|
सिगारेट ओढणे जितके पुरुषाला वाइट तितकेच बाईलासुद्धा. म्हणुन बाईने ओढुच नये, किंवा बाईने सिगारेट ओढणे हे साहित्यामध्ये येउच नये असे का? हा ढोंगीपणा आहे. भारतीय स्त्रीच्या मनात काय आहे याचा लेखिकेने का विचार करावा? बहुसंख्य लोकांच्या चवीनुसार लिहिणारे लेखक हे भयाण लिहितात (उदा. सुमती क्षेत्रमाडे). लेखकाचे स्वातंत्र्य कुणीही हिरावुन घेउ नये. जर पुरुष शिवराळ भाषा वापरू शकतो तर बाई का नाही. मी जे काही थोडेफार वेग-वेगळ्या समाजामध्ये वावरलो आहे (महाराष्ट्रीयन समाज), त्यातील काही समाजांमध्ये ऐकवत नाही इतक्या भयाण शिव्या बायका देतात. हे सत्य आहे. जाणुन बुजुन तम्बाखु खाण्यात काय वाईट आहे. उलट तिला जे करायचे आहे ते तिने केले असे लेखिकेला दर्शवायचे असेल. तुमचे तिनही मुद्दे हे मला पटले नाहीत कारण तुम्ही तुमच्या चश्म्यातुन पुस्तकामधील व्यक्तिमत्वांकडे बघत आहात. तुमचा दुसरा मुद्दा हा खरेतर पहिल्या तीन प्रश्णांचे कारण आहे. समाजाच्या आणि व्यक्तिच्या बांधिलकी हा संपूर्ण स्वतंत्र विषय आहे. पण जो इंडिविजुआलिस्ट असतो तो चालीरिती आणि नैतिक मुल्यांना भीक सुद्धा घालत नाही. मला पुस्तकाच्या नायिकेचे पात्र हे इंडिविजुआलिस्ट या शब्दाची व्याख्या करण्याचा प्रयत्न करणारे वाटते. आता ती व्याख्या किति बरोबर त्या नायीकेला उमजली हा पुस्तकाचा विषय. पुस्तक वाचुन चांगल्याच गोष्टींचा प्रसार व्हावा? चांगलं म्हणजे कोण ठरवणार? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्ण आहे. मला विचाराल तर माझी आई, बहिण वा बायको (जी अजुन नाहीये पण असली तर) कशी वागते हा तीचा वैयक्तिक प्रश्ण आहे. मला त्यावर भाष्य करायचा अधिकार नाही. मुलांना वाचायला देण्यासारखे हे पुस्तक नाही. पण म्हणुन वासुनाका पण नाही आणि कोसला पण नाही. मुलांना एका विशिष्ठ वयापर्यंतच वाचायला द्यावे लागते. त्यापुढे ते स्वत: पुस्तके निवडतात. मग काही जण वाचतच नाहीत, काही पु ल, व पु च्या पुढे जात नाहीत, आणि काही जण प्रचंड वाचतात. पण म्हणुन प्रत्येक लेखकाने मुलांना वाचता येइल असे साहित्यच लिहावे का? मी नतिचरामि चे साहित्यिक मूल्य खुप महान आहे असे म्हणत नाहीये. मला खटकले ते साहित्यिक मूल्यमापनाचे वरील दंडक. तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकुण कथानकच फ़ार ओढले आहे. पण म्हणुन कथेला बोल्ड असण्याची गरज नव्हती हा पुन्हा लेखकाच्या विचारस्वातंत्र्यावर आक्षेप होतोय. आधी चार अक्षरी शब्दाचे मराठी प्रतिशब्द वापरले जात असत. अगदी मुबलक पणे. फरक एवढाच कि आज इंग्रजी शब्द वापरला जातो. दारु आधीही तरुण पीढी पीत होती. तेव्हा हॉटेल मधे पीत होती. आज पब मधे पीते. प्रमाण फक्त मुलींच्या पीण्याचे वाढले आहे. परत हा ज्या त्या मुलीचा वैयक्तिक प्रश्ण आहे. बाकी सर्वांच्या मताचा आदर आहेच.
