|
Ninavi
| |
| Monday, September 19, 2005 - 12:50 pm: |
| 
|
दिनेश, तुमचे मुद्दे १०० टक्के पटतात मला. फक्त एक 'करेक्शन'. इरावतीबाईन्च्या 'युगांतर'मधे 'दारू प्यायलेले असताना कृष्णाcए पाय द्रौपदीcया मांडीवर आणि अर्जुनाcए सत्यभामेcया मांडीवर' असे वर्णन आहे. तुम्ही दिलेला संदर्भ कुठला आहे मला लक्षात येत नाही.
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 20, 2005 - 12:21 am: |
| 
|
हो निनावी, तुमचे बरोबर आहे. माझी तपशीलात चुक झाली. आम्हाला जेंव्हा ईरावती कर्वेंचा परिपुर्ती हा धडा होता, त्या काळात हे पुस्तक वाचले होते. त्यावेळची आठवण सांगण्यासारखी आहे. हा लेख स्वतःच्या नावावर छापायची ईरावती बाईना लाज वाटत होती. आणि मी याच लेखावरुन बाईंच्या लेखनाची कल्पना करण्याची घोडचुक केली. शिक्षिकेनी विचारल्यावर मानववंश शास्त्राबद्दल थोडेफ़ार सांगितले पण होते. शिवाय ईतर पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला. ह उल्लेख आल्यावर मी शिक्षिकेकडे नाराजी व्यक्त केली. काहि कळायचे वय नव्हते ते. (मी शाळेत सगळ्या विद्यार्थ्यांपेक्षा एक वर्ष लहान होतो). मी त्याना म्हणालो, बघा बाई आपल्या देवांबद्दल काय लिहिलेय ते त्या म्हणाल्या. दिनेश ते सत्य आहे. आणि सत्य तु स्वीकारले नाहीस म्हणुन बदलत नाही. सत्य स्वीकारणे असा काहि प्रकारच नसतो. तुम्ही स्वीकारा वा अस्वीकारा, सत्य हे सत्यच असते. सत्य नाकारण्याचा एकमेव ऊपाय म्हणजे ते असत्य आहे, हे दाखवुन देणे. कायम हे लक्षात ठेवणार आहे मी हे.
|
Bee
| |
| Tuesday, September 20, 2005 - 8:36 am: |
| 
|
दिनेश, तुम्ही मेघना पेठेंबद्दल जणू तुम्हाला वैयक्तीक आकस आहे असेच लिहिता मी मेघना पेठेंच्या कविता, त्यांचे लेख आणि मग कथा, कादंबरी असे त्यांचे बरेच लिखाण एकदा नाही तर अनेकदा वाचले आणि प्रत्येकवेळा बाई किती वेगळ्या लिहितात, त्यांची शैली किती दमदार आहे, भाषासौदर्य किती वेगळे आहे, कथेचा घाट किती छान आहे, कथेतील पात्र किती साधी असतात ह्याची जाणिव होत राहते. काल पुन्हा कितीतरीदा छाया माया काया वाचली!!! मेघनाताई, स्त्रिवादी लिखाण मुळीच करत नाही, जसे जीडी करायच्या. नातिचरामी ही त्यांची पहीलीच कादंबरी आहे, जी थोडी किचकट आहे कळायला पण त्यांच्या कथा अगदी सरळसाध्या आहेत आणि वाचताना पुस्तक सोडावेसेच वाटत नाही. त्यांची मौजमधली प्रेमस्वरूप आई ही कथा आणि अजून काही कथा असा नविन कथासंग्रह येत आहे असे ऐकले आहे. मी वाट पाहून आहे त्याची. ह्या लेखिकेचे छोटे छोटे लेख ज्यांनी वाचले त्यांना हे माहिती असेल की त्यांची लिखाणामागची प्रेरणा काय, त्यांचा उद्देश काय. दुर्गाबाईंचा काळ आणि मेघनाताईंचा काळ ह्यात दोन पिढींचे अंतर आहे. फ़रक तर असणारच ना.. मलाही वाटतं त्या भाऊ पाद्यांच्या कन्या नाहीत. मी कुठेतरी वाचले की त्या एकट्याच राहतात, बॅंकेत नोकरी करतात आणि अजून अविवाहीत आहेत. लेखक वाचताना त्याची प्रतिभा पहावी, कोण कसे वैयक्तीक जगतो आहे ह्याचा फ़ारसा विचार करू नये. कथेतील पात्र ही लेखकाचीच रुपे असतात असेही गृहीत धरू नये.
