एक विनंती आहे की पद्य विभागात जाऊन एकदा चंद्रशेखर सानेकर हा BB एकदा पाहून घ्यावा आणि प्रतिक्रियाही अवश्य नोंदवावी.
|
तुला हा गर्व की ठोका कधी चुकणार नाही, मला ही जिद्द की स्पर्शिन तुझिया काळजाला. -चंद्रशेखर सानेकर
|
तुला आश्चर्य हे की मला का सावली नाही अन मला अप्रूप हे की मी उन्हाशी बोलतो आहे. -चंद्रशेखर सानेकर
|
भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले एवढे मी भोगले की मज हसावे लागले गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधीही मी कशी होते मलाही आठवावे लागले लोक भेटायास येती काढत्याअ पायासवे अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले -सुरेश भट्ट
|
आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे चालु दे वक्षांत माझ्या वादळांचे येरझारे रंगत्या पूर्वेस माझी वेदनेस देईल लाली अन तुझ्या दारात माझी धूळ हे नेतील वारे -सुरेश भट्ट
|
देशील जर का हाक मला तू बुडेन मी तर आनंदाने तुला तीरावर उभी पाहूनी सोडून देईन मीच किनारे -चंद्रशेखर सानेकर
|
तू कुणाला फूल समजावे तुझा हा प्रश्न आहे हुंगले तर कागदालाही जरासा गंध येतो. -चंद्रशेखर सानेकर
|
Kaushik
| |
| Thursday, March 15, 2007 - 11:56 am: |
| 
|
चंद्रशेखर सानेकर.....ख़्हुप्च छान, छान लीहीता षयरि आवदलि
|
Sneha21
| |
| Wednesday, June 06, 2007 - 9:37 am: |
| 
|
एकदम अप्रतिम....वाचतच रहावे असे वाट्ते.........
|
gचन्द्रशेखर सनेकर अप्रतिम गज़ल एक्दम सुन्दर सुरेख
|
दादा, माझे नावं गणेश, वय 19/मुंबई. मी web designing शिकत आहे. मी एक नविन मराठी web site बनवित आहे. मला तुझे गजल खुप आवडले म्हणुन मी ते तुझ्या नावासहित माझ्या web site वर add करायचा विचार केला आहे. please reply me on wedant_ganesh@yahoo.co.in
|