|
Chafa
| |
| Thursday, November 23, 2006 - 3:46 pm: |
| 
|
क्या बात है! शंतनु, अगदी मनातले विचार लिहिलेत. गंमत म्हणजे मीदेखील Individualism आणि Collectivism बद्दल लिहिणार होतो, पण विस्तारभयास्तव आवरते घेतले. आणि तो मुद्दा क्रमांक २ च कळीचा (चुकीचा) मुद्दा वाटल्याने तिथून सुरुवात केली. तुम्हाला 'Ditto' म्हणण्यासाठी हे पोस्ट!
|
Dineshvs
| |
| Thursday, November 23, 2006 - 6:11 pm: |
| 
|
भाग्यश्री, आपण दोघे म्हातारे झालो, आपली मुल्ये आपल्याबरोबरच संपणार. तु ईथे लिहायला नको होतेस. अगदी उबग आणणार्या एकता कपुरच्या मालिका तुफान TRP मिळवतात. आपल्या हातात काय असते ? तर त्या न पाहणे. भाषा आणि सिगरेट हे माझ्या अनेक मुद्द्यापैकी एक होते. त्यातही per se मी ते नाकारले नव्हते तर त्याचे ग्लोरिफ़िकेशन नाकारले होते. भाषा शिवराळ असली तरी अस्सल नाही, आणि नैसर्गिकहि नाही. माझे तीन धोबी, थडग्यावरची फुले, पारश्यांची विहिर सारखे बरेच मुद्दे अस्पर्षित आहेत. असो. हे पोस्ट फक्त तुझ्यासाठीच.
|
Chafa
| |
| Thursday, November 23, 2006 - 6:19 pm: |
| 
|
दिनेश, ती सत्यकथा नाही. लेखिका तिला हवे तसे संदर्भ बदलू आणि वळवू शकते एवढेच म्हणून थांबतो. भाषेच्या मुद्द्यावर आधीच विस्तृतपणे लिहिले आहेच. शिवाय मूल्ये वगैरे संपण्याचा भावनिक संघर्ष इथे कशाला? हे काही शाळेत आदर्श जीवनपद्धती शिकण्यासाठी लिहिलेले पुस्तक नाही!
|
चाफ्याची पोस्ट्स खूपच आवडली... दिनेश कधी कधी दिनेशसारखे लिहीत नाही सचिन तेन्डुलकर आज सचिनसारखा खेळला नाही असे आपण कधी कधी म्हणतो ना तसे...
|
Bhagya
| |
| Thursday, November 23, 2006 - 9:34 pm: |
| 
|
दिनेशदा, म्हातारे झालो म्हणून काय झालं? ज्या तर्हेची पुस्तके मी गेले २४ वर्षे वाचते आहे, त्यामुळेच मला हा (मूल्यांचा) चष्मा लागला आहे ना? आणि आपली मूल्ये संपायचा काही प्रश्नच येत नाही.....एक साधं उदाहरण देते. काही दिवसांपूर्वी इथे canberra ला प्रोजेक्ट समोसा नावाचा सिनेमा इथल्या तरुण पिढीने लॉंच केला. आम्ही पण गेलो होतो त्या पार्टीला. पार्टीत काही मुले मुली अगदी पिऊन टेर होती. आजच्या तरूण पिढीच्या रितीप्रमाणे boyfriend girlfriend हो! आणि गंमत म्हणजे ह्यात बरीचशी भारतातून शिकायला आलेली होती. पण काही मुले मुली अगदी व्यवस्थीत कपडे घालुन, सभ्य वर्तन करत होती. त्यांच्याकडे बघून मला 'मुल्ये' अजून शिल्लक आहेत असेच वाटले. robeen , चाफ़ा, शंतनू तुमच्या मतांचा आदर आहेचपण त्यांच्याशी सहमत नाही.