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 20, 2005 - 3:23 pm: |
| 
|
Bee या विषयावरचे माझे शेवटचे पोस्ट. मी तिच्यावर वैयक्तीक आरोप एवढाच केला कि तिने अपुरी आणि चुकीची माहिती लिहिली. लेखन एकांगी केले. सर्वनामाचा अतिरेक केला आणि अकारण न पटणारी भाषा वापरली. बस एवढेच. तिच्या खाजगी आयुष्यात मला रस नाही. तिच्या म्हणजे लेखिकेच्या, पेहरावाचा विषय मी नव्हता काढला, मी नायिकेबद्दल बोललो होतो. ईतर कथांबद्दल काहि खास नाही, एवढेच मत मी दिले होते. समजण्यास कठीण म्हणजे, तुम्हाला हवा तसा अर्थ लावा, असेच ना. सहज कळते ते लेखन चांगले नसते का असो माझी वैयक्तीक मते अजुन तीच आहेत. आणि माझ्यापुरता हा वाद मी ईथे संपवतोय.
|
Gs1
| |
| Wednesday, September 28, 2005 - 11:06 am: |
| 
|
बाकी शून्य, कमलेश वालावलकर. कोसलाच्या पठडीतले वाटले. असेच अजून एक वाचले होते पूर्वी, काही केल्या नाव आठवत नाही, नायक नायिका जे कृष्णमुर्तींच्या भाषणात भेटतात एकमेकांना असा उल्लेख होता त्यात. ते पण साधारण असेच होते. दिशाहीन आणि अर्थहीन वाटत जाणार्या आयुष्याची कहाणी. शेवट फार भरकटला आहे असे वाटले. पुस्तक तसे बरे आहे. पण खपवण्यासाठी राजहंस प्रकाशनाला 'सेक्सकडे स्त्रीवादी दृष्टीकोनातून बघणार्या पुरुषाची गोष्ट' अशी जाहिरात करावीशी वाटली हे दुर्दैव. तीच गोष्ट नातिचरामीची, आंधळ्याच्या गायी आणि हंस अकेलातल्या काही गोष्टी आवडल्या होत्या. पण ही अत्यंत सामान्य दर्जाची कादंबरी. लेखिकेचे आत्तापर्यंत झालेले नाव आणि सेक्स्बद्दल फार उघड उघड लिहिले आहे अशी एक चर्चा यामुळे चांगला खप झाला आहे पण या दोन्हीपैकी कुठल्याही उद्देशाने वाचले तरी वाचकांची साफ निराशा होईल हे आधीच सांगितलेले बरे. म्हणजे ना धड गौरी देशपांडे आणि ना धड काकोडकर असे झाले आहे. (मी वर उल्लेखलेली चर्चा, वाद, टीका सुद्धा खप वाढवण्यासाठी मुद्दामच पसरवली जात असावी असे मला हाती लागलेल्या काही पुराव्यांवरून वाटते) बी, तुम्ही वर म्हटले आहे तसे मला तरी यात काहीच अवघड दिसले नाही. उलट काहीच बौद्धिक गुंतागुंत नसल्याने काळ पुढे मागे करून, बर्याचदा कोण कोणाबद्दल बोलत आहे यात चार दोन पाने संदिग्धता बाळगून कृत्रीम क्लिष्टता निर्माण करण्याचा असफल प्रयत्न केला आहे असे वाटते. दिनेश, तुम्ही हा विषय थांबवला आहे असे वाचले आहे तरीही लिहितो आहे. तुम्ही जरा जास्तच रागावला आहात लेखिकेवर असे वाटले. आणि नायिकेच्या वर्तनावरचे आक्षेपही पटले नाहीत. उदा. सिगारेट न पिणे हे चांगले मुल्य असेलही, पण ते या नायिकेने पाळावे