|
Bhagya
| |
| Thursday, November 23, 2006 - 9:46 pm: |
| 
|
आणि ते पण ठीकच आहे, असूच नये सगळ्यांची मते सारखी. असतील तर बोलायचे कशावर? नवीन गोष्टी, नवीन विचार यांचे आदान प्रदान कसे करायचे? आत्ताच पहाना, मला चाफ़्याची ओळ्ख नव्याने झाली. मला फ़क्त तो इब्लिस आणि वेंधळेपणाच्या BB वर भेटत होता. पण तो काय, शंतनु काय पुस्तके वाचून त्यावर प्रगल्भपणे लिहू शकतात हे पण कौतुकच आहे, (काय लिहितात ते मला पटले नाही तरी). आणि मीटिंगहून आल्यावर माझा 'बान्धीलकी' चा मुद्दा मी अजून स्पष्ट करुन सांगते. कारण तोच खटकलाय न चाफ़ा आणी शंतनु तुम्हाला?
|
दिनेश आणि भाग्यश्री, मी तुम्हा दोघांच्याही मताचा आदर राखतो. मला मान्य आहे की माझी वरील पोस्ट जरा जास्तच उद्धट झाली आहे. क्षमस्व. पण जेव्हा इंडिविजुआलिजमचा विषय येतो तेव्हा मी थोडा जास्त आक्रमक होतो. कदाचित काही वर्षांनी मीदेखील तुमच्या मतांना पाठिंबा देइन. माहिती नाही. कदाचित मी आत्ता तुम्हा लोकांएव्हडा प्रगल्भ नसेन. पण मला आत्ता जे जास्ती (रिलेटिव्ह) पटते ते मी मांडायचा प्रयत्न केला. एकाच वाक्यात सांगायचे तर, मला आत्ता ज्ञानेश्वरी पेक्षा, अल्बर्ट कामु चा Mother died today. Or may be yesterday. I dont know. म्हणणारा नायक जास्ती भावतो.
|
Raina
| |
| Friday, November 24, 2006 - 6:21 am: |
| 
|
माझा आक्षेप हा त्या पुस्तकाला glorify करण्याला आहे. त्याची जी.ए. , तेंडुलकर D.H.Lawrence वगैरेशी तुलनाच होऊ शकत नाही. १. नैतिक/ अनैतिकतेचा विचार आपापल्या परिने करायचा पात्रांना किंवा लेखिकेला पूर्ण स्वातंत्र्य आहे हे ब-याच जणांनी व्यक्त केलेले मत अगदी मान्य. त्याबद्दलची उदाहरणेही समर्पक आहेत. २. बरेचसे भडक/ अतिरंजीत प्रसंग, त्यात ठासून भरलेला एकांगी पद्धतीचा विचार, चार दोन अर्धवट व्यक्तिचित्रे असा फाॅर्म्युला वापरेलं एक पुस्तक आहे. ते लिहायच अर्थातच लेखिकेला स्वातंत्र्य आहेच.पण सगळी कडे जाऊन मी तेंडूलकरांना बाप मानते, गौरिचे आणि माझे लेखन यावर मुक्ताफळं उधळणे हे प्रकरण अक्षम्य आहे. बाई ग- तू लिही ना तुला काय वाट्टेल ते- पण स्वच्छ मान्य कर.. की मला उगाचच sensational for sake of being sensational लिहायला आवडते. मराठीतली थोड्याफार प्रमाणातली शोभा डे- असे (पाहिजे तर)स्वत:ला म्हणव. पण डायरेक्ट तेंडुलकरांच्या दाढीला हात घालू नको. त्या माणसाचे लेखन वेगळ्या पातळीवरचे आहे. ३. जेव्हा हे पुस्तक प्रदर्शीत झालं तेव्हा वृत्तपत्रात काय उदो.उदो. अगदी D.H. Lawrence शी पण तुलना केली गेली. अगदी lawrence चे Lady Chatterly's lover हे सुद्धा काही त्याचे सर्वोत्कृष्ट रचना नाहीच. त्यापेक्षा त्याचे Sons and Lovers , Women in love , Rainbow हेच अभिजात साहित्यात समाविष्ट होतात. पण सुमारे ७८ वर्षांपूर्वी प्रदर्शीत झालेल्या त्या Lady Chatterly's lover ची विचारप्रक्रिया त्या काळात कोंडिफोडु होती. पेठे बाईंनी असा तरी कुठला पायंडा घातलाय मग ह्या (नातिचरामी) पुस्तकाला path breaking वगैरे विशेषणं लावावीत का? ४.साधं मुखपृष्ट घ्या- घोडागाडिचे चित्र असलेले मग- हे रुपक- ईथपासून ठायी ठायी भेटत जातात ते cliche . "तेव्हा मी नाहीका तद्दन मेलोड्रामा मांडला होता" असं ती मीरा म्हणते ना- तेच मला ह्या पुस्तकाबद्दल म्हणावेसे वाटते. ५. an actor should not be caught acting असे म्हणले जाते. तसेच writer चे असावे असे वाटते- त्या उलट ही कादंबरी- ४-२ कल्पनांभोवती विणत जावी तशी- she gets caught while writing . म्हणुनच pretense जास्त वाटतो.ते लेखन प्रामाणिक वाटत नाही. ६. feminist writings मध्ये ही नातिचरामी फार पुरोगामी म्हणता येणार नाही. असो- .
|
अगदी रैना.. exactly .. हेच मला तीच्या लेखनबाद्दल वाटले..., गौरी देश्पांडे ची पुस्तके मी वाचली पण दोघींची तुलना होउ शकते हे मला पटले नाही. शोभा डे चे उदा..!!!
|
Chafa
| |
| Friday, November 24, 2006 - 3:03 pm: |
| 
|
धन्यवाद रॉबिन... भाग्या, तुम्ही ज्याबद्दल बोलताय तो मी नव्हे. त्या युजर चा ID 'चाफ्फा' असा आहे, माझा 'चाफा'. मूल्यांची जपणूक आम्ही देखील करतो. 'अमृतातेही पैजा जिंकणारी' परंपरा आमचीही आहे. तो मक्ता केवळ एका गटाचा (वयस्कर?) नाही. पब संस्कृती, सिगरेट, तंबाखू वगैरे आम्हालाही पटत नाही. ज्ञानेश्वरीतील संदेश आम्हालाही भावतो. पण खर्यापासून खोटे आणि फिक्शनपासून ग्लोरिफिकेशन वेगळे करता यायला हवे. हा परिच्छेद फक्त ट्युलिप आणि शंतनुसाठी. भाग्या, माझे मुद्दे मी पुरेशी पुनरावृत्ती करुन आधीच मांडलेले आहेत. आणि मला वाटतं तुम्ही देखील. तेव्हा आता नवीन कोणाला त्यांना 'नातिचरामि' कसे वाटले ते लिहायचे असेल तर लिहू देऊ यात. रैना, तुमचे काही मुद्दे एकदम पटण्यासारखेच आहेत. पण मी मांडलेले मुद्दे एकदम वेगळे होते ते तुम्ही ओळखले असेलच.
|
Tulip
| |
| Friday, November 24, 2006 - 7:31 pm: |
| 
|
अगदी मनातले बोललास चाफ़ा. मला वाटलच होत की आता चर्चा मुल्यांची जपणूक, नवी - जुनी पिढी तत्सम गोष्टींकडे वळणार. असो. व्यापक, सर्वसमावेशक साहित्यात प्रत्येक स्तरातील संस्कृतीचे बरे वाईट प्रतिबिंब पडणे अपेक्षीतच असते आणि कथा किंवा कादंबरी प्रकारात त्या त्या लेखकाला / लेखिकेला आपापल्या कुवतीनुसार, अनुभवांनुसार अथवा कल्पनेनुसार त्याचे जग मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो. लेखकांच्या अनुभव विश्वाच्या मर्यादा अनेकदा उघड्या पडतात. सर्वच साहित्य हे research based असू शकत नाही आणि कथा कादंबर्यांमधून तशी अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे. थडग्यावरील फ़ुले किंवा देवीच्या अंगावरील वस्त्रे, नारळ हे पुनर्वापरासाठी आहे की नाही हा परत त्या लेखकाच्या संवेदनशिलतेचा, मताचा प्रश्न आहे. वाचकांना ते पटले नाही तर तो त्यांचा प्रश्न. हजारो वाचकांना हजारो मते असु शकतात. लेखकने त्या मतांचा आदर ठेवून लेखन करणे कधीही अपेक्षीत नसते. कथानायीकेच्या पुढच्या वागण्यातली तर्कविसंगती वगैरे हा परत त्या लेखकाला पात्राची मनोवृत्ती कोणत्या प्रकारे कशी रंगवायची आहे ह्या त्याच्या मर्जीचा भाग झाला. काही ठरावीक समाजातील रुढी, रितीरिवाज ह्यांचे दर्शन परत अगदी research based