वा या दुर्गुणाचे उदात्तीकरण करू नये असे कसे म्हणणार बहुतेक सर्व प्रथमपुरूषी निवेदन असले तरी नायिका म्हणजे लेखिका नव्हे (प्रस्तावनेतही हे स्पष्ट केले आहे), आणि ती सर्वगुणसंपन्ना आहे असा आवही लेखिकेने आणलेला नाही. एकंदरीत कादंबरी रटाळ आणि 'ड' दर्जाची आहे असे माझे मत आहे. पुण्यातल्या प्रकाशनवर्तुळातल्या संपादकांचा कानोसा घेतला तर हेच मत ऐकले. पण अशा अनेक कादंबर्या पाडल्या जात आहेत, तुम्ही यांच्यावरच का चिडलात हे कळले नाही. २५० रुपये आणि चार तास खर्च झाल्याचा एवढा मनस्ताप (कोणाला संग्रही हवे असल्यास माझ्याकडचे नवे कोरे, फक्त चार तास माझा स्पर्श झालेले पुस्तक मी २५ % सवलतीत देउ इच्छितो)
|
Ajjuka
| |
| Monday, October 10, 2005 - 6:46 pm: |
| 
|
मेघना वर झालेली, वरcई सगळी अर्cआ वाcअली. तिcया लिखाणात मला कुठेही आव किंवा smoking ए glorification हे जाणवले नाही. जे वर्तुळ तुम्ही म्हणताय ते मला थोडे जवळून परीcअयाcए आहे. पण मेघनाcए वाcअले नाही म्हणून त्या वर्तुळातून कोणी बाहेर ठेवत नाही तेव्हा तिcए पुस्तक खपले याला उगाc वर्तुळ आणि दिखाऊपणाcए माप लावू नये हि विनंती. मीना प्रभू यांcए लिखाण हे बहुतांशी प्रवासवर्णनc आहे त्यामुळे त्याcई तुलना मेघनाशी होऊ शकत नाही. तरीही मला ते प्रवासवर्णन हे आता परतल्यावर मी पुस्तक लिहिणार आहे हं! याc tone ए वाटते. मी सगळे अनुभव घ्यायला किती open minded आहे हा आव जाणवतो. हे माझे वैयक्तिक मत. हे ज्याला पटत नाही त्याला खत्रुडपणाcए विशेषण लावण्याइतका कोतेपणा माझ्यात नाही. इडली, ऑर्किड आणि मी या पुस्तकाबाबत माझिही प्रतिक्रिया अशीc काहीशी होती. he is a visionary no doubt पण त्यांcई दृष्टी कशी वाढत गेली ही वाcअणे आवडले असते भावाशी आलेल्या clashes पेक्षा.
|
Dakshina
| |
| Thursday, November 17, 2005 - 6:43 am: |
| 
|
दिनेश, तुम्हाला पण एक गोष्ट आवर्जून सांगायची होती 'नातिचरामी' बद्दल. ते पुस्तक मी सध्या वाचतेय. माझा ही अगदी तुमच्याप्रमाणेच 'तो' 'तो' 'आहो' यांचा मेळ घालताना गोंधळ उडाला... ती बंडखोर आहे ते मला पटलं आणि तुम्ही काढलेले Points पण अगदी मनापासून पटले... तिला मुलाचा सोस होता तर तिने मुल दत्तक का घेतले नाही? शिवाय मला अजुन एक प्रश्णं पडला तो म्हणजे.. मेघना पेठेंना एक एकटी बाई रंगवायची आहे खरी, पण ती संपुर्ण पुस्तकात कुठेच एकटी नाहीये... कधी 'आहो', कधी 'तो' कधी 'लोभी' कोणी ना कोणीतरी सारखं बरोबर आहेच की तिच्या.. अजुन मी पुर्ण नाही वाचलेलां पुस्तक... पण अत्तपर्यंत तरी मला हेच जाणवलय...