असणे तेव्हाच अपेक्षीत असते जेव्हा त्या रितीरिवाजांना मध्यवर्ती ठेवून कथेचा किंवा कादंबरीचा विस्तार केलेला असतो. मुळात नातिचरामी बद्दल इथे मी किंवा चाफ़ा ने लिहिले ते केवळ कादंबरी संदर्भात कोणतीही साहित्यीक चर्चा करण्याकरता नव्हे तर लेखिकेला जे स्वातंत्र्य असणे अभिप्रेत आहे त्यालाच चुकीच्या मुद्द्यांच्या आधारे आक्षेप घेतला गेल्याने. मेघना च्या काही कथा मला अतिशय आवडल्या होत्या काही अजिबात आवडल्या नव्हत्या. नातिचरामी एक साहित्य म्हणून कोणत्या पात्रतेचे आहे ह्या बद्दलचीही माझीही मते पूर्ण वेगळी आहेत. पण त्या बद्दल चर्चा मुळातच चालू नव्हती. नातिचरामी मधील असंख्य गोष्टी माझ्याही sensitivity ला न पटणार्या व न झेपणार्या होत्या. वेगळे उदाहरणच द्यायचे झाले तर अशाच प्रकारे glorify केलेल्या इतकेच नव्हे तर 'गाजवलेल्या' कमलेश वालावलकरच्या 'बाकी शून्य' नावाच्या माझ्या मते 'भिकार' पुस्तकाला मी नावे ठेवते तेव्हा त्या पुस्तकाची जीवतोड भलामण करणारेही असतातच. पण म्हणून 'बाकी शून्य' चा नायक स्वत्:ला उध्वस्त वगैरे ज्या प्रकारे करतो तो मार्ग मला न पटणे, लेखकाने स्त्री पत्रकाराचे पात्र त्यात ज्या प्रकारे स्वैराचारी, दारु, सिगरेट पिणारे रंगवले आहे ते मला पटणे न पटणे हा माझ्या 'वैयक्तिक' sensitivity चा भाग झाला. त्या साठी मी कमलेश वालावलकरने असे लिहिणेच मुळात चुकीचे आहे वगैरे आक्षेप घेतले तर ते नक्कीच 'चुकीचे' मुद्दे ठरतील. त्याने त्याला हव्या त्या पद्धतीने लिहिण्याचे, पात्र रंगवण्याचे स्वातंत्र्य आहे ( तसेच मेघनालाही तिची नायिका शिव्या देणारी, सिगरेट पिणारी दाखवण्याचे स्वातंत्र्य आहे ) आणि मला किंवा कुणाला ते पुस्तक आवडले की नाही ते ठरवण्याचा अधिकार आहे. नुकतेच एका दिवाळी अंकात गौरीच्या तेरुओ ला झोडपून काढणारा असाच एक लेख वजा पत्र आहे. पत्रलेखक म्हणतो .. तेरुओ ज्यांना ज्यांना आवडली त्यांनी कोणीच तेरुओ च्या बायको बद्दल किंवा नायीकेच्या पती बद्दल विचार केलेला नाही का? कादंबरी आवडणार्यांना विवाहबाह्य संबंधांबद्दल काहीच sensitivity नाही का? त्यांना हे कसे रुचते, विशेषत्: स्त्रियांना वगैरे वगैरे ... आता त्या संदर्भात पण असेच म्हणायला हवे की लेखिकेला पुर्ण स्वातंत्र्य असते तिने कोणत्या प्रकारची relationship कशी दाखवावी ह्या बद्दल. जे तेरुओ आवडली म्हणतात त्या सार्यांना विवाहबाह्य संबंध मान्य असतात असा अर्थ काढणे हास्यास्पद आहे. आणि गौरीने तसे लिहीणेच चुकीचे असे म्हणणेही. इतकेच. .
|
Bhagya
| |
| Sunday, November 26, 2006 - 10:07 pm: |
| 
|
दोन युजर आयडी आहेत एक चाफ़ा आणि एक चाफ़्फ़ा हे मला माहितच नव्हतं. एनी वे, मला जी बांधीलकी अभिप्रेत आहे ती थोडक्यात अशी: शिक्षक, आई-वडील यांच्या वर्तनातून मुले काही मुल्ये उचलतात. त्यांच्यावर योग्य ते संस्कार व्हावे, म्हणून शिक्षक आणि आई-वडिलांकडून योग्य वर्तनाची अपेक्षा असते. तसेच सिनेमा दिग्दर्शकाकडून अपेक्षा असते की त्याने आपल्या सिनेमातून wrong message देऊ नये. याबाबतीत बरीच ओरड आपण वृत्तपत्रांमधून वाचतोच. राजकीय नेते हे स्वच्छ चारित्र्याचे आणि प्रामाणिक असावेत ही पण एक अपेक्षा असते. तसेच माझ्या मते पुस्तकांमधून पण, काही अंशी का होईना समाजाला चांगल्या गोष्टींची ओळख होणे, चांगली मूल्ये प्रदर्शीत होणे अपेक्षित आहे. अर्थात, या फ़क्त अपेक्षा झाल्या. म्हणून माझ्या पोस्ट मध्ये मी स्पष्ट लिहिलेच आहे की ही अलिखित बान्धिलकी असते, नैतिक जबाबदारी असते. वास्तवात हे असे घडत नाही. आणि म्हणूनच तर राजकीय नेते लाचखाऊ आणि डागाळलेल्या चारित्र्याचे असतात, सिनेमे वेडेवाकडे काढले जातात आणि पुस्तके पण कशीही लिहिली जातात. लेखकाचे लेखनस्वातंत्र्य अगदी मान्य आहे आणि त्याने समाजातल्या बर्या वाईट गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या लेखनात पाडणे हे पण ठीकच आहे, पण ते वास्तवाला धरून असावे. आणि हे पुस्तक त्या आणि अनेक बाबतीत थिटे पडते. शिवाय आधी एकदा लिहिल्याप्रमाणे मी मेघना पेठेंची तीन्ही पुस्तके एकापाठोपाठ वाचली आणि तेव्हाच लक्षात आली ती त्यातली नको त्या गोष्टींची ची पुनरावृत्ती. आणि शंतनू, तुला क्षमा मागण्याची काही गरजच नाही. कारण हा बी बी या लेखिकेच्या साहित्यासाठी आहे आणि प्रत्येकाला आपला अभिप्राय, जसा आहे तसा मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहेच. so everybody chill .
|
Malavika
| |
| Monday, November 27, 2006 - 7:38 pm: |
| 
|
चाफा आणि ट्युलिप ला १००% अनुमोदन. मी असे म्हणीन की साहित्यात सर्व तर्हेच्या अनुभवांचे प्रतिबिंब पडले तर त्या त्या भाषेतील साहित्य समृद्ध होते. मग अमुक एक अनुभव लिहु नयेत असे म्हणून कसे चालेल?
|
Sashal
| |
| Thursday, December 07, 2006 - 9:39 pm: |
| 
|
बरीच चर्चा झालीये म्हणून हा बीबी वाचून काढला .. मेघना पेठे या St. Xavier's College चे एकेकाळचे vice-principal प्रो. मोरेश्वर व्ही. पेठे ह्यांची कन्या, असं नेट वर वाचलं ह्या लिंक वर http://www.xaviers.edu/campus.htm
|
Chetnaa
| |
| Friday, December 08, 2006 - 12:54 pm: |
| 
|
naticharami baddal sarvanchi post wachale.tyatil page no.105 to 140 madhe group discussion ahe.topart khup chhan jamlay.mala watate ata yawar thodi charcha karayla havi.