|
Omsai
| |
| Monday, December 19, 2005 - 7:55 am: |
| 
|
Meghana Pethe che Naticharami surekh ahe. majhya manatle ch lihilya sarkhe vatke. Ajunhi mi 100 kande ani 100 phatke donhi shikshe bhogat ahe,khup kahi samjun dekhil umjat nahi.
|
नुकतच नातिचरामि वाचुन झाले या पुस्तकाबद्दल खुप वाचले होते त्यामुळे खुप ओढ होती... खरचच अतिशय सुन्दर लिहिले आहे संग्रही अवश्य असायला हवे
|
Ravysaraf
| |
| Tuesday, February 07, 2006 - 4:32 pm: |
| 
|
Sorry for differing. So far I have read only “Naticharaami” of Mrs. Meghana Pethe. It is a bold write-up with some beautiful lines (both in Marathi and English). But many times it looks like an attempt to follow the style of Mrs. Gauri Deshpande……the way there are many poets who try to write something overwhelming using Gres’s poetry.
|
Ravysaraf माझ्या दुर्दैवाने नातिचरामि' माझ्या हाती अजून काही लागलेले नाही. ते वाचल्यानंतर कदाचित त्या पुस्तकाच्या बाबतीत मी तुमच्याशी सहमत होईनही. मी हंस अकेला' आणि आंधळ्यांच्या गायी' हे कथासंग्रह वाचले आहेत. त्यातील काही कथांचे स्वरूप, काही ठिकाणी आलेल्या दृष्टांतांमुळे, काही प्रतिमांच्या संयोजनांमुळे मला जी एंशी असणारे उपर्निर्दिष्ट साम्य जाणवले. तसे ते इतरांना जाणवले किंवा कसे, असा माझा प्रश्न होता.
|
Muktasunit
| |
| Wednesday, February 08, 2006 - 4:35 am: |
| 
|
Dineshvs, एकूण तुमचे नातिचरामि' बद्दलचे किंवा पेठे यांच्या बद्दलचे मत प्रतिकूल दिसते. मुकुंद टाकसाळे यांच्या ग्रेडींग' बद्दल काही अधिक माहिती मिळू शकेल का?
|
Surahi
| |
| Thursday, February 09, 2006 - 8:39 am: |
| 
|
evadhe je kautuk zale titake great "naticharami" mala pan vatale nahi.kahi vela tar khup bore,muddam aav anun lihilya sarkhe vatale.
|
Jyachi Tyachi Vaiyaktik aavad asane swabhavik aahe,aata nemadenche koslaa he great pustak majhya mitrala ajibaat aavadale nahi,pan mhanun tya pustakcha darja kami hot nahi,Naaticharami mi vachalay aani kharach phar spashtpane lihilay,and for me it's relly great.aani samikshakahi shevati manus aahe tyachya hi aavadi asu shaktat.
|
Raina
| |
| Monday, July 31, 2006 - 7:20 am: |
| 
|
मेघना पेठेंचे 'नातिचरामि" दुस-यांदा वाचते आहे. पहिल्यांदा वाचले तेव्हा अजिबात आवडले नव्हते.. पण त्या पुस्तकाचे एवढे कौतुक होते आहे परत एकदा वाचून पाहू म्हणुन पुन्हा वाचले.. तरीही आवडले नाहीच. प्रमुख कारण म्हणजे- " sensational for the sake of being sensational". निष्प्राण वाटते पुस्तक अगदी- काही germ असलाच तर त्यात इतके पाणी घालण्यात आले आहे- की मुळ पदार्थ ओळखु येत नाहीये. भ्रमनिरास झाला एवढं गाजलेलं पुस्तक वाचून.