|
Dineshvs
| |
| Friday, December 08, 2006 - 4:58 pm: |
| 
|
रॉबीन, मला खरेच ईथे यायचे नव्हते. सचिन आणि माझी तुलना गैर आहे रे. एक रास सोडली तर त्याच्या माझ्यात काहिच साम्य नाही. आणि जर पेठेबाईना वाट्टेल ते लिहायचे स्वातंत्र्य आहे, तर मला साधे मत मांडायचे का नाही रे ? माझे मुद्दे ईथे कुणीहि लक्षात घेतले नाहीत, अरे साधा शिवराळ भाषेचा मुद्दा घे. मी फक्त त्या भाषेच्या कम - अस्सलपणाचा मुद्दा मांडला होता. आणि त्या पात्राने तशी भाषा वापरण्याबद्दल नापसंती दाखवली होती. जर तिने त्या भाषेतला " अमुक " असा शब्द वापरला असेल तर त्या जागी " तमुक " असा शब्द हवा होता. हे फरक सुक्ष्म असले तरी मला माहित आहेत, पण माझ्या पातळीवर लिहायचे असेल तर असे थेट शब्द मला लिहिता येणार नाहीत. पण एक आडवळणाचे उदाहरण द्यायचे तर चाकु या शब्दाचा एका गुंडाच्या तोंडी उच्चार च्य न वापरता चमचा, मधला च वापरुन केला तर चालेल का ? पारश्यांच्या पवित्र विहीरीबद्दल मी खरी परिस्थिति लिहिली आहेच. आता त्या बाईने त्या विहिरित प्रेते टाकतात, त्या खायला वर घरी घिरट्या मारतात अशी विधाने केली, तर तेहि तिचे स्वातंत्र्य मानायचे का ? एखाद्या पारश्याला हे रुचेल ? अगदी भर रस्त्यावर, जिथुन दिवसाकाठी लाखो लोक जातात, तिथे असे घडु शकेल ? हे बाईंचे भास मानायचे का ? वारंवार जर पेठेबाईंच्या स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला जातोय, तर तिच्या विरुद्धात लिहिणार्यांच्या स्वातंत्र्याला का आक्षेप घेतला जातोय ? तिने कम अस्सल भाषा वापरायची, तर बाईचे स्वातंत्र्य ? कुठलिही विपर्यास्त विधाने करायची, तर बाईंचे स्वातंत्र्य. ? एकदा गरिब मुले कॅथलिकांच्या कबरीवरची फुले विकतात, म्हणुन ती नाकारायची ते पटवुन घेतले तर तिने रस्त्यावरचे मुल उचलुन घरी आणुन त्याचे लाड केले, कसे पटवुन घ्यायचे ? मानवाच्या स्वभावात टोकाचे बदल होतात. सखाराम बाईंडर मधली, गरिब लाचार लक्ष्मी, चंपाच्या खुनाला प्रवृत्त करण्याईतकि कठोर होवु शकते, ते सादर करायला तेंडुलकरांची लेखणी लागते. आहे बाबा, आमची नायिका व्हिमसिकल, असा बचाव करुन चालत नाही. या पेक्षाहि जास्त दर्जेदार, अर्थात माझ्या मताने, पुस्तके मराठीत आली आहेत, पण याच पुस्तकावर जी पद्धतशीर रितीने चर्चा घडवुन आणली जात आहे, ती केवळ एकता कपुरच्या तोडीचीच आहे. अजुन तीन धोब्यांचा मुद्दा बाकि आहेच म्हणा. आता त्याचे संदर्भ काय ते सांगुन टाका बघु. असो. हेहि पोस्ट फक्त तुझ्याचसाठी.
|
Shonoo
| |
| Sunday, December 10, 2006 - 4:28 am: |
| 
|
ते तीन धोब्यांचं प्रकरण मी पहिल्यांदा वाचलं तेंव्हा मला ती फक्त पानं भरण्याची युक्ती असेल असं वाटलं. मग वाटलं की नुसती पानं भरायला इस्त्रीवाले कशाला हवेत? नक्की काहीतरी रूपक असेल किंवा काही गर्भितार्थ असेल. म्हणून परत एकदा सावकाशीने वाचलं. तेंव्हा वाटलं की नायिकेच्या आयुष्यात पुरुष येतात आणि जातात त्याचं हे इस्त्रीवाले म्हणजे प्रतीक असावेत ( म्हणजे ड्रायव्हर, वेळी अवेळी प्लम्बर, सुतार, इलेक्ट्रिशीयन वगैरे कामं नवर्याकडून करून घेण्यार्यांना अगदीच वाईट वाटू नये :-) . पण ते इस्त्रीवाले आणि तिच्या आयुष्यातले पुरुष यांच्यातही काही साम्य मला आढळलं नाही. त्यामुळे सध्या तरी मला ते इस्त्रीवाले प्रकरण म्हणजे पानभरू वाटतंय. इथे इतकी चर्चा चाललीये म्हणजे आता देशातून येताना पुस्तक आणावच लागेल.
|
Dineshvs
| |
| Sunday, December 10, 2006 - 4:48 pm: |
| 
|
शोनू, मग पैसे फुकट गेले म्हणुन नाही हं म्हणायचे. GS1 कडे सवलतीच्या दरात मिळु शकेल. वर माझा एक मुद्दा राहिला होता. रॉबीनला जसे माझे पोस्ट माझ्या स्वभावाविरुद्ध वाटले, तसेच मला ती भाषा नायिकेच्या तोंडी विसंगत वाटली. असो, माझे मुद्दे खोडुन काढण्यापेक्षा, अगदी वस्तुनिष्ठपणे त्या पुस्तकाची थोरवी, कुणीतरी सांगायला हवी होती. म्हणजे माझे मतस्वातंत्र्य अबधित राहिले असते.
|
बेकार पुस्तक आहे हो अगदी. भाषा कशी आहे, नायिका अमुक एका प्रकारेच का वागते (psychic वाटली मला), तपशिलात चुका काय आहेत याचा इथे संबंध नाही. मला नाही आवडले. That's it.
|
Bee
| |
| Friday, May 20, 2005 - 12:48 am: |
| 
|
TuilapÊ maoGanaa pozoMcaM naaitcaramaI maI vaacala Aaho. tI ek kadMbarI Aaho. maI Ait krNaar naahI. maaJaI
vaagaNaUk (a caÝkTItca rahIla. kadMbarIcaI XaOlaI hI jara inaraLI Aaho. svagatasaarKI. pNa AaMQaL\yaacyaa
gaayaI AaiNa hMsa Akolaa (a dÜna kqaa saMga`hacyaa maanaanao naaitcaramaI jara tÜkDI vaaTlao. kadMbarI
vaacaUna Jaalyaavar Asao vaaTlao %yaa kqaaca AiQak Cana ilaihtat. maQyaMtrI kuNaItrI not w/o my daughter (a pustkacao naava [qao ilaihlao hÜto. %yaaba_la %yaa vya>Icao Qanyavaad. KUp sauroK Aaho pustk.
|
Mi_anu
| |
| Thursday, June 07, 2007 - 9:15 am: |
| 
|
काल नातिचरामि ग्रंथालयातून घेऊन वाचली. मला डोक्यात प्रकाशच पडेना काही पानं वाचल्यावर पण. दोन नवरे आहेत हे मी हा बीबी आधी वाचलेला असलेल्याने कळलं. खूप गोंधळायला होतं पूर्ण पुस्तकभर. फ्ल्याशब्याक कधी आणि वर्तमान कधी ते लवकर कळत नाही. एकंदरीत विशेष खास आणि विकत घेऊन वाचावं असं अजिबात वाटलं नाही मला तरी.
|
याबाबत आपण मायबोलीवरील स्वयंघोषित समीक्षक श्री. दिनेश यांचेशी चर्चा करावी...
|
'सगळेभर' बकवास अणि 'विभोर' आचरटपणा..पैसे अणि वेळ दोन्ही वाया.. बाईंच्या वाटेला परत जाणे नको.. तुमचे चालु द्या....
|
|
|