|
Rangy
| |
| Monday, July 31, 2006 - 7:42 am: |
| 
|
रैना, अगदी! मी या आधी त्यान्ची कोणतीच पुस्तके वाचली नाहीत. पण एवढा गवागवा ऐकून नातिचरमि घेऊन आले, इन्डियाहून... पूर्णपणे भ्रमनिरास झाला. मागे दिनेशनी एवढ्या पोटतिडकेने या पुस्तकावर का टिका केली होती ते लक्षात आल. बाकी मेघना पेठेन्च्या बाकीच्या पुस्तकबाद्दल महित नाही. But this one is waste of time , माझ्या मते
|
Neela
| |
| Thursday, September 14, 2006 - 11:33 am: |
| 
|
mazehee Dinesh yanchyasarkhech mat aahe..mee andhyalyachya gayee wa naticharimi aaNalee..donhee ajibat awadalee naheet..ugach stom majwale aahe tyanche ase watate.
|
Critic
| |
| Thursday, October 12, 2006 - 7:25 am: |
| 
|
नमस्कार लोकहो. ही माझी पहिलीच पोस्ट. नुकतेच नातिचरामि वाचल्याने लगेच इथे लिहावेसे वाटत आहे. या पुस्तकाचं नाव खरं तर 'नॉटीचरामि' असायला हवं होतं! अशी पुस्तके वाचून आपण आपला वेळ वाया घालवू नये असं वाटलं. मराठीत अजून खूप चांगली पुस्तके आहेत. जरा बर्यापैंकी शैली व तंत्र आणि कमालीचा बोल्डनेस (तेही एका स्त्रीने लिहीलंय म्हणून) यापलिकडे काय आहे या पुस्तकात वाचण्यासारखं? एखाद्या गोष्टीवर कुठलीही भूमिका न घेता त्या अनुषंगाने येणारे सर्व विचार उलगडून दाखवणे हे खासच. पण 'कसं सांगितलंय' च्या झाकोळीत 'काय सांगितलंय' कडे पहायला नको का?एके ठिकाणी बाई म्हणतात की जगात महान कामं केलेल्या बायका बहुतांश घटस्पोटिता आहेत. हे या पुस्तकातलं सगळ्यात विनोदी विधान वाटलं मला! नायिकेच्या दु:ख़ाचं खापर बाईंनी विवाहसंस्था आणि पुरुषप्रवृत्तीच्या माथी फोडलंय. काही अंशी (दुर्दैवाने) तथ्य उरलंय त्यात अजूनही. पण पुस्तकात कुठेही नायिका आपल्या प्रियकराची(सॉरी, प्रियकरांची) बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत्ये आहे असं दिसलं नाही. आपण स्त्री आहोत याची अति जास्त जाणीव अशा प्रकारच्या लेखनातून दिसते. असो. शैली संमोहित करणारी आहे, स्त्रीने कधी लिहीलं नाही इतकं स्पष्ट लिहीलंय याउपर या पुस्तकात फ़ार काही नाहीये.
|
I totally agree with "critic"al post!...
|
Critic
| |
| Thursday, October 12, 2006 - 7:40 am: |
| 
|
रॉबिनहूड, मेघना पेठे असतीलही मोठ्या ताकदीच्या लेखिका, पण त्यांची तुलना जी.एं. शी होऊ शकेल असं मला वाटत नाही. तुम्ही ज्या मुद्द्यावरून ही तुलना केली आहे (पात्रे नियतीच्या हातातील बाहुले वगैरे), तर नातिचरामी मधे असं काही मला तरी आढळलं नाही. आणि त्यांची इतर पुस्तके अजून मी वाचली नाहीत. शितावरून भाताची परीक्षा पुस्तकांच्या बाबतीत मी करत नाही. पण गोणीवरून कोठाराची कल्पना यावी तसे मला आता त्यांची इतर पुस्तके वाचावीत का असा प्रश्न पडलाय.
|